ज्योतिषसल्ला हवाय - ब्रेनट्यूमरची पेशंट

Submitted by limbutimbu on 6 March, 2015 - 06:57

विशेष सुचना: या धाग्यावर गंभिरपणे ज्योतिष/कुंडलीविषयक मार्गदर्शन विचारले आहे. व ते ज्यांना करणे शक्य आहे त्यांनी जरुर करावे.
मात्र अन्य कोणीही, खास करुन ज्योतिषावर विश्वास नसणारे, देवधर्म यांना न मानणारे, बुद्धिवादी, अन्निसवाले-श्रन्निसवाले, समाजवादी, निधर्मी, नक्षली यांनी इकडे फिरकू नये, हा धागा व विषय त्यांचे करता नाही.

जातकः स्त्री
जन्म दिनांक: ०३/१०/१९६९ रात्री ०.४० (२ ऑक्टोंबरची रात्र, उजाडती ३ ऑक्टोंबर),
स्थळः पुणे
मिथुन राशी, आर्द्रा नक्षत्र १ चरण, लग्न मिथुन राशी, पुनर्वसु नक्षत्र
अन्य माहिती:
विवाह मे, १९९५
अपत्यप्राप्ती मे १९९६ (मुलगी) व जानेवारी, २००४ (मुलगा)

या व्यक्तिला, ब्रेनट्यूमरचे निदान मे, २०१० मधे झाले, व ब्रेन ट्यूमरचे पहिले ऑपरेशन लगेच झाले.
त्यानंतर आजवर ४ ते ५ ऑपरेशन्स झाली असून, जवळपास १२ वेळा केमोथेरपी झाली आहे.
आता परिस्थिती बिकट आहे.
४/५ ऑपरेशन्स व १२ वेळा केमो, हा एक चमत्कारच म्हणावा लागेल.

नातेवाईक "निदाना बद्दलच" साशंकता व्यक्त करताहेत.
त्याचबरोबर, आता हे कसे व किती वेळ चालणार, अजुनही पुढे केमोथेरपी, व त्याचे साईड इफेक्टस टाळण्यासाठी स्टेरॉइड्स यांचे उपचार चालूच ठेवायचे वा नाही याबाबत संभ्रमात आहेत.

मायबोलीवरील ज्योतिषी मंडळींना नम्र विनंती, की या कुंडलीबाबत काही आशादायक स्थिती असल्यास तसे इथे कळविणे.

(ता.क. ७ व ८ मार्चला मी इथे प्रतिसादासाठी उपलब्ध नसेन, तरीही आपापली प्रतिक्रिया मात्र जरुर नोंदवावि ही विनंती)
धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्री लिंबूटिंबू जी,

या व्यक्तीचा विवाह १६ व्या वर्षी झाला? पहिले अपत्य १९९६ मध्ये आहे . १९८५ मध्ये विवाह ही टायपिंग ची चूक तर नाही ना?

<<या व्यक्तीचा विवाह १६ व्या वर्षी झाला? पहिले अपत्य १९९६ मध्ये आहे . १९८५ मध्ये विवाह ही टायपिंग ची चूक तर नाही ना?>>
---- १९९५ असे असेल.... ९ च्या जवळची ८ कळी नजरचुक असावी असे वाटते...

ब्रेन ट्युमरने ग्रासलेल्या व्यक्तीला परिस्थितीशी सामना करण्यासाठी शुभेच्छा...

..

मृत्युयोग अचूक वर्तवणारे काही ज्योतिषी असतात परंतू त्या भाकिताचा नक्की फायदा काय?व्यवहाराने पाहिले तर जे काही दुसऱ्यास द्यायचे आहे ते देऊन झाले की जातक मरतो.

पुढे महत्वाच्या घटनांच्या तारखा देतो आहे.
विवाहः ०७ मे १९९५
प्रथम अपत्य (मुलगी) १५/०५/१९९६
द्वितीय अपत्य (मुलगा) १६/०१/२००४
प्रथम नोकरी लागली (LIC) मे, १९९०
रोगनिदानः ०१ मे, २०१० (फिट आली होती)
पहिले ऑपरेशनः २०/०५/२०१०
दुसरे ऑपरेशनः ०८/११/२०१२

(बाकी ओपरेशन्स व उपचारांच्या तारखा सध्याच्या परिस्थितीत विचारून घेऊ शकलो नाही, व वरील तपशील उपलब्ध असताना तशी आवश्यकता भासुही नये असे वाटते).

लग्न व चंद्र रास एकच मिथुन तरी नक्षत्र भिन्न. लग्न पुनर्वसु नक्षत्रावर २ चरण, तर चंद्र आर्द्रा नक्षत्री १ चरण ८.४२ अंश.
सप्तमात धनुचा मंगळ १३.५३ अंश गुरुचे पूर्वाषाढा नक्षत्रात,
रवि १५.५८ अंश, बुध वक्री ९.०६ अंश व गुरु २१.२७
अंश व हर्षल ११.१५ अंश तर प्ल्युटो २.०२ अंशावर चतुर्थात कन्या राशीत.
शुक्र तृतियस्थानी सिंहेला १८.२१ अंश तर केतु तिथेच २७.४८ अंशावर.
शनि लाभस्थानी मेषेला १४.०२ अंशावर.
षष्ठस्थानी वृश्चिकेस नेपच्युन ३.१९

चंद्र प्रतियुति मंगळ, रवि युति बुध व हर्षल, रविबुध केंद्र मंगळ, शुक्र अर्धलाभ रविबुध, शुक्र नवपंचम मंगळ, शुक्र नवपंचम शनि, शनि षडाष्टक रविबुधहर्षल, शनि नवपंचम मंगळ. नेपच्युन लाभयोग प्ल्युटो

विशोत्तरी दशेप्रमाणे शनिची १९ वर्षांची (०२/०१/२००१ ते ०२/०१/२०२०) दशा, त्या अंतर्गत ०५/०७/२०१३ पर्यंत चंद्राची अंतर्दशा व नंतर मंगळाची १४/०८/२०१४ पर्यंत, पुढे राहूची २०/०६/२०१७ व नंतर गुरूची ०२/०१/२०२० पर्यंत आहे.

२०१३ मध्ये माझ्यामते मी कळविल्याप्रमाणे, सर्व वैद्यकीय टेस्ट्स पुन्हा स्वतंत्र ठिकाणी करुन डॉक्टरांचे सेकण्ड ओपिनियन घेणे उचित ठरले असते.

कृपया जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा.

Sad
ब्रेन ट्युमर..
त्या किमो, त्याचे साइड एफेक्ट्स आणि सर्वच बाबतीत साशंकता.
वाइट्ट्ट...

देव त्या कुटुम्बास ह्यातुन बाहेर पडायला धैर्य देवो हीच प्रार्थना

झकोबा, अरे ही माझी सख्खी "आतेमेव्हणी" आहे. दिसायला सुंदर, उच्चशिक्षित (सी.एस., एल.एल्.बी इत्यादि), हुषार, कष्टाळू वगैरे.
समहाऊ, मला पहिल्यापासूनच "ब्रेनट्यूमर" या निदानावरच शंका येत्ये.
पण ते खरे मानले तरी, ट्युमर लहान मेंदुचे खाली अवघड जागी असल्याने पूर्ण निघत नाही.
अन तरीही इतकी ऑपरेशन्स/इतक्या सन्ख्येने केमोथेरप्या सहन करुन ही व्यक्ति अजुन टीकून आहे, याच्या मागचे रहस्य काय?
मागे माझ्या मामेबहिणीला ब्रेनट्युमरच झालेला, एक ऑपरेशन व दोन केमोथेरपी नंतर निदान झाल्यापासून आठ/नऊ महिन्याचे आत ती गेली. ती तशी जाईल हे माझ्या दुसर्‍या एका डॉक्टर मावसभावाने सांगितले होते.
पण या केसमधे हे काय होतय? मुम्बईतले व पुण्यातले नावाजलेले डॉक्टर्स उपचार करताहेत.
किती होप्स ठेवायच्या, कुठवर ठेवायच्या, कशावर ठेवायच्या? काय सांगावे?

बायोप्सी रिपोर्ट बघा लिंबु.

ब्रेन ट्युमरचा एक पेशंट एक वर्षात गेला म्हणजे हा रुग्णही तितकाच्काळ जगावा की काय ?

मुम्बैच्या कोणत्या डॉक्टरकडे उपचार सुरु आहे ?

काऊ, मी पेशंट (जातक) व्यक्तिचे तसेच उपचार केलेल्या/करणार्‍या डॉक्टरांची नावे सांगू शकत नाही.
तसेच, मी डॉक्टरी अँगलने डॉक्टरांकडून सल्ला विचारीतच नाहीये तर आता धर्म-गूढशास्त्रीय ज्योतिषविद्येद्वारे काहि थांग लावू पहातोय. ज्योतिषी सल्ला विचारतो आहे.
डॉक्टरी उपचारांचा/सनावलीसहित घटनांचा उल्लेख ज्योतिषास त्या त्या वेळच्या गोचर ग्रहभ्रमणावरून काही मदत व्हावी व वस्तुस्थिती कळावि या हेतूने आहे.

लिम्बु शेठ.
रहस्य माहिती नाही.
पण माझ्या सासुबाई डॉ नी "सहा महिने जास्तीत जास्त" अस निदान केलेल असतानाही चारेक वर्षे ते ही कसलाही औषधोपचार न करता होत्या. अर्थात त्यांना त्रास होत होताच.

झकोबा, माझ्या काकाला ब्लडकॅन्सर झाला होता, सहा महिन्यातील उपचारानंतर शेवटच्या घटका मोजत असताना त्याच्याच हट्टाखातर त्याला अ‍ॅम्बुलन्समधे घालून कोकणातील आमच्या गावच्या मूळ घरी अन कुलःस्वामीच्या दर्शनाला नेले., तेथुन परत आल्यावर तो साडेतीन वर्षे होता. Happy

>>> मग पुन्हा साडेतीन वर्षानी पुन्हा दर्शनाला न्यायचे की. <<<<
नेले असते, पण तशी संधी मिळाली नाही अन डायरेक्ट तिरडीवरच घालावे लागले...

काउ, या आयडीमागे तू जो कोण नर वा नारी असशील तो/ती, तुझी वरली कॉमेण्ट तद्दन मवाली, असभ्य, अशिष्ट व घाणेरडी आहे, तरी तुला साजेसे, व तुझ्यासारख्यालाच आवडू शकेल असे उत्तर दिले आहे.

ह्या पत्रिकेत वक्री बुध ( लग्नेश ) युती हर्षल ह्याचा मंगळाशी केंद्रयोग आहे . तसेच वक्री शनि पण बुध हर्षल युतीच्या षडाष्टकात आहे. हे योग ब्रेन tumer च्या दृष्टीने पुरेसे बोलके वाटत आहेत . त्यामुळे निदान चुकत असण्याची शक्यता कमी वाटते . मेंदूच्या दुखण्या मध्ये बुध बिघडलेला आढळून येतो . तसेच बुधवार मंगळाचे कुयोग पण असतात .

अन्विता, बरोबर आहे तुमचे.
पण प्रथमेश चतुर्थेश बुध चतुर्थात, व जे काही महत्वाचे कूयोग होतात ते चतुर्थस्थानाशी संबंधित होत असल्याने मला कुठेतरी गृहसौख्य/माता यांचेबाबतीतही तृटी आढळायला हवी होती. तशी ती नाहीच, शिवाय भुतकाळात वयाच्या ४०व्या वर्षापर्यंत साधी डोकेदुखीही नाही, वा अन्य कोणतेही आजार नाहित. मी महादशांचा मागोवा घ्यायचा प्रयत्न केला पण क्ल्यू मिळत नाहीये.
आता शेवटी नवरा व अपत्ये यांच्या कुंडली तपासून बघणार आहे.

श्री. लिंबूटींबू जी

पत्रिका बधितली, जातकाच्या जम्नवेळेत चूक असण्याची शक्यता. मी जातकाच्या आयुष्यात घडलेल्या काहि 10 -12 (सध्या एव्हढ्याच पुरे) घटनांची यादी तयार केली आहे. जातकाच्या आयुष्यात त्या घट्ना केव्हा घडल्या असाव्यात याची मी जी वर्षें सांगतोय ती तीच आहेत का याची खात्री करुन घ्यायची आहे. माझ्याशी संपर्क साधा suhas मग एक डॉट astro मग एक डॉट मग जीमेल मग एक डॉट आणि कॉम.

लिंबुटिंबु

मात्र अन्य कोणीही, खास करुन ज्योतिषावर विश्वास नसणारे, देवधर्म यांना न मानणारे, बुद्धिवादी, अन्निसवाले-श्रन्निसवाले, समाजवादी, निधर्मी, नक्षली यांनी इकडे फिरकू नये, हा धागा व विषय त्यांचे करता नाही.

ही प्रवेशबंदी करून तुम्ही चर्चा लिमिटेड केली आहे. तुमचा प्रॉब्लेम जेन्युईन आहे. तुम्हाला व्यत्यय नको आहे हे पण ठीक. जर हे शास्त्र असेल तर अज्ञानी लोकांनाही त्याचा लाभ होईल. आणखी एक पर्याय उपलब्ध होईल. त्यासाठी या विषयावर चर्चा व्हायला पाहीजे.

पण हे शास्त्र आहे किंवा नाही याबद्दल खात्री न होता इतर कुणी इथल्या चर्चेतून प्रेरणा घेत असे उपचार केले तर ?

या बाफवर ही चर्चा नको आहे हे ठीक. पण अन्यत्र व्हायला तुमची हरकत नसावी. तसच तुम्ही जसा नो एण्ट्री चा बोर्ड लावला आहे तिथेच वैधानिक इशारा द्यायलाही विसरू नये. (ज्यांचा या शास्त्रावर ठाम विश्वास आहे त्यांनीच इथे यावे, इतरांपैकी कुणी अपु-या माहीतीवर इलाज केल्यास आणि रुग्ण दगावल्यास आम्ही जबाबदार नाही वगैरे )

पटलं तर घ्या.

>>>> पण हे शास्त्र आहे किंवा नाही याबद्दल खात्री न होता इतर कुणी इथल्या चर्चेतून प्रेरणा घेत असे उपचार केले तर ?
तिथेच वैधानिक इशारा द्यायलाही विसरू नये. (ज्यांचा या शास्त्रावर ठाम विश्वास आहे त्यांनीच इथे यावे, इतरांपैकी कुणी अपु-या माहीतीवर इलाज केल्यास आणि रुग्ण दगावल्यास आम्ही जबाबदार नाही वगैरे )<<<<
बाळू, या आयडीमागे जे कोण असाल ते, तुमच्या वरील दोन वाक्यातून व्यक्त होणारी कायदेशीर कारवाईची गर्भित धमकी तेवढी मी समजून घेतली आहे व मी माझ्या शब्दरचनेतून सुयोग्य काळजी घेतोच आहे. धन्यवाद.

ह्या पत्रिकेत वेळ चुकण्याची शक्यता आहे. जी बऱ्याच वेळा शक्यता असते. परंतु तरीही त्यावेळेस चे ग्रहयोग तसेच राहतील मात्र भाव , लग्नरास (कदाचित) बदलेल .त्याप्रमाणे दशा बदलतील . दशा कोणते भाव देत आहेत ते पण बदलेल.
म्हणजे इथे ह्या आजाराकरता हे ग्रहयोग कारणीभूत वाटतात. ते जरी चतुर्थातून होत असले तरी त्यांनी त्याचे फळ आजार ह्या रूपातून दिले आहे.बुध- हर्षलाच्या योगामध्ये अचानक आजारपण येण्याची शक्यता असतेच .
बाकी केव्हा आजार झाला त्याकरता मग दशा,गोचर इ. बघावे लागेलच आणि त्यासाठी अचूक जन्मवेळ लागेल.
( जन्मतारीख चुकण्याची शक्यता कितपत आहे? )

जन्मतारीख चुकण्याची शक्यता कितपत आहे? >>>

बरीच ! मी के.पी. चे रुलिंग प्लॅनेट्स वापरत नाही , माझ्या खास वेगळ्या (शिक्रेट) मेथड्स आहेत त्याच्या आधारवर सांगतो , जातकाच्या आयुष्यातल्या ज्या काही दोन चार घटनां दिल्या आहेत त्यावरुन जन्मवेळ चुकली आहे असे वाटते.

limbutimbu

पत्रिकेवरून भविष्य सांगणे ह्यातलं काही मला काळत नाही पण २ अध्यात्मिक उपाय माहित आहेत . दत्त महात्म्य मधला १० अध्याय किवा मग गुरु चारीत्रातला १३ वा अध्याय . त्याचबरोबर दत्ताप्रीतीकारक स्तोत्र (ज्याला अघोर कष्टोउद्धरण स्तोत्र असं पण म्हणतात)

Pages