कॅलिफोर्नियाचं कोकण झालंय का नाही हे पाहण्याच्या मिषानं यंदाच्या उन्हा़ळ्याच्या सुटीत (जून-जुलै २०१५) तिथे प्रस्थान ठेवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. तर तिथे राहणार्या / न राहणार्या / राहून आलेल्या / रहायला जाणार असलेल्या / न जाऊनही सल्ले देण्यास उत्सुक असलेल्या अशा सर्व सज्जनांकडून खालिल मुद्द्यांवर सल्ले अपेक्षित आहेत :
१. आम्ही ३ ते ४ आठवडे तिथे असू. कुपर्टिनो बेस ठेऊन आजूबाजूला भटकून येण्याचा मानस आहे. त्यामुळे कुपर्टिनो मध्ये एखादं अपार्टमेंट (२-३ बेडरुम्स) हायर करणार आहोत. हाऊसही चालेल. गेटेड कम्युनिटी असेल तर उत्तम. अशा घराबद्दल कोणाला कल्पना असल्यास सांगावे. कोणता एरीया मध्यवर्ती पडेल ते ही सुचवावे.
२. सेफ्टी इश्शुज काय आहेत?
३. लेकीकरता एखादा आर्ट्/क्राफ्टचा समर कोर्स असेल तर प्लीज सुचवा. १ किंवा २ आठवड्याचा असेल तर जमू शकेल.
४. कार हायर करण्याबाबत काही सल्ले असतील तर नक्की द्या. इथून इंटरनॅशनल लायसन्स घेऊन आलं तर तेवढं पुरेसं आहे की तिथेही कच्चं लायसन्स काढावं लागेल?
५. जवळपासची, सहसा माहित नसलेली पण प्रेक्षणीय स्थळे सुचवलीत तर छान होईल.
६. खाण्यापिण्याची फेमस ठिकाणं सुचवालच.
७. अजून काही मुद्दे राहिले असतील तर नम्रपणे ध्यानात आणून द्यावेत.
विसु: सज्जन शब्दामुळे बिचकू नका. तो असाच लिहिलाय. तुम्ही सल्ले द्या बिन्दास!
residence inn मधे पण चांगली
residence inn मधे पण चांगली स्वयंपाकघरे वगैरे असतात. सकाळी फुकट मोट्ठा ब्रेकफास्ट असतो. काही दिवशी संध्याकाळी पण भरपुर खायला असते. मुख्य म्हणजे स्वच्छ्ता करायची कटकट नाही, ते रोज येऊन करुन जातात. गरम पुल, जीम वगैरे तर असतेच, व्यायाम करायचा असेल तर वा कुठे न जाता दमल्यास नुसतेच डुंबायचे असेल तर.
एलेला मेळावा भरत असेल आम्ही इथल्या माबोकरणी कदाचीत यायचा विचार करु.
----------
आणि हो, लायसन्सचे आमच्या राज्यात तरी पुर्वी वेगळा नियम होता. IDP वर गाडी चालवायची असेल तर शेजारी अमेरिकेचे लायसन्सधारी बसावाच लागायचा त्याशिवाय गाडी चालवणे नियम्बाह्य होते. भारताच्या नेहमीच्या लायसनवरपण चालवता येते हे माहिती नव्हते.
सगळ्यांच्या सुचनांबद्दल
सगळ्यांच्या सुचनांबद्दल धन्यवाद.
@ कंसराज
26 February, 2016 ला मिळतील तूम्हाला सूचना व सल्ले.
>>> वाट बघतेय.
@ चनस
मामी.. ठिकाणं सुचवतेय.. पहिले वेगास हॉलीवुड, युनिव्हर्सल स्टुडिओज, योसेमाईटी (गर्मी असेल का?) .. बाकी सिलिकॉन व्हॅलीतच राहताय..
बाकी बेकर्स सांगतीलच
>>> हो ती नेहमीची यशस्वी ठिकाणं तर करणार आहेच.
@ सशल
बाकी विवेचन येईलच प्रेक्षणीय जागांबद्दल पण बेकरीकरही अगदी प्रेक्षणीय आहेत .. एकदा तरी भेटाच त्यांनां .. >>> सगळी प्रेक्षणीय स्थळं बघणार.
@ बस्के
मामी, लॉस एंजिलीसमध्ये आलीस की माझ्याकडे कम्पलसरी यायचे. आपण फिरू सगळीकडे मग! बेकरीच्या गटगला मी तिकडे येऊ शकते तेव्हा. मी समरमध्ये तिथे असायची शक्यता आहे!
>>> ऑफकोर्स बस्के. भेटूच नक्की.
@ फारएण्ड
बाय द वे. स्पेसिफिकली कुपर्टिनोच का? मध्यवर्ती हवे असेल तर सनीवेल, सांता क्लारा, सॅन होजे, फ्रीमॉण्ट, मिलपीटस चे बरेच भागही आहेत. कुपर्टिनो चालेलच पण थोडा वाईड एरिया ठेवा सर्च करायला.
>>> आधी कोणीतरी सांगितले म्हणून कुपर्टिनोवर फोकस होता. पण आता चालेल थोडं इकडे तिकडे.
मामी, भारतातून येउन एक महिन्याकरिता घर रेण्ट केल्याचे ऐकले नाही. तरी या साईटवर चेक करा
www.vrbo.com
>>> लिंककरता धन्यवाद, फारेंड.
@ श्री, रमड, बस्के, सीमंतीनी
तुमच्या प्रतिसादांवरून बेकरी गटगची देदिप्यमान परंपरा लक्षात आलेली आहे.
@ लवन्गीमिरची, अमितव, जिज्ञासा, सुनिधी
>>> लिंक्सकरता धन्यवाद. बघते.
मामी अपार्ट्मेंट पेक्षा किचन
मामी अपार्ट्मेंट पेक्षा किचन वालं हॉटेल बरं पडेल. एक अपार्ट्मेंट आहे साराटोगा वर, फर्निश्ड, आणि असं मंथली वगेरे, नाव सापडलं तर बघते, माझी माहिती बरीच जुनी आहे, १० वर्ष तरी झाली, पण रेंट तेंव्हा पण बरच होतं.
विषयांतरा बद्द्ल
विषयांतरा बद्द्ल क्षमस्व......
http://www.cntraveller.in/story/9-countries-where-you-can-drive-against-...
तुमच्या प्रतिसादांवरून बेकरी
तुमच्या प्रतिसादांवरून बेकरी गटगची देदिप्यमान परंपरा लक्षात आलेली आहे >> मामी, आम्ही एल ए गटगांबद्दल बोलत होतो ते. बेकरी गटग खूप फ्रिक्वेन्टली होतात. तू आलीस की तुझ्यासाठीही करू एक!
Mami Sorry for writing in
Mami
Sorry for writing in English. Typing Marathi on phone is bit annoying.
We have used Vacation Rentals By Owner aka VRBO.com site couple of times, it's really good. They offer different rates for daily, weekly and monthly rental. We also use http://www.vacationrentals.com from time to time to book condos (flats) or cabins.
I found it more cheaper than hotels as they generally do not offer cleaning service during your stay. If you are okay with cleaning yourself then I would surely recommend this site.
Rental homes come with kitchen, fridge, microwave as well as washing machine. If you have kids with you then I would say washing machine is a must.
नुकतीच कॅलिफोर्नियाची ५०
नुकतीच कॅलिफोर्नियाची ५० दिवसांची ट्रिप करून आले. इथल्या आणि मायबोलीवरच्या इतरत्र विखुरलेल्या अनेक माहिती तुकड्यांचा खूप फायदा झाला. या धाग्यावरच्या गोगांनी दिलेल्या माहितीचाही उपयोग झाला. माझ्या ट्रीपचे डिटेल्स वेगळ्या लेखात लिहिते लवकरच.
सर्व सुचनाकारांचे पुन्हा एकवार धन्यवाद.
कॅलिफोर्निया २०१५ : ट्रिप -
कॅलिफोर्निया २०१५ : ट्रिप - एक आखणे
हायला झाली होय ट्रीप
हायला झाली होय ट्रीप
Pages