एनडीए सरकारचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभु ह्यांनी ह्या सरकारचे संपूर्ण वर्षाचे पहिले रेल्वे बजेट आज मांडले तर अर्थंमंत्री अरूण जेटली सर्वसाधारण बजेट परवा मांडतील.
रेल्वे बजेटवर विविध माध्यमांत संमिश्र प्रतिक्रिया वाचल्या. कुठलाही विरोधी पक्ष कुठल्याच बजेटला कधीच चांगलं म्हणत नाही, तिच परंपरा नविन विरोधी पक्षाने सुरू ठेवली. रेल्वे भाड्यात वाढ झाली नाही म्हणून सामान्य माणसाने समाधान व्यक्त केले तर काही जणांनी नव्या गाड्यांच्या घोषणा नाहीत म्हणून आश्चर्य व्यक्त केले. आघाडी सरकारांची परंपरा सुरु झाल्यापासून सरकारात राहून विरोधी पक्षासारखे वागणारे पक्ष प्रत्येक सराकारात असतात. अश्यांनी त्यांच्या भुमिकेला साजेश्या प्रतिक्रिया दिल्या.
अर्थसंकल्पाबाबत माध्यमांमध्ये बरीच उत्सुकता दिसते आहे. दिल्ली निवडणूकांचा बजेटवर परिणाम होणार असे माध्यमे म्हणत आहे. निवडणूकांदरम्यान तसेच नंतरही मोदी सरकार वारंवार अर्थिक सुधारणांबाबत बोलत होते तर त्या सुधारणांना ह्या बजेटमध्ये खरच हात घालणार का की निव्वळ लोकांना खुष करणारे बजेट मांडणार ह्याबाबतही बरीच चर्चा सुरू आहे.
हा बाफ रेल्वे बजेट तसेच सर्वसाधारण बजेट ह्यावर चर्चा करण्यासाठी.
काय अपेक्षित आहे :
१. बजेट मधल्या तरतुदींबद्दलची मतं.
२. सामान्य माणसांच्या दैनंदीन जिवनावर त्यामुळे होणारे परिणाम.
३. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने फायदे तोटे.
४. बजेटसंबंधीच्या मुद्द्यांवर जाणकार आणि तज्ञांची मतं. (इथल्यांनी लिहावे किंवा बाहेरच्यांच्या लिंका)
५. मुद्द्याला धरून पोष्टी.
काय अपेक्षित नाही :
१. चष्मे लावणे !
२. भाजपा / काँग्रेस / मोदी / गांधी वगैरे चांगले का वाईट, तुम्हांला आवडतात का नाही वगैरे मुद्द्यांवर इतर अनेक बाफांवर चर्चा झालेली आहे. कृपया तिच चर्चा ह्या बाफवर नको.
३. प्रक्षोभक / तिरकस / चर्चा भरकटवणास्या पोष्टी.
मुद्देसुद चर्चा घडली तर माझ्यासारख्यांना माहिती मिळायला आणि समजून घ्यायला उपयोग होईल. हा बाफाचेही चरायला दिलेले कुरण किंवा चिखलफेकीसाठी उघडलेले गटार होऊ नये एव्हडीच माफक अपेक्षा आहे.
हे या सरकारचे दुसरे बजेट आहे.
हे या सरकारचे दुसरे बजेट आहे. पहिले बजेट पूर्ण वर्षासाठी नव्हते तरीही ते मांडले गेले होते. रेल्वेमंत्री सदानंद गौडा होते बहुतेक. ते बजेट भाडेवाढीनेच गाजले होते. त्यामुळे लगेच आलेल्या बजेटमध्ये भाडेवाढ नसल्याचे नवल वाटायला नको. बाकी बजेट पाहायला वेळ झालेला नाही. पण आज रेल्वेसंबंधी उद्योगांचे शेअर्स गडगडलेत.
सुरेश प्रभूंनी कर्ज उभारून गुंतवणूक करणार हे सांगितले आहे.
एकाही नव्या गाडीची घोषणा नाही. (भाराभार नवीन प्रकल्प सुरू कराण्याऐवजी आधीचे अर्धवट राहिलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर जोर द्यावा असे मी त्या एका धाग्यावर सुचवले होते. ते रेल्वेमंत्र्यांनी ऐकले. )
अनेक मार्गांचे दु/तिपदरीकरण होणार असे उडत उडत कानावर पडले
माझे मत : १. नविन गाड्यांची
माझे मत :
१. नविन गाड्यांची घोषणा झाली नाही हे बरच झालं. मध्यंतरी वाचनात आलं होतं की बजेटमध्ये जाहीर झालेल्या कित्येक गाड्या प्रत्यक्षात सुरू होतच नाहीत. त्यामुळे आधी त्यांचं काहितरी करावं.
२. बर्याच प्रलंबित प्रकल्पांना आधी निधी पुरवून ते मार्गी लावणार असं सांगितलं जी चांगली गोष्ट आहे.
३. बर्याच हाय टेक सुविधांच्या घोषण झाल्या आहेत. त्यातल्या काही काही प्रवाशांच्या दॄष्टीने सोईच्या वाटल्या. उदा. स्मार्टफोनवर तिकीट मिळणे, स्टेशनवर सर्वसाधारण वर्गाची विनाआरक्षित तिकीटे मशिनद्वारे मिळणे, गाड्यांच्या वेळा, डिले बाबत एसएमएस अॅलर्ट.
बायो किंवा विमानातल्यासारखे व्हॅक्यूम टॉयलेट : प्रवासीसंख्या लक्षात घेता हे खरच शक्य आहे का माहित नाही.
मुंबईत एसी लोकल : हे सुद्ध्या प्रवासी संख्या बघता कसे राबवणार माहित नाही.
मुंबई दिल्ली, दिल्ली कलकत्ता गाड्यांचा वेग वाढवणार : हे चांगलं आहे. ओव्हरनाईट प्रवास शक्य झाला तर महाग विमानवहातुकीला रेल्वे सक्षम पर्यात होईल.
४. प्रवासी भाडेवाढ करायला हवी होती. (कितीदिवस तोट्यातली रेल्वे चालवणार?)
५. रेल्वेस्टेशनांवर वाय-फाय : सुरक्षिततेच्या दृष्टीने गरजेचे आहे का हे बघायला हवं होतं. वाय-फायपेक्षा रेल्वेस्टेशनांची स्वच्छता हा अधिक महत्वाचा मुद्दा आहे.
अजून बजेटसंबंधित एकही बातमी
अजून बजेटसंबंधित एकही बातमी बघितली नाही.
आमच्या मराठवाड्याला काही मिळालंय का या बजेटमध्ये. तिथले बरेच प्रकल्प नुसता अभ्यास होवून वर्षानुवर्षं रेंगाळले आहेत.
हे या सरकारचे दुसरे बजेट आहे
हे या सरकारचे दुसरे बजेट आहे >>>> मयेकर, बरोबर. पुर्णवर्षाचं पहिले बजेट असं म्हणायचं होतं मला.
लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या
लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या सर्वसाधारण डब्यांतही मोबाईल चार्जिंगची सोय होणार.
तो सूचनांचा धागा शोधून त्यातलं काही ऐकलंय का ते पाहता येईल.
नंतर रेल्वेमंत्रालयाने जनतेकडून सूचना मागवल्या होत्याच.
रेल्वे भाड्यात वाढ झाली नाही
रेल्वे भाड्यात वाढ झाली नाही म्हणून सामान्य माणसाने समाधान व्यक्त केले >> नाही राहिलंय पराग. बाकी वेळ मिळाला की लिहितो.
Ya warshicha arthasankalpa
Ya warshicha arthasankalpa mala barach sakaratmak watala. Navin gaDyanchi ghoShaNa zali nahi he changle Ahe. Itar muddyanbabat nantar lihin. Matra ata १२० divas adhi reservation karta yeil he mala paTala nahi. Yache toTe ya purvee disle ahet. Agents cha traas kami na karta mudat waDhavaNa ya mule samanya pravashanna traas hoil he nakki.
Matra ata १२० divas adhi
Matra ata १२० divas adhi reservation karta yeil he mala paTala nahi. >>>> ह्याच्याबद्दल असं वाचलं की लवकर आरक्षित केलेली तिकीटे नंतर रद्द होण्याची शक्यता जास्त, त्यामुळे त्यातुन उत्पन्न वाढेल आणि मग तिच तिकीटे तत्कालमध्ये विकली जाऊन अजून उत्पन्न वाढेल ! हे न पटण्याजोगं आहे.. पण 120 दिवसांचे तोटे काय ते लिही नंतर..
चिपळूण कराड रेल्वे मार्गाची
चिपळूण कराड रेल्वे मार्गाची याहीवेळी घोषणा झाली आहे. एक रूळतरी टाका त्या मार्गावर!!!
नवीन गाड्ञांची घोषणा झाली नाही ते बरं वाटलंय, आधीच्याच व्यवस्थित चालवा.
एकूणात अर्थसंकल्प पॉझिटीव्ह. दिमक्खदार घोषणेबाजी जास्त नाही, सुरेश प्रभूंकडून किमान तीतरी अपेक्षा होतीच.
गाडी सुटायच्या आधी पाच मिनिटे
गाडी सुटायच्या आधी पाच मिनिटे तत्कालमध्ये तिकिट(रिझर्व्हड?) काढता येईल. ही सूचना मायबोलीवरून गेली होती. तिथे जरा जास्त वेळ दिला होता. प्रभूंनी अगदी पाच मिनिटे धावतपळत आलात तरी चालेल असं म्हटलंय.
२) डायरेक्ट इंपॅक्ट म्हणजे
२) डायरेक्ट इंपॅक्ट म्हणजे शेअर मार्केट पडले काल. आता मेन बजेट नंतर तरी रॅली होणार की नाही अशी शंका आली आहे. २०४ पॉइन्ट ड्रॉप आहे. शनिवारी मार्केट चालू आहे ते चांगले आहे. नाहीतर सोमवारी मेजर स्पाइक आयदर वे होईल असे मत होते.
एसी लोकल हे पाइप ड्रीम वाट्ते.
डायरेक्ट इंपॅक्ट म्हणजे शेअर
डायरेक्ट इंपॅक्ट म्हणजे शेअर मार्केट पडले काल. >>>> वर मयेकरांनी पण लिहिलय. कारण काय ह्याचं ?
सुरेश प्रभूंकडून किमान तीतरी
सुरेश प्रभूंकडून किमान तीतरी अपेक्षा होतीच.>>> वन्स अ सीए ऑलवेज अ सीए .
लैंड बिल का इफेक्ट: आखिरी
लैंड बिल का इफेक्ट: आखिरी वक्त पर मोदी सरकार ने बदला था किराया बढ़ाने का फैसला
http://www.bhaskar.com/news-ht/UT-DEL-NEW-government-roll-back-passenger...
कृपया बाजारात बजेटवर शॉर्ट
कृपया बाजारात बजेटवर शॉर्ट टर्म खेळु नका (डे ट्रेडींग टाळा) . काल ऑप्शन्स एक्स्पायरी होती त्याने सुद्धा मार्केट पडु शकते.
एका वर्षाचा किंवा जास्तचा व्यु ठेवल्यास नक्कीच फायदा होइल.
भाव वाढ करायला पाहिजे होती
भाव वाढ करायला पाहिजे होती असे मला वाटते. रेल्वे तोट्यात आहे (असं म्हणतात). तुमच्या रेवेन्यू जनरेट करुन सुधारणा करा. आत्ता कर्ज काढणार आणि नंतर कुठेतरी जनतेकडूनच वसूली करणार. आता बास झाले हे.
न आवडलेला पॉइंट- सिमेंट, स्टिल वगैरे वहातूकीचे दर वाढवले. freight increased. म्हणजे बाकी बर्याच गोष्टींचे दर वाढणार. आत्ता जेव्हा इंफ्रा बिल्ड करायची गरज आहे तेव्हाच या बेसिक गोष्टींच्या वहातूकीचे दर वाढवता??
दुसरा मुद्धा. १२० दिवस आधी बुकींग. जेव्हा बुकींग्ज पहिल्या काही दिवसातच संपतात आणि ऐनवेळेस तिकीटे मिळायची मारामार होते. कुठल्या सामान्य माणसाला आपले प्रवासाचे प्लॅन्स अगदी १२० दिवस आधी आखता येतात? इथे ६० दिवस अॅडवान्स बुकींगमध्येसुद्धा रेल्वे तिकीट म्हणजे लॉटरी लागल्याचा आनंद असतो. क्रमश:..
रेल्वेचं आरक्षण १२० दिवस आधी
रेल्वेचं आरक्षण १२० दिवस आधी हे अजिबातच पटलेलं नाही. यामुळे रेल्वेचं तात्काल आणि रद्द तिकिटांचं उत्पन्न वाढणार आणि तिकिटांच्या काळ्याबाजाराला आमंत्रण मिळणार. प्रवासाचे बेत चार महिने आधी आखणं हे खूपच विरळा आहे. एजंट डमी बूकिंग करून विकणार.
गाडी सुटायच्या आधी पाच मिनिटे तत्कालमध्ये तिकिट(रिझर्व्हड?) काढता येईल.>> आरक्षण खिडकीवर नंबर लागून तिकिट मिळून ट्रेनपर्यंत पोचणे यासाठी पाच मिनिटे पुरतील का?
एसी लोकल मध्य रेल्वे मार्गावर आणि लवकरात लवकर आल्या पाहिजेत. आमच्यासारख्यांच्या शुभेच्छा मिळतील प्रभूंना.
तिकिटांच्या काळ्याबाजाराला
तिकिटांच्या काळ्याबाजाराला आमंत्रण मिळणार >> अगदी अगदी.
एसी लोकलची खरंच गरज आहे कां मुंबईसाठी? त्या खर्चात नविन साध्या लोकल्स घेता आल्या असत्या असे वाटते.
एसी लोकलची खरंच गरज आहे कां
एसी लोकलची खरंच गरज आहे कां मुंबईसाठी?>> अवं, पेडगावी राहून असं बोलू नका. मुंबईत येऊन, राहून, लोकलने नियमित प्रवास करून मग हा प्रश्न उपस्थित करा.
मंजूडीजी, पेडगाव हे कुठे
मंजूडीजी, पेडगाव हे कुठे आडगांवी नाहीये, मुंबईतच आहे. मी मुंबईच्या लोकलने (द्वितीयश्रेणी) नियमित गर्दीच्या वेळीच प्रवास करतो. पण तो पश्चिम रेल्वेने, मध्य-हारर्बर नाही.
बरं मग मध्य रेल्वेने प्रवास
बरं मग मध्य रेल्वेने प्रवास करून मग विचारा
नविन साध्या लोकलने काय साध्य होईल असं तुम्हाला वाटतं?
भा.प्र. आहे, मला खरोखर जाणून घ्यायचं आहे.
पण एसी लोकल केल्या तर लोकाना
पण एसी लोकल केल्या तर लोकाना लटकता कसे येईल दाराजवळ? गर्दी मॅनेज कशी करतील एसी लोकल?
ए सी लोकलातुन सगळे लोक जाणार
ए सी लोकलातुन सगळे लोक जाणार नाहीत. दर जास्त असेल. मॅट्रो , मोनो वगैरे प्रमाणे होइल
एसी लोकल सर्वांना परवडेल असं
एसी लोकल सर्वांना परवडेल असं नाही. (हा माझा अंदाज आहे) त्यामुळे त्यामधुन प्रवास करणर्यांंची संख्या बरीच कमी असेल. अर्थातच त्यामागुन येणार्या गाडीची गर्दी वाढु शकेल. काही प्रमाणात हे लेडीज स्पेशल गाडीनंतरच्या गाडीबाबत होते. (माझा लेडीज स्पेशलला विरोध बिलकुल नाही. किंबहुना त्यांची संख्या वाढवावी असे माझे मत आहे.एसी लोकलपेक्षा लेडीज स्पेशल वाढवावी ) पण लेडिज स्पेशल (किमान प.रे) या बर्याच प्रमाणात रिकाम्या जातात ही वस्तुस्थिती आहेच.
मरे वरील परिस्थिती वेगळी/ यापेक्षा खडतर असु शकते, पण मला त्याचा अनुभव नाही.
<<मुंबईच्या प्रवाशांसाठी
<<मुंबईच्या प्रवाशांसाठी अतिरिक्त ४७ नव्या गाड्या,>> असा एक मुद्दा बातमीमध्ये आहे.
ह्या गाड्या कुठे, कधी, केव्हा, कश्या धावतात हे न उलगडणारं कोडं आहे.
स्टेशन्स पुनर्विकास>> यामध्ये स्वच्छ टॉयलेट्स प्रत्येक प्लॅटफॉर्मवर आली तर बरं होईल. पाणी नाही, कामगार नाहीत अशी रडगाणी नकोत. तसंच प्लॅटफॉर्मवर उतरणारी गर्दी वाहून नेण्यासाठी व्यवस्थित आणि पुरेश्या प्रमाणात पादचारी पूल व्हायला हवेत. पुलांवर फेरीवाले, भिकारी अजिबात नकोत.
तिकिट तपासनीसांची संख्या आणि तपासणीची वारंवारता वाढवायला हवी.
नाठाळ, ऋग्वेदच्या बाफवर
नाठाळ, ऋग्वेदच्या बाफवर याबद्दलची चर्चा झालेली आहे.
ऋग्वेदच्या बाफवर याबद्दलची
ऋग्वेदच्या बाफवर याबद्दलची चर्चा झालेली आहे.>> सॉरी, मला माहित नव्हतं.
प्लॅटफॉर्मवर उतरणारी गर्दी वाहून नेण्यासाठी व्यवस्थित आणि पुरेश्या प्रमाणात पादचारी पूल व्हायला हवेत.>> याबाबत अनुमोदन. सध्या ट्रेन मधुन उतरल्यावर पूल चढणे आणि उतरणे यातच वेळ जातो. नवीन पुलांच्या बांधकामाच्या दर्जाकडेही लक्ष पुरविले पाहिजे. कमी-जास्त उंचीच्या पायर्या, पुलावरील लाद्या उखडणे हे सर्रास आढळणारे प्रकार. स्वच्छ / दुर्गंधीमुक्त टॉयलेट्स हा कळीचा मुद्दा आहे.
बजेट-भाषणातले मुख्य
बजेट-भाषणातले मुख्य मुद्दे
संपूर्ण बजेट भाषण
भरत मयेकर, दोन्ही
भरत मयेकर, दोन्ही दुव्यांबद्दल तुम्हाला दुवा.
भरत, उदय, मला तुमच्या
भरत, उदय, मला तुमच्या पोस्टीतले संदर्भ वाचून वाटतय की "मायबोलिवरील" गंभीर मुद्देसूद चर्चा ही सरकारी मण्डळी वाचून मनावर घेतात की काय ...!
हे स्वप्न मी खूप पूर्वी पाहिले होते की येथील (मायबोलीवरील) विविध विषयांवरील चर्चेची दखल घेणे भाग पडेल/अत्यावश्यक होईल.
Pages