सुरुवातीला एक चेंडू घरंगळत येतो आणि एका कश्यातरी बांधलेल्या पट्टीवरून धडपडत जाऊन दुसर्या चेंडूवर आपटतो..की तो दुसरा चेंडू वरुन खाली टूणकन उडी मारतो आणि एक चाक गरागरा फिरायला लागते. मग त्यामुळे पुढे बरेचसे चेंडू पळापळ करून चाके फिरवतात आणि शेवटी अचानक एक म्हातारा दोरांसकट एका बोटीच्या नाळेवर हवेत उचलला जातो. आपली रोझ आणि जॅक जसे टायटॅनिकवर उडण्याची अॅक्शन करतात ना तसं, फक्त हा जरा जास्त हवेत दाखवलाय. हा सीन पुढे पिक्चरमधे किमान चारवेळा येतो आणि उत्तरोत्तर तो तितकाच अनकन्विन्सिंग होत जातो....सीनही आणि साहजिकच सिनेमाही! आपल्या मिकी माऊसचे सायन्सचे प्रयोग यापेक्षा कितीतरी जास्त पटणेबल वाटतात.
शिवकर बापुजी तळपद्यानी नेमकी किती विमानं उडवली? या चित्रपटात त्यांचे पहिले मानवरहीत उड्डाण म्हणजे शास्त्रिजी आणि 'शिवी' च जॉईंट वेंचर आहे. आणि दुसरं म्हणजे 'शिवी' चा एकपात्री मानवसहीत उड्डाण प्रयोग आहे. असं खरच झालं होतं का?
तर थोडक्यात कथा अशी की एका जमिनदाराचा 'शिवी' हा वाया गेलेला, ईयत्ता चौथीत आठवेळा नापास झालेला, दारुबाज पोरगा. ईथेच पहीली डायरेक्टरची डूलकी...शिवकरचे लघुरुप चक्क 'शिवी'! अर्थात पुर्ण चित्रपटादरम्यान दिग्दर्शक झोपलेलाच होता की काय असं वाटण्यासारख वातावरण आहे. तर हा शिवी सिताराच्या म्हणजे एका नाचणारणीच्या प्रेमात पडतो. ओघानेच बाप त्याला घराबाहेर काढतो.
बनारसहून शिकून, खूप ज्ञान मिळवून आलेला आणि उडण्याची स्वप्ने पाहणारा पण लोकांच्या दृष्टिने वेडा असलेला शास्त्रज्ञ आपल्या शिवीला हातोहात उचलतो. तत्पुर्वी सिनेमाचा बराचसा भाग शिवी आणि सिताराच्या लवस्टोरीवर खर्ची पडलेला असतो. सिताराचा एक उत्तान आयटेम नंबर, शिवी-सिताराचे एक प्रेमभरे गाणे ई.ई. झाल्यावर शिवीने 'लग्न करु' असे म्हणल्याबरोबर सितारा त्याला सोडून निघून जाते आणि अचानक दिग्दर्शकाला थोडी जाग येते. अरे पिक्चर विमानाचं आहे नाही का..
येता-जाता 'ब्लडी ईंडीयन्स' म्हणणारे स्टिरीयोटाईप्ड ब्रिटीश पोलीस त्या वेड्या शास्त्रज्ञाचा फुल्ल पाठलाग करत असतात. पण त्यांना मुम्बईच्या लगतच समुद्रात उभे असलेले सुसज्ज जहाज मात्र दिसत नाही. लांबून हे जहाज दाखवतात तेंव्हा तो चक्क डिजीटल पडदा आहे हे दिसतं. अशीच मजा त्या काळची मुंबई दाखवतांना पण झालीय. ढग अगदी खाली जमिनीला टेकलेत आणी राजाबाई टॉवर त्यातून मान वर काढतोय, हे चक्क पडद्यावर रंगवेलेलं ठळक कळतय.
त्याकाळची मुंबई अर्थात एका खोट्या आणि नाटकी सेट्वर उभी केलिय. ईतकी खोटी की २-३ वर्ष्यांच्या काळातही तीच तीच माणसे त्याच रस्त्यांवरुन फिरतांना दिसतात. चौपाटिवर विमानाचे उड्डाण पहायलाही तिच माणसे आणि शेवटच्या कोर्ट सीनमधेही तिच. अगदी शाळेतील वर्गाचे पहिले दृष्य आणि साधारण २ वर्षे गेल्यावरचे दृष्य यातही तीच मुले आणि त्याच उंचीची आहेत. शिवीचा पुतण्याही २ वर्ष्यांच्या काळात एवढासाही बदलत नाही.
स्वतः शिवीचे वय हे ही एक गौडबंगालच आहे. तो जेमतेम १८-२० चा दाखवलाय.
या सगळ्या नाच-गाण्यात, प्रेमालापात ते विमान बनतांना कधीच दिसत नाही. आणि विमानाच्या नावाखाली जे काही बनवून आणलं जातं ते ईतकं खिळखीळं खेळणं दाखवलय की त्याला ढकलून आणतानाच त्याच्या ठिकर्या ठीकर्या होतील अशी भिती वाटते. यथावकाश, चौपाटिवर टिळक आणि बडोद्याचे संस्थानिक सयाजीराव गायकवाड यांच्या उपस्थितीत हे विमान चक्क भरारी घेते आणी थोड्या दूर समुद्रात जाऊन नाकावर आदळते.
त्यानंतर शास्त्रीचा मृत्यू आणि मग परत एक स्वतंत्र विमान बनवण्याची शिवीची धडपड! त्यात 'शास्त्रीजींच्या मृत्यूला आपणच जबाबदार आहोत अर्थात मी खूनी आहे' या समजूतीतून खर्ची पडलेली काही हजार फूट लांबीचि असह्य फिल्म!
ह्या सगळ्यामुळे सॉल्लिड्ड हादरलेले ब्रिटिश शिवीला परत एका खटल्यात अडकवतात. कोर्टामधे अचानक एक कळकट्ट क्रांतिकारक आणि क्रांतिकारीण कुठूनसे येतात आणि बाँब फोडतात. त्या हास्यास्पद धुमाकूळात पळून जातांना क्रांतिकारीणीला हसू अनावर होते, आणि ते कॅमेर्याने चक्क तसेच्या तसे टीपलेय! तसच ईतर ठिकाणीही प्रत्येक कलाकार प्राणपणानी अक्टिंग करतो पण त्यावेळी समोरच्याचीही हसु दाबून ठेवण्याची प्राणपणानी अॅक्टिंग सुरु असते...
शेवटी शेवटी 'मेरा विमान उडेगा ना..?' हा डायलॉग ईतक्या असंख्य वेळा बोलला जातो की मी ओरडलेच "उडनाच मंगताय..मैने आठसों रुपयेका टिकट खरिदा है.."
विमानाच्या खर्या ईंधनाचे रहस्य फक्त शस्त्रिजींच्या गुरुलाच म्हणजे चारु सरस्वतीला माहिती असते. तो शिवीला काही कॉमेडी प्रश्ण विचारतो, त्याची म्हणे उलटी उत्तरे शिवीने द्यायची मगच तो ईंधनाचे नाव सांगेल. उदा. ईन्सान को सबसे ज्यादा दु:ख किस बात का होता है...हार का या मौत का? मी मनातल्या मनात उत्तर दिले 'तमौ का'...अर्थात मौत च्या उलट. पण ते उलट उत्तर होते 'नाकामयाबीका'...देवा...डोकं पुर्ण कामातून गेलेलं....
सरतेशेवटी ईंधनाचे नाव...यात काहीच डीस्क्लेमर द्यायच्या लायकिचे नाहिये, म्हणून नाहिच देत. कारण यावेळे पावेतो बहुतेक कोणी चित्रपटगृहात टिकतच नाही. तर, ४१२१ असा एक अगम्य आकडा चारुजी सांगतात. मी पिरीयॉडीक टेबल ई.ई. फालतू डोकं खाजवत बसले. हल्ली आपल्याकडे मराठीत नंबर लिहीलेल्या जंबो एस्युव्ही दिसतात. पांढर्याशुभ्र गाड्या, पाढरेशुभ्र कपडे आणि काळाकुट्ट गॉगल चढवलेले डायव्हर्स...आठवलं..?? तर अश्या गाडीवरची नंबर प्लेट डोळ्यांसमोर आणा, काहिशी खाली दिलीय तशी आणी लढवा डोकं...!!
कंफेशन द्यायला चर्चमधे जाणारा ब्राम्हण शिवी, त्याला हजचे साठवलेले पैसे देणारा मुसलमान क्लर्क, टिळक दिसताच पडद्यावर दिसणार्या गणेशमुर्ती आणि त्या बनविणारा चांगल्या मनाचा मुसलमान कारागीर असे सर्वधर्मिय गळ जागोजागी टाकून ठेवलेले आहेत, त्यामुळे तरी लोकं यावित बघायला. आणि तरिही तुम्ही बधला नाहितच तर विमान उडवतांना चक्क 'वंदे मातरम..' ची धून ऐकवून थेट तुमच्या देशभक्तिच्या कासोट्यालाच हात घातलाय...
ईंधन क्ल्यु..
आणि हा पण,
(No subject)
४१२१.... दारु???? हैल्ल्ला!
४१२१.... दारु????
हैल्ल्ला!
जबरी
जबरी
चिडचिड पोहोचली अगदी ! (पण
चिडचिड पोहोचली अगदी ! (पण वैदिक का म्हणे ते ?).
मुग्धमानसी > दारू नाही.
तळपदेंविषयी आधी माहिती नव्हती आणि कळल्यावर अभिमान वाटला.
chaangalyaa viShayaachee vaaT
chaangalyaa viShayaachee vaaT laavalee vaaTate yaa chitrapaTaane !
भारीये असे चित्रपट थिएटरात
भारीये
असे चित्रपट थिएटरात मित्रांबरोबरच बघावे, आठवणी जागवायला मजा येते..
(No subject)
शेवटी शेवटी 'मेरा विमान उडेगा
शेवटी शेवटी 'मेरा विमान उडेगा ना..?' हा डायलॉग ईतक्या असंख्य वेळा बोलला जातो की मी ओरडलेच "उडनाच मंगताय..मैने आठसों रुपयेका टिकट खरिदा है..">>>>>>>>>>>>>:हहगलो:
ईंधन
ईंधन क्ल्यु..>>>>मस्तच........;)
ईंधन क्ल्यु..>>>>मस्तच हो ते
ईंधन क्ल्यु..>>>>मस्तच हो ते सांगायचेच राहीले
पारा?? बाकी भारीच आहे हे.
पारा??
बाकी भारीच आहे हे.
पारा च..... का ????? प्लिज
पारा च..... का ????? प्लिज उत्तर द्या कि हो ........
पाराच.. अचूक उत्तर
पाराच.. अचूक उत्तर देणार्यांना हवाईझादाचे फ्री तिकीट!!
मल नको बै
मल नको बै
चला उडाल एकदाच विमान
चला उडाल एकदाच विमान !!!!!!!!!!!!
ॠगवेदातील भरद्वाज ऋषींच्या
ॠगवेदातील भरद्वाज ऋषींच्या विमानशास्त्रावर आधारीत ग्रंथ सुब्बराय शास्त्री यांनी लिहिलाय. 'प्राचीन वैमानिक शास्त्र' असे काहीसे नाव आहे. म्हणून वैदिक विमान म्हटलेय.
उडालं आणि नाहिस झालं.. कारण
उडालं आणि नाहिस झालं.. कारण परत जमिनीवर उतरविण्याचे शास्त्र लिहूनच ठेवलेले नव्हते.
गाणी आणि संगित चांगल आहे. विशेषतः मधले तबल्याचे तुकडे तर भन्नाटच वाजवलेत. पण जे आहे ते अत्यंत अस्थानी आहे. गाण्या-बजावण्यात तब्बल १/२ तास घालवलाय आणि गाण्यांंमूळे पटकथा अजिबात पुढे सरकत नाही...अनावश्यक आहेत गाणी. आणी अर्थातच गाण्यांसाठी कोणी हवाईझादा पहायला जाणार नाही.
त्या काळची वेषभुषा पण सॉल्लीड गंडलीय. शिवी ला भेटायला सितारा चक्क काळा ईविनींग गाऊन घालून येते. ब्राह्मण किंवा सिकेपी घरातल्या बायकांचे पदर...याबद्दल न बोललेल बरं. छोट्या पुतण्याची भुमिका उत्तम आहे.
खरतर दिड तासांचा फास्ट आणि फाफटपसारा मुक्त चित्रपट जास्त बघणिय झाला असता.
शेवटी जेंव्हा त्याची आई त्याला विचारते, "तू खरच विमान उडवणार? आणि परत येणार नाहीस?" तेंव्हा बर्याच लोकांनी 'न जाणो, तो खरच परत बिरत आला तर तिसरं विमान बन्वायला घेईल' या भितीने हॉल सोडला...
पण आत्ताच मला कळलय की या सिनेमाविरुद्ध बोलणे हींदूहीतविरोधी (un eslamic च्या चालीवर) ठरले आहे...
या सिनेमाविरुद्ध बोलणे
या सिनेमाविरुद्ध बोलणे हींदूहीतविरोधी (un eslamic च्या चालीवर) ठरले आहे...> अगोबाई ! कठीण आहे . सिनेमा चांगला नसेल तर तसं म्हणताना उलट इतरांच्या हिताचच (वेळ आणि पैसे खर्च या दोन्ही गोष्टींसाठी) आहे की ते.
छान आहे परीक्षण. पण म्याडम
छान आहे परीक्षण. पण म्याडम सॉरी हं ....मी नाही पाहिला. केवळ तुमचे येथील परीक्षनावरच समाधान मानते. मी थेटरात जावून सिनेमे पाहत नाही (क्क्च्चीत जाते अगदी शेवटचा बहुदा 'धूम'-१ पाहिला होता).
ऑफिसात कोणी डाऊनलोड केलेला आणला कि पाहते. आणि मोस्ट ऑफ कलीग्स सुद्धा हिट सिनेमेच डाऊनलोड करून आणतात. शनिवारी जंत्री असते आमच्या ऑफिसात मिळतो मग बघायला.
(No subject)
शेवटी जेंव्हा त्याची आई
शेवटी जेंव्हा त्याची आई त्याला विचारते, "तू खरच विमान उडवणार? आणि परत येणार नाहीस?" तेंव्हा बर्याच लोकांनी 'न जाणो, तो खरच परत बिरत आला तर तिसरं विमान बन्वायला घेईल' या भितीने हॉल सोडला... >>
आपली रोझ आणि जॅक जसे
आपली रोझ आणि जॅक जसे टायटॅनिकवर उडण्याची अॅक्शन करतात ना तसं, फक्त हा जरा जास्त हवेत दाखवलाय. हा सीन पुढे पिक्चरमधे किमान चारवेळा येतो आणि उत्तरोत्तर तो तितकाच अनकन्विन्सिंग होत जातो....सीनही आणि साहजिकच सिनेमाही! आपल्या मिकी माऊसचे सायन्सचे प्रयोग यापेक्षा कितीतरी जास्त पटणेबल वाटतात. >>>>>>>>>>> भारिच
(No subject)
अरेच्चा हे पुन्हा कसं आलं?
अरेच्चा हे पुन्हा कसं आलं? आधीच लिहिलं होतं ना हे परिक्षण? :जामच गोंधळलेली बाहुली:
परिक्षण एकदम महान आहे ....
परिक्षण एकदम महान आहे ....
मिपावर लिहीलं होतं..
मिपावर लिहीलं होतं..
(No subject)
महान आहे परीक्षण. ते
महान आहे परीक्षण. ते प्रतिसादात लिहिलेलं वेशभूषा आणि खरंच परत आला तर? लेखात पण लिहा ना.
हा बरोबर. कोणीतरी इथल्या
हा बरोबर. कोणीतरी इथल्या कोणत्या तरी धाग्यावर लिंक दिलेली .