..
"ऋन्मी ऐक ना रे, मी उद्या एंजेलिना ज्योलीला भेटतेय.."
... ग’फ्रेंड असे म्हणाली आणि पाणीपुरी खायला माझा वासलेला ऑं तसाच वासून राहिला. या संधीचा फायदा उचलत तिने लागलीच माझ्या वाटणीची पुरी गटकावली. पण एंजेलिना ज्योली या नावासमोर ती पुरी पाणीकम वाटल्याने मी ते फारसे मनाला लाऊन घेतले नाही.
"एंजेलिना ? ... आपल्या जोल्यांची ?? ... काय कुठे कधी ??"
"हो, एंजेलिनाच... पण कोणीतरी शर्मा की वर्मा आहे,.. एंजेलिना म्हटले की पटकन ज्योलीच तोंडात येते ना"
.... कायपण!
"कोण आहे ती?"
"ती नाही त्या.. डाएटीशिअन आहेत" ग’फ्रेंडने माझा शुद्धलेखनाचा क्लास घेतला. इथे अॅंजेलिनाचे नाव ऐकताच माझी हरपलेली शुद्ध एव्हाना मूळ जागी परत आली होती.
"डाएटीशिअन म्हणजे आहारतज्ञ," ...हा ईंग्लिशचा क्लास!
"वजन कमी करायला काय खायचे आणि काय नाही, हे त्या सांगतात."
"हे तर मी सुद्धा तुला सांगतो, पण तू ऐकतेस कुठे माझे?..
प्लीज आता असं बघू नकोस माझ्याकडे,
मला दोन चमचे पेस्ट्री जात नाही, तू पाव किलो एकाच वेळी गटकावतेस. कमी कर.. निदान ५०-१०० ग्राम!
आईसक्रीम एकाच वेळी दोन दोन फ्लेवरचे,.. दोन दोन कोन,.. दोन हातात घेऊन, सपासप संपवतेस... निदान एकावेळी एकच खात जा!
मॅकडोनाल्डचे बर्गर खाताना तुला फ्रेंच फाईज आणि कोल्ड्रींक सोबत लागतेच... अवॉईड कर... निदान यातला एखादा तरी प्रकार!
पिझ्झामध्ये एक्स्ट्रा चीझ नसेल तर ते तुला गोरगरीबांचे खाणे वाटते... वाटू दे,. निदान काही दिवस!
चॉकलेट बद्दल तर बो.......
"बस्स हां ऋन्म्या.. मी कमावते, मी खाते., तुला सतर्यांदा सांगितलेय माझे खाणे काढत जाऊ नकोस. तुझ्या या अश्या वागण्याने खाल्लेले माझ्या अंगाला लागत नाही. आपण पहिल्यांना भेटलो तेव्हा आपण कसे एकमेकांना अनुरूप होतो. आता मी वेईट पुटऑन करतेय आणि तू सुकत चाललायस..."
तिच्या या लांबलचक वाक्याला अन त्यातील मुद्द्यांना प्रतिवाद करायला बरेच मुद्दे अस्से अस्से तोंडावर आले होते, पण इतिसाहातील चुकांपासून शिकायची सवय माझ्या अंगी असल्याने आवंढाच काय तो गिळला.
"अंगाला लागत नाही" या वाक्यप्रचाराचा नवीन आणि नेमका उलटा अर्थ मला आज समजला होता.
"मी कमावते अन मी खाते" हे तिच्या तोंडून ऐकताना आम्ही दोघे एकत्र असताना तिने शेवटचे बिल केव्हा दिले होते ते आठवायला मागत नव्हते.
आणि राहता राहिला प्रश्न आमचे जुळल्यापासून तिचे वजन का वाढले आणि माझेच का कमी झाले?? तर दोघांत शेअर केलेल्या एक प्लेट पाणीपुरीच्या सहा पुर्यांपैकी चार पुर्या तिच्या अन दोन पुर्या माझ्या अश्या अ’समतोल वाटणीनंतर, नेहमीसारखे सुख्या पुरीवर तिने आपलाच हक्क सांगणे यातच ते उत्तर दडलेले होते.
सुना है दो दोस्त एक थाली मै खाते है, इससे प्यार बढता है.. पर दो प्रेमी जब एक थाली मे अरबटचरबट और चमचमीत खाते है तो सिर्फ प्रेयसीका वजन बढता है.. कारण स्त्री-पुरुष समानता नेमकी इथे येऊन गंडते!..
(बाकी या सुखा पुरीची पण एक गंमत आहे., नवीन नवीन जुळलेले तेव्हा तिला सुखा पुरी आवडते किंबहुना त्यामध्येच जास्त ईंटरेस्ट आहे हे लक्षात आल्यावर एकदा मी ‘मला सुखा पुरी आवडत नाही’ अशी थाप मारत तिला माझ्या वाटणीची पुरी दिली होती. बस्स तेव्हापासून आजवर ती थाप पचवतोच आहे)
असो, तर थोडक्यात बाईसाहेबांचे वजन वाढले होते..
तिच्या मैत्रीणींच्या तुलनेत!..
तशी ही कुरबूर गेले काही दिवस, काही महिने ऐकतच होतो. अमुकतमुक ड्रेस कसा होत नाही, हे ते वाढलेले वजन मोजायचे परिमाण सतत कानावर आदळतच होते. पण तात्कालिक ठिणगी उडायचे कारण होते ते तिच्या ऑफिसात झालेले कंपनी टी-शर्ट वाटप!..
जेव्हा तिच्या सार्या मैत्रीणी "एम" आणि "एल" मध्ये फिट झाल्या होत्या, त्याचवेळी हिला मात्र "एक्स-एल" ची गरज पडली होती..,
आणि सौंदर्याचा असा हा "एक्स फॅक्टर", साहजिकच तिला नको होता.
जिमचा पर्याय चाचपून झाला होता, पण वेळा जुळून येत नव्हत्या.
घरच्या घरी ट्रेडमिल वापरायचा विचार केला होता, पण जागेची अडचण सामोरी आली होती.
काही जडीबुटी आणि हर्बल प्रॉडक्ट्सबद्दल ईंटरनेटवरून तिने माहिती काढली होती,. पण आधी अरबट चरबट खाऊन वजन वाढवायचे आणि मग औषधे खात ते कमी करायचे, हे लॉजिक माझ्या पचनी न पडल्याने मी त्याला विरोध केला होता.
पण या डाएटीशिअनच्या पर्यायावर मात्र तिचा आवेश पाहता ती ठाम दिसत होती.. म्हणून मग मी सुद्धा त्याला तितक्याच गंभीरपणे घेतले.
"काय? .. नक्की प्लान काय आहे?"
"पंधरा आठवडे - पंचवीस हजार रुपये ... पण कन्सेशन आहे, म्हणून फक्त वीस!.."
"अरे वाह!," हे असे मी म्हणालो खरे,. पण स्वत:च आधी मोठी किंमत लावायची आणि नंतर ती कमी केल्याचे दाखवत तिला कन्सेशनचे गोंडस नाव द्यायचे, हा प्रकार नेहमीच मला चीड आणतो.
"पंधरा आठवड्यात ७ किलो वजन कमी करणार".. ती पुढे म्हणाली, आणि मला हे वीस हजारात ७ किलो वजन कमी करणार असे ऐकायला आले.
मी मनातल्या मनात पुटपुटत हिशोब लाऊ लागलो. पंधरा आठवड्यांचे वीस हजार, म्हणजे एका आठवड्याचे एक हजार तीनशे तेहत्तीस रुपये, तेहत्तीस नवे पैसे!.. म्हणजेच एका दिवसाचे तब्बल एकशे नव्वद रुपये, आठ आणे!..
ह्मम, म्हणजे एकंदरीत ठिक होते, तसेही हल्ली राईस प्लेट शंभरच्या खाली येत नाही. डाएटींगचा आहार म्हणजे जरा कमीच येत असावा, पण तरी परवडेबल आहे..
"काय खायला देणार आहेत ते तुला रोज,.. या २०० रुपयांत?" , मी साळसूदपणे विचारले.
"देणार नाहीत सुचवणार, खायचा आपला आपणच." ... हे ऐकताच माझे सारे हिशोब माझ्यासकट गडबडले.
"काय?? फक्त आहार सुचवायचे दिवसाचे दोनशे रुपये ??"
समोरून थंड प्रतिसाद!.. जो माझाच आवेश थंड करून गेला.., अन मी जरा नरमलो.
तरीही वीस हजार रुपये ?? मलाच हुंडा दिला असता..?? लग्नानंतर आणखी पाचपंचवीस किलो वजन वाढले असते, तर आणखी पाचपन्नास हजार रुपये दिले असते, त्याबदल्यात मी आयुष्यात कधी तुझ्या वजनाबद्दल कुरबूर केली नसती..
मनात आलेले हे विचार मी तिला मोठ्या धाडसाने बोलून दाखवताच तिने आपल्याकडची बदाम सत्ती फेकली,
"सोच लो ऋन्मेऽऽष, आमची प्रथा तुला ठाऊकच आहे.., लग्नानंतर मला उचलून तुला हनुमान मंदीराच्या पाच पायर्या चढायच्या आहेत.."
किती ती माझी काळजी!..
पण हा बाण मात्र माझ्या वर्मी लागला, माझे हिशोबाचे कॅल्युलेटर पुन्हा खडखडले...
पाच पायर्यांना वीस हजार, म्हणजे एका पायरीला चार हजार!, सौदा अगदीच काही वाईट नव्हता..
कर बाई कर, वजन कमी कर .. (उगाच सासुरवाडीला फजिती नको!, हे मनातल्या मनात) म्हणत, मी तिला (तिने न मागितलेली) परवानगी दिली!..
...
तर, आज दिनांक २३ फेब्रुवारी २०१५ ..
आमच्या फाईटींग विथ ए डाईटींगला लवकर्रच सुरुवात होईल.. फाईटींग एवढ्यासाठीच, कारण ही मुलगी डाएटींग कशी काय जमवणार हे मला अजूनही समजत नाहीये.. तुर्तास अब तो ये आनेवाला वक्तही बतायेगा म्हणत इथेच थांबतो.., पण काही सुरस, मनोरंजक आणि उल्लेखनीय घडले या डाएटींग पिरीअडमध्ये तर नक्की इथे अपडेटेन .. तवंसर, शुभरात्री शब्बाखैर ऋन्मेष..!!
..........तळटीप -
लिखाण वाचून हसायला नाही आले, तर प्रतिसादात स्वत:चे चार विनोद टाका,
पण लिखाण विनोदी विभागात टाकतोय, तेव्हा या ऋन्मेऽऽषची लाज राखा..
हा हा हा पण नाही रे खरच
हा हा हा
पण नाही रे खरच आवडलं
धागवण या आजारावर वेळीच उपचार
धागवण या आजारावर वेळीच उपचार व्हायला हवा. शिवाय हा आजार संसर्गजन्य असावा असंही दिसतंय.
एव्हड करेपर्यंत आयटम बदलायची
एव्हड करेपर्यंत आयटम बदलायची ना रे भौ …।
ऋन्मेष, मीही तुमच्याइतकेच
ऋन्मेष,
मीही तुमच्याइतकेच धागे काढतो. तुमच्या धागे काढण्यावर होत असलेली टीका ही मला आता लेकी बोले सुने लागे सारखी वाटत आहे.
हा हा हा पण नाही रे खरच
हा हा हा
पण नाही रे खरच आवडलं>>>>>> खरंच.
बेफ़िकीर, ते तुमच्याकरिता
बेफ़िकीर,
ते तुमच्याकरिता नव्हतं. इथे अजुन आजच असे दोन सदस्य पाहिले की ज्यांनी काहीच्या काही विषयांवर धागे काढले आहेत.
http://www.maayboli.com/user/57947/created यांचे सर्वच
आणि अजुन एका सदस्येचे हे दोन. खरं तर यांचे इतर लिखाण चांगले आहे, पण हे आताच असे का झाले याचा विचार केल्यावर या रोगाच्या संसर्गाचा संशय आला.
http://www.maayboli.com/node/52847
http://www.maayboli.com/node/52435
तारीफ के लिये शुक्रिया
तारीफ के लिये शुक्रिया गुगळेभाऊ ….
बाकी मला टोलेबाजीत इंटरेस्ट नाहि….
गुगळेंनी तळटीप मनावर घेतलेली
गुगळेंनी तळटीप मनावर घेतलेली दिसतेय.
कथेपेक्षा जास्त त्या प्रतिसादाने हसु आले.
(बाकी या सुखा पुरीची पण एक
(बाकी या सुखा पुरीची पण एक गंमत आहे., नवीन नवीन जुळलेले तेव्हा तिला सुखा पुरी आवडते किंबहुना त्यामध्येच जास्त ईंटरेस्ट आहे हे लक्षात आल्यावर एकदा मी ‘मला सुखा पुरी आवडत नाही’ अशी थाप मारत तिला माझ्या वाटणीची पुरी दिली होती. बस्स तेव्हापासून आजवर ती थाप पचवतोच आहे) >>>>>> हाउ क्युट !
मनीमोहोर, देवकी __ ओके
मनीमोहोर, देवकी __ ओके![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्वस्ति![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एव्हड करेपर्यंत आयटम बदलायची
एव्हड करेपर्यंत आयटम बदलायची ना रे भौ …। >>>> खरचं ऋन्मेश गफ्रेंड बदलं.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
नवीन धागा काढायला अजुन नवीन आय्डियाज मिळतील. होउ दे खर्च !
ऋ सोड रे ! ( तुझी गफ्रे नाही
ऋ सोड रे ! ( तुझी गफ्रे नाही हं ) .![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रच्याकने , "दम लगाके हैश्शा " रिलिज होतोय
मस्त जमलंय!!!!!
मस्त जमलंय!!!!!:D
आवडला. (कितीही डायटिंग वर
आवडला.
(कितीही डायटिंग वर मुली(बायका) असल्या तरी चॉकलेटे बंद करण्यास त्यांना कदापि न सांगणे हा अलिखित नियम लक्षात ठेवा.)
श्री, चेतन गुगळेंनी तळटीप
श्री, चेतन![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
गुगळेंनी तळटीप मनावर घेतलेली दिसतेय.
कथेपेक्षा जास्त त्या प्रतिसादाने हसु आले.
>>
+१
आवडले
आवडले![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
जो दे उसका भी भला जो ना दे
जो दे उसका भी भला जो ना दे उसका भी भला सरवांचे धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
प्रशू प्लीज, आधीच वरील काही
प्रशू प्लीज, आधीच वरील काही काऊमेंटसनी मी विचित्र कोंडीत सापडलोय आणि आपण असे चेहरे बनवून मला आणखी भंजाळवू नका..![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
आपण असे चेहरे बनवून मला आणखी
आपण असे चेहरे बनवून मला आणखी भंजाळवू नका>>>
नाहीतर काय, overall इथे काय चालू आहे काहीच समजत नाहीये.
लेख 'विनोदी लेखन' या ग्रुपमध्ये होता, म्हणून पहिला आणि वाचत गेलो, पण च्यामारी अजिबात हसायला आल नाही आणि वाटल चुकून हा लेख 'विनोदी लेखन' ग्रुपमध्ये पडला असेल, पण
.
.
.
.
.
.
.तुमची तळटीप वाचली आणि मनापासून हसायला आल.
Any way![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मायबोलीकर आपला बालहट्ट पुरवत आहेत, दुसर काय
बालहट्ट थॅन्क्स फॉर
बालहट्ट![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
थॅन्क्स फॉर कॉम्प्लीमेन्ट
काळजी नको ऋन्मेऽऽष... आगे
काळजी नको ऋन्मेऽऽष... आगे बढो.
अवांतरः काही लोकानी कुठून कसा व का पळ काढलाय आणि कुठे कुठल्या "सिंहीणी" सोडलेत याचे तपशील उघड केले तर खरोखरच लेखापेक्षा प्रतिसाद मनोरंजक होतील.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मधुशाला, "सिंहीणी" चा संदर्भ
मधुशाला,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
"सिंहीणी" चा संदर्भ नाही समजला, ना ते कोणासाठी हे समजले.
इथे काही गुपित राखायचे असल्यास विपु मेसेज करू शकता का.
बस्स उत्सुकता म्हणून, नाहीतर मग मला झोप नाही येत.
सिंहीण अवतरल्यावर उंदरीण
सिंहीण अवतरल्यावर उंदरीण बिथरली वाटतं.
आता उंदरीण कोण अरे काही तरी
आता उंदरीण कोण![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
अरे काही तरी संदर्भ द्या, उगाच मी माझ्यावरच काहीतरी बोलत आहात असे समजून खुश होतोय ..
आता उंदरीण कोण
आता उंदरीण कोण >>>>>>
गुगळेभाऊंना विचारा कि….
आधी सिंहीण कोण आणि कोणी कुठून
आधी सिंहीण कोण आणि कोणी कुठून पळ काढला याचा आधी उलगडा होऊ द्या.
आणि कोणी कुठून पळ काढला याचा
आणि कोणी कुठून पळ काढला याचा आधी उलगडा होऊ द्या.>>>
तुम्हीच करा कि मग "उलगडा" ….
जरा सई लाही डाएटींग करायला
जरा सई लाही डाएटींग करायला सांगा
ज्या गोष्टीचा उल्लेख मी केला
ज्या गोष्टीचा उल्लेख मी केला नाही त्याचा उलगडा मी कसा करणार? शिवाय आधी ज्यांनी संदर्भ दिलाय त्यांनाच आता उलगडा करायची सुरुवात देखील करावी लागेल.
Pages