Submitted by समीर चव्हाण on 22 February, 2015 - 23:32
माझ्या वरचढ माझी दुनिया
सदान्कदा बुडलेली दुनिया
खोलखोल जाताना आपण
भासत जाते गहिरी दुनिया
मात्र बुडबुडे आपण काही
बसू न देते खाली दुनिया
कुणी लटकले दुनियेला तर
कोणाला जड झाली दुनिया
दुनियेसाठी नसते कोणी
नसते कोणासाठी दुनिया
एक ग्रहण लागून कधीचे
हरवणार तर नाही दुनिया
दगडाच्या हातातुन अपुल्या
सुटो न ही काचेची दुनिया
समीर चव्हाण
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दगडाच्या हातातुन अपुल्या सुटो
दगडाच्या हातातुन अपुल्या
सुटो न ही काचेची दुनिया<<< व्वा
सर्वच शेर आवडले समीर! मस्त गझल!
सदान्कदा ऐवजी सदाकदा चालले
सदान्कदा ऐवजी सदाकदा चालले असते बहुधा.
गझल आवडलीच.
कुणी लटकले दुनियेला तर कोणाला
कुणी लटकले दुनियेला तर
कोणाला जड झाली दुनिया
दुनियेसाठी नसते कोणी
नसते कोणासाठी दुनिया >>>>>
....... लाजवाब !
दगडाच्या हातातुन अपुल्या
सुटो न ही काचेची दुनिया >>>>>
... मक्ता असावा तर असा. अतिशय सुरेख !
अवांतर : तुम्हालाही जमतेय दुनियादारी !
बरेच शेर आवडले पण नसते दुनिया
बरेच शेर आवडले पण नसते दुनिया खुपच !
धन्यवाद !!
सदान्कदा ऐवजी सदाकदा चालले
सदान्कदा ऐवजी सदाकदा चालले असते बहुधा.
दोन्ही वापरले जाते, चालते.
धन्यवाद.
अवांतर : तुम्हालाही जमतेय दुनियादारी !
हा हा. एक शेर आठवला:
बरीच झाली दुनियादारी
गत अपुली फसल्यागत बहुधा
समीर चव्हाण
(No subject)
छान आवडली दुनिया
छान
आवडली दुनिया
सगळेच शेर आवडले. विशेषकरून :
सगळेच शेर आवडले.
विशेषकरून :
एक ग्रहण लागून कधीचे
हरवणार तर नाही दुनिया
दगडाच्या हातातुन अपुल्या
सुटो न ही काचेची दुनिया
मस्त गझल.
मस्त गझल सर, धन्यवाद
मस्त गझल सर, धन्यवाद
जड झाली दुनिया हा शेर समजला
जड झाली दुनिया हा शेर समजला नाही
बाकी गझल मस्तय
(नसते कोणासाठी दुनिया वरून ...जो ह्या गझलेतला बेस्ट शेर आहे )...एक शेर आठवला
मी त्याच्याकरता आहे की
आहे माझ्याकरता विठ्ठल
..असो
कुणी लटकले दुनियेला तर कोणाला
कुणी लटकले दुनियेला तर
कोणाला जड झाली दुनिया <<<
व्वा!
कोणी निव्वळ दुनियेच्या चांगुलपणाचा फायदा घेत जगत राहिले तर कोणी इतके चांगले होते की ही वाईट दुनिया 'कॅरी' करत राहणे शेवटी त्याला इतके जड झाले की त्याने ही दुनिया सोडली.
समीरचा सुपर्ब शेर नएकु!
बाय द वे, तुमचा हा आय डी अबाधित असल्याचे पाहून आनंद झाला.
आता कोणालाही मनस्ताप न देता छान छान गझला तेवढ्या देत राहा अशी विनंती!
'कॅरी' करत राहणे << 'लटकले'
'कॅरी' करत राहणे << 'लटकले' चा असा अर्थ घ्यायचा आहे हे अता माझ्या लक्षात आले मी आधी लटकले चा अर्थ फासावर लटकणे असा काढलेला त्यामुळे दोन्ही ओळी एकच गोष्ट सांगत आहेत असे वाटून तर ह्या शब्दाचा संबंध लागेचना झाला ..म्हणून विचारले
आपणास तसदी घ्यावी लागली त्याबद्दल क्षमस्व बेफीजी पण धन्यवादही
आपल्या विशेष विनंतीचा खूप खूप विचार करून निर्णय घेइन कदाचित घेणारही नाही मी बहुतेक पण अत्ताच काही संगता यायचे नाही लगेच असो आपले कृपाशिर्वाद असूद्यात बस !:)