साहित्य:
कोवळे दोड़के ४ किंवा ५
हिरव्या मिर्च्या १०
टोमॅटो २ मोठे
चिंच १ लिम्बाएवढी (न भिजवता)
लसणा च्या पाकळ्या ७ ठेचून
कांदा १ बारीक चिरून
कोथिंबीर १/२ जुडी
फोडणी साठी साहित्य:
तेल
लाल मिरच्या २
मेथी दाणे
हिंग
कढीपत्ता
जिरं
कृती:
१. दोड़के धुवून थोडेसे खरवडून घ्या आणि छोटे तुकड़े करा
२. टोमॅटो धुवून तुकडे करा कोथिंबीर धुवून घ्या
३. छोट्या कढ़ाईत दोड़क्याचे तुकडे, हिरव्या मिरच्या, टोमेटो+कोथिंबीर् वेगवेगळे परतून घ्या (कशातही पाणी राहता कामा नये)
४. परतलेला दोड़का, टोमॅटो, मिरच्या, कोथिंबीर मिक्सर मधे वेगवेगळे वाटून घ्या आणि नंतर चिंच घालून एकत्र गुरगुरवा
५. कढल्यात तेल तापवून त्यात जिरं , मेथी दाणे, लाल मिरच्या, उड़ीद डाळ , कढीपत्ता, लसूण, कान्दा, हिंग तळून घेऊन वरील मिश्रणावर ही चरचरीत फोडणी दया
६. चवीप्रमाणे मीठ मिक्स करा
आंध्र मधे( आता तेलंगाणा सुधा) ही चविष्ट आणि तिखट पचड़ी वरण भाता बरोबर नुस्तीच् खातात्.
टीप: मिरच्या चवीप्रमाणे आणि आवडीप्रमाणे घेणे
रेसीपी छान अन वेगळी... पण
रेसीपी छान अन वेगळी...
पण गुरगुरवायचं कोणावर? कुठे? कसं??
मेर्सी योकु ही रेसिपी एका
मेर्सी योकु
ही रेसिपी एका आंध्र सुगरणी च्या किचन मधे करताना live बघत notes घेतल्या आहेत
Its mouthwatering really! जरूर ट्राय करा
छान प्रकार. अगदी कोरडे
छान प्रकार. अगदी कोरडे होईस्तो परतायचे का ?
हो नक्की करीन. तसाही दोडका
हो नक्की करीन. तसाही दोडका नाही विशेष आवडत.
Bonne journée
दिनेश दादा@ होय शक्यतो सगळं
दिनेश दादा@ होय शक्यतो सगळं पाणी गेलं पाहिजे...मिरच्या शिजून छान binders होतात
योकु@ दोड़का न आवडणार्यांसाठी best aahe. आणि मिक्सर वर गुरगुरवायचं! मिसेस ला नाह:P
(No subject)
बीरकाय पचड़ी (दोड़क्याची चटणी)
बीरकाय पचड़ी (दोड़क्याची चटणी) चा फोटो हवा होता ....
मस्त लागते, अशीच वांग्याची
मस्त लागते, अशीच वांग्याची आणि लवकीची पण करतात.
मी खालेल्ली आहे ही चटणी.
मी खालेल्ली आहे ही चटणी. तेलुगु लोक कुठलीच साल वाया जावू देत नसावेत. त्यांच्याकडे सालीच्या चटण्या प्रसिद्ध आहे.
मस्त आहे पाकृ. धन्स.
रेसिपी चांगली आहे पण मला
रेसिपी चांगली आहे पण मला दोडक्याच्या किसाची दाकु घालून केलेली भाजीच अती आवडते. त्यामुळे कधी कुणी करून खाउ घातली तर खाईन बापडी
मी क र ते ही च ट णी फ क्त ट
मी क र ते ही च ट णी फ क्त ट मा टे व ग ळु बाकी पा कृ सेम..
ते ल गु मै त्री ण स रि था क डु न शिकली होते. छा न च लागते
मी क र ते ही च ट णी फ क्त ट
मी क र ते ही च ट णी फ क्त ट मा टे व ग ळु बाकी पा कृ सेम..
ते ल गु मै त्री ण स रि था क डु न शिकली होते. छा न च लागते
मस्त, वेगळीच आहे रेसिपी. एरवी
मस्त, वेगळीच आहे रेसिपी. एरवी दोडका घरात येत नाहीच तु पा वा भाजीशिवाय. तेव्हा ह्याकरता आणेन मुद्दाम.
छान आणि वेगळीच कृती आहे.
छान आणि वेगळीच कृती आहे.
सायो, हे - 'एरवी दोडका घरात येत नाहीच तु पा वा भाजीशिवाय.' - ह्यातलं तु पा वा म्हण्जे काय?
तुरिया पात्रा वाटाणा ही
तुरिया पात्रा वाटाणा ही गुज्जू स्टाईल भाजी. मंजूडीची रेसिपी आहे इथे.
दोडक्याची चटणी? ऐतेन! पण कृती
दोडक्याची चटणी? ऐतेन! पण कृती भारीच दिसत आहे. फोटो का टाकत नाही?
ओके सायो, धन्स...
ओके सायो, धन्स...
धन्यवाद मंडळी! पुढल्या वेळी
धन्यवाद मंडळी! पुढल्या वेळी ही पचडी केली की नक्की फोटो घेऊन टाकेन. Meanwhile इतर कुणी try केली तर pls photo upload करा!
प्रज्ञा परततानाच दोडक्याचा
प्रज्ञा परततानाच दोडक्याचा पार खिमा होतो का?
गुरगुरवणे आवडले .... आधीच दोडके (लाडके नसलेले) त्यात गुरगुरवके