१. उडदाची डाळ - १ वाटी
२. अर्धा लिटर दूध
३. तळणीसाठी तेल
३. मीठ, साखर चवीनुसार
४. दहीवड्यावर वरून घेण्यासाठी मीरपूड, लाल तिखट, चिरलेली कोथिंबीर इत्यादी आवडीप्रमाणे
१. उडदाची डाळ स्वच्छ धुवून साधारण सात ते आठ तास भरपूर पाण्यात भिजत घालावी.
२. दूध तापवून विरजण लावून ठेवावे.
३. सात - आठ तासांनंतर उडदाची डाळ भिजली की पाणी उपसून टाकावे. मिक्सरमध्ये डाळ बारीक वाटून घ्यावी. डाळ वाटताना पाणी आवश्यक तेवढेच घालावे. आवडत असल्यास डाळीमध्ये जिरे/ हिरवी मिरची वाटताना घालू शकता. वाटलेले पीठ मेदूवड्यांपेक्षा किंचीतच सैल हवे. पीठ चमच्यात घेऊन वरून सोडले असता एकसंध गोळा पडायला हवा. पीठाची कन्सिस्टन्सी भज्यांप्रमाणे, केकप्रमाणे, इडलीप्रमाणे असायला नको. डोश्याप्रमाणे तर अजिबातच नको. दहीवडे/ मेदूवडे करण्यामधे पीठ वाटणे एवढे एकच कौशल्याचे काम आहे. त्यात तुमचा मिक्सर पॉवरबाज असेल तर काम अगदीच सोपं होऊन जातं.
४. वाटलेल्या पीठात चवीप्रमाणे मीठ घालून साधारण अर्ध्या-पाऊण तासासाठी झाकून ठेवून द्या.
५. विरजणाच्या दह्यात चवीप्रमाणे आणि आवडीप्रमाणे मीठ, साखर आणि भाजलेल्या जिर्याची पूड घालून दही व्यवस्थित गुळगुळीत होईपर्यंत घुसळून घ्या. किंचीत आल्याचा रस घातल्यास दह्याला मस्त चव येते. दह्यात बहुतेकवेळा पाणी घालावे लागत नाही. विरजणाचे अंगचे पाणी आणि मीठ साखरेमुळे सुटलेल्या पाण्यामुळे दही सैल होईल तेवढेच पुरेसे होते. पण तयार झालेले दही खूपच घट्ट वाटले तर पाणी मिसळून दही फ्रिजमधे थंडगार व्हायला ठेवून द्या.
६. अर्ध्या-पाऊण तासानंतर उडदाच्या डाळीचे वाटलेले पीठ चमच्याने व्यवस्थित आणि भरपूर फेटून घ्या. तळणीसाठी तेल तापवून आपल्याला आवडतील तेवढ्या आकाराचे वडे किंचीत चॉकलेटी रंग येईपर्यंत तळून टिश्यू पेपरवर काढून घ्या.
७. तळलेले सगळे वडे एका पसरट भांड्यात किंवा परातीत घ्या. एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात किंचीत मीठ आणि हिंग मिसळून घ्या. आणि हे पाणी वड्यांवर घाला. साधारण दहा मिनिटे वड्यांमधे पाणी राहू द्या.
८. मग एकेक वडा हातात घेऊन हलक्या हलक्या हाताने पाणी पिळून घ्या. वडा मोडता कामा नये. हे वडे घट्ट झाकणाच्या डब्यात फ्रिजमधे ठेवले तर (मुंबईच्या हवेत) दोन दिवस चांगले राहतात. पण नंतर मात्र खराब (म्हणजे वड्यांना बुळबुळीतपणा येतो) व्हायला सुरूवात होते.
९. दहीवडे देताना प्लेटमधे वडे घेऊन त्यावर तयार केलेले थंडगार दही घालून आवडीप्रमाणे मिरपूड, लाल तिखट, कोथिंबीर भुरभुरवून द्यावे.
१. पूर्ण उडदाची डाळ घ्यायची नसेल तर मुगाची आणि उडदाची डाळ निम्मी निम्मी घेता येते. मुगाच्या डाळीमुळे वड्यांना छान रंगही येतो.
२. एक वाटी डाळीसाठी अर्धा लिटर दुधाचे विरजलेले दही जास्त होते. अर्ध्या लिटरमधले साधारण कपभर (चहाचा कप) दूध वगळले तरी चालेल.
३. दहीवडे करायला घेण्याआधी हा अख्खा बाफ पूर्णपणे वाचून काढा. प्रतिसादांत जास्त आणि मस्त टीपा आहेत.
(No subject)
वॉव!!! सशल, मला आता डोहाळे
वॉव!!!
सशल, मला आता डोहाळे लागले
सशल, मला आता डोहाळे लागले
सशल, मला आता डोहाळे लागले >>++१११ मला पन आता करावेसे वाटत आहेत.
मला पण हवेत.
मला पण हवेत.
अप्रतिम! लगेच खायला मिळाले तर
अप्रतिम! लगेच खायला मिळाले तर काय मजा येईल!!!!!!!!!!!!!!!!!
श्या................ कशाला
श्या................ कशाला उघडला मी हा बाफ... इतके दिवस निग्रहाने टाळत होते.. सशल पाठवुन दे जरा....
अजुन एक, लो फॅट दही वडे हवे
अजुन एक,
लो फॅट दही वडे हवे असतील तर आप्पे पात्रात करायचे, अर्थात डीप फ्राइड इतके हलके होत नाहीत पण चांगले लागतात स्मित. >> +१
मी आप्पे दहिवड्यांच्या दह्यात टाकुन खाउन पाहिले, ते सुद्धा छान लागले होते.
इथे कुणी तरी (इब्लिस?)
इथे कुणी तरी (इब्लिस?) सांगितल्या प्रमाणे जीरा बटर दह्यात घालून दही वड्याचं सिम्युलेशन केलं होतं. साधारण पापडी चाट सारखं लागलं असा रिपोर्ट आहे. खाण्याच्या अर्धा पाऊण तास आधी केलं तरी बटर कुरकुरीत राहिले. पुढल्या वेळी आणखी थोडा वेळ ठेवणार म्हणजे मॉइस्ट होतील.
अगदी दही वडे नाही तरी झटपट होणारा एक मस्त चाट आयटम म्हणून हा प्रकार चालून जाइल.
सिंडे, मी लिहीले
सिंडे, मी लिहीले होते.
बटर्सना फोर्कने खोचा मारून गरम पाण्यातून काढायचे म्हणजे मस्त मऊ होतात.
मीही तेच म्हणणार होते. आधी
मीही तेच म्हणणार होते. आधी थोडा वेळ गरम पाण्यात ठेवून पिळून घेतले तर नंतर पितील दही बहुधा.
फोर्कने खोचा मारून गरम
फोर्कने खोचा मारून गरम पाण्यातून काढण्याचे योग्य व्यक्तींना सांगण्यात येइल
वॉव सशल! काय तोंपासु फोटो
वॉव सशल! काय तोंपासु फोटो आहे!
माझ्या साबाई करायच्या बटरचे
माझ्या साबाई करायच्या बटरचे दहीवडे. ताक कोमट करुन त्यात फोर्कने टोचे मारलेले बटर तीन साडेतीन तास ठेवायच्या. मस्त मऊ व्हायचे.
एक नंबर... मी पण ह्या
एक नंबर... मी पण ह्या क्लबात...
प्राची, मी बटरचे दहीवडे (?)
प्राची, मी बटरचे दहीवडे (?) करणार आहे, तुझ्या टिपा लक्षात ठेवून.
मी पण दही वडे फॅन
मी पण दही वडे फॅन क्लबमध्ये.
हे घ्या.
आणि हे मेदू वडे हातानेच बनवले आहेत.
उडदाची डाळ वाटताना अजिबात पाणी नाही घालायच आणि बारीक वाटायच. तेल तापवून मंद गॅसवर तळायचे. वेळ खाऊ काम आहे पण छान स्पाँजी होतात.
एवढे दिवस कसा मिसला हा धागा.
एवढे दिवस कसा मिसला हा धागा. मी सुध्दा दहिवडे फॅन क्लबात.....
पाककृती मस्त आणि सगळे फोटो एकदम जबरी.
तोंपासु!
तोंपासु!
एवढे दिवस कसा मिसला हा धागा.
एवढे दिवस कसा मिसला हा धागा. >> हो न..
मी पन फॅन ..
हे बघा .. मी मेड ..
हे बघा .. मी मेड ..
दहीवडे आपून को भी अच्चा लगता
दहीवडे आपून को भी अच्चा लगता है.
मी पन फॅन ..
मी पन फॅन ..
उद्या नक्की! (इथे लिहीलं की
उद्या नक्की!
(इथे लिहीलं की करावच लागतं.त्यामुळे नोंद करून ठेवली आहे.)
अहाहा!!! ठाण्यात सर्वात उत्तम
अहाहा!!! ठाण्यात सर्वात उत्तम दहीवडे कूठे मिळतील? खूप पूर्वी अशोक हॉटेलमध्ये मिळायचे आता माहित नाही.
सेनापती... यू आर ऑल्वेज
सेनापती... यू आर ऑल्वेज वेलकम!!
मी पण. एवढे आवडतात की कधी
मी पण. एवढे आवडतात की कधी कधी दही वड्याची तहान दही बुंदीवर भागवते. ( अगदी छोटे दहीवडे )
मंजूडी... म्हणजे तुझे घर
मंजूडी... म्हणजे तुझे घर सोडूण अजून कुठे खास दहिवडे मिळतात असे विच्चरायचे होते.
बर आता विचारलेच आहेस तर... कधी येउ???
मी आज केलेच! आयुष्यात
मी आज केलेच!
आयुष्यात पहिल्यांदाच दहीवड़े केले (मला तळणाचा भयंकर कंटाळा आणि तिटकारा आहे). 'जहबहरी झालेत!' असे नवरा म्हणाला आणि मलाही आवडले.(सहसा स्वत: केलेला पदार्थ मला लगेच खावासा वाटत नाही). मोबाइल वरुन फोटो टाकण्याची कला अजुन अवगत न झाल्याने फेबु वर फोटो टाकले आहे.
या धाग्याबद्दल मंजुडी यांचे आणि धागा वर आणल्याबद्दल आरती. यांचे आभार!
डाळ जास्त भिजवल्याने जास्त झालेले वड़े पाण्यात न टाकता तसेच ठेवले आहेत. उद्या सांबार करणेत येईल.
आप्पेपात्रात वडे कोणी करुन
आप्पेपात्रात वडे कोणी करुन बघितले आहेत का? कसे होतात?
दहीवडे तुफान आवडतात. पण तळण
दहीवडे तुफान आवडतात. पण तळण नको वाटतं. म्हणून बिनतळणीचे दहीवडे शोधले. काही पाककृतींमध्ये वडे इडलीपात्रात वाफवण्याची आयडिया होती. पण ती काही आवडली नाही. तरला दलालांची कृती ठीक वाटली म्हणून त्यानुसार दहीवडे केले.अफाट मस्तं लागले. ज्यांना माहितीनव्हतं त्यांना कळलंही नाही हे वडे तळलेले नसल्याचं.
१ वाटी उडीदडाळ ७-८ तास भिजवून आलं,हिरव्या मिर्च्या आणि मीठ घालून बारीक वाटली. कृतीत जाडसर वाटायला सांगितली आहे, पण बारीक वाटलेली आवडते. फायनल टेक्स्चर छान लागतं. ह्यात इनो फ्रूट सॉल्ट घालून फेटून घेतलं. गरम तव्यावर चमचाभर तेल पसरून थोडं थोडं पीठ घातलं. जरा वेळ झाकून ठेवलं. उलटून दुसर्या बाजूनं वडे खरपूस होऊ दिले. थोडं तेल ब्रशनं चोपडलं.
नंतर नेहमीप्रमाणे कढत पाण्यात घालून, किंचित दाब देऊन पाणी काढलं. वडे दह्यात घालून ४-५ तास ठेवले. खाल्ले.
(पहिल्या बॅचला फ्रूट सॉल्ट कमी पडलं. वडे जास्त फुगले नाहीत. पण थोडं आणखी फ्रूट सॉल्ट घातल्यावर मस्तं हलके आणि गुबगुबीत वडे झाले.)
Pages