स्टार प्लस वरील महाभारताची आपली चर्चा चांगली रंगली होती. महाभारत चा शेवटचा एपिसोड संपेपर्यंत चर्चा सुरु राहिली होती.
आता नुकतीच कलर्स या वाहिनीवर "चक्रवर्तीन अशोक सम्राट" ही मालिका सुरु झाली आहे आणि सोम-शुक्र रात्री ९ वाजता. चक्क ५० मिनिटे हि मालिका दाखवली जात आहे. सुरुवातीची ३५ मिनिटे एकही ब्रेक नसतो. सुरुवातीचे तीन एपिसोड झकास जमून आले आहेत.
पहिल्याच तीन भागात मराठीतले कसलेले कलाकार आपला सुंदर अभिनय सादर करत आहेत. मनोज जोशी चाणक्य बनलाय. समीर धर्माधिकारी बिंदुसार झालाय, पल्लवी सुभाष धर्मा/शुभ्रदंगी झालीय.
अधून मधून चाणक्यला स्वप्नातून किंवा शकून म्हणून दर्शन देणारा आणि मार्गदर्शन करणारा सिंह (सम्राट चंद्रगुप्ताचा आत्मा) ही संकल्पना झकास जमून आलीय.
तसेच चाणक्य मेल्यानंतर बहुतेक त्याचा आत्मा सूत्रधारा सारखा त्याची "चाणक्य नीति" आपल्याला सांगत राहाणार आणि गोष्ट पुढे नेणार असे वाटते आहे, जसे कृष्ण महाभारतात सांगायचा तसेच! अर्थात अजून सिरीयल मध्ये चाणक्य जिवंत आहे.
नितीन देसाई चा सेट छान आहे. पुन्हा एकदा!
श्रीमंत निर्मितीमूल्ये आहेत.
स्पेशल इफेक्ट छान आहेत.
थोडे नाट्य जास्त आहे पण ठीक आहे, त्याने मनोरंजन मूल्यही वाढते आणि सोबत आपल्याला अशोकाची जीवनकथा सुद्धा कळते.
यात शुद्ध हिंदी बोलणारी जर्मन अभिनेत्री सुद्धा आहे ,जिने हेलेना चे काम केले आहे.
हेलेना हि सेल्युलस निकेटर ची मुलगी आणि चंद्रगुप्त मौर्य ची पत्नी. बिंदुसार ची सावत्र आई. सेल्युलस निकेटर हा अलेक्झांडर चा सेनापती असतो. खुरासन नावाचे एक पात्र आहे जे नूर या आपल्या मुलीचा विवाह बिन्दुसार शी करून मगध हडप करण्याच्या मार्गावर असतो.
आतापर्यंत ची कथा:
हेलेना आपल्या जस्टीन या मुलाच्या मदतीने बिंदुसारला मारण्याचा अयशस्वी प्रयत्न करते. शुभ्रदंगी त्याला वाचवते जिच्याशी लग्न करून बिंदुसारला काही कारणास्तव पुन्हा मगध मध्ये परतावे लागते . बिन्दुसार ला त्याचेवर हल्ला कुणी केला/करवला हे कळत नाही. मगध चा राजा जस्टीन ला बनवण्याचे तिचा डाव फसतो. दरम्यान चाणक्यवर बिंदुसार च्या आईवरच्या विष प्रयोगाबद्दल शंका घेतली गेल्याने तो दूर राहून अर्थ शास्त्र लिहितो. शुभ्रदंगी चा मुलगा अशोक मोठा होतो. दरम्यान एका युद्धात जखमी झाल्यावर बिंदुसार वर उपचार चालू असताना पुन्हा हेलेना त्याचेवर विषप्रयोग करते....
दरम्यान चाणक्य असे योगायोग घडवून आणतो की शुभ्रदंगी चा बिंदुसार बद्दलचा गैर समाज दूर व्हावा (जो खुरासन या राज्यकर्त्याने निर्माण केला असतो - तिला आणि पोटातल्या अशोक ला मारण्याचा प्रयत्न बिन्दुसारच्या नावे करून!) आणि तिचा मुलगा अशोक हा सम्राट व्हावा.....!!!
सर्वांनी ही मालिका बघावी अशी माझी इच्छा आहे. विनंती आहे.
बाकी आपली मर्जी.
जे बघतील त्यांनी आपली मते मतांतरे येथे मांडावीत ही अपेक्षा!
(No subject)
काय विचारात पडलात सुधीर जी?
काय विचारात पडलात सुधीर जी?
कोणी पहात नाही का ही सिरीयल?
कोणी पहात नाही का ही सिरीयल?
आज पासून सुरू केली बघायला छान
आज पासून सुरू केली बघायला छान वाटली. सम्राट ची भुमिका करणारा मुलगा जबरदस्त काम करतोय आणि शोभुन पण दिसतोय.
मी पाहतेय दोन दिवस. मलापण
मी पाहतेय दोन दिवस. मलापण छोट्या अशोकचे काम आवडलं.
तो दुसरा अशोकचा सावत्र भाऊ
तो दुसरा अशोकचा सावत्र भाऊ नाही आवडला. फारच व्हिलन वाटला.
तो अशोकचा सावत्र भाऊ कुठल्या
तो अशोकचा सावत्र भाऊ कुठल्या तरी डान्स शो मधे पाहिल्या सारखा वाटतोय..Dance India Dance किंवा Dance maharashtra Dance
चाणक्य सर्वात जबरदस्त!
चाणक्य सर्वात जबरदस्त!
सम्राट अशोकाचे आजोबा
सम्राट अशोकाचे आजोबा चंद्रगुप्त मौर्य हे लहान असताना चाणक्य मोठे होते मग आता अशोकाच्या वेळी ते म्हातारे हवे होतेना, तेव्हढे म्हातारे वाटत नाहीत चाणक्य.
मनोज जोशी यांनी काम चांगलं
मनोज जोशी यांनी काम चांगलं केलंय.
मनोरंजन म्ह्णुन बघायला ठीक
मनोरंजन म्ह्णुन बघायला ठीक आहे.खरा इतिहास वाटत नाहिय.
मनोरंजन म्ह्णुन बघायला ठीक
मनोरंजन म्ह्णुन बघायला ठीक आहे.खरा इतिहास वाटत नाहिय.>>.+१११
आणि त्या बिन्दुसाराची आई फोरेनर का दाखवलीय ? दागिने , महालाची रचना बौद्ध पद्धतीची वाटते . चायनीज वगेरे सारखी . irritating गोष्ट म्हणजे पल्लवी
सुभाष घुंघट घेत असल्यामुळे तिचा चेहराच दिसत नाहीये
आणि त्या बिन्दुसाराची आई
आणि त्या बिन्दुसाराची आई फोरेनर का दाखवलीय ?>> His step mother was Greek.
मस्त चाललिये सद्ध्यातरी.
मस्त चाललिये सद्ध्यातरी. कथानक भराभर पुढे सरकतय. सम्राट अशोकाचा जन्म ते पुढचा १४वर्षांचा काळ एकाच एपिसोडमधे संपला.
राजमाता हेलेना जरा जास्तच कारस्थानी वाटते किंबहुना तसं दाखवताहेत अर्थात ती लिबर्टी म्हणुन जरी एकवेळ मानल तरी राणी नूर आणि राजकुमार जस्टीन मधली जवळीक सद्ध्याच्या टीव्ही सिरियल मधे दाखवल्याप्रमाणे दाखवलिये.
पाहिली नाहिये. ऑनलाईन कूठे
पाहिली नाहिये. ऑनलाईन कूठे बघता येईल का?
बर हा धागा इतिहस पेक्षा मालिका विभागात हलवा.
कलर्स च्या साईट वर जा
कलर्स च्या साईट वर जा
निमिष ते अशोकाच्या आईचे नाव
निमिष ते अशोकाच्या आईचे नाव सुभद्रांगी की शुभ्रदंगी ते चेक कराल का? मला ते सुभद्रांगी ऐकु येतय आणि विकी पण तेच सांगतोय.
सुभद्रांगी. मला आता तिसरया
सुभद्रांगी. मला आता तिसरया आठवड्यात नीट ऐकू आले...
पण इथे दाखवत आहेत तसाच इतिहास
पण इथे दाखवत आहेत तसाच इतिहास आहे का कारण मला खूप काही माहिती नाहीये सम्राट अशोक बद्दल.
जसं महाभारत माहिती होतं पण सम्राट अशोक चा इतिहास फार कमी माहितेय. शाळेत वगैरे शिकलेय तेवढाच.
मी अधून मधून बघतेय ही सिरियल.
मी अधून मधून बघतेय ही सिरियल. इन्टरेस्टिंग आहे. मला समहाऊ अशोकाचा काळ असेल ६ -७च्व्या शतकातला असं वाटत होतं पण नंतर सर्च केल्यावर कळले की इसवी सनापूर्वी ३०० वर्षे म्हणजे जवळ जवळ अडीच हजार वर्षापूर्वीचा काळ आहे! त्या काळाच्या मानाने विचार करता चाणक्याची राजनीती, अर्थशास्त्र, तेव्हा असलेली विद्यापीठे सर्वच विस्मयकारक वाटते.
नालासोपारा येथे मूळ बुध्द
नालासोपारा येथे मूळ बुध्द स्तूप होते आणि त्याची प्रतिकृती सांची येथे आहे असं मी वाचलंय आणि सोपाऱ्याला स्वतः अशोकाने भेट दिली होती. पण सोपारा इथे नीट लक्ष दिलं गेलं नाही. सांचीच्या स्तुपाची जोपासना केली गेली.
मी १० वर्षे नालासोपारा येथे राहूनही स्तूप बघितला नाही याचं वाईट वाटतं.
खरा दानव सापडेल बरं का
खरा दानव सापडेल बरं का आज!
आणि तो सियामा किती क्युट आहे ना!
सुशीम दानव निघाला. अशोक
सुशीम दानव निघाला. अशोक त्याचेपेक्षा वस्ताद निघाला. आणि चाणक्य सर्वापेक्षा उस्ताद निघाला. आता प्रतिक्षा आहे बिंदुसार ला अशोक त्याचा मुलगा आहे हे केव्हा कळेल याची!
आणि आज चाणक्याचा कुणीतरी दुश्मन येणार आहे म्हणे! हेलेनाच्या सांगण्यावरून!
चाणक्याला मात देण्यासाठी!
बघुया काय होते ते!
इथे वाचून सिरीयल बघायला
इथे वाचून सिरीयल बघायला सुरुवात केलीये, आत्तातरी मस्त वाटतेय.
कालचा भाग चांगला होता.
कालचा भाग चांगला होता. सिरीयलला अजून वेग नाहीये पण. थोडा वेळ लागेल.
अमात्य राक्षस आलाय आता.
अमात्य राक्षस आलाय आता. चाणक्य ला मात द्यायला.
कालचा भाग छान होता.मधे त्या
कालचा भाग छान होता.मधे त्या दानव प्रकरणात १-२ भाग जरा संथ झालेले. कालच्या भागा मधला धर्मा आणि चाणक्य यांच्यामधला अहिंसा आणि हिंसा याबद्द्लचा संवाद चांगला वाटला. मागेही एका भागात चाणक्य अशोकला राजाने न्याय कसा करावा हे सांगतो त्या वेळेचा संवाद छान होता. चाणक्यनीती ची थोडी झलक पाहायला मिळाली.
आता अमात्य राक्षस आलाय तेव्हा नाट्यमय घडामोडी घडतील असं वाटतय ...या दोघांमधली जुगलबंदी पाहायला मजा येईल.
<बर हा धागा इतिहासापेक्षा
<बर हा धागा इतिहासापेक्षा मालिका विभागात हलवा> +१.
जान्हवीचे सासरे आणि बाबा दोघे
जान्हवीचे सासरे आणि बाबा दोघे ही या सिरियल मध्ये आहेत.पण बाबांना जास्त संवाद नाहियेत.
हा धागा मालिका विभागात कसा
हा धागा मालिका विभागात कसा हलवायचा?
जान्हवी चे सासरे दिसले नाहीत कुठे? बाबा दिसले (खाल्लाटक)!
Pages