आज लागलेल्या निकालाने राजकारणात अनेक अन्वयार्थ नव्याने दिसत आहेत. निकालाने नविन उच्चांक निर्माण झाले आहेत हा भाग आणखी वेगळा आणि आश्चर्यकारक आहेत.
१) आम आदमी पार्टी ५५ % मते आणि ९६ % जागा मिळवुन सत्तेवर येत आहे. आजकाल हे % प्रथमच पहाण्यात येत आहे.अश्याप्रकारे प्रथमच जागा आणि % या दोन्ही स्तरावर आम आदमी पार्टी विजयी झाली आहे.
२) ३३% मते मिळवुन भाजपला फक्त ४ टक्के जागा मिळवौन भाजप दिल्लीत हारला आहे.
३) दिल्लीला प्रथमच नविन पक्षाला एक वर्षाच्या अंतराने जनतेने पुन्हा कौल मिळाला आहे.
४) तिसरा पक्ष आणि अपक्ष या निवडणुकीत जनतेने संपुर्णपणे नाकारले आहेत.
५) दिल्लीची जनता १४-१५ महिन्यांच्या कालावधीत तीन वेळा निवडणुकीला सामोरे जाऊन तीन वेगळे जनादेश देऊन दिल्लीचे प्रश्न आणि राष्ट्रीय प्रश्न वेगळे आहेत या निर्णयावर शिक्कामोर्तब करत आहे.
६) दिल्ली कायमच धक्कादायक निकाल देते हे वेगळेपण राखले आहे.
७) जनलोकपाल ज्या मुद्यावर मागील सरकार बनले आणि पडले हा मुद्दा दिल्लीच्या जनतेच्या मते महत्वाचा नव्हता.
८) पक्षबदलुना दिल्लीने नाकारले आहे.
९) स्त्री आणि आय पी एस असलेल्या किरण बेदी सुध्दा आपला प्रभाव पाडु शकल्या नाहीत.
१०) जनतेने अरविंद केजरीवाल यांना राजीनामा देण्यासाठीच नाही तर सामान्य माणसाचे सरकार वेगळे
असेल अश्या घोषणा न पाळण्यासाठी सुध्दा माफ केले आहे. उदा.
१) सरकारी घर घेणार नाही. गाडी वापरणार नाही इ.
भाजप का हरले याची कारणमिमांसा
१) दिल्लीत लोकांना केजरीवाल जास्त विश्वासु वाटले.
२) मोदींचा करिष्मा दिल्ली विधानसभेसाठी चालला नाही.
३) बेदींना आणल्यामुळे भाजप कार्यकर्ते नाराज असावेत.
४) शिस्त लावल्यामुळे सरकारी नोकर मोदीसरकारवर नाराज असावेत.
५) हिंदुत्व अजेंड्यचा अतिरेक झाल्यामुळे मुसलमान मतदार दुरावला.
६) सर्वात महत्वाचे आणि खात्रीलायक, भाजपचा जनाधार संपला नाही पण काँग्रेसचा संपला
२०१३ मध्ये कॉग्रेसला २४ % मते होती पैकी १४ % आता ती आआप च्या पारड्यात पडली.
यामुळे मतविभाजनाचा फायदा भाजपला मिळाला नाही.
आता पहाण्यालायक खालील गोष्टी असतील.
१) केंद्र आणि राज्याचे संबंध खरोखरच चांगले रहातात का?
२) दिल्लीत लोकपाल विधेयक येणार का?
३) भाजपला राष्ट्रव्यापी पर्याय किंवा काँग्रेसला पर्याय आम आदमी पक्ष बनु शकतो का?
४) स्त्रीयांचे संरक्षण दिल्लीत होऊ शकते का?
५) चांगले काम करुन पाच वर्षांनी पुन्हा सत्तेवर येऊ शकते का?
६) वीज आणि पाणी हे प्रश्न कायमचे सुटु शकतात का?
७) आम आदमी पक्ष सत्ताधारी म्हणुन वेगळा ठसा उमटवु शकते का?
:
:G:
खुर्चीवाल याला दिल्लीच्या
खुर्चीवाल याला दिल्लीच्या पब्लिकने दुसर्यांदा "मुख्यमंत्री" बनवल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा!
गेल्यावेळेसारख यमुनेत उडी मारुन, वाराणसीला गंगेतुन बाहेर येण्याचा प्रयत्न, पंतप्रधान या पदाच्या लालसेतुन या जोकराने करु नये एवढीच इच्छा.
आआप आणि त्याला पाठिंबा
आआप आणि त्याला पाठिंबा देणार्या सर्वांचे कौतुक, अभिनंदन, शुभेच्छा सर्व काही ! स्मित
फेब्रुवारी अखेरपर्यंत फार काही लिहिता येणार नाही. मार्च किंवा एप्रिल मधे पुन्हा नियमितपणे वाचता / लिहिता येईल असे वाटते. तोपर्यंत बर्याच गोष्टी घडलेल्या असतील. त्याच्यासह सविस्तर मुद्दे घेऊन येऊन लिहिणार.
जमल्यास नविन धागा सुरू करण्यात येईल. तो पर्यंत वाचणे चालू ठेवायचा प्रयत्न राहील.
फक्त एकच सांगतो ते लक्षात ठेवा. सत्ता मिळवून समाजात चांगले बदल घडवणे सोपे नाही. जोपर्यंत प्रत्येक माणुस स्वतःहुन बदलत नाही, तोपर्यंत कितीही चांगली सत्ता आली तरी समाज सुधारणा होणे सर्वथैव अशक्य आहे.
याचे कारण ज्या तरुण वाढीव
याचे कारण ज्या तरुण वाढीव मतदारांनी त्यांना मतदान केलय, त्यांचेच पालक/मालक/सगोसोयरे हे जेव्हा आपच्याच "भ्रष्टाचार विरोधी" मोहिमे मुळे अडचणीत येऊ लागतील तेव्हा काय कसे होईल हे सांगणे कठीण आहे.
------ लिम्बुजी आप "भ्रष्टाचार विरोधी" आहे आणि त्यान्चा विरोध प्रामाणिक आहे हे जनसामान्य मतदारान्वर ठसवण्यात आप कमाल यशस्वी झाली आहे...
मतदारान्ना भाजपाने 'विकासाचे' स्वप्न दाखवले, काळा पैसा परत आणू असे जाहिर आश्वासन अनेकवेळा दिले, मतदारान्नी त्यावर विश्वास ठेवला... दिल्लीत सर्व सहा खासदार निवडुन देणारा त्यावेळचा आणि आज ७० पैकी ६७ भाजपा आमदार नाकारणारा मतदार तोच आहे.
भ्रष्टाचार करणारे पालक, मालक, सगेसोयरे असतील तर ते मुलान्च्या आदर्शवादा मुळे सुधरण्यची शक्यता पण आहेच. प्रत्येकवेळा नकारात्मक विचार नको करायला...
केजरीवाल के भाषण के
केजरीवाल के भाषण के महत्वपूर्ण अंश-
5 साल दिल्ली में रहूंगा, दिल्ली की सेवा करुंगा।
टोपी पहनकर गुंडागर्दी करने वालों को पुलिसवाले न बख्शें।
49 दिन की सरकार में भ्रष्टाचार खत्म हो गया था।
कोई रिश्वत मांगे तो मना नहीं करना। सेटिंग कर रिकॉर्ड कर लेना।
सरकार पर समय सीमा का दबाव न बनाए मीडिया।
हमारे मंत्री और विधायक 24 घंटे काम करेंगे।
पिछले कुछ समय में दिल्ली में सांप्रदायिकता की घटनाओं में बढ़ोतरी हुई। इस तरह की सांप्रदायिकता की राजनीति बंद होनी चाहिए।
हम दिल्ली पुलिस के साथ मिलकर राजधानी को सुरक्षित बनाएंगे, जिसमें सभी धर्म के लोग अपने को सुरक्षित महसूस कर सकें।
पीएम से मिलने गया था। वहां कहा था कि केंद्र से सहयोग चाहते हैं और केंद्र के हर अच्छे कार्य में सहयोग करेंगे।
मैं और आप [मोदी] चाहे तो दिल्ली को पूर्ण राज्य का दर्जा मिल जाएगा।
हारी सीटों पर भी बिना भेदभाव के विकास करेंगे।
दिल्ली के व्यापारियों को दिया आश्वासन। कहा कि आज से कोई भी विधायक आपको तंग नहीं करेगा। आप बस पूरा टैक्स भरें।
आपके टैक्स की चोरी नहीं होने दूंगा। इस टैक्स का एक-एक पैसा जनहित में लगेगा। आप दिल खोलकर टैक्स दीजिए।दिल्ली सरकार के खजाने में कमी नहीं। नीयत साफ होनी चाहिए।
मुझे सिर्फ 4-5 कमरे चाहिए।
हमें पार्टीबाजी नहीं करनी है।
कोई भी मंञी लालबत्ती नहीं लेगा।
हम किरण बेदी और अजय माकन का भी सहयोग लेते रहेंगे।
हमें सही निर्णय लेने की ताकत दे भगवान।
भारतीय क्रिकेट टीम को दी शुभकामना और कहा कि टीम विश्व कप लेकर लौटेगी।
छान भाषण !! केजरीवाल व
छान भाषण !!
केजरीवाल व त्यांच्या टीमला शुभेच्छा !!
छान भाषण !! +१ पण 49 दिन की
छान भाषण !! +१
पण
49 दिन की सरकार में भ्रष्टाचार खत्म हो गया था।
<<
<<
हे केजरीवालांना कसे काय कळले की सर्व दिल्लीत भ्रष्टाचार थांबला.
मुझे सिर्फ 4-5 कमरे चाहिए।
<<
<<
हे ४-५ कमरे कश्यासाठी?
आप दिल खोलकर टैक्स दीजिए।
<<
<<
हा टैक्स मागतोय की स्वत:च्या पार्टीसाठी चंदा?
कल तक अकड़ने वाले , आज मुंह
कल तक अकड़ने वाले , आज मुंह लटकाए से नज़र आते हैं !
दम भरते थे दुनिया हिलाने का , पर खुद हिले हिलाये से नज़र आते हैं !!
जो एक दो थप्पड़ों पर , अरविन्द का मजाक उड़ाया करते थे !
आधी दिल्ली के तमाचों से तिलमिलाए से नज़र आते हैं !
काँग्रेसवालो का हाल सही बयान
काँग्रेसवालो का हाल सही बयान किया "आपने" !!
:G:
CM केजरीवालांच्या हाती
CM केजरीवालांच्या हाती मंत्र्यांचा रिमोट!
आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी रामलीला मैदानावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर लगेच मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर केले. सहा मंत्र्यांना सर्व खात्यांचे वाटप केले. एकाही खात्याचा 'भार' हाती न घेता त्यांनी मंत्र्यांच्या 'कारभाराचा रिमोट कंट्रोल' आपल्याकडेच ठेवला आहे.
तरी बर, त्यांच्या त्या
तरी बर, त्यांच्या त्या धाग्यावर मोदींचा कंट्रोल कोणाला पचनी पडला नव्हता पण, तिथेच
हा केजरीवालचा कंट्रोल असल्याने तो फारच " जेन्युंईन " आणि युग प्रवर्तक ठरेल !
आपल्या भाषणात केजरीवाल एक
आपल्या भाषणात केजरीवाल एक महत्वाचे बोलले. मिडीयावाल्यांना सांगा की किती तासात हे करणार विचारु नका. आम्हाला जनतेने ५ वर्षांसाठी निवडुन दिलेले आहे.
लोकहो, हाच निकष मोदींनाही लागु पडतो का ? अस असेल तर आआप सह सर्वच पक्ष १०० दिवसात काय केल, सहा महिन्यात काय केल आणि नउ महिन्यात काय केले याचा हिशोब आत्ता का मागत आहेत ?
दुहेरी मापदंड दुसर काय
प्रचारात १०० दिवासात 'काला
प्रचारात १०० दिवासात 'काला धन' आणू असे भाजपेयी नेते म्हणत होते. ही डेडलाइन त्यांनी स्वतःच दिली होती आता तो चुनावी जुमला झाला असेल. मोदींना कामासाठी वेळ द्यायला हवा मात्र काही भरीव काम अजून केले नाही तरी भाजपेयी मात्र खूप काम केल्याचा डंका वाजवत असतात.आम्हाला बहुमत द्यां, गेल्या ६०-६५ वर्षात झाला नाही एवढा विकास ५ वर्षात करून दाखवेन अश्या गमजा प्रधान सेवक मारत होते मग ८-९ महिन्यात त्या विकासाची झलक तरी पाहायला मिळावी अपेक्षा चूक कशी म्हणता येईल? आत्ता पर्यंत तरी कामे कमी भाषणबाजीच जास्त अशी स्थिती आहे.
limbutimbu, भाऊ तोरसेकरांनी
limbutimbu,
भाऊ तोरसेकरांनी या लेखात बघा भाजपच्या पराभवाचं आणि आआपच्या विजयाचं विश्लेषण कसं केलंय :
‘आप’सात बदललेल्या भूमिका
मतदारराजाच्या भावना पायदळी तुडवणाऱ्या भाजपला छानपैकी शिक्षा मिळाली म्हणून मी आनंदात आहे. खरंतर लोकसभा निवडणुकीत भाजपला दिल्ली विधानसभेच्या ७० विभागांपैकी पैकी ६० ठिकाणी मताधिक्य होतं. भाजपने (=मोदींनी) याचा फायदा तत्काळ उठवायला हवा होता. जर एव्हढा वेळ काढायचा होता तर मतदारांशी संपर्कात राहायला हवं होतं. तसंच राष्ट्रपती राजवटीच्या माध्यमातून सरकार लोकाभिमुख रीत्या चालवायला हवं होतं. मोदींना ते आजिबात अवघड नाही. मात्र हे काहीही न करता केवळ वेळकाढूपणा केला.
यासंबंधी तोरसेकरांनी एक निरीक्षण दिल्ली निवडणुकांच्या पूर्वी २०१४ च्या डिसेंबरात नोंदवलं होतं :
भाजपाच मोदीमंत्र विसरतोय
आ.न.,
-गा.पै.
केजरीवाल शपथविधीच्या भाषणात
केजरीवाल शपथविधीच्या भाषणात क्रिकेट बद्दल बोलतात आणि टिम ईंडीयाला यश चिंतीतात, ते बरोबर पण
पंतप्रधांनानी केल तर ते चुक ? हा अजब न्याय म्हणायचा, मिर्ची ताईचा !!
अरे देवा, चालु
अरे देवा, चालु घडामोडींवर
लोकांना उपरोध देखील कळत नाही म्हणजे अवघड आहे!
<<केजरीवाल शपथविधीच्या भाषणात
<<केजरीवाल शपथविधीच्या भाषणात क्रिकेट बद्दल बोलतात आणि टिम ईंडीयाला यश चिंतीतात, ते बरोबर पण

पंतप्रधांनानी केल तर ते चुक ? हा अजब न्याय म्हणायचा, मिर्ची ताईचा !!>>
रमाकांत, बरे आहात ना?? मी क्रिकेटबद्दल काय लिहिलंय इथे ???

मोगलांना जसे तळ्याच्या पाण्यातही संताजी-धनाजी दिसायचे तसे तुम्हाला मिर्ची आणि केजरीवाल दिसायला लागले की काय?
मिर्चीताई मस्त किमान शब्दात
मिर्चीताई मस्त किमान शब्दात कमाल खिल्ली
किमान शब्दात कमाल अपमान
Pages