दिल्लीच्या निकालाचा अन्वयार्थ

Submitted by नितीनचंद्र on 10 February, 2015 - 08:30

आज लागलेल्या निकालाने राजकारणात अनेक अन्वयार्थ नव्याने दिसत आहेत. निकालाने नविन उच्चांक निर्माण झाले आहेत हा भाग आणखी वेगळा आणि आश्चर्यकारक आहेत.

१) आम आदमी पार्टी ५५ % मते आणि ९६ % जागा मिळवुन सत्तेवर येत आहे. आजकाल हे % प्रथमच पहाण्यात येत आहे.अश्याप्रकारे प्रथमच जागा आणि % या दोन्ही स्तरावर आम आदमी पार्टी विजयी झाली आहे.
२) ३३% मते मिळवुन भाजपला फक्त ४ टक्के जागा मिळवौन भाजप दिल्लीत हारला आहे.
३) दिल्लीला प्रथमच नविन पक्षाला एक वर्षाच्या अंतराने जनतेने पुन्हा कौल मिळाला आहे.
४) तिसरा पक्ष आणि अपक्ष या निवडणुकीत जनतेने संपुर्णपणे नाकारले आहेत.
५) दिल्लीची जनता १४-१५ महिन्यांच्या कालावधीत तीन वेळा निवडणुकीला सामोरे जाऊन तीन वेगळे जनादेश देऊन दिल्लीचे प्रश्न आणि राष्ट्रीय प्रश्न वेगळे आहेत या निर्णयावर शिक्कामोर्तब करत आहे.
६) दिल्ली कायमच धक्कादायक निकाल देते हे वेगळेपण राखले आहे.
७) जनलोकपाल ज्या मुद्यावर मागील सरकार बनले आणि पडले हा मुद्दा दिल्लीच्या जनतेच्या मते महत्वाचा नव्हता.
८) पक्षबदलुना दिल्लीने नाकारले आहे.
९) स्त्री आणि आय पी एस असलेल्या किरण बेदी सुध्दा आपला प्रभाव पाडु शकल्या नाहीत.
१०) जनतेने अरविंद केजरीवाल यांना राजीनामा देण्यासाठीच नाही तर सामान्य माणसाचे सरकार वेगळे
असेल अश्या घोषणा न पाळण्यासाठी सुध्दा माफ केले आहे. उदा.

१) सरकारी घर घेणार नाही. गाडी वापरणार नाही इ.

भाजप का हरले याची कारणमिमांसा

१) दिल्लीत लोकांना केजरीवाल जास्त विश्वासु वाटले.
२) मोदींचा करिष्मा दिल्ली विधानसभेसाठी चालला नाही.
३) बेदींना आणल्यामुळे भाजप कार्यकर्ते नाराज असावेत.
४) शिस्त लावल्यामुळे सरकारी नोकर मोदीसरकारवर नाराज असावेत.
५) हिंदुत्व अजेंड्यचा अतिरेक झाल्यामुळे मुसलमान मतदार दुरावला.
६) सर्वात महत्वाचे आणि खात्रीलायक, भाजपचा जनाधार संपला नाही पण काँग्रेसचा संपला
२०१३ मध्ये कॉग्रेसला २४ % मते होती पैकी १४ % आता ती आआप च्या पारड्यात पडली.
यामुळे मतविभाजनाचा फायदा भाजपला मिळाला नाही.

आता पहाण्यालायक खालील गोष्टी असतील.

१) केंद्र आणि राज्याचे संबंध खरोखरच चांगले रहातात का?
२) दिल्लीत लोकपाल विधेयक येणार का?
३) भाजपला राष्ट्रव्यापी पर्याय किंवा काँग्रेसला पर्याय आम आदमी पक्ष बनु शकतो का?
४) स्त्रीयांचे संरक्षण दिल्लीत होऊ शकते का?
५) चांगले काम करुन पाच वर्षांनी पुन्हा सत्तेवर येऊ शकते का?
६) वीज आणि पाणी हे प्रश्न कायमचे सुटु शकतात का?
७) आम आदमी पक्ष सत्ताधारी म्हणुन वेगळा ठसा उमटवु शकते का?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गेल्या ३ महीन्यात देवेंद्र सरकारनी एक सुद्धा राष्ट्रवादीचा मंत्री तुरुंगात धाडला नाही. काय उपयोग असल्या देवेंद्र आणि नरेंद्र चा.
------
हे करायला धाडस हवे... सेनेने पाठिम्बा काढल्यावर राष्ट्रवादी हा backup plan आहे. राष्ट्रवादी ने पहिल्या तासालाच न मागता बिनशर्त पाठिम्बा जाहिर केला होता.

मला सर्वात जास्त निराश केले ते आसुमल प्रकरणातील दोन महत्वाच्या साक्षिदारान्च्या हत्येने आणि तिसर्‍यावर झालेल्या हल्ल्यामुळे.

वर कुणीतरी केजरीवाल आणि राष्ट्रपतींचा फोटो यावर लिहील आहे. अंबानी मालक एका कार्यक्रमात आपल्या प्रधान सेवकांच्या खांद्यावर जिगरी यार असल्याच्या थाटात हात टाकून उभे होते ते आठवले.

दिल्ली निवडणुकांच्या सगळ्या जाहिरातीवर मोदिंचेच फोटो झळकत होते. 'चले चलो मोदी के साथ' ही घोषणा तिकडे पण होती. बाकी राज्यात मोदींना पुढे करून जागा मिळवल्या कि मोदींची जीत, ८-९ महिन्यापूर्वी याच दिल्लीत सगळ्या लोकसभेच्या जागा भाजप जिंकली तेव्हा मोदींची जीत आता जनतेने उलटा कौल दिला कि ते लगेच अपरिपक्व ?

निवडणुकीत हरल्यावर बहुमताचा आदर न करता जनतेला अपरीपक्व म्हणने हे आगामी काळात अंगलट येऊ शकते.
माझ्यामते हा अपरीपक्व राजकारणाचा नमुना आहे. Happy

काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्याला एकही जागा मिळाली नाही व आता उगाच पक्ष चालवत बसावा लागणार नाही ह्या आनंदात तिकडे सोहळा आयोजीत केला असेल. इकडे मायबोलीवर मात्र त्यांचे प्रवक्ते अजून प्रचारच करत बसलेले आहेत. प्रचार तरी काय? तर आप कसा भाजपपेक्षा चांगला आणि केजरीवाल कसे मोदींपेक्षा श्रेष्ठ! आणि हे सांगतंय कोण? तर जे दिल्लीतल्या सगळ्या जागांवर नुसतेच उभे राहून आले.

२०१३ नंतर भयंकर दिवस आलेत, एका पाठोपाठ निवडणुकीत पराभव पत्करायला लागल्याने काहींच्या डोक्यावर
परीणाम झालाय.

चर्चा मुद्द्यांवरून मायबोलीकरांवर घसरली याचा अर्थ वेगळा लावयला नको. मी हे अपरिपक्वतेचे लक्षण आहे असे म्हणणार नाही.
एकाच निवडणुकीतल्या इतक्या भयंकर पराभवाचा परिणाम भयंकर होऊन दिलीतील भारतीयांना मूर्ख व देशद्रोही म्हटले जावे याचे नवल वाटत नाही.

मयेकर,

लोकसभेच्या दिल्लीच्या दारुण पराभवानंतर, ईथेच तुमच्यातल्यच एकाने अगदी असेच उद्गात काढलेले होते, ते तुम्ही सोईस्कर रित्या विसरलेले दिसताहात !!

लोकांचे ओपीनीयन सुद्धा ईथे काहीजण डकवायला लागलेत लोक, ते ही अश्या आवेशात की जणु काही तो पुर्ण जनतेचा क्षोभच असावा !!

जितके लोक तितक्या प्रकृती

Rofl

टोचा,

>> खरे तर जलदगती कोर्ट चालू करुन आत्ता पर्यंत १० राजकारणी तरी तुरुंगात दिसायला हवे होते.

सहमत. दुर्दैवाने गुन्हेगार राजकारणी ही तुरुंगात पाठवायची वस्तू नसून राजकीय तारण म्हणून ठेवायची वस्तू असते. लोकशाहीत असंच चालतं! Sad

केजरीवालांना दोन कोट रुपये कुठून आणले अशी प्राप्तीकरपृच्छा मिळाली. त्यावरून भुजबळांना (विधानसभा निवडणुका हरल्यावर) मिळालेल्या दणक्याची आठवण झाली. असे दणके देऊन शत्रू काबूत ठेवण्यात येतात. प्रत्यक्षात शिक्षा कधीच होणार नाहीये. केजरीवाल यांनाही असंच काबूत ठेवण्यात येईल.

आ.न.,
-गा.पै.

केजरीवाल यांनाही असंच काबूत ठेवण्यात येईल. > दिवास्वप्ने भारी आहेत. आजच्या अँटी करप्शन चीफच्या नियुक्तीवरुन मोदीला भाव देणार नाही असेच दिसुन येत आहे

केजरीवाल नडणार आहे भाजपला आणि मोदींना!. आधी काही नसताना एवढे तुटून पडत होते आता तर दिल्लीत विक्रमी यश आणि मुख्यंत्रीपद!

आधी मा. शिला दिक्षित यांना ही असेच पिडले होते, जन्ते मध्ये फाईली दाखवुन दाखवुन !!!

Rofl

नंतर केजरीवालनीं काय केल हे सर्वांनाच माहीती आहे !!

उमातै भारती नावाच्या वाचाळ बाईने वड्राला ६ महिन्यात तुरुंगात धाएन अशा वल्गना केल्या होत्या. सध्या हिमालयात गेल्या आहेत कां त्यां? Proud

<<नंतर केजरीवालनीं काय केल हे सर्वांनाच माहीती आहे !!>>

रमाकांत,
ह्याविषयीच बोलताय ना? Wink
"The then Chief Minister Arvind Kejriwal had ordered filing of an FIR on February 11 last year against Moily, his predecessor Murli Deora, who is dead now, and RIL Chief Mukesh Ambani for alleged collusion in hike of prices in natural gas from the KG basin. The then AAP government had also ordered a probe into street light purchase scam during the Commonwealth Games of 2010 in which Dikshit's role had come under the scanner.

Sisodia said the AAP government will "revive" the cases that have been put in cold storage."
गेल्या ९ महिन्यांमध्ये त्या सगळ्या FIR कोल्ड स्टोरेजमध्ये का गेल्या तेवढं फक्त अजून माहीत नाही. सांगा की समजावून.

दिल्लीतील कॉन्व्हेंट शाळेवर झालेल्या हल्ल्याचा ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांनी कडक शब्दांत निषेध नोंदविल्यामुळे ‘बॅकफूट’वर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या घटनेची तत्परतेने दखल घेणे भाग पडले. यापूर्वीच्या पाच हल्ल्यांनंतर मोदींनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती.
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/AAP-Modi/articleshow/46238...

फारच बदल झाला Happy

<<गेल्या ९ महिन्यांमध्ये त्या सगळ्या FIR कोल्ड स्टोरेजमध्ये का गेल्या तेवढं फक्त अजून माहीत नाही. सांगा की समजावून.>>

याचे उत्तर माननीय गामा पैलवान यांनी आधीच देवून ठेवलंय.
''दुर्दैवाने गुन्हेगार राजकारणी ही तुरुंगात पाठवायची वस्तू नसून राजकीय तारण म्हणून ठेवायची वस्तू असते.''

गामा, सुरवातीच्या पानावरील आकडेवारी समजुन घेतली. बीजेपीला त्यांच्या हमखास मतदानात फारसा फरक पडलेला नाही. बाकी विश्लेषणाशी सहमत.

मला मात्र बोवा असे वाटतय, की मागे दहाबारा वर्षांपूर्वी नै का "गणपती दूध पिऊ" लागला या बातमीवर विश्वास ठेवून आख्ख्या भारतभर गणपतीला दूध पाजायची अहमहमिका सुरू झाली, त्याच धर्तीवर यावेळेस "पाच साल केजरीवाल केजरीवाल" या गाण्याच्या धूनीचा अफाट अफलातून परिणाम झाला अन वरील अहमहमिकेप्रमाणेच "आप" ला भरघोस मतदान झाले. Proud यावरून इतकेच सिद्ध होऊ शकते की "दिल्लीत" काहीही होऊ शकते. पण अशी गरज नाही की जे दिल्लीत होते तेच गल्लीतही होते !
सबब, बीजेपीविरोधकान्नी जरा सबूरच धरावी.

या निखळ विजयामुळे आप पुढे आव्हान उभे राहिले आहे.
याचे कारण ज्या तरुण वाढीव मतदारांनी त्यांना मतदान केलय, त्यांचेच पालक/मालक/सगोसोयरे हे जेव्हा आपच्याच "भ्रष्टाचार विरोधी" मोहिमे मुळे अडचणीत येऊ लागतील तेव्हा काय कसे होईल हे सांगणे कठीण आहे.
पण प्रशासनातील भ्रष्टाचार निपटणे हे बीजेपीपुढचेही आव्हान आहेच.
याबाबीला धरुन प्रशासनातील असंतुष्टांना धरुन "संप" वगैरे बाबी सुरु करुन आपले अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न कम्युनिस्ट करतील, त्याला दिल्लीत "आप व आपचे नवमतदार" आणि बाकी देशात बीजेपी कसे तोंड देतात हे बघणे मनोरंजक ठरेल.

>>>यावरून इतकेच सिद्ध होऊ शकते की "दिल्लीत" काहीही होऊ शकते.<<<

होय. सुदैवाने इतर ठिकाणचे लोक अजूनही काँग्रेस, राष्ट्रवादी ह्यांनाही थोडी मते देतात. फक्त एकट्या भाजपला मते द्यायची असे करत नाहीत.

केजरीवालांनी मफलर काढला तर दिल्लीत उन्हाळा येईल अशी सध्या परिस्थिती आहे. त्यांनी छत्री धरली तर गावोगावीच्या आभाळातले ढग दिल्लीकडे धावू लागतील बरसायला! एक गोष्ट चांगली आहे की कोणीतरी बहुमतात आहे.

राज्यात 'आप' आणि केंद्रात 'भाजप' हे लक्षण काही खरे दिसत नाही.

Pages