आज लागलेल्या निकालाने राजकारणात अनेक अन्वयार्थ नव्याने दिसत आहेत. निकालाने नविन उच्चांक निर्माण झाले आहेत हा भाग आणखी वेगळा आणि आश्चर्यकारक आहेत.
१) आम आदमी पार्टी ५५ % मते आणि ९६ % जागा मिळवुन सत्तेवर येत आहे. आजकाल हे % प्रथमच पहाण्यात येत आहे.अश्याप्रकारे प्रथमच जागा आणि % या दोन्ही स्तरावर आम आदमी पार्टी विजयी झाली आहे.
२) ३३% मते मिळवुन भाजपला फक्त ४ टक्के जागा मिळवौन भाजप दिल्लीत हारला आहे.
३) दिल्लीला प्रथमच नविन पक्षाला एक वर्षाच्या अंतराने जनतेने पुन्हा कौल मिळाला आहे.
४) तिसरा पक्ष आणि अपक्ष या निवडणुकीत जनतेने संपुर्णपणे नाकारले आहेत.
५) दिल्लीची जनता १४-१५ महिन्यांच्या कालावधीत तीन वेळा निवडणुकीला सामोरे जाऊन तीन वेगळे जनादेश देऊन दिल्लीचे प्रश्न आणि राष्ट्रीय प्रश्न वेगळे आहेत या निर्णयावर शिक्कामोर्तब करत आहे.
६) दिल्ली कायमच धक्कादायक निकाल देते हे वेगळेपण राखले आहे.
७) जनलोकपाल ज्या मुद्यावर मागील सरकार बनले आणि पडले हा मुद्दा दिल्लीच्या जनतेच्या मते महत्वाचा नव्हता.
८) पक्षबदलुना दिल्लीने नाकारले आहे.
९) स्त्री आणि आय पी एस असलेल्या किरण बेदी सुध्दा आपला प्रभाव पाडु शकल्या नाहीत.
१०) जनतेने अरविंद केजरीवाल यांना राजीनामा देण्यासाठीच नाही तर सामान्य माणसाचे सरकार वेगळे
असेल अश्या घोषणा न पाळण्यासाठी सुध्दा माफ केले आहे. उदा.
१) सरकारी घर घेणार नाही. गाडी वापरणार नाही इ.
भाजप का हरले याची कारणमिमांसा
१) दिल्लीत लोकांना केजरीवाल जास्त विश्वासु वाटले.
२) मोदींचा करिष्मा दिल्ली विधानसभेसाठी चालला नाही.
३) बेदींना आणल्यामुळे भाजप कार्यकर्ते नाराज असावेत.
४) शिस्त लावल्यामुळे सरकारी नोकर मोदीसरकारवर नाराज असावेत.
५) हिंदुत्व अजेंड्यचा अतिरेक झाल्यामुळे मुसलमान मतदार दुरावला.
६) सर्वात महत्वाचे आणि खात्रीलायक, भाजपचा जनाधार संपला नाही पण काँग्रेसचा संपला
२०१३ मध्ये कॉग्रेसला २४ % मते होती पैकी १४ % आता ती आआप च्या पारड्यात पडली.
यामुळे मतविभाजनाचा फायदा भाजपला मिळाला नाही.
आता पहाण्यालायक खालील गोष्टी असतील.
१) केंद्र आणि राज्याचे संबंध खरोखरच चांगले रहातात का?
२) दिल्लीत लोकपाल विधेयक येणार का?
३) भाजपला राष्ट्रव्यापी पर्याय किंवा काँग्रेसला पर्याय आम आदमी पक्ष बनु शकतो का?
४) स्त्रीयांचे संरक्षण दिल्लीत होऊ शकते का?
५) चांगले काम करुन पाच वर्षांनी पुन्हा सत्तेवर येऊ शकते का?
६) वीज आणि पाणी हे प्रश्न कायमचे सुटु शकतात का?
७) आम आदमी पक्ष सत्ताधारी म्हणुन वेगळा ठसा उमटवु शकते का?
दिल्ली पूर्वी केंद्रशासितच तर
दिल्ली पूर्वी केंद्रशासितच तर होती. >>
आधी दिल्ली राज्य होतं (हो ना??), १९५६ मध्ये दिल्लीला केंद्रशासित प्रदेश घोषित केलं गेलं. त्यानंतर १९९१ च्या घटना दुरुस्तीनंतर १९९३ मध्ये दिल्लीला राज्याचा दर्जा दिला गेला. त्यानंतर १९९३ ते १९९८ तिथे भाजपाची सत्ता होती.
(दिल्लीला केंद्रशासित प्रदेशाऐवजी राज्य घोषित करायची मागणी कुणाची होती हे कुणाला माहित आहे का? मला याबद्दल काही माहिती नाहीये)
दिल्लीच्या स्टेटहुडबद्दल इथे
दिल्लीच्या स्टेटहुडबद्दल इथे बर्यापैकी समजावलं आहे -
Explained: Full mandate in a half state
अल्पना, दिल्लीला राज्य
अल्पना,
दिल्लीला राज्य बनवण्यासाठी घटनेत ६९ वी दुरुस्ती केली होती. त्यासंबंधी इथे माहिती आहे (इंग्रजी दुवा) : http://indiacode.nic.in/coiweb/amend/amend69.htm
प्रत्यक्षात दिल्ली हे अर्धे राज्य आहे (मिर्ची यांनी वर दिलेल्या दुव्यानुसार).
आ.न.,
-गा.पै.
दिल्लीत आप जिंकले आणि भाजप
दिल्लीत आप जिंकले आणि भाजप हरला ह्याचा फायदा मोदींवर टीका करण्यासठी का घेतला जात आहे?
मोदींमुळे त्यांचा पक्ष केंद्रात बहुमताने निवडून आलेला आहे आणि त्या जागांच्या निवडणूका अजून चार वर्षे होणार नाहीत.
ह्या केजरीवालांनी ४९ दिवसात रस्त्यावर बसून सत्ता सोडलेली होती ना? एका मुख्यमंत्र्याने लॉ अॅन्ड ऑर्डर सिच्युएशन स्वतःच क्रिएट करणे इतकी हास्यास्पद व बालिश बाब आधी बघितली होती का कोणी?
त्या केजरीवालांना प्रचंड बहुमत मिळाले आहे. असेलही दिल्लीतले पब्लिक मूर्ख, म्हणून उठसूट मोदींना का दोष द्यायचा?
मोदींनी दिल्लीसाठी प्रचार करू नये? का?
प्रचारासाठी सर्व शक्य ते उपाय योजू नयेत? का?
तरीही हरले तर काय नाक घासावे? का?
त्या केजरीवालचे स्वागत दोन कोटींच्या नोटिशीने झाले त्याचे काय?
मोदींनी स्वच्छता अभियान काढले आणि झाडू हे चिन्ह असलेले केजरीवाल जिंकले म्हणून मोदींच्या स्वच्छता अभियानाचा फायदा आपला झाला? कसा बुवा? आजवर कोणत्या पंतप्रधानाने देश बरा दिसावा ह्यासाठी एक अभियान सुरू केलेले होते?
प्रणव मुखर्जींनी केजरीवालांना मारलेली मिठी म्हणजे जणू शतकानुशतके ज्याची प्रतीक्षा होती तो प्रियकर कोणतीही अॅडव्हान्स नोटिस न देता दाराची बेल वाजवून दारात उभा राहिला असावा अशी होती. ते चित्र किती टुकार दिसत आहे. राष्ट्रपती उभे राहिले तर अख्खा केंद्र सरकारातील मंत्र्यासंत्र्यांचा जथ्था उभा राहतो. इथे राष्ट्रपती दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना गहिवरून आलिंगन देत आहेत. बख्श दो भैय्या!
इतका प्रचार करूनही भाजप का हरला ह्याचे उत्तर दिल्लीकरांच्या अपरिपक्वतेला विचारायला हवे.
व्हेरी वेल सेड बेफी ! ईथेही
व्हेरी वेल सेड बेफी !
ईथेही लोक अपरीपक्वच आहेत !!
ज्या पक्षाची लायकी लोकांना
ज्या पक्षाची लायकी लोकांना अवघ्या ९ महिन्यातच कळली
अश्या समजूतदार लोकांना सलाम
गेल्या मे महिन्यात भारतीय
गेल्या मे महिन्यात भारतीय लोकशाही परिपक्व असल्याचा साक्षात्कार अनेकांना झाला होता. दिल्लीतून सातही भाजप खासदार निवडून देणारे मतदारही तेव्हा परिपक्व होते. आता ते अचानक अपरिपक्व झाले.
महाराष्ट्रानेही मोदींना स्पष्ट बहुमत दिले नाही म्हणजे महाराष्ट्रही हवा तितका परिपक्व नाही.
दिल्लीतून सातही भाजप खासदार
दिल्लीतून सातही भाजप खासदार निवडून देणारे मतदारही तेव्हा परिपक्व होते. आता ते अचानक अपरिपक्व झाले.
महाराष्ट्रानेही मोदींना स्पष्ट बहुमत दिले नाही म्हणजे महाराष्ट्रही हवा तितका परिपक्व नाही.>>+१
>>गेल्या मे महिन्यात भारतीय
>>गेल्या मे महिन्यात भारतीय लोकशाही परिपक्व असल्याचा साक्षात्कार अनेकांना झाला होता. दिल्लीतून सातही भाजप खासदार निवडून देणारे मतदारही तेव्हा परिपक्व होते. आता ते अचानक अपरिपक्व झाले.
महाराष्ट्रानेही मोदींना स्पष्ट बहुमत दिले नाही म्हणजे महाराष्ट्रही हवा तितका परिपक्व नाही.<<
हलो मयेकर, लाॅंग टाइम नो सी.
वरील वाक्यात तुम्ही सफरचंद व संत्र्याची तुलना करताय असं वाटतं. मोदि किंवा भाजपा ४९ दिवसांत पळुन गेले हे माझ्यातरी वाचनात आलेलं नाहि...
राजकारणात सोडाच, सर्वसामान्य
राजकारणात सोडाच, सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यातही, तेच ते उगाळत बसण्यात काही हशील नसतो. 'केजरीनी सत्ता सोडली, आंदोलन केलं' .. त्यानंतर अतिशय कठीण असा प्रत्यक्ष प्रचार झाला ना! पब्लिकला त्यांच्याशी बोलायची/प्रश्न विचारायची संधी मिळाली. त्यानंतर पब्लिकनी मान्य केलं त्यांचं म्हणणं. आपल्याला एखादा मनुष्य आवडत नसेल तरी पुरेशा माहिती/अभ्यासाविना त्याच्या राजनीतीविषयी दणादण मतं बनवू नयेत. प्रश्न पडतात ना एखाद्या राज्यकारभाराबद्दल, चांगलीच गोष्ट आहे. त्याची उत्तरं व्यवस्थित शोधून काढून सापडली नाहीत तर जाणकारांना प्रश्न विचारून माहिती करुन घ्यावीत. 'आप' 2.0 च्या आत्तापर्यंत वेगळ्या कार्यशैलीचा हा पैलू लक्षात आला असेल आत्तापर्यंत कदाचित. आविर्भाव / अभिनिवेशाविना प्रत्यक्ष प्रश्नांना भिडण्यात खरी लोकशाही आहे.
बराक ओबामांना मारलेली मिठी दिलदार, आणि केजरीवालांना बसलेली मिठी टुकार??
बाकी दिल्लीतल्या अपयशात 'ज्येष्ठ'ही का वाटेकरी - ते किती वेळा इथे-तिथे लिहून झालंय. चर्चा वाचली पाहिजे.
भाजपाप्रेमी डोळ्यावर चष्मा
भाजपाप्रेमी डोळ्यावर चष्मा लावून बसले आहेत तसे भाजपा विरोधक पण चष्मे लावूनच बसले आहेत. दिल्लीत भाजपा हारल्यावर थेट मोदींचा करिष्मा संपला, मोदी सरकार निकम्मे आहे ही विधाने तितकीच भंपक वाटत आहेत. आजच आसाममध्ये म्युनिसिपाल्टी निवडणुकात भाजपाने जोरदार विजय मिळवले आहेत ही बातमी आहे.
काँग्रेसची जागा आपने घेतली आहे हे जास्त ठळक आहे. बंगालमध्ये, बिहारमध्ये - जिथे जिथे तीन वा अधिक पक्ष आहेत तिथे आपने निवडणुक लढवण्याचा फायदा भाजपाला होणार आहे. कारण काँग्रेसचे मतदार + स्थानिक पक्षांचे मतदार आपकडे वळण्याची शक्यता अधिक आहे.
असो. जितका भाजपेयींचा चष्मा गंमतशीर आहे तितकाच समाजवाद्यांचा पण.
मोदी हारे नही! मोदी हारते नही
मोदी हारे नही!
मोदी हारते नही है!
विचार ़करा, काँग्रेसला एक सीटही मिळवू दिली नाही दिल्लीकरांनी.
पण भाजपाला महाप्रचंड तीन तीन सीटस आल्या.
जर मोदींचे सरकार चांगले, लोककल्याणकारक नसते तर ई.....तक्या सीटस कश्या मिळाल्या असत्या?
उलट आपण मोदींचे अभिनंदन ़केले पाहिजे.
ज्या परीक्षेत राहुल बाळ शून्य मिळवून नापास ़झाले त्याच परीक्षेत मोदीकाकांना ए़़क नाही, दोन नाही , चक्क तीन सीटस मिळाल्या.
नमोनमः
>>आविर्भाव / अभिनिवेशाविना
>>आविर्भाव / अभिनिवेशाविना प्रत्यक्ष प्रश्नांना भिडण्यात खरी लोकशाही आहे.<<
फेअर इनफ. घोडामैदान जवळ आहे; आश्वासनांची पुर्तता होते का नाहि हे कळेलच. सुरक्शा हा दिल्लीचा ब्लिडींग इश्यु आहे. लेट्स सी हाउ इट गेट्स ॲड्रेस्ड...
+१ राज
+१ राज
'टण्या' यांचा मुद्दा एक्दम
'टण्या' यांचा मुद्दा एक्दम valid! पण हीच तर गंमत होतीय, किती व्यक्तिकेंद्रित झालंय electoral politics. प्रत्यक्ष राज्यकारभार तसा नाहीच होत, हे आपण विसरतो की विसरल्यासारखं करतो? मोदींकडे जादूची छडी नाही, ना इतर कुणाकडे. त्यामुळेच व्यक्तिगत करिष्मा हा फक्त सुरुवातीची एक पायरी आहे. त्यानंतर कामी येतात ती धोरणं, योजना, उत्पन्न-खर्चाचा ताळमेळ, आणि प्रामाणिक्/गतिमान अंमलबजावणी. हे सामान्यातलया सामान्य माणसाला जाणवतंच किंवा नाही जाणवत. त्यावरुन तर एकेका कॅम्पेनची 'हवा' ठरते.
मोदींची लोकप्रियता घटली इ. जे
मोदींची लोकप्रियता घटली इ. जे म्हणत असतील तिकडे ती विधाने वळवावीत. दिल्लीतील काही सर्वेक्षणांच्या निष्कर्षांनुसार बहुतांश दिल्लीकर मोदींच्या करभाराबद्दल समाधानी होते, तरीही मुख्यमंत्रीपदासाठी त्यांची पसंती केजरीवालच होती. परिक्पक्वतेचा आणखी काय पुरावा हवा?
४९ दिवसांत पळून जाण्याबद्दल म्हणावे तर त्याबद्दल त्यांनी दिल्लीच्या जनतेला स्पष्टीकरण दिले, चुकले हे कबूल केले, पुन्हा परत येतोय हे पटवले. भाजप मात्र (निवडणुका टाळत) मागल्या दाराने पळण्याच्या प्रयत्नात होते.
आश्वासनांची पूर्तता हा खरेच
आश्वासनांची पूर्तता हा खरेच कळीचा मुद्दा हा. दिल्लीतल्या दोन्ही सरकारांच्या बाबतीत. भाववाढ कमी झालेली नाही ही ग्राउंड रिअलिटी आहे.
टण्या+१ दिल्लीतील भाजपाच्या
टण्या+१
दिल्लीतील भाजपाच्या जागा तीनच असल्या तरी मतसंख्येत लक्षणीय घट झालेली नाही. त्यामुळे मोदींचा करिश्मा संपला असे समजून पाण्यात घातलेले देव बाहेर काढणे घईचे आहे. दिल्लीतील लोकांना वर मोदी आणी खाली केजरिवाल हवे आहेत हेच फार तर म्हणत येइल. गेल्या विधानसभेच्या वेळेस एक मतदार असेच म्हणाला होता. कोंग्रेसचे बरेच मतदार आप कडे वळल्याने आपला घवघवीत यश मिळाले. त्यामुळे दिल्लीतले निकाल भाजप पेक्षा कॉंग्रेस साठी जास्त चिंताजनक आहेत.
टण्या, मी भाजपा प्रेमी नाहि
टण्या, मी भाजपा प्रेमी नाहि आणि विरोधकहि नाहि म्हणुन तुर्तास माझ्याकडे चष्माच नाहि हे धरुन चालुया. पण चष्म्याशिवाय दिसणारं ढळढळीत वास्तव तर नाकारु शकत नाहि ना? धिस इज नथिंग बट टेक टु आॅफ वाॅट हॅपन्ड इन '७७ - जनता पार्टी २.० इफ यु विल...
त्या केजरीवालांना प्रचंड
त्या केजरीवालांना प्रचंड बहुमत मिळाले आहे. असेलही दिल्लीतले पब्लिक मूर्ख >> On what basis you say this?
what can I say wake up & grow up.
Anyway mature people only stay in Maharashtra & write on Maayboli.
इतका प्रचार करूनही भाजप का हरला ह्याचे उत्तर दिल्लीकरांच्या अपरिपक्वतेला विचारायला हवे.>> ask this to yourself (I mean BJP leaders)
दिल्लीतील भाजपाच्या जागा तीनच असल्या तरी मतसंख्येत लक्षणीय घट झालेली नाही.>> Then this is very dangerous for BJP. If there is strong opposition or oppssition get together then there will be no chance for BJP to come to power. BTW the vote percent is reduced by 12% from loksabha for BJP.
भगवान की लाठी मे आवाज नही
भगवान की लाठी मे आवाज नही होती
खासगी क्षेत्रात भ्रष्टाचार
खासगी क्षेत्रात भ्रष्टाचार नसतो असे अर्क यांचे मत वाचून पोटभर हसलो.
इंदिरा गांधी मुर्ख होत्या या त्यांच्या वाक्याचा स्क्रीन शॉट फ्रेम करुन ठेवत आहे.
जगातील सर्व ज्ञान प्राप्त केल्याबद्दल अभिनंदन.
कॉंग्रेस = समाजवादी. दोघे
कॉंग्रेस = समाजवादी. दोघे सिनौनिम्स आहेत असे टण्या यांचे मत आहे काय?
<इतका प्रचार करूनही भाजप का
<इतका प्रचार करूनही भाजप का हरला ह्याचे उत्तर दिल्लीकरांच्या अपरिपक्वतेला विचारायला हवे>
हे संघाला सांगायला हवे. ते या प्रश्नाचे उत्तर इराणी बाई, निर्मला सीतारामन आणि रविशंकर प्रसाद यांना का विचारून राहिलेत?
दिल्लीत आप जिंकले आणि भाजप
दिल्लीत आप जिंकले आणि भाजप हरला ह्याचा फायदा मोदींवर टीका करण्यासठी का घेतला जात आहे? अ ओ, आता काय करायचं
मोदींमुळे त्यांचा पक्ष केंद्रात बहुमताने निवडून आलेला आहे आणि त्या जागांच्या निवडणूका अजून चार वर्षे होणार नाहीत.
------- केद्रात लोकसभा निवडणुकीत पक्षाला बहुमत मिळाल्याचे सम्पुर्ण श्रेय श्री. नरेन्द्र मोदी यान्ना दिले जाते आणि ते योग्यही आहे. त्यानन्तर महाराश्त्रात विधानसभेच्या निवडणुकीत विजयाची पुनरावॄत्ती झाली. त्याचे श्रेयही मोदी- शहा यान्ना आणि त्यान्च्या व्युहरचनेला दिले जाते. मग आता दिल्ली विधानसभेच्या निकालान्चे श्रेय त्यान्ना (मोदी - शहा) का नको द्यायला?
निवडणुकात जय आणि पराजय होतच रहाणार पण म्हणुन विजय झाला तर नेत्याचा आणि पराजय झाला तर पक्षाची सामुहिक जबाबदारी असे म्हणणे अयोग्य ठरेल.
अगदी योग्य उदय +१
अगदी योग्य उदय +१
कॉंग्रेस = समाजवादी. दोघे
कॉंग्रेस = समाजवादी. दोघे सिनौनिम्स आहेत असे टण्या यांचे मत आहे काय?
>>>
विचाराने नाही. मत देण्याबाबतीत बहुतांश राज्यात 'हो'. कारण एकमेकांना अजून कोण वाली नाय. आआप आलं तर ही काँग्रेसची मते एक गठ्ठा तिकडे वळतील. बाकी वाद-विवादाशी घेणं देणं नसलेले मतदार काय मतदान करतात हे सर्वात उद्बोधक ठरेल. उदा. आमच्या वड्डी गावात कारखाना-दूधसंघ-खतेसंघ ज्याच्या ताब्यात त्याला मतदान होत असे. आता नवीन पोरं जुमानेनात. कारखाने मोप झालेत. अपेक्षा वाढल्यात. तुकडे फेकून मते मिळेनात. ही मते कुणाला जातील तो जिंकेल.
दिल्लीत हीच मते रिक्षावाले ते महाविद्यालयीन तरुण तरुणींची आहेत.
हे पण
हे पण वाचा.
http://indianexpress.com/article/india/politics/bjp-dominates-municipal-...
तुम्ही म्हणाल की नगर आणि महानगरपालिकेच्या निवडणुका जिंकून काय होतय. तर ज्यांनी कामं केली आहेत त्यांना माहिती असेलच की बरेच काही होते.
दिल्ली निकालाने मोदी विरोधकांनी अर्ध्या हळकुंडाने पिवळे होण्याची गरज नाहिये. मोदी-भाजपाला बरेच शिकण्याची गरज आहे हे नाकारत नाहिये. ते शिकले तर तरतील नाही तर हारतील.
राजकारणात हार-जीत होतच असते. १९७७-७९ नंतर काँग्रेसने जोरदार मुसंडी मारलीच. मात्र तेव्हाच्या काँग्रेसमध्ये व आजच्या काँग्रेसच्या नेतृत्वात जमीन आस्मानाचा फरक आहे. तसेच जनता पक्ष हे एक कडबोळे होते. 'आवाज एक, हम दो है' समाजवाद्यांचा पक्ष टिकणे अवघड होतेच. (पुन्हा विचारू नका. समाजवादी पक्षाचा इतिहास बघा अगदी १९५० पासून लोहिया वगैरे वेळपासून. पक्ष स्थापन नाही झाला की तुकडे पाडतात.) आता मात्र काँग्रेसच्या विरोधात एक अखंड पक्ष उभा आहे. भाजपा हा एकच पक्ष आहे जो फुटलेला नाही (जनसंघ ते भाजप पूर्ण इतिहास). ही सोपी गोष्ट नव्हे. आज काँग्रेसची जागा खायला आप किंवा अनेक स्थानीय पक्ष आहेत.
पूर्वी काँग्रेसची जागा अभेद्य असे आणि स्थानिक पक्ष व भाजपा (जिथे असेल तिथे) एकमेकांची मते खायचे. इथून पुढे यायचे तर नेतृत्व द्रष्टे व संयमी हवे तसेच कार्यकर्त्यांना मोटिवेट करणारे हवे. राहुल गांधी हे करतील ही शक्यता आता खरेच कमी आहे. त्यांना राजकारणात येवून १०+ वर्षे झाली. सोनिया गांधी वृद्धापकाळाकडे झुकत आहेत. त्यांचा प्रभावदेखील व उपस्थिती कमी होताना दिसतेय. दुसरा नेता त्या पक्षात दिसतच नाहिये. होणारच नाही असे नाही. मात्र आज दिसत नाही.
आसामात इन्कंबंट गोगोई सरकारविरोधात असंतोष आहे. बिहारमध्ये नितिशनी लालूंबरोबर युती केली. लालूंचे राज्य सर्वमान्य सर्वात भ्रष्टाचारी होते हे जवळपास सर्व जण मान्य करतील. पासवान भाजपाबरोबर आहेत. आता मांझी कार्ड जोरात वाजवले जाईल. बंगालात आआप उतरल्यास फायदा भाजपाला होईल - आआप तृणमूल मते खाईल. आआप युती करेल असे वाटत नाही.
मी भाजपा प्रेमी नाही. आआप आल्याने व केंद्र सरकारला दणका बसल्याचे मला आनंदच आहे. मात्र मी मोदी-भाजपा द्वेष्टा पण नाहिये. आपल्याला आवडत नसलेल्या विचारसरणीकडे चष्मा न लावता बघायला शिकणे माणसाला सर्वात जास्त आनंद देते.
जनतेला भ्रष्ट
जनतेला भ्रष्ट राजकारण्यांबद्दल प्रचंड राग आहे हे मोदींना समजले नाहीये असे दिसते.
लोकांना काही महत्वाचे नेते तुरुंगात गेलेले बघितल्या शिवाय बरे वाटणार नाही. गेल्या ९ महीन्यात मोदींना सहज शक्य असुन सुद्धा त्यांनी गेल्या १० वर्षातल्या भ्रष्टाचाराबद्दल एकही केस न्यायालयात नेली नाही. खरे तर जलदगती कोर्ट चालू करुन आत्ता पर्यंत १० राजकारणी तरी तुरुंगात दिसायला हवे होते.
इतके जरी केले असते तरी भाजप दिल्लीत निवडुन आली असती.
मोदींनी हिंदू राजनिती आणि भ्रष्टाचाराला विरोध ह्या जोरावर मते मिळवली. पण आता दोन्ही गोष्टींना त्यांनी वार्यावर सोडले आहे.
आता तर मोदींनी कहर केलाय, खुद्द बारामतीकरांना मिठी मारायला त्यांच्याच गावात जातायत. गेल्या ३ महीन्यात देवेंद्र सरकारनी एक सुद्धा राष्ट्रवादीचा मंत्री तुरुंगात धाडला नाही. काय उपयोग असल्या देवेंद्र आणि नरेंद्र चा.
टण्या, मस्त पोस्ट.
टण्या, मस्त पोस्ट.
Pages