आकाशी झेप घे रे पाखरा

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 January, 2015 - 05:34

बरेच दिवस ऐकून होते उरणच्या पाणजे येथील खाडीत फ्लेमिंगो पक्षी आले आहेत. आज जाऊ उद्या जाऊ करत एक रविवारी वेळ काढलाच आणि कौटुंबीक मित्रपरीवारासह गेलोच हे पक्षी पहायला. ही खाडी माशांसाठी खास करून कोलीम (माझ्या माशांच्या मालिकेत हा प्रकार आहे) ह्या प्रकारासाठी प्रसिद्ध आहे. खाडीपर्यंत पोहोचलो तेंव्हा फ्लेमिंगोचे नामोनिशान नव्हते. सुरुवातीला छोटे काळे पक्षी दिसू लागले. सुर्यप्रकाशामुळे त्यांचे मुखदर्शन न झाल्याने नक्की कुठल्या जातीचे आहेत ते कळत नव्हते.

१)

पुढे रस्त्याच्या जवळच पाण्यात हा सुंदर पक्षी होता.

२)

अजुन पुढे ह्या पक्षाची कसरत भक्ष पकडताना.
३)

पाणी भरल्या खाडीत फ्लेमिंगोची आशा धरून आलेलो आम्ही थोडेसे निराश होऊन इकडे तिकडे पाहतो तो पाणी नसलेल्या एका खाडीच्या पट्यात पांढरे थर्माकोलचे जाळे लावतात त्याप्रमाणे काहीतरी लांबून दिसले. जरा जवळ गेलो तेंव्हा मात्र त्या थर्माकोल ढोकळ्यांच्या भासाची जागा फ्लेमिंगोच्या उंची आकृतीमध्ये साकार होत गेली. मी कॅमेरा काढला आणि जवळ जाऊ लागले. आपली चाहूल लागताच हे उडतील म्हणून आधी लांबून फोटो काढून घेतले.

४)

५)

आता ह्या पक्ष्यांच्या क्लोजअपच्या आशेने मी हळू हळू पुढे जाऊ लागले. पक्षी माझ्या भितीने उडू नयेत म्हणून मी दबक्या पावलांनी चालत होते खरी पण एकीचे बळ करून हे माझ्यावर हल्ला तर नाहीना करणार ही भिती पण मनामध्ये डोकावत होती. तसे दृश्यही माझ्या डोळ्यासमोर येऊ लागले. Lol

जव्ळ जाऊन पाहते तर ते फ्लेमिंगो नसून अजून वेगळेच पक्षी होते पण तितकेच सुंदर होते. नि.ग. च्या धाग्यावर त्याचे चित्रबलाक हे नाव समजले.
६)

आम्ही २-३ जणच पुढे गेलो. पण आमची चाहूल लागताच पहिले दोन पक्षी १-२-३ च्या ठेक्यावर उठले. आणि वर उडाले तेंव्हा भित्यापाठचा ब्रह्मराक्षस म्हणू लागला आलेच तुझ्या डोक्यावर आता हे टोचायला. पण बहुतेक त्यांना माझे फोटो काढणे पसंत नव्हते म्हणून कंटाळून दुसरीकडे निघून गेले. त्यापाठोपाठ ८-१० चा ग्रुप करत सगळे पक्षी दुसर्‍या ठिकाणी निघून गेले. त्यांचे उडते रुप अतिशय मनमोहक होते. हे उडणे पाहताना आकाशी झेप घे रे पाखरा, पाखरा जा दूर देशी अशी गाणी आठवत होती.

७)

८)

९)

१०)

ह्या पक्षांना जवळून निरखायचे राहीले म्हणून पुन्हा आम्ही ह्यांची शोधमोहिम सुरु केली. आमच्या परतीच्याच भावावर एका पाणथळीवर हे जाऊन बसले होते. आता मात्र एकदम सावध गतीने आम्ही जवळ गेलो. हे काय पिच्छा सोडणार नाहीत अशा आविर्भावाने आता मात्र त्यांनी जागा सोडली नव्हती किंवा एका भेटीतच आमची मैत्री झाली होती. पण नंतर जवळ गेल्यावर कळाले की एका ठराविक अंतरावरुन आम्ही त्यांना पाहू शकत होतो, पुढे पुर्ण पाणी होते व त्या पाणथळ जागेनंतरच्या कोरड्या भागात ते उभे होते. अगदी तळ्यात मळ्यात खेळतात तसे मला वाटू लागले.

११)

१२)

१३)

१४)

१५)

कोरड्या खाडीतील त्यांच्या पाउलखुणा व पिसे.
१६)

१७)

१८)

खाडीभेटीतील हे सुंदर झुडूप.
१९)

२०)

२१) समुद्रभाजी डायला. ही चवीला खारट असते. मिठ टाकायची गरज नसते. माझ्या लेखनात सापडेल.

२२) दुर्व्याला आलेली फुले प्रथमच पाहीली.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सो क्यूट पाऊल खुणा ...

प्रत्येक फोटो अतिशय आवडला.. जागुले... मस्त मस्त !!!!!

बापरे! ही प्रचिची माळ एकदम आवडलीच!!!!

पुण्याहून कसे जाता येईल सांगतेस का? आणि नक्की कुठल्या ऋतुमधे हे पक्षी इथे स्थलांतर करतात कधीपर्यंत असतात ही माहिती सुध्दा दे.

पहायला गेलो फ्लेमिंगो दिसले चित्रबालक असं काहिसं झालं काय? Proud
पण फोटो मस्त आहेत. आणि फोटो इतके सुंदर आहेत तर पक्षी प्रत्यक्षात किती सुंदर असतील Happy

पहायला गेलो फ्लेमिंगो दिसले चित्रबालक असं काहिसं झालं काय?>>>> अगदी हेच आलं माझ्या मनात!!
कोरड्या वाळूतल्या पाऊलखुणा - हे वाचून तर मायबोलीशी नातं सांगणार्‍या...... हे आठवलं!!
मस्त फोटू.............

खूप छान प्र.चि. त्यात ही प्र.चि. ६ आणि १२ चित्त वेधक आहेत. पक्ष्यांचे रंग आणि उडतानाची भरारी मस्तच.

चित्र बालक हे नांव ही आकर्षक वाटते......

चित्रबालक नाही चित्रबलाक (बलाक म्हणजे बगळा बहुतेक). इंग्लिश नाव "painted stork". दुसर्या चित्रातला जांभळा बगळा (purple heron). फोटो सुंदर आलेत. हे साधारण सकाळी किती वाजता? BNHSच्या शिवडीच्या सगळ्या मोहीम भल्या पहाटे असतात. Sad

व्हिटी धन्स. बदल करते.
मी हे फोटो संध्याकाळी ४ च्या दरम्यान काढलेत.

रश्मी, वर्षूताई, दक्षिणा, शांकली,अवल्,अनंतसुत धन्यवाद.

बी साधारण नोव्हेंबर-डिसेंबर पासून येतात. तुम्ही आलाक की मला मेल करा.

म स्त अनुभव जागु आ णि प्र. ची दे खिल...
त्या पाउल खुणा जणु ईवल्या ई व ल्या चान्द ण्या ..
ंमासे कीती प क ड ले स. . तो फोटो कुठे आहे...