गवार निवडून तुकडे केलेली (त्याला लागणारा वेळ धरलेला नाही)
फोडणीचे साहित्य
गार्लिक पावडर किंवा लसूण
काळा मसाला
कोथिम्बीर
गोळ्यांसाठी
बेसन
ओवा
तिखट
मीठ
हळद
फार काही कॉम्प्लिकेटेड रेसिपी नाहिये
गवार शिरा काढून तुकडे करून धुवून तयार करावी. साधारण ३ वाट्या. (आपण भाजी करणार असल्यास हे कंटाळवाणे काम इतरांना द्यावे! - यातल्या लिंगनिरपेक्षतेची नोंद घ्यावी :डोमा:)
नेहमीप्रमाणे हळद, हिंग, कढिपत्ता घालून फोडणी करा, त्यात गवार घालून परता.थोडी रोस्टेड गार्लिक पावडर किंवा दोन तीन पाकळ्या लसूण ठेचून घाला. मला स्वतःला कच्च्या लसणापेक्षा त्या गार्लिक पावडर चा स्वाद जास्त आवडतो या भाजीत. तिखट, काळा मसाला , मीठ, गूळ किंवा साखर आणि थोडे पाणी घालून उकळी येऊ द्या. पाणी अगदी गवारी पोहण्याइतके नव्हे तर अंगाबरोबर रस होईल इतकेच घाला, ते गोळे वाफवण्यासाठी लागणार आहे.
गोळ्यांसाठी - एक वाटी (जास्त गोळे हवे असल्यास दीड वाटी) बेसन, तिखट , मीठ, थोडा ओवा च्रुरून असे एकत्र करा. अगदी थोडे पाणी अन तेलाचा हात लावून साधारण पोळीच्या कणकेच्या कन्सिस्टन्सीप्रमाणे मळून घ्या. याचे तेलाच्या हाताने लहान लहान गोळे बनवा (साधारण शेंगदाण्यापेक्षा थोडा मोठा आकार) आणि शिजणार्या भाजीत सोडा. हलक्या हाताने थोडे हलवा. झाकण ठेवून भाजी अन गोळे एकत्र शिजू द्या.साधारण ५-१० मिनिटात भाजी तय्यार! वरून कोथिंबीर घाला. एक वाफ जाईपर्यन्त झाकून ठेवा आणि मग वाढा - त्यामुळे मसाला / रस्सा जरा जास्त मुरतो गोळ्यात.
मस्त लागते ही भाजी! माझी पोरे एरवी भाज्या खाताना का-कू करतात पण गोळयांमुळे गवार पण खातात उरलेल्या शेवटच्या गोळ्यांसाठी मारामारी होते
** फोटो :
तोंपासु दिसतेय. करुन बघेन!
तोंपासु दिसतेय. करुन बघेन!
मी पण आज गवारीची भाजी अशीच
मी पण आज गवारीची भाजी अशीच बेसनाचे कोफ्ते घालून केली आहे. दुपारी डबा खाल्ली की लिहिते कशी झाली होती ते. माझी कुक पण आज खुश झाली वेगळी रेसिपी बघून .
आवडली ग भाजी
आवडली ग भाजी
मस्त स्वादिष्ट
मस्त स्वादिष्ट भाजी!
स्वातीच्या टिपेप्रमाणे फोडणीतही ओवा घातला आणि ओली लसूण बारीक चिरून घातली आणि लसणीची पात बारीक चिरून कोथिंबीरीबरोबर भाजी होत आल्यावर घातली, त्यामुळे की काय पण मस्त उंधीयूसारखी चव लागली भाजीची
मला वाटतेय श्रावणघेवड्यात हे
मला वाटतेय श्रावणघेवड्यात हे गोळे घालून ट्राय करावे का? आज गवार नाही माझ्याकडे :विचारात पडलेली बाहुली:
मीही करून पाहेन. पण मी हौशी
मीही करून पाहेन. पण मी हौशी कलाकार असल्याने बेसन कच्चे राहील अशी शंका आहे. गोळे वेगळेच कुकरला लावून शिजवून घेतले तर?
कसला चकचकीत फोटो आलाय
कसला चकचकीत फोटो आलाय मृण्मयी. मस्त.
मी पण केली ही भाजी.
मी पण केली ही भाजी. चट्टामट्टा केला गवार आवडत नसलेल्या मंडळीनी सुध्दा
विकु, नको गोळे कुकर ला वगैरे
विकु, नको गोळे कुकर ला वगैरे नका करू, तेच अवघड होईल उलट. भाजीला रस्सा जरा जास्त ठेवा. गोळ्याचा साइझ लहान ठेवा. शिजतील बरोबर. भाजीत तेल अगदी तवंग टाइप नको पण अगदी कमी तेल (२ टि स्पू छाप) पण नको. गोळे भाजीत टाकले की गॅस मिडियम लो वर ठेवा आणी पॅनवर झाकण असू द्या.
खरं सांगायचं तर नवशिक्यांच्या दृष्टीने जास्त स्किल ते गोळे बरोबर मळून घेण्यात आहे. बेसनाची कणिक मळणे ट्रिकी असू शकते. पाण्याचा, तसाच मिठाचा अंदाज चुकू शकतो.
मी केली ह्या पद्धतीने गवारीची
मी केली ह्या पद्धतीने गवारीची भाजी. बाकी मसाला तोच असल्याने चवीत फरक वाटला नाही पण ते गोळे खायला मजा आली. वाफेवर शिजलेही व्यवस्थित, भाजीत रसही जेवढा हवा तेवढाच होता. एकूणात सगळं जमून आलं.
फार् मस्त भा़जी होते, तिच तिच
फार् मस्त भा़जी होते, तिच तिच दाण्याच्या कुटाची भाजीपेक्षा मला हिची चव जास्त आवडली.. फोडणित ओवा घातला की मस्त दरवळ सुटतो..मी गवार उकळताना शेंगा तंरगतिल एवढ पाणि घातल होत पण गोळे घालुन शिजल्यावर ..अंगाबरोबर रस अशी भाजी झाली..
अनेक दिवसांनी गवार मिळाली ,
अनेक दिवसांनी गवार मिळाली , म्हणून लग्गेच ह्या रेसिपीने भाजी केली. फार मस्त झाली, गोळे तर पटापट संपले . रेसिपीसाठी धन्यवाद.
सौ काऊ यानेअॅ केले
सौ काऊ यानेअॅ केले
मस्त फोटो. गवारीच्या भाजीला
मस्त फोटो. गवारीच्या भाजीला इतकं सर्व्हिंग डेकोरेशन वगैरे बघून ट्डोपाच झालं एकदम मीही कालच केली होती ही भाजी.
मला ही भाजी आणि त्यातले
मला ही भाजी आणि त्यातले कोफ्ते फार आवडतात पण आमच्याकडच्या दोन्ही नाठाळ मेंबरांना न आवडल्यामुळे ( मुळात गवारही खपत नाहीच ) कमीच होते. पण मला ते कोफ्ते इतके आवडले होते की कदाचित गवारीमुळे आवडले नसतील ह्या आशेने मी कांदा-टोमॅटोची ग्रेव्ही करुन त्यात कोफ्ते घातले तर त्या ग्रेव्हीतले कोफ्तेही आवडले नाहीत
साबा सगळ्या शेंगभाज्या आधी परतून मग कुकरला लावतात. छान मिळून येते भाजी. त्यामुळे ही भाजीही कुकरच्याच भांड्यात केली. बरेच जुने आहेत फोटो. रेसिपी आल्याआल्या लगेचचे !
ही कांदा-टोमॅटोच्या ग्रेव्हीतली.
उरलेली पाठवुन देत जा मग इकडे.
उरलेली पाठवुन देत जा मग इकडे. नवीन सगळे फोटो छान आलेत .
मी पण करते. मस्त होते. सर्व आवडीने खातात.
इकडे सावजी पद्धतीने गवार
इकडे सावजी पद्धतीने गवार शेंगा करतांना फक्त दोन्ही बाजूची टोकं काढून सगळ्या शेंगा करतात. त्यात तेलात जिरं नंतर बारीक चिरलेला लसुन टाकून तो लाल होईपर्यंत तळतात नंतर शेंगा घालून वाफू देतात …. नंतर हळद तिखट धने पूड वगैरे घालतात थोडं पाणी सोडून एक उकळी आल्यावर त्यात कलमी पावडर आणि आवडेल तशी साखर घालतात. अतिशय रुचकर होते हि भाजी. आमच्याकडे दाण्याचा कुट घालून करतात…. या पद्धतीने करून बघते एकदा
कलमी पावडर म्हणजे काय ?
कलमी पावडर म्हणजे काय ?
कलमी पावडर म्हणजे काय ?>>
कलमी पावडर म्हणजे काय ?>> दालचिनी
गोळ्यांची गवार करुन बघीतली.
गोळ्यांची गवार करुन बघीतली. आवडली. फार काही श्रम न करता गवारीला 'स्पेशल' चव आली गोळ्यांमुळे.
मैत्रेयीला विदर्भातलं सासर
मैत्रेयीला विदर्भातलं सासर असून दालचिनीला कलमी म्हणतात माहित नाही
हो, खरंच नव्हता ऐकला हा शब्द
हो, खरंच नव्हता ऐकला हा शब्द !! मला वरच्या वर्णनावरून आमचूर पावडर असेल की काय असं वाटलं होतं
ही कोफ्ता भाजी खूपच भाव खाते
ही कोफ्ता भाजी खूपच भाव खाते आहे .. मी लवकरच करून बघेन ..
मी ही करून पाहिली. मस्त झाली.
मी ही करून पाहिली. मस्त झाली. असेच बेसन गोळे घालून कढी करता येइल का? की ताक फाटेल?
रिकामा सिक्स पॅक कशाला ठेवलाय
रिकामा सिक्स पॅक कशाला ठेवलाय तो फोटोत ?!
च्च, बियरमध्ये शिजवलीत की काय
च्च, बियरमध्ये शिजवलीत की काय विकु?
रिकामा सिक्स पॅक मिसळवणाचा
रिकामा सिक्स पॅक मिसळवणाचा डबा म्हणुन वापरत असतील विकु. हळद, मोहरी, गोडा मसालाच्या छोट्या प्लास्टिकच्या बाटल्या ठेवत असतील एकेका खणात सिक्स पॅकच्या
विकुंनीं भाजीला सजवलेली दिसत
विकुंनीं भाजीला सजवलेली दिसत नाही .. पाठच्या शेगडीवर तर एकदम थाटात जास्तीची (फोडणी?) वगैरे करून ठेवलेली दिसत आहे .. पण भाजी त्यामानाने अगदी पथ्यकर दिसते आहे ..
सशल बॅक इन बिझनेस का?
सशल बॅक इन बिझनेस का?
आता विकुंनी भाजी खोबरं,
आता विकुंनी भाजी खोबरं, कोथिंबीर घालून सजवली की तुम्ही म्हणणार कोफ्ते कुठे आहेत, दिसत नाही म्हणून. करावं तरी काय माणसाने?
Pages