ब्यूटी हॅज इट्स ओन अॅड्रेस - ओमान.. हा ओमानच्या पर्यटन खात्याचा दावा आहे. आणि तो खरा आहे, हे मी खात्रीने सांगू शकतो.
मी याच महिन्यात ४ दिवसांचा मस्कत, सलालाह असा दौरा केला. त्याबद्दलची मालिका सुरु करतोय. पण त्या आधी
या देशाबद्दलची पर्यटनविषयक माहिती इथे देतो. मग पुढच्या भागापासून एकेक जागा दाखवत जाईन.
१) मस्कतला का जायचे ?
या प्रश्नाचे माझे म्हणून असे वेगळे उत्तर आहे. १० फेब्रुवारी १९९० ला पहिल्यांदा मी देशाबाहेर पडलो ते इथे येण्यासाठी. नंतरही २००० साली तिथे परत गेलो. एकंदर ५ वर्षे तिथे वास्तव्य केले. इतके देश बघितले तरी माझ्या
मनातले ओमानचे स्थान तसेच अव्वल राहिलेय. माझी शेवटची भेट २००१ सालची होती. एमिरेट्सने प्रवास करत असल्याने माझे दुबईला जास्त वेळा जाणे होते खरे पण प्रत्येकवेळी विमान मस्कतवरूनच जात असल्याने, परत
एकदा भेट द्यावी असे फार वाटत होते. ती ईच्छा मी पूर्ण केली... तरी परत जावेसे वाटतेच आहे ..
अर्थात केवळ पर्यटक म्हणून जायलाही अनेक कारणे आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे हा देश फार सुंदर आहे. इथे दुबईसारखे मॉल्स वा स्काय स्क्रॅपर्स नाहीत कि तिथली मानवनिर्मित आकर्षणे नाहीत. आहे तो रांगडा निसर्ग, मोकळ्या मनाची माणसं आणि ज्यासाठी ते लोक प्रसिद्ध आहेत ते त्यांचे आदरातिथ्य.
शिवाय हा देश आपल्याला अगदी जवळ. विमानाला पुरते ३ तास देखील लागत नाहीत.
२) व्हीसा
ओमानने आता टुरिस्ट व्हीसा द्यायला सुरवात केलीय हा व्हीसाही ऑनलाईन मिळतो. त्यांच्या आरोपीच्या वेबसाइटवर पूर्ण माहिती आहे. आरोपी ? हो आरोपीच. ओमानमधे पोलिसांना आरोपी म्हणतात. म्हणजे आर. ओ. पी. रॉयल ओमान पोलिस. तूमचा ट्रॅव्हल एजंट ही हे काम करू श कतो. माझ्यासाठी नेहमीप्रमाणेच थॉमस कूकच्या मानसी गोरे आणि पायल देसाई यांनी चोख व्यवस्था केली .
३) खर्च
व्हीसाचा खर्च २ हजाराच्या आसपास येईल. मुंबईहून मस्कतला जायला ओमान एअर, एअर इंडिया एक्स्प्रेस, जेट एअरवेज, स्पाईस अशा अनेक थेट सेवा आहेत. व्हीसासाठी ओमान एअरचे तिकिट लागेल. सध्या ते तिकिट २० हजार रुपयांच्या आसपास आहे. सेवाही उत्तम आहे.
४) राहण्याची सोय.
बजेटप्रमाणे राहण्याची सोय होऊ शकते. मी ओमानमधल्या सर्वात जून्या हॉटेलमधे म्हणजेच मत्राह हॉटेलमधे राहिलो होतो. दिवसाचा राहण्याचा खर्च साधारण १० हजार रुपये होईल.
५) वाहतुकीची व्यवस्था
खाजगी गाडीची सोय केलीत तर छानच पण ओमानमधे शेअर टॅक्सी खुप कॉमन आहेत. आणि त्यासाठी फार वाटही बघावी लागत नाही. पांढर्या केशरी रंगाच्या टॅक्सी सतत फिरत असतात. व्हॅन्सही आहेत. लांबच्या प्रवासासाठी आरामदायी बसेस्सही आहेत. आणि त्या फारसे महाग नाहीत स्वतंत्र गाडी करायची तर भाव करता येईल. साध्या गाडीला दिवसाला ५/६ हजार रुपये लागतील
६) सुरक्षितता
मी भेट दिलेल्यांपैकी ओमान हा सर्वात सुरक्षित देश आहे. अगदी रात्री अपरात्रीही खुशाल एकट्याने रस्त्यावर फिरणेही सुरक्षित आहे. तिथले पोलिसही मदतीस तत्पर असतात ( अर्थात गरज पडलीच तर )
७) खादाडी
मस्कतमधे गुजराथी, दाक्षिणात्य इतकेच नव्हे तर मराठमोळे पदार्थही मिळू शकतात. थाली सिस्टीम घेतली तर अगदी लग्नात करावा तसा आग्रह होतो. स्थानिक ओमानी, लेबनानी, इजिप्शियन, तुर्की, पाकिस्तानी, बांग्ला देशी, श्रीलंकन जेवणही जेऊ शकता. तिथल्या बलदिया म्हणजेच म्यूनिसिपालिटीचे अन्न सुरक्षा विषयक नियम कडक
असल्याने सर्व पदार्थ सुरक्षित असतात . अगदी रस्त्याच्या कडेच्या कॉफी हाऊसमधले देखील. खरं तर मस्कतमधे खादाडीसाठी वेळ आणि तोड अपुरे पडेल.. !
८) शॉपिंग
दुबईमधे जे शॉपिंग कराल ते सर्व मस्कतमधे करणे शक्य आहे. कदाचित स्वस्तही आहे. शिवाय मस्कती खजूर, डाळिंब, हलवा, मध, गुलाबकली, अत्तरे, धूप.... असे बरेच काही... मी तर सिताफळे आणि बोरेही आणली !
९) बघण्यासारखे काय
भरपूर आहे, नद्या ( वाद्या ) , पर्वत, फलाज, धरणं, म्यूझियम्स, समुद्रकिनारे, मरीन लाईफ, किल्ले..... काही ठिकाणे मी दाखवतोच... बट दॅट्स नॉट ऑल...
तर हि फक्त झलक... सविस्तर लिहिनच ओघात.
आणि हे नमुन्यादाखल फोटो...
१) हे मस्कतमधले रस्ते... दोन्ही बाजूंना खजूराची झाडे, फुलझाडे आणि सुंदर वळणे
२) एखाद्या सरोवरासारखा भासणारा समुद्र
३) डोंगरातली गुहा
४) झुळ झुळ वाहणारी नदी
ं५) नजरबंदी करणारे कडे
६) शांत डोह
७) नदीतली वाट
८) देखणे झुंबर ( साईडने कसे दिसत असेल बरं )
९) ग्रँड मॉस्क
१०) धरण ( तेदेखील इतके देखणे )
११) सिंकहोल ( म्हणजे काय रे भाऊ ? )
१२) रॉयल ऑपेरा हाऊस
आणि चक्क एका लगीनघरात ???
या देशाबद्दल आणखी माहिती हवी असेल तर अवश्य विचारा नंतर आपण सहलीला निघू या !
फोटो खूपच सुंदर आहेत.
फोटो खूपच सुंदर आहेत.
ओमान बद्दलची माहिती खूप
ओमान बद्दलची माहिती खूप उपयुक्त आणि रंजक ....
फोटो तर सगळेच क्लास... पुढील भागांची वाट पहायला लावणारे !!!!!!!
वाह!!! तुझ्या या सीरीज मुळेच
वाह!!! तुझ्या या सीरीज मुळेच मस्कत ला जावेसे वाटतेय.. काय सुंदर आहे सगळं.. वॉव!!!
Wow.. It's so calm and
Wow.. It's so calm and beautiful! मस्त लिहिलंय आणि फोटोज सही. प्लिज खूप लिहा आणि फोटो टाका..
मस्त माहिती मिळते आहे. फोटोज
मस्त माहिती मिळते आहे. फोटोज तर मस्त आहेतच.
सुरुवात मस्तच !
सुरुवात मस्तच !
Pages