आवरणासाठी:
१ वाटी सुवासिक तांदळाचे पीठ,
१ वाटी गरम पाणी,
कणभर मीठ,
१ चमचा लोणी,
२ चमचे आंबा इमल्शन अथवा आंबा इसेन्स + खाण्याचा आंबा रंग
सारणासाठी:
१ ओला खवलेला नारळ,
आवडीप्रमाणे साखर,
सुका मेवा,
रंगीत टुटी-फ्रुटी
इतरः
मोदकपात्र अथवा चाळणी आणि कुकर
पांढरे स्वच्छ पातळ कापड
मायबोली वरची माझी पहिलीच पाककृती आहे, म्हणुन गोडाने सुरवात करतेय..
१. एक वाटी गरम पाण्यात लोणी, मीठ आणि आंबा इमल्शन घालावे. गॅस बंद करुन त्यात सुवासिक तांदळाचे पीठ हळुहळु घालावे. गुठळ्या होउ देऊ नयेत. अशी उकड काढताना तेल/ तुप न घालता लोणी घातल्यामुळे उकड मऊ आणि लुसलुशीत होते. ही उकड छान मळुन घ्यावी.
२. कढईत ओल्या नारळाचा चव आणि साखर घालावी. एकजीव होईपर्यंत शिजवावे. त्यात सुका मेवा (मी काजु व मनुका टाकल्या होत्या) आणि रंगीबेरंगी टुटी-फ्रुटी घालावी. सारण थंड होऊ द्यावे. बाहेरील आवरण केशरी असल्याने आणि टुटी-फ्रुटीचा रंग खुलुन दिसावा ह्यासाठी सारणात गुळ न घालता साखरच घालावी.
३. मोदक करुन, एकदा पाण्यात घालुन मोदकपात्रात पातळ कापड टाकुन वाफवावे. पाण्यातुन काढ्ल्याने उकडताना मोदक फुटत नाहीत.
असे गरम गरम सुवासिक आंबा मोदक गणपतीबाप्पाला द्यावेत आणि स्वतासुद्धा तुप घालुन गरम गरमच खावेत..
पाककृती भारीच असेल, पण
पाककृती भारीच असेल, पण फोटोशिवाय मजा नाही.
उद्या माघी गणेशजयंती आहे, उद्याच हे मोदक बनवा आणि बनविल्यानंतर फोटो डकवुन टाका.
(No subject)
लगेच बनवले सुध्दा, खुपच सुंदर
लगेच बनवले सुध्दा, खुपच सुंदर दिसत आहेत.
फोटो आहेतच, पण नीट टाकता येत
फोटो आहेतच, पण नीट टाकता येत नाहीयेत..
मोदक मस्तच आहेत.
मोदक मस्तच आहेत.
फोटो एक्दम तोंपासु!!
फोटो एक्दम तोंपासु!!
मी मायबोलीवरील अशीच एक रेसीपी
मी मायबोलीवरील अशीच एक रेसीपी पाहून प्रयत्न केला पण इतका चांगला नाही झाला. शोधावी लागेल ती रेसीपी. त्यात आंबा रस घालून करायचे होते.
>>>माघी गणेशजयंतीनिमित्त
>>>माघी गणेशजयंतीनिमित्त उकडीचे आंबा मोदक..!!<<
माघी म्हणजे काय?
मोदक झकास!
अर्धा मोदक कापून फोटो टाकायचा ना... कळले असते टूटी फ्रूटी कसं दिसतं ते.
वाह! मस्तच एकदम सुबक झालेत
वाह! मस्तच एकदम सुबक झालेत मोदक. एक घेऊ का उचलून?
झंपी, गणेशाचा जन्म माघ
झंपी, गणेशाचा जन्म माघ महिन्यातला म्हणून माघी उत्सव
गणपतीचा वाढदिवस एकदाच असतो आणि तो माघातच असतो. त्यामुळे माघी गणेशजयंती ही द्विरुक्ती आहे. माघी गणपती म्हटलं तरी चालतं.
धन्यवाद अश्विनी के. मला वाटले
धन्यवाद अश्विनी के.
मला वाटले टायपोस आहे, माझी चे माघी झालेय. पण विचारले म्हणून माहिती मिळाली.
गप्प बसून राहू नये प्रश्ण असेल मनात हेच खरं.
कसल तोपांसु आहे.आताच्या आता
कसल तोपांसु आहे.आताच्या आता खावे अस वाटतय मस्तच.
मस्तं...
मस्तं...
एकदा पाण्यात घालुन
एकदा पाण्यात घालुन मोदकपात्रात पातळ कापड टाकुन वाफवावे>>> पाणी कस घ्यायच.कोमट की थंड ???
@ झंपी, अर्धा कापलेला फोटो
@ झंपी, अर्धा कापलेला फोटो सुद्धा आहे. पण केबी जास्त असल्याने इथे डकवता येत नाहीये.
@ दक्शिणा, एक का, सगळे ताटच घेऊ शकता..
@ देवीका, आता ह्या पाककॄतीनुसार प्रयत्न करा. नक्की जमतील.
@ अंकु, थंड पाणी घ्यायचे. एक मोदक हळुच एकदाच बुडवुन काढायचा.
फोटो गायब कसा झाला?
फोटो गायब कसा झाला?
मस्तच फोटो.
मस्तच फोटो.
अप्रतीम! सुबक! देखणे! लाजवाब!
अप्रतीम! सुबक! देखणे! लाजवाब! रसिले! ( एवढी विशेषणे पण कमी पडतील)
फोटो गायब???
फोटो गायब???
आई गं ! काय लाजवाब दिसतायत
आई गं ! काय लाजवाब दिसतायत मोदक.
छान आहेत. मीपण करते थोडे
छान आहेत. मीपण करते थोडे वेगळ्या प्रकारे पण मे महिन्यात करते अस्सल आंब्याचे. पण उकड मात्र पांढरीच ठेवते.
क्युट दिसतायत.
मस्तच !
मस्तच !
.
.
सुंदर फोटो.
सुंदर फोटो.
भारी टिपा आणि फोटो!!
भारी टिपा आणि फोटो!!
अमेझिंग आहेत फोटोज. साच्यात
अमेझिंग आहेत फोटोज. साच्यात बनव्लेत का?
मस्त दिसतायत.
मस्त दिसतायत.
फोटो सुरेख! फोटोची साइझ इथे
फोटो सुरेख!
फोटोची साइझ इथे कमि करता येइल www.shrinkpictures.com
वा, सुंदर सोनेरी दिसत आहेत
वा, सुंदर सोनेरी दिसत आहेत मोदक!
हा आमच्या घरातील गणपती!
@ अंजु, सारणात आंबा टाकता
@ अंजु, सारणात आंबा टाकता येईलच, अजुनही बरेच प्रयोग करता येतील. पण पांढर्या उकडीला स्वताची अशी खास चव नसते. आंबा इसेन्स सारणाएवजी आवरणामध्ये टाकायचे माझे हेच कारण आहे की आवरण देखील चविष्ट व्हावे.
@ शुम्पी, होय. साच्यामध्येच केले आहेत. हाताने जमतात, पण इतके सुबक नाही.:P
@ प्राजक्ता, लिंकसाठी खुप खुप धन्यवाद. त्यामुळे साईझ कमी केलेला फोटो टाकता आला.
प्रतिसादासाठी सर्वाना खुप खुप धन्यवाद..
Pages