माघी गणेशजयंतीनिमित्त उकडीचे आंबा मोदक..!!

Submitted by माणिकमोती on 22 January, 2015 - 02:51
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आवरणासाठी:
१ वाटी सुवासिक तांदळाचे पीठ,
१ वाटी गरम पाणी,
कणभर मीठ,
१ चमचा लोणी,
२ चमचे आंबा इमल्शन अथवा आंबा इसेन्स + खाण्याचा आंबा रंग

सारणासाठी:
१ ओला खवलेला नारळ,
आवडीप्रमाणे साखर,
सुका मेवा,
रंगीत टुटी-फ्रुटी

इतरः
मोदकपात्र अथवा चाळणी आणि कुकर
पांढरे स्वच्छ पातळ कापड

क्रमवार पाककृती: 

मायबोली वरची माझी पहिलीच पाककृती आहे, म्हणुन गोडाने सुरवात करतेय..

१. एक वाटी गरम पाण्यात लोणी, मीठ आणि आंबा इमल्शन घालावे. गॅस बंद करुन त्यात सुवासिक तांदळाचे पीठ हळुहळु घालावे. गुठळ्या होउ देऊ नयेत. अशी उकड काढताना तेल/ तुप न घालता लोणी घातल्यामुळे उकड मऊ आणि लुसलुशीत होते. ही उकड छान मळुन घ्यावी.

२. कढईत ओल्या नारळाचा चव आणि साखर घालावी. एकजीव होईपर्यंत शिजवावे. त्यात सुका मेवा (मी काजु व मनुका टाकल्या होत्या) आणि रंगीबेरंगी टुटी-फ्रुटी घालावी. सारण थंड होऊ द्यावे. बाहेरील आवरण केशरी असल्याने आणि टुटी-फ्रुटीचा रंग खुलुन दिसावा ह्यासाठी सारणात गुळ न घालता साखरच घालावी.

३. मोदक करुन, एकदा पाण्यात घालुन मोदकपात्रात पातळ कापड टाकुन वाफवावे. पाण्यातुन काढ्ल्याने उकडताना मोदक फुटत नाहीत.

असे गरम गरम सुवासिक आंबा मोदक गणपतीबाप्पाला द्यावेत आणि स्वतासुद्धा तुप घालुन गरम गरमच खावेत..

वाढणी/प्रमाण: 
४ जणांसाठी
माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा... खुपच सुरेख... आणि ते सुद्धा साच्याशिवाय..!! लगेच मोदक करुन बघितले हे पाहुन खुप बरे वाटले..

Pages