Submitted by मी कल्याणी on 25 March, 2011 - 00:41
पाचूच्या रानात पुन्हा बासरी घुमली
सागरनिळाई ओल्या दिठीत सजली
हरपली राधा मनी मोरपंखी साज
मेघियात दाटू आले कान्हाचे आभास
सोनसळी हूरहूर अंतरी दाटली
हसुनिया पळभर सांज रेंगाळली
निमिषात पानोपानी कान्हा उमलला
आभासछबीत कान्हा राधेस भेटला
वा-यावर लहरली जणू रूणझूण
मेघातून दाटू आले निळे-श्याम क्षण
पाखरांच्या चाहूलीचा करुनी बहाणा
वेध घेई राधा.. म्हणे आला यदुराणा..
प्राण आसावला तरी चाहूल देईना..
निजू पाहे सांज तरी श्रीरंग येईना
यमुनेचे नीर नयनात भरू आले
मोरपीसावरी दोन मोती विसावले
वा-यावर अनामिक घुमली लकेर
मनाचा हिंदोळा गेला दूर नभपार
शहारली राधा, मनी श्रावण अवघा
सरसर सरींसवे आला प्राणसखा..
सरसर सरींसवे आला प्राणसखा..
गुलमोहर:
शेअर करा
वा-यावर अनामिक घुमली
वा-यावर अनामिक घुमली लकेर
मनाचा हिंदोळा गेला दूर नभपार
शहारली राधा, मनी श्रावण अवघा
सरसर सरींसवे आला प्राणसखा..
सरसर सरींसवे आला प्राणसखा..
छानच आहे शेवट!
मेघियात
आभासछबीत >>> हे शब्द... ? कृपया योग्य फोड करून नेमका अर्थ सांगा.
सुंदर कविता, कल्याणी, माझ्या
सुंदर कविता, कल्याणी,
माझ्या अशाच एका कवितेची आठवण करुन देणारी...
http://www.maayboli.com/node/22004
पु ले शु
आवडली
आवडली
खूपच सुरेख ........... अगदी
खूपच सुरेख ........... अगदी लयीत वाचता येतेय, ....... आवडली!!!!!!!!!!!!
ह्.बा., शशांक, वर्षा,
ह्.बा., शशांक, वर्षा, संदिप.. धन्यवाद..
ह.बा., मेघियात म्हणजे मेघातून..
आणि आभासछबीत.. राधा अत्यंत आतुरतेने कान्हाची वाट बघ्ते आहे.. प्रत्येक चाहूलीत, पानाफुलात, मेघात तिला कान्हाची छबि दिसतेय.. अशा श्याममय झालेल्या राधेला प्रत्यक्षात तिथे नसतानाही आभासछबीत कान्हा भेटतोय..
कल्याणी
@शशांक.. तुमची कविता खुप सुंदर आहे.. आत्ताच वाचली
वा.. अप्रतिम.. तरल..
वा.. अप्रतिम.. तरल..
वा-यावर अनामिक घुमली
वा-यावर अनामिक घुमली लकेर
मनाचा हिंदोळा गेला दूर नभपार
शहारली राधा, मनी श्रावण अवघा
सरसर सरींसवे आला प्राणसखा..
सरसर सरींसवे आला प्राणसखा..>>> अरे वा?
कल्याणी गौरव, मनापासून अभिनंदन, कविता सुरेख आहे.
धन्यवाद
-'बेफिकीर'!
(गुणगुणण्यासारखीही आहे.)
मुक्ता.. धन्यवाद... बेफिकिर,
मुक्ता.. धन्यवाद...
बेफिकिर, आभारी आहे... सध्या या कवितेला चाल लावायचा प्रयत्न करतेय...
सह्ह्हीच..!
सह्ह्हीच..!
Apratim.. Dusra shabdch
Apratim.. Dusra shabdch nahiye..
सुंदर!
सुंदर!
कल्याणी, छान कविता .जया एम
कल्याणी, छान कविता .जया एम म्हणुन एक कवियात्री होत्या ,त्यांच्या कवितेसारखी वाटली. या जयाएमच्या कविता वाचून पहा.
http://www.maayboli.com/node/50130