लोकमान्य बाळगंगाधर टिळक. काही भारतीयांची नावे घेतली की माझे मस्तक आपोआप आदराने झुकते, त्यातलं हे महत्त्वाचं नाव. लोकमान्य. दुसरं काहीही नाही. संत नाही, महंत नाही, महात्मा नाही, देवमाणूस नाही, किंवा तत्सम काहीही नाही. लोकमान्य. लोकांना मान्य असलेला तो लोकमान्य. बास्स.
![Lokmanya Profile.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u57169/Lokmanya%20Profile.jpg)
सत्तावन्नचे स्वातंत्र्ययुद्ध इंग्रजांनी चिरडून फारा वर्षे लोटली नव्हती. या पराभवाने लोक मनाने इतके खचले होते की भारतीय जनता संपूर्णपणे हतवीर्य होऊन 'इंग्रज हेच आपले मायबाप, ते म्हणतील तेच आणि त्यांचेच सगळे बरोबर, आणि भारतीय जे जे ते ते टाकाऊ' अशा निष्कर्षाप्रत आली होती. अशा काळी थंड लोळागोळा होऊन पडलेल्या हिंदुस्थानला ऊब आणली ती न्यायमूर्ती रानडे यांनी. मात्र या उबेचे रूपांतर धगधगत्या वणव्यात केले ते लोकमान्य बाळगंगाधर टिळकांनी. "लोकमान्य टिळकांचा विजय असो" या मराठीभूमीतल्या घोषणे पासून उत्तरेतल्या "तिलक महाराज की जय" या जयजयकारात काय दडलेलं नाही? जनसामान्यांनी दिलेल्या या पदवीपासून ते थेट ब्रिटीश राज्यकर्त्यांच्या तोंडून म्हणजेच 'फ्रॉम द हॉर्सेस माऊथ' आलेल्या "भारतीय असंतोषाचे जनक" (Father of Indian Unrest) या संबोधनाचे धनी असलेल्या लोकमान्य बाळगंगाधर टिळकांवर आजवर अनेक लेख व पुस्तके लिहिली गेली असतील. चरित्र लिहायचं म्हटलं की किती लिहावं याला बंधन नसतं. मात्र एखाद्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाचं चित्रण चित्रपटाच्या माध्यमातून करायचं म्हटलं तर ते मात्र अतिशय आव्हानात्मक काम ठरतं. चित्रपटाला असलेलं वेळेचं बंधन आणि त्या माध्यमाला असलेल्या मर्यादा हे मोठे अडथळे ठरू शकतात. त्यात ती व्यक्ती राजकीय पुढारी किंवा स्वातंत्र्यसैनिक असली, तर बघायलाच नको. त्यातही लोकमान्यांसारखं उत्तुंग व्यक्तिमत्व असेल तर हे काम आणखी कठीण होऊन बसतं.
मग चित्रपट काढणार तरी कुठल्या पैलूवर? एका निष्णात गणितज्ञावर की पंचांगकर्त्यावर? गीतारहस्य ह्या ग्रंथाच्या रचनाकारावर की "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे" ही सिंहगर्जना करणारर्या या नरसिंहावर? गोपाळराव आगरकरांसारख्या वैचारिक शत्रूची त्याच्या आजारपणात रात्र-रात्र बसून शुश्रुषा करणार्या हळव्या मित्रावर की 'शिक्षणमहर्षी' ही ज्या काळी शिवी झाली नव्हती त्या काळात सरकारी शाळांहून सरस आणि देशाभिमान जागृत होईल असे शिक्षण देणार्या शिक्षणसंस्था काढणार्या ध्येयवेड्यावर? भल्याभल्यांची भंबेरी उडवून देणार्या धडाडीच्या पत्रकार आणि संपादकावर की १९४७ नंतरही ज्याचा पुतळा कराचीत उभा होता अशा एकमेव भारतीय पुढार्यावर? दुष्काळ पडल्यावर ब्रिटीश सरकारने केलेल्या दुष्काळावरच्या कायद्यांचा उपयोग शेतकर्यांना व्हावा म्हणून त्यावर पुस्तिका लिहून वाटणार्या आणि शेतकर्यांच्या हितासाठी झटणार्या समाजसेवकावर की तुरुंगात असतानाही केवळ पुस्तकांच्या आधारावर नवी भाषा शिकणार्या तल्लख बुद्धीच्या या विद्यार्थ्यावर? वासुदेव बळवंत फडक्यांना सबूरीचा सल्ला देणार्या बळवंतरावांवर की चापेकरांसारख्या अनेक क्रांतीकारकांना प्रेरणास्थान ठरणार्या लोकमान्यांवर? व्यक्तिमत्वाला असंख्य कंगोरे असलेल्या या नरसिंहावर कुणाला चित्रपट काढता येईल? घटना नेमक्या कुठल्या निवडायच्या? एखाद्या डबक्यावर लघुपट काढता येतो. तलावावर मालिका लिहीता येते. आणि नदीवर नाटक-चित्रपट. पण ज्याच्या अमर्याद खोलीचा अंदाजच येत नाही अशा या अथांग रत्नाकरावर कुणाला चित्रपटासारखी कलाकृती निर्माण करणे झेपेल काय?
याचे उत्तर मात्र ओम राऊत यांच्या "लोकमान्यः एक युगपुरुष" या चित्रपटातून बर्याच अंशी होकारार्थी मिळते. मी बर्याच अंशी का म्हणालो याचा खुलासा पुढे करतो. बालगंधर्व चित्रपटापासूनच सुबोध भावे कुठल्याही भूमिकेचं सोनं करु शकतो याबद्दल शंका नव्हतीच. मात्र हा चित्रपट बघायला जाताना तो लोकमान्यांच्या भूमिकेचं शिवधनुष्य कसे पेलतो याची उत्सुकताही होती. हा चित्रपट बघितल्यानंतर मात्र सुबोध भावे कुठलीही भूमिका अक्षरशः जगू शकतो याची ठामपणे खात्री पटली. लोकमान्यांची करारी भावमुद्रा, ताठ बाणा, प्रसंगी दिसणरा हळवेपणा आणि आग ओकणारे डोळे अंगार हे सुबोधने उत्तमरित्या स्वतःत उतरवले आहेत. इतके की आज टिळक हयात असते तर त्यांनीही सुबोधचं मनापासून कौतुक केलं असतं इतकी ही भूमिका तंतोतंत वठवण्यात सुबोध यशस्वी झाला आहे. गांधींची भूमिका म्हटलं की लगेच कृष्ण भानजी अर्थात बेन किंगस्ले आणि सरदार पटेल म्हटलं की परेश रावल हे ताकदीचे कलाकार जसे आठवतात, तसे आता यापुढे टिळक म्हटलं की सुबोध आणि सुबोध म्हटलं की टिळक हेच समीकरण आठवत राहणार नि:संशय.
"डॉग्स अॅन्ड इंडिअन्स आर नॉट अलाउड" हे ऐकण्याची सवय असलेल्या जनतेच्या समोरच त्या काळी एका इंग्रजाला "बाहेर पाटीच लाऊन घेणार आहे. डॉग्स अॅन्ड ब्रिटीश आर नॉट अलाउड" असं सुनावताना त्याचे डोळे अक्षरशः आग ओकतात. गोपाळराव आगरकरांशी वाद घालताना "हिंदू धर्मात काय सुधारणा करायची ते हिंदूच ठरवतील, (ब्रिटीश) कायद्याने लादलेली बळजबरीची सुधारणा चालणार नाही" असे जेव्हा लोकमान्य ठणकावतात, तेव्हा हे देशाभिमानी वाक्य ऐकताना आपल्याच हृदयाचे ठोके चुकतात. सुधारकांची सभा उधळल्यावर तिथून निघून जाताना त्याच्या चेहर्यावर उमटलेले ते छद्मी हास्य अजूनही डोळ्यांसमोरून जात नाही. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच !!" ही डरकाळी आणि "बहुजनांना मंदिरात जाऊन दर्शन घेता येत नाही आता सार्वजनिक गणेशोत्सवात घेता येईल" ही आणि अशी वाक्ये ऐकावी तर सुबोध भावेच्या तोंडूनच. केसरीत छापावयाच्या अग्रलेखाचा मजकूर लेखनिकाला सांगत असताना मधेच "विश्वनाथ गेला" हे ऐकल्यावर कापर्या आवाजात तो लेख सांगून पूर्ण करणार्या टिळकांना फक्त आणि फक्त सुबोधच साकारू जाणे.
![Lokmanya Cover.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u57169/Lokmanya%20Cover.jpg)
हा चित्रपट जसा सुबोधचा आहे तसाच तो दिग्दर्शक ओम राऊत यांचाही आहे. ओम राऊत यांनी सुबोध भावे नामक हिर्याला पैलू पाडून चमकवलं आहे, त्याच्याकडून अगदी हवा तसा अभिनय करवून घेतला आहे. या बाबतीत दिग्दर्शक ओम राऊत यांचं कौतुक करायलाच हवं. वर म्हटल्याप्रमाणे घटना कोणत्या निवडायच्या या पेचातून त्यांनी इतक्या व्यवस्थितपणे मार्ग काढला आहे, की त्यातून हा चित्रपट टिळकांची कारकीर्द संपूर्णपणे दाखवत नसला तरी त्यांच्या कर्तृत्वाची पुरेशी झलक नक्की दाखवतो. चित्रपटात लोकमान्यांची हिंदुत्ववादी धर्माभिमानी बाजू त्यांनी कुठलाही प्रचारकी आव न आणता व्यवस्थित मांडली आहे. देशाच्या हिताचा असेल तर केलेला खूनही समर्थनीय ठरतो ही लोकमान्यांची भूमिका मांडताना चित्रपट कुठेही भीड ठेवत नाही. त्याचबरोबर "स्वराज्यासाठी रक्त वहायलाच हवं, नाहीतर मिळालेल्या स्वराज्याची किंमत राहणार नाही" असं सुनावून राजकारणात नाहक घुसू पाहणार्या अहिंसा नामक थोतांडाची संभावना करतानाही चित्रपट कमी पडत नाही. लोकमान्यांचा स्वदेशीचा पुरस्कार ही बाजूही चित्रपट यशस्वीपणे मांडतो. तसेच टिळक-आगरकर वाद आणि गांधी-टिळक भेट या प्रसंगांना प्रभावीपणे सादर करण्यात आलेले आहे. चित्रपटात टिळकांच्या कारकिर्दीतल्या महत्त्वाच्या घटना अशा प्रकारे दाखवण्यात आलेल्या आहेत की प्रेक्षकांना चित्रपटातून तर टिळकांविषयी माहिती मिळेलच पण चित्रपट संपवून घरी गेल्यावरही त्यांच्याविषयी अधिकाधिक जाणून घेण्याची प्रेरणा मिळेल. थोडक्यात, हा चित्रपट म्हणजे टिळक नामक महासागराची खोली दाखवण्याचा एक प्रयत्न आहे.
सुबोध म्हणजे टिळक आणि टिळक म्हणजे सुबोध असं वाटायला लावण्यात रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचाही मोठा वाटा आहे. आशिष म्हात्रे आणि अपूर्वा मोतीवाले यांनी संपादनाची बाजू उत्तमरित्या सांभाळली आहे. वेषभूषाकार महेश शेरला व कलादिग्दर्शक संतोष फुटाणे यांनी तो काळ हुबेहूब उभा करुन आपापल्या विभागात कमाल केली आहे. अजीत-समीर यांचे संगीत एरवी वेगळी गाणी म्हणून ऐकायला फार रोचक नसले तरी त्या त्या प्रसंगांत कुठेही उपरे भासत नाही, उलट चपखलच वाटते. चित्रपटाच्या सुरवातीला नाना पाटेकरांच्या आवाजातले निवेदन सुरू असताना निवेदनानुरूप ज्या बातम्या आणि छायाचित्रे दाखवली आहेत त्याबद्दल दिग्दर्शकाला वाकून कुनिर्सात.
![LokmanyaEkYugpurush 03 Kesari.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u57169/LokmanyaEkYugpurush%2003%20Kesari.jpg)
लोकमान्यांना कारावासाची शिक्षा होऊन मंडालेला रवाना करण्याचे ठरते तो प्रसंग म्हणजे या चित्रपटाची सुरवात आहे. मग आजच्या काळातल्या मकरंद (चिन्मय मांडलेकर) आणि त्याची पत्नी समीरा (प्रिया बापट) याच्या माध्यमातून तो फुलत जातो. हा भाग मात्र जरा खटकला. एक कारण म्हणजे मुळात अशा व्यक्तिमत्वावर चित्रपट काढताना वेळेचं बंधन असताना हा भाग दाखवण्याऐवजी त्याला पूर्ण फाटा देऊन लोकमान्यांच्या कारकिर्दीतलेच अधिक प्रसंग दाखवले असते तर चित्रपट आणखी प्रभावशाली झाला असता. मकरंद आणि समीराच्या आयुष्यात लोकमान्यांच्या प्रभावाने जे बदल होतात ते सगळं फारच ओढून ताणून दाखवलं आहे, त्यामुळे चित्रपटातला हा भाग अधिकच अनावश्यक वाटतो. मात्र असं असलं तरी या दोन्ही भूमिकात्काम चिन्मय आणि प्रिया यांनी चांगलं काम केलं आहे. त्यामुळे चित्रपटाच्या या वैगुण्याकडे दुर्लक्ष करायला हरकत नाही. म्हणूनच मी सुरवातीला 'बर्याच अंशी' हे शब्द वापरले होते.
दुसरी गोष्ट म्हणजे चित्रपटात काही ठिकाणी घडणारे प्रसंग हे गोंधळात टाकतात. म्हणजे घटना किंवा दाखवलेले प्रसंग अमुक साली घडलेले असताना वेगळ्याच साली घडले आहेत असे दाखवले आहे. मात्र या गोष्टींकडे लक्षही जाणार नाही अशा प्रकारे ते प्रसंग रंगवण्यात चित्रपटकर्ते यशस्वी झाले आहेत.
चुकाच काढायच्या तर आणखीही काढता येतील. पण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहीजे. कुठल्याही चरित्रपटाचं एक महत्त्वाचं साध्य (key takeaway) असावं ते म्हणजे एखादे जबरदस्त पुस्तक वाचल्यावर वाचकाची जशी भारावल्यासारखी अवस्था होते तशीच परिणामकारकता साधणं. निर्मिती, दिग्दर्शन, अभिनय, वेषभूषा आणि रंगभूषा, कलादिग्दर्शन इत्यादी प्रत्येक बाबीत घेतलेली प्रचंड मेहनत व अभ्यास आणि एकूणच चित्रपटाचे अप्रतीम सादरीकरण यांच्यामुळे तशी परिणामकारकता नक्कीच साधली जाते. चित्रपट आपल्याला एवढा गुंगवून ठेवतो की मध्यंतर नामक लहानशा व्यत्ययामुळेही आपण प्रचंड अस्वस्थ होतो. चित्रपटाच्या सुरवातीला सुबोधने उभ्या केलेल्या लोकमान्यांच्या प्रवेशापासून ते शेवटच्या श्रेयनामावलीपर्यंत आपण एक वेगळेच भारावलेपण अनुभवतो.
भारतीय राजकारणावर ज्यांचा तीव्र प्रभाव पडतो आहे आणि आपल्याला प्रचंड अडचणीचे ठरू शकतात अशा नेत्यांना पाताळयंत्री ब्रिटीशांनी भारतीय जनतेपासून लांब ठेवण्याचं धोरण अवलंबलं. या रास्त भीतीतूनच लोकमान्यांना आयुष्याची तब्बल सहा वर्ष ब्रिटीशांनी भारताबाहेर मंडालेत, लोकांपासून लांब ठेवलं. लोकमान्यांना आणखी फक्त दहा वर्षांचे आयुष्य मिळते, तर भारतीय स्वातंत्र्यलढा आणि एकूण राजकारण यांचा चेहरामोहरा आज काही वेगळाच दिसला असता हे निश्चित.
असे जास्तीतजास्त चित्रपट बनायला हवेत. कारण आपल्याला आझादी ही फक्त आणि फक्त बिना खडग बिना ढाल मिळालेली आहे अशी खोडसाळ आणि तितकीच खुळचट समजूत करुन देणारी पाठ्यपुस्तके असल्यावर पुढच्या पिढीला सत्य समजणार तरी कसे? अशा कलाकृती बनल्याशिवाय स्वातंत्र्यलढ्यातल्या अशा हिर्यांचे प्रभावशाली दर्शन होणार तरी कसे?
चित्रपटाचा तिकीट काढलेला खेळ केव्हाच संपतो, पण त्यानंतर बराच काळ डोक्यात ठाण मांडून बसतात ते सुबोध भावेने सादर केलेले तुमचे, आमचे, सर्वांचेच - लोकमान्य. दुसरं काहीही नाही. संत नाही, महंत नाही, महात्मा नाही, देवमाणूस नाही, किंवा तत्सम काहीही नाही. लोकमान्य. लोकांना मान्य असलेला तो लोकमान्य. बास्स.
अजून बघितला नसेल तर चित्रपटगृहात जाऊन नक्की पहा. लोकमान्य - एक युगपुरुष.
------------------------------------------------------------------------------------
ट्रेलर
http://www.youtube.com/watch?v=aLvVD0lyOqw
http://www.youtube.com/watch?v=nu7_JEUm6mc
http://www.youtube.com/watch?v=BpS2bF3KwmU
पत्रकार परिषद १
http://www.youtube.com/watch?v=S32mOWXJIi8
पत्रकार परिषद १
http://www.youtube.com/watch?v=VlU3RW_MTQc
गाणे: हे जीवन आपुले सार्थ करा
http://www.youtube.com/watch?v=0DeqgxST6Fg
गाणे: गजानना, गजानना
http://www.youtube.com/watch?annotation_id=annotation_3593398775&feature...
हो नताशा, ते दृश्य मलाही
हो नताशा, ते दृश्य मलाही खटकलं होतं; दिग्दर्शकाने ते दृश्य उगाचच नाट्यमय करण्याच्या हेतूने केलं असावं तसं.
टिळक मंडालेहून परत आले होते तेव्हा नक्की कसं स्वागत झालं हे दुर्दम्य (पूर्ण) वाचल्यावर किंवा इतर साहित्य वाचल्यावर कदाचित समजेल. जाणकारांनी प्रकाश टाकावा.
कोकणस्थ, >> टिळक मंडालेहून
कोकणस्थ,
>> टिळक मंडालेहून परत आले होते तेव्हा नक्की कसं स्वागत झालं ...
बहुधा कोणाचाही विश्वास बसला नसावा की टिळक परत आलेत. युरोपात सरासरी आयुर्मान ४८ वर्षे असतांना लोकमान्यांना ५२ व्या वर्षी ६ वर्षांची शिक्षा झाली. आता टिळक कसले परतून येतात असाच सगळ्यांचा ग्रह झाला असणार. या कारावासानंतर टिळकांची प्रकृती अतिशय क्षीण झाली होती असंही ऐकून आहे.
आ.न.,
-गा.पै.
नताशा, कोक्या, मी अजुन पाहिला
नताशा, कोक्या, मी अजुन पाहिला नाहीये पण ते दुर्दम्यमधे असेच दिलेले आहे.
त्यांना मुद्दाम आडरात्री गायकवाड वाड्यापाशी छपून सोडण्यात आले. गुप्तता राखणेचे कारण असे की घरापाशी येईपर्यंत लोकांचा थोरला जमाव जमून आपसूकच मिरवणूकीचे स्वरूप आले असते आणि त्यांचे महत्व अजुनच वाढले असते.
ते असे रात्री येतील याचा काहीच सुगावा नसल्याने वाड्याच्या दारात नोकराला आधी विश्वासच बसेना.
पण ही बातमी लगेचच पुण्यात वणव्यासारखी पसरली आणि रात्रीच भेटीस येणारांची रीघ लागली.
धन्यवाद महेश
धन्यवाद महेश![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद महेश
धन्यवाद महेश
>>या कारावासानंतर टिळकांची
>>या कारावासानंतर टिळकांची प्रकृती अतिशय क्षीण झाली होती असंही ऐकून आहे.
गापै, खरे आहे मंडालेला असताना कारावासात मिळणार्या अन्नामुळे प्रकृतीवर परिणाम झाला होताच.
बहुतेक डायबेटीस पण झाला होता असे वाटते. पण तरीही आधी जी तब्ब्येत कमावली होती त्या जोरावर बर्याच गोष्टी निभावून नेल्या.
हो. मधुमेह झाला होता
हो. मधुमेह झाला होता
लोकमान्यांचा हा करारी चेहराच
लोकमान्यांचा हा करारी चेहराच लहानपणापासून डोळ्यासमोर आहे.. पण तो त्यांचा सार्वजनिक क्षेत्रातला चेहरा असावा.. खाजगी आयुष्यात तेही हळवे असतील... असा एखादा प्रसंग चित्रपटात असावा असे वाटतेय.
बघणार आहेच.
>>खाजगी आयुष्यात तेही हळवे
>>खाजगी आयुष्यात तेही हळवे असतील
कदाचित नव्हते, कारण तसा उल्लेख कुठे दिसत नाही. घरात सुद्धा त्यांचा एक प्रकारे दरारा / धाक होता असे वाटते.
१००
१००![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
घरात सुद्धा त्यांचा एक
घरात सुद्धा त्यांचा एक प्रकारे दरारा / धाक होता असे वाटते.>>
सध्या दुर्दम्य वाचायला घेतले आहे. त्यात असेच काहीसे आहे.
कोके, अरे मी दुर्दम्यच्या
कोके, अरे मी दुर्दम्यच्या आधारेच सांगतो आहे. काही वर्षांपुर्वी वाचलेली आहे.
हो रे माहिती आहे तू त्याच्या
हो रे माहिती आहे तू त्याच्या आधारावरच सांगत आहेस. मी तुलाच दुजोरा देत होतो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
विश्राम बेडेकर यांनी 'टिळक
विश्राम बेडेकर यांनी 'टिळक आणि आगरकर' हे नाटक लिहिले आहे. पुस्तक मिळाले तर जरूर वाचा. अतिशय सुंदर आहे. यामधे भक्ती बर्वे आणि श्याम पोंक्षे यांनी काम केले होते. नाटकाची चित्रफीत उपलब्ध नसेल पण पुस्तक उपलब्ध आहे. अवश्य वाचा.
http://www.justmarathi.com/lo
http://www.justmarathi.com/lokmanya-ek-yugpurush-first-day-box-office-co...
On the first day of its release, Lokmanya occupied 20% screens in Mahashtra . This is the highest opening amount for the month for Marathi films. With favorable reviews and word of mouth , the film recorded improved collection on the following days. The occupancy for the film has been high which is around 60 % in theatres all over the state. Subhodh Bhave, who has played historic characters before this, is an award winning actor. Thanks to his fan following, the film’s response has been terrific and is expected to increase after the weekends as well. The total collection of the film at the end of the week is above 2 Crore With PK running successfully across the country, it remains to be seen how the audiences will receive the historic biopic in days to come.
टिळकांन्ना जबर्दस्त डायेबेटिस
टिळकांन्ना जबर्दस्त डायेबेटिस होता. त्यांन्ना खुप पथ्य पाणी होते. ते राजगीर्याच्या पुर्या, मेथीची भाजी असे खात असत. त्यांच्या पत्नीला पण डायबेटिस होता. सुपारीची खांडे ते सतत खात. दिवसाला २ किंवा ३ सुपार्या लागत.
घरात ते अतिषय कडक होते. वादविवाद घालणे हा अतिषय आवडिचा छंद (त्या वेळेस मायबोली असते तर ...). प्रथम किरकोळ तब्येत होती पण एकदा त्यांच्या आणि पत्नी च्या तब्येती वरुन मित्रांमध्ये चिडवा चिडवी झाली ( त्यांची पत्नी त्यांच्या पेक्षा स्थुल होती), त्याचे आव्हान स्विकारुन एक वर्ष आभ्यासातुन ब्रेक घेवुन त्यांनी फक्त शरीर कमावले. बलदंड केले. त्यातही अतिरेकी व्यायाम केला. स्टॅमिना वाढवला.
त्यांच्या स्वभावात जे अतिरेकीपण होतं ते देशाला फार उपयोगी पडलं...... लॉ चे क्लासेस काढणारे ते पहिले.
त्यांच्या लहान पणीच त्यांचे आईवडिल वारले. काकांनी त्यांना वाढवले. त्यांच्या वडिलांनी त्या काळी त्यांच्या नावावर १० हजार रुपये ठेवले होते. त्यामुळे प्रपंचाची तेवढी काळजी त्यांना नव्हती. आर्थात त्यांनी अनेक गरजु मुलांना शिकवुन व तो पैसा सगळा देशकार्यातच वापरला.
( बहुतेक रेफरन्सेस दुर्दम्य....मागे त्यांच्या वर किर्लोस्कर मासिकात प्रदिर्घ लेख आला होता.. लेखक आठवत नाहीत)
अतिरेकीपण होतं ते देशाला फार
अतिरेकीपण होतं ते देशाला फार उपयोगी पडलं >> कृपया जहालपणा/ कडवटपणा म्हणावे.
.
धन्यवाद
शहजादी नीलम यांनी लिहीलेले हे
शहजादी नीलम यांनी लिहीलेले हे समीक्षण आवडले.
http://www.pahawemanache.com/review/lokmanya-ek-yugpurush
चेतनजी लिंक बद्दल धन्यवाद,
चेतनजी लिंक बद्दल धन्यवाद, कामाला येईल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला नाही आवडली शहजादीबाईन्ची
मला नाही आवडली शहजादीबाईन्ची लेखणी.
आर्थात त्यांनी अनेक गरजु मुलांना शिकवुन व तो पैसा सगळा देशकार्यातच वापरला.>>>>.. शहजादीबाईना हे जमेल का? उचलली जीभ लावली टाळ्याला असे करणारे भरपूर आहेत. या सर्व क्रान्तीकारक, समाजसुधारक यान्च्या नखाचीही सर नाही असल्या ब्लॉगवाल्याना. गावगुन्डाना विरोध करता येईल का शहजादीबाईना ? या देशभक्तानी तर आपली हयात परकीयान्विरुद्ध काढली.
सॉरी कोकणस्थ, इथे मी वाद घातला म्हणून. अगदीच राहवले नाही.
अहो रश्मी ते परीक्षण
अहो रश्मी ते परीक्षण चित्रपटाचे आहे, लोकमान्य टिळक या व्यक्तीमत्वाचे नाही, ते त्यांच्या गुणदोषासह उत्तुंगच राहणार.
असो, गैरसमज नसावा, पण मी त्या लिंक बद्दल धन्यवाद म्हणालो, कारण एकंदरीत सर्वच परीक्षणांचा सूर पाहता हा चित्रपट फारच फसलाय हे नक्की, त्यामुळे तो मला बघायचा नाहीये, पण माझी ग'फ्रेंड माझ्या मागे लागल्याने तिचा विचार बदलायला म्हणून मी तिला एकदोन परीक्षणे वाचायला दिलीयेत, अजून एक दोन देईन त्यात हे वरचे देखील आले. म्हणून कामाला येईल म्हणालो. (बाकी त्या लिखाणाचा टोन ऊथळ आहे, याच्याशी मात्र सहमत)
@ रश्मी.. नीलम शहजादी यांनी
@ रश्मी..
नीलम शहजादी यांनी नकारात्मक सूर लावलाय तो चित्रपटाबद्दल, भाव्यांच्या फाजील अभिनयाबद्दल आणि दिग्दर्शकाच्या रोहित शेट्टी स्टाईल मारामारी दृश्यांबद्दल; लोकमान्य टिळकांबद्दल नव्हे.
@ ऋन्मेऽऽष
या धाग्यावर पण? त्यापेक्षा त्यांना मायबोलीचं सदस्यत्व मिळवून ऑफिशियलीच इथे आणा की...
ऋन्मेष मी तुला नाही म्हणले
ऋन्मेष मी तुला नाही म्हणले तसे.:स्मित: मला शहजादीबाईन्चेच लेखन नाही आवडले. ठीके की राऊत चूकले पण असतील. पण गल्लाभरु चित्रपटातले शाहरुख, सलमान, अमीर, अक्षय, लहान मुलाना माहीत आहेत. मग आपले देशभक्त आणी समाज सुधारक का माहीत नसावेत? चित्रपट हे प्रभावी माध्यम आहे, मग आपल्या मुलाना तो चित्रपट तान्त्रिक दोष बाजूला ठेऊन का दाखवु नये? निदान मुलाना टिळक थोडे तरी समजतील ना? तान्त्रिक दोषान्शी काय घेणे देणे.
माझी चित्रपटावरील टीकेला
माझी चित्रपटावरील टीकेला अजिबात ना नाही. शेवटी सिनेमा आहे, चार लोकांना आवडणार, चार जणांना नाही आवडणार. मी या सिनेमावर टीका असलेले किमान २-३ लेख वाचलेले आहेत. पण त्यांची भाषा ही व्यवस्थित होती. मी सुद्धा सिनेमावर अत्यंत व्यवस्थित भाषेत तीव्र टीका करणारा लेख लिहू शकतो. मात्र त्या लेखात जी भाषा वापरलेली आहे ती सुसंस्कृत निश्चितच नाही. It is extremely filthy, अर्थात, ज्या लोकांची जशी अभिरुची असेल त्या लोकांना तशी भाषा आवडते म्हणा.
रश्मी, तुम्ही व्यक्त केलेल्या बाकीच्या मतांशीही सहमत. आणि no issues with you arguing whatever you have said.
कष्टाचे पैसे खर्च करुन
कष्टाचे पैसे खर्च करुन चित्रपट पाहणे माझ्या तत्वात बसत नसल्या मुळे कुठले ही चित्रपट मी पहात नाही.
@कोकणस्थ तुम्ही अतिशय समर्पक
@कोकणस्थ तुम्ही अतिशय समर्पक परिक्षण लिहीले आहे.... तुमचे लेखन वाचूनच मी सिनेमा पण पाहिला ..मला आवडला...सुबोध भावे ने समरसून काम केले आहे...
तरूण पिढीने नक्की बघावा असे वाटते...
थिएटरमध्ये बघण्यात जास्त मजा आहे.
धन्यवाद गंधजी.
धन्यवाद गंधजी.
मलाही लोकमान्य चित्रपट आवडला.
मलाही लोकमान्य चित्रपट आवडला. चुकांसकट. काही शेट्टी वगैरे नाही हं!
बादवे शहजादीबाई जातानाच नकारात्मक दृष्टिकोन ठेवून गेल्या होत्या "बघणं बाई जीवावर आलं होतं पण जावं लागलं" या ठेक्यात, त्या काय चांगलं लिहिणार मग!
शहजादी बाईंने छान डिसेक्शन
शहजादी बाईंने छान डिसेक्शन केलेय. त्या ओम राऊत व त्या सुबोध भावेला वाटले असणार आपण फार झेंडे गाडलेत ,पण अत्यंत टुकार चित्रपट बनवलाय. या चित्रपटाला सगळ्यांनीच नाके मुरडलीत. कदाचीत लोकमान्य हा फक्त पुस्तकातच चांगले वाटणारा विषय आहे, चित्रपटात दाखवावे असे सिनेमॅटीक काही त्यांच्या काळात घडलेले नाही.
भारताला स्वातंत्र्य मिळवुन देणारे गांधीजी ,सुभाष बाबु यांच्यावरच फक्त चांगले चित्रपट होऊ शकतात.कारण त्यांचे आयुष्य व तो काळ लोकविलक्षण घटनांनी भरलेला आहे व त्यांचे कर्तृत्वही तसेच मोठे होते.
रश्मी ओके निदान मुलाना टिळक
रश्मी ओके![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
निदान मुलाना टिळक थोडे तरी समजतील ना? तान्त्रिक दोषान्शी काय घेणे देणे.
>>>>
सहमत, चित्रपट मराठी आणि एका महापुरुषाबद्दल असेल तेव्हा तांत्रिक दोषांबाबत मलाही घेणेदेणे नाही पण टिळकांबद्दल जे समजावे ते योग्यच समजले पाहिजे हि अपेक्षा आहेच. माझे इतिहासाचे ज्ञान जेमतेमच आणि टिळकांबद्दल हि चार वाक्यांपुरतेच, त्यात हल्ली इतके वेगवेगळे अन आपापल्या सोयीने ईतिहास फिरत असतात की ईतिहासाबद्दल जाणून घेणे म्हणजे नकोच वाटते. इथेही मी बहुतांश परीक्षणात वाचलेय की बरेच महत्वाच्या घटना दाखवल्या नाहीयेत वा बरेच काही एकांगी दाखवलेय. मग माझ्या कोर्या पाटीवर ते न आलेलेच बरे, म्हणून हा चित्रपट बघू नये या निर्णयाला मी माझ्यापुरता तरी आलोय.
Pages