'अकॅडमी अवॉर्डस्' उर्फ 'द ऑस्कर्स'साठी नामांकनं आज जाहीर झाली. 'अकॅडमी अवॉर्डस'चं हे ८७वं वर्ष. या वर्षी पहिल्यांदाच नामांकन सोहळ्याचं थेट प्रक्षेपण केलं गेलं. 'बर्डमॅन' आणि 'द ग्रँड बुडापेस्ट हॉटेल' या दोन चित्रपटांना सर्वात जास्त- प्रत्येकी नऊ- नामांकनं आहेत. 'द इमिटेशन गेम' या चित्रपटाला 'बेस्ट अॅक्टर'चं मिळून आठ नामांकनं आहेत. अधिकृत यादी इथे बघता येईल http://oscar.go.com/nominees
नामांकनं आणि नंतर विजेते याबद्दल दरवर्षीच वाद, मतभेद होतात. यंदा 'द लेगो मूव्ही' हा अॅनिमेशनपट, 'सेल्मा' या चित्रपटाच्या दिग्दर्शिका आणि त्याच चित्रपटातील भूमिकेसाठी डेव्हिड ओयिलोवो (Oyelowo), 'केक' या चित्रपटातल्या भूमिकेसाठी जेनिफर अॅनिस्टन ही न दिली गेलेली आणि सीझनच्या शेवटी आलेल्या 'अमेरिकन स्नायपर' या चित्रपटाला दिली गेलेली ही काही वादग्रस्त नामांकनं. हॉलिवूडबाहेरच्या चित्रपटांना मुख्य श्रेणीतली खूप जास्त नामांकनं मिळण्याचं पण हे वर्ष. तर जाहीर झालेल्या नामांकनांपैकी विजेते कोण ठरतील, नामांकन मिळालेले चित्रपट बघितल्यास त्याबद्दल, रेड कार्पेट कपडेपट या सगळ्यांची चर्चा करण्यासाठी हा धागा.
ऑस्करविषयी काही रंजक माहिती इथे आणि इथे वाचायला मिळेल. नामांकनाचे नियम इथे वाचायला मिळतील.
हे 'ऑस्कर्स'चे अधिकृत संकेतस्थळ http://www.oscars.org/
http://oscar.go.com/mypicks या दुव्यावर तुम्ही तुमच्या पसंतीचे विजेते निवडू शकता. तिथेच आपल्या 'फ़्रेंड्स'सोबत हा खेळ खेळण्याची पण सोय आहे. अर्थातच हे विजेते तुमच्या-आमच्यापुरतेच असतात. अंतिम विजेत्यांची निवड अकॅडमी करते.
वितरण सोहळा २२ फेब्रुवारीला आहे. यावर्षी नील पॅट्रिक हॅरीस या सोहळ्याचं संचलन करणार आहे.
मी नेहमीप्रमाणेच सुरूवातीचा
मी नेहमीप्रमाणेच सुरूवातीचा तासभर बघेन बहुतेक. वादविवाद, नॉमिनेशन्स फॉलो करत नाहीये.
"this oscar is going to be
"this oscar is going to be legen....wait for it....dary"
पाहायला हवेत यातील काही आता. भारताची एण्ट्री काय होती यावेळेस?
धागा काढलास हे बरीक चांगलं
धागा काढलास हे बरीक चांगलं केलंस हो!
'लायर्स डाईस' म्हणून हिंदी
'लायर्स डाईस' म्हणून हिंदी चित्रपट होता भारताची एंट्री. नवाझुद्दीन सिद्दीकी आहे त्यात. रीलीज झाला आहे का कल्पना नाही.
आपला या वर्षी बॉयहूड ला फुल्ल
आपला या वर्षी बॉयहूड ला फुल्ल ऑन पाठिंबा! नुकताच पाहिला. जबरदस्त आहे. इमिटेशन गेमपण चांगला आहे पण बॉयहूड जास्ती आवडला!
मी दर वर्षी ठरवते सगळे
मी दर वर्षी ठरवते सगळे नॉमिनेटेड सिनेमे बघायचे असे. पण समहाऊ कधीच ते तडीला गेलेले नाही
मी दर वर्षी ठरवते सगळे
मी दर वर्षी ठरवते सगळे नॉमिनेटेड सिनेमे बघायचे असे. पण समहाऊ कधीच ते तडीला गेलेले नाही
+१
मागच्या वर्षी ग्रॅव्हिटी आधी बघितलेला होता. यावेळी तर फक्त गॉन गर्ल बघितलाय (आणि त्याला मेजर कॅटेगरीजपैकी फक्त बेस्ट अॅक्ट्रेसचं नॉमिनेशन मिळालंय). समहाऊ काही काही नॉमिनेटेड मुव्हीज तितक्या करमणूक प्रधान नसतात असंही वाटतं. म्हणूनही बघायचा उत्साह कमी होतो.
पण तरी माझ्या आवडत्या genres (biopics, historic) मधले मुव्हीज नक्कीच बघितले जातील.
डबल पोस्ट झाली
डबल पोस्ट झाली
गॉन गर्ल माझ्या लिस्टवर आहे
गॉन गर्ल माझ्या लिस्टवर आहे पण सध्या तरी $१५ ला आहे बायिंग ऑप्शन, जो मला नकोय. रेंटवर आला की बघेन.
मी दर वर्षी ठरवते सगळे
मी दर वर्षी ठरवते सगळे नॉमिनेटेड सिनेमे बघायचे असे. पण समहाऊ कधीच ते तडीला गेलेले नाही >> +१
'कापूसकोंड्याची गोष्ट' कन्टेन्शन लिस्टमध्ये आल्याचं वाचलं होतं. बहुतेक तरी हा चित्रपट मेन स्ट्रीममध्ये 'बेस्ट पिक्चर'साठी पाठवला होता. फॉरेन फिल्ममध्ये 'लायर्स डाईस' होता.
गेल्या (२०१४ पूर्वीच्या) २०
गेल्या (२०१४ पूर्वीच्या) २० हून अधिक वर्षात खालील प्रमाणे ऑस्कर मिळाले:
Oscar winner movies:
Subject: Infidelity, 14 ऑस्कर. Jealousy, 11 ऑस्कर Survival, 10ऑस्कर
Racism, 10 ऑस्कर
Features: Fem Nudity, 17, Beating, 15, Shot to death, 13
Specialties: No Opening Credits, 20, Flashback 17
Location: Church, 12, NYC 11
स्टॅटिस्टिक वर विश्वास असेल (नि समजत असेल तर) यंदा कोणत्या सिनेमाला ऑस्कर मिळेल?
मी गॉन गर्ल २०१३ मध्ये वाचलं
मी गॉन गर्ल २०१३ मध्ये वाचलं होतं. नवर्याने पुस्तक वाचलेलं नव्हतं त्याला मुव्ही बघायचा होता म्हणून माझाही गॉन गर्ल थिएटरमध्ये बघून झाला. If you are into reading books, you could read the book either before or after the movie - preferably before. पुस्तकात अनेक कोट्स, रेफरन्सेस आहेत जे मुव्हीमध्ये नाहीत पण वाचायला मजा येते.
परदेशी चित्रपटांच्या
परदेशी चित्रपटांच्या श्रेणीतले Leviathan, Ida आणि Timbuktu हे तिन्ही चित्रपट महान आहेत. जरूर बघा.
झक्की, इन्टरेस्टिंग , पण खरे
झक्की, इन्टरेस्टिंग , पण खरे आहेत का ते स्टॅटिस्टिक्स की असेच तुम्हीच पकवलेत
ते कुठून पकवतील?
ते कुठून पकवतील?
मला वाटलं झक्कींनीच स्टॅट्स
मला वाटलं झक्कींनीच स्टॅट्स काढलेत.
त्या हिशेबाने यंदा 'सेल्मा'ला बेस्ट पिक्चर मिळायला हवे.
स्नायपरलाही मिळू शकतं. वॉर
स्नायपरलाही मिळू शकतं. वॉर मूव्हीज आर ऑफ्ट्न फेव्हर्ड.
झक्कींनी दिलेले
झक्कींनी दिलेले स्टॅटिस्टिक्स Wired मधे आले होते.
मी गेल्या वर्षीचे सगळे नॉमिनेटेड सिनेमे बघितले होते मुख्य categories मधले नि Nebraska हा माझा winner होता. यंदा तसा कोणता निघतो ह्याची उत्सुकता आहे. Leviathan बद्दल बरच ऐकले आहे. पण तो इथे बघायला मिळेल असे वाटत नाही.
मी दर वर्षी ठरवते सगळे
मी दर वर्षी ठरवते सगळे नॉमिनेटेड सिनेमे बघायचे असे. पण समहाऊ कधीच ते तडीला गेलेले नाही >>>> खरय !
धागा काढलास ते बरं केलस.. सगळे सिनेमे एकाच ठिकाणी सापडतील..
मस्त घागा. नेहेमीप्रमाणे
मस्त घागा. नेहेमीप्रमाणे होतील तेवढे बघायचे असा प्लान आहेच. लिहितो बघीन तसं.
झक्कींनी दिलेले स्टॅटिस्टिक्स
झक्कींनी दिलेले स्टॅटिस्टिक्स Wired मधे आले होते.
धन्यवाद. असामी
मायबोलीवर लिहिणे म्हणजे पी एच डी चा थिसिस असतो का? रेफरन्स शिवाय लिहायचे नसते?
म्हणजे मायबोलीवर लिहीलेले सगळे खरेच मानावे लागेल!
बॉयहूड पाहिला. मला खूप आवडला
बॉयहूड पाहिला. मला खूप आवडला मुव्ही. सहजसुंदर अभिनय, subtlety, कोणीही अॅक्ट करतंय असं वाटत नाही इतके नॅचरल सीन्स, अवचित येणारे हार्ट वॉर्मिंग क्षण ...सिंपली ब्युटिफुल. टेक्सास मध्ये राहिले/फिरले असाल कधी तर अजून आवडेल. बॉयहूड हे टेक्सासला लिहिलेलं प्रेमपत्र आहे असं कुठेतरी वाचलं होतं
मिष्टरांना बॉयहूड 'ठीक' वाटला. मी आधी मुव्हीबद्दल वाचलं होतं त्यामुळे वेगळा प्रयोग, सेम अॅक्टर्स, अनेक वर्षं शूटिंग वगैरे माहीत होतं. मिष्टरांना लहान मेसन व मोठा मेसन वेगवेगळे आहेत असं आधी वाटलं मग मी खुलासा केल्यावर म्हणे 'इतकी वर्षं शूटिंग करुन शेवटी स्टोरीत काही नाहीच आहे मग काय उपयोग?'
तर बॉयहूड ही सामान्य लोकांची गोष्ट आहे. आपण आजूबाजूला बघतो तसे काही लोक आहेत. तुम्हाला कुठेतरी तुमचीही गोष्ट वाटू शकेल. भव्यदिव्य काही घडत नाही. एरव्ही ऑस्करमध्ये जे लार्जर दॅन लाईफ पीपल किंवा घटना (लिंकन, स्लेव्हरी, सिव्हिल राईट्स, स्पेस ट्रेव्हल, टायटॅनिक, हॉकिंग वगैरे) या थीम्सवरचे मुव्हीज असतात तसा हा नाही. पण तरी छान आहे.
द ग्रॅड बुडापेस्ट हॉटेल
द ग्रॅड बुडापेस्ट हॉटेल पहिला. मस्त स्टोरी टेलिंग, पार्श्वसंगीत, cinematography.
नेटफ्लिक्स (कॅनडात) स्टीमिंगवर आहे. मला अशाप्रकारचे सिनेमे जास्त आवडतात असं वाटून गेलं.
पराग : दुरुस्त केलं धन्यवाद.
तुमच्या इथे आणि आमच्या इथे
तुमच्या इथे आणि आमच्या इथे फरक आहे स्ट्रिमिंगच्या सिनेम्यांचा.. इथे ग्रॅबुहॉ डिव्हीडीवर आहे.. !
स्टीमिंग पण बदला की
स्टीमिंग पण बदला की
अॅमेझॉनवर अजून आलेले नाहीत हे सिनेमे. मी वॉचलिस्टमध्ये टाकून ठेवलेत.
बॉयहूड अॅमेझॉन इन्स्टन्ट
बॉयहूड अॅमेझॉन इन्स्टन्ट स्ट्रीमिंगवर आला आहे.
द ग्रॅड बुडापेस्ट हॉटेल एच
द ग्रॅड बुडापेस्ट हॉटेल एच बी ओ कडे आहे. एच बी ओ गो वर सापडेल किंवा मधे मधे चालू असतो.
बॉयहूड पहायचा आहे पण त्याच्या आधी सेल्मा. इमिटेशन गेम पाहिला या वीकांताला.
स्नायपर पाहिला कालच कुठेतरी.
स्नायपर पाहिला कालच कुठेतरी. पण वॉर मूव्हि असल्यास मला इंटरेस्ट नाही बघण्यात म्हणून लक्ष दिलं नाही फार.
सेल्मा बघितला. भारी आहे
सेल्मा बघितला. भारी आहे आवडलाच.
सगळ्यांचीच काम आवडली, तरुण मुलगा मरतो त्याच्या वडिलांची तर फारच आवडली. प्रेसिडेंट आणि मार्टिन ल्युथर किंग यांच्या मधले संवाद खरेच अशा तऱ्हेचे झाले आहेत का?
आपल्याला गांधी मिळूनही आपण आज कुठे आहोत आणि नसते मिळाले तर काय झाल असतं बरेच प्रश्न डोक्यात आले. ऑस्करला बेस्ट मुव्ही मध्ये हवा होता.
अमित, सेल्माला बेस्ट पिक्चरचं
अमित, सेल्माला बेस्ट पिक्चरचं मिळालं आहे नॉमिनेशन. डिरेक्टर आणि अॅक्टरचं नाही मिळालंय.
Pages