द ऑस्कर्स २०१५

Submitted by तृप्ती आवटी on 15 January, 2015 - 21:05

'अकॅडमी अवॉर्डस्' उर्फ 'द ऑस्कर्स'साठी नामांकनं आज जाहीर झाली. 'अकॅडमी अवॉर्डस'चं हे ८७वं वर्ष. या वर्षी पहिल्यांदाच नामांकन सोहळ्याचं थेट प्रक्षेपण केलं गेलं. 'बर्डमॅन' आणि 'द ग्रँड बुडापेस्ट हॉटेल' या दोन चित्रपटांना सर्वात जास्त- प्रत्येकी नऊ- नामांकनं आहेत. 'द इमिटेशन गेम' या चित्रपटाला 'बेस्ट अ‍ॅक्टर'चं मिळून आठ नामांकनं आहेत. अधिकृत यादी इथे बघता येईल http://oscar.go.com/nominees

नामांकनं आणि नंतर विजेते याबद्दल दरवर्षीच वाद, मतभेद होतात. यंदा 'द लेगो मूव्ही' हा अ‍ॅनिमेशनपट, 'सेल्मा' या चित्रपटाच्या दिग्दर्शिका आणि त्याच चित्रपटातील भूमिकेसाठी डेव्हिड ओयिलोवो (Oyelowo), 'केक' या चित्रपटातल्या भूमिकेसाठी जेनिफर अ‍ॅनिस्टन ही न दिली गेलेली आणि सीझनच्या शेवटी आलेल्या 'अमेरिकन स्नायपर' या चित्रपटाला दिली गेलेली ही काही वादग्रस्त नामांकनं. हॉलिवूडबाहेरच्या चित्रपटांना मुख्य श्रेणीतली खूप जास्त नामांकनं मिळण्याचं पण हे वर्ष. तर जाहीर झालेल्या नामांकनांपैकी विजेते कोण ठरतील, नामांकन मिळालेले चित्रपट बघितल्यास त्याबद्दल, रेड कार्पेट कपडेपट या सगळ्यांची चर्चा करण्यासाठी हा धागा.

ऑस्करविषयी काही रंजक माहिती इथे आणि इथे वाचायला मिळेल. नामांकनाचे नियम इथे वाचायला मिळतील.

हे 'ऑस्कर्स'चे अधिकृत संकेतस्थळ http://www.oscars.org/

http://oscar.go.com/mypicks या दुव्यावर तुम्ही तुमच्या पसंतीचे विजेते निवडू शकता. तिथेच आपल्या 'फ़्रेंड्स'सोबत हा खेळ खेळण्याची पण सोय आहे. अर्थातच हे विजेते तुमच्या-आमच्यापुरतेच असतात. अंतिम विजेत्यांची निवड अकॅडमी करते.

वितरण सोहळा २२ फेब्रुवारीला आहे. यावर्षी नील पॅट्रिक हॅरीस या सोहळ्याचं संचलन करणार आहे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इमिटेशन गेम ...बघितला. मस्त आहे. खुपच आवडला
द ग्रॅड बुडापेस्ट हॉटेल गेल्या वर्शिच बघितला होता. ओके आहे. एवढा नाहि आवडला.

Imitation game पाहिला. खूपच सुंदर सिनेमा बनवला आहे. शेवटी डोळ्यात पाणी येतं! Humanity still has a long way to go! Benedict Cumberbatch ने फार भारी काम केलं आहे!

कम्बरबॅचचं काम आवडलं असेल तर रेकर्स (Wreckers) आणि थर्ड स्टार नक्की बघा. दोन्ही चित्रपट बर्‍यापैकी हळू पुढे सरकतात. थर्ड स्टार तर डिप्रेसिंग होतो शेवटी पण कम्बरबॅचसाठी बघा(च).

करतोच तो >>> नुसतं असं म्हणू नका, यंदाच्या सीझनमध्ये एक तरी बाहुली द्या त्यांना.

करतोच! खरंय Happy आणि त्याला बाहुली पण मिळाली पाहिजे! फक्त मी सगळे सिनेमे पाहिलेले नाहीत त्यामुळे..पण माझं मत कधीही कंबरबॅचलाच!
सिंडरेला, नक्की बघेन दोन्ही!

ग्रँड बुडापेस्ट हॉटेल पाहिला.. दिग्दर्शन चांगला आहे.. पण प्लॉट ठिक ठाकच आहे. बेस्ट मुव्हीसाठी कंटेंडर नाही वाटला.. एकदा बघायला चांगला आहे. युरोपचं चित्रण नेहमीप्रमाणेच नेत्रसुखद आहे.

सिनेमॅटोग्राफी मिळू शकतं कदाचित.

एरवी सनी असलेल्या आमच्या शहरात खास पाहुण्यांसाठी नेहेमीप्र्॑माणे परंपरा कायम ठेवत पावसाने सर्वात आधी हजेरी लावलीये रेड कार्पेट वर :).

रेड कार्पेट एकदम सोसो आहे. अ‍ॅन केंड्रिक चा गाउन छान आहे. लॉरा डर्न चा चॉइस चुकला आहे. ड्रॉप डेड ग्लॅमरस असे कोणीच नाही वाटले. पाइक बाई छान दिसत आहेत पण रेड कार्पेट रेड गाउन?! नॉट स्मार्ट. बाप्ये कंपनी ठीक ठाक. मी ४८ फोटो पाहिले. बाकीचे बरे असतील.

कीरा नाइटली ने फुला फुलांचे झबले घातले आहे. जेन अ‍ॅन डेस्परेट दिसते आहे. केट ब्लँकेट विची दिसते आहे.
मारिआन कोटि कोटि लाड चा ड्रेस बरा आहे पन किती बोअरिन्ग आहे.

फेलिसीटी जोन्स ला परीराणी/ सिंड्रेला/ प्रिन्सेस काँप्लेक्स आहे का? तसाच ड्रेस आहे. लुपिता चा ड्रेस छान आहे. ज ज्युलीआन मूर बाई कुठेही उत्साहाने जातात. व हसतात.

रेड कार्पेट २: कृपया दिवे घ्या. ऑस्कर पण घ्या.

रीस विदरस्पून पर्फेक्ट.
निकोल किड्मन केस आणि ड्रेस क्लॅश होतो आहे.
जेनिफर लोपेझ अनैसर्गिक दिसते आहे पण ड्रेस छान आहे.
मेरील स्ट्रिप अगेन छान एज अ‍ॅप्रोप्रिएट.
लेडी गागा लॉबस्टर खायला निघाली आहे असे वाटते आहे.
स्कार्लेट जॉन्सन ड्रेस मस्त पण गळ्यातले फार ओव्हर पावरिन्ग आहे. सोनेरी/ हिर्‍याचे काही घातले असते तर बॅलन्स झाले अस्ते.
झो सल्दाना छान.
सोलांज नोल्सः काहीकरा बहिणीची सर येत नाही.
ब्लांको ब्लांको : हे काय घातले आहे ताई?

ग्वेनेथ पाल्ट्रो परफेक्ट.

लोरेलाई लिंक्लाटर एकदम फेल. त्यात पोझ ही ऑकवर्ड आहे.

फेथ हिल : सर्मन देणार असे वाट्टॅ

ग्रॅंड बुडापेस्ट हॉटेल जोरात आहे.. !
आणि इंटरस्टीलर्सला एक मिळालं एकदाच.. Happy

केट ब्लँकेट विची दिसते आहे. >>>> म्हणजे 'बेस्ट अ‍ॅक्टर'चं अवॉर्ड 'विची'च्या हस्ते दिलं जाणार तर.. Proud

इंटरस्टेलर ल व्हिज्युअल इफेक्टच मिळालं नायतर काय बेस्ट स्क्रिप्ट Wink
नील पॅ हॅ एकदम दंगा करतो आहे.

ऑस्कर तर पहाणे होत नाही पण त्यानंतर कुठेकुठे त्या दिवशी आलेल्या सर्व बायांचे सुंदर व असुंदर कपड्यांचे फोटो (त्या बायांसकट) टाकतात ते पहायला फारफार आवडते.

अमा ती डाकोटा जॉनसन मस्त दिसत होती की.

इमिटेशन गेम पहा. मस्त आहे एकदम. मला सेल्मा पहायचा आहे. तो पाहिला आहे का कोणी ?

काल बेस्ट फॉरेन मुव्ही मिळालेला 'ida' पाहिला. दुसर्‍या महायुद्धाच्या पार्श्वभुमीवरचा चित्रपट. चांगला आहे. काही काही प्रसंग फार अंगावर येतात. टिपीकल PIFF चित्रपट !

Pages