काल महालक्ष्मी सरस २०१५ च्या एक्जीबीशन ला जाउन आले. नक्कीच पाहण्यासारखं वाटलं दुसर्या मैत्रीणी मध्य लाईन वरुन येणार होत्या १२.३० वाजेपर्यंत आणि मी ११ वाजताच पोहोचले मग एकटीनेच फीरायला सुरुवात केली
सुरुवातीला गेटच्या बाहेर उजव्या बाजुला फुलझाडांची छोटीशी नर्सरी होती तर डाव्या बाजुला लहान मुलांना खेळण्याची सोय केलेली होती. गेटमधुन आत घुसल्या घुसल्या आधी श्री. गणेशाची मुर्ती होती मागे कारंजे उडत होते.
आणी समोर मोठ्ठा लांबच्या लांब मांडव उभारला असुन खुप सारे स्टॉल्स दिसत होते. सुरुवातीलाच एका बचत गटाच्या महीला हाताने गोधडी शिवत बसल्या होत्या. त्यांच्या संमतीने त्यांचा फोटो काढला.
नंतर चा स्टॉल हाताने शिवलेल्या बॅगांचा होत्या, अतिशय सुंदर अशा कापडी, जुट्च्या पिशव्या टांगलेल्या होत्या.
पुढे हाताने कलाकुसर केलेल्या पणत्यांचा स्टॉल होता.
विविध प्रकारची लोणची यांच्यासाठी बरेच स्टॉल होते.
एका भागात विविध प्रकारची पिठे , कुरडया, शेवया, सांडगे, कडध्याने, पोहे
होते.
एक स्टॉल तर खास मांसाहार करण्यार्ंसाठी स्पेशल होता, सर्व प्रकारचे सुकट इथे मिळत होते.
आयुर्वेदीक सुगंधी अगरबत्त्या , अत्तरे , काजळ यासाठी ही बरेच स्टॉल्स होते.
राजस्थानी पारंपारीक वस्तुंसाठी एक राजस्थानी स्टॉल होता.
कोकण स्पेशल आमसुले, आंबा वडी, चिंचवडी, सरबते, आमरस.
मंडपाचा बाहेरच्या बाजुलाही काही वस्तु विक्रीसाठी ठेवल्या होत्या.
तिथेच हा वासुदेवही भेटला
हाताने केलेल्या अजुन कलाकुसरी
वेगवेगळ्या राज्यातील साड्या , ड्रेस मटेरीयल्स
बाकीच्या काही वस्तुंचे स्टॉल्स
पुर्ण मंडप फिरुन झाला, साधारण १२.१५ झाले , फिरुन फिरुन भुक लागली होती म्हणुन कैरीचे पन्हे घेतले.
पुन्हा एकदा मैत्रीणींना फोन केला तर त्या जवळ जवळ पोहोचल्याच होत्या. पोटपुजा करुन पुन्हा स्टॉल्स कडे वळलो.
व्वा ! भरपुर धमाल केलेली दिसत
व्वा ! भरपुर धमाल केलेली दिसत आहेस !!
जळले रे मन माझे जळले रे.
जळले रे मन माझे जळले रे. कविता लक्की आहेस तू. मी एकदाच पुण्यात सकाळ फेस्टी ला गेले होते. आता बाकी छान छान काही असले तरी सोबत कुणी नसल्याने जाता येत नाही.:अरेरे:
छान आलेत फोटो. काय खरेदी केले? साड्या, शाली, खाऊ वगैरे मस्तयत.
केपुडे, शाबास! स्त्रीसुलभ
केपुडे, शाबास!
स्त्रीसुलभ खरेदीहावर्या मनाच्या कॅमेरात रसिकतेचा रोल घालून आणि संयमाचे बटण वापरून तू ही जी प्रचि काढली आहेस ती अतिशयच प्रशंसनीय आहेत.
ही माझी खरेदी. खालून वर -
ही माझी खरेदी. खालून वर - कांथावर्कचा स्टोल , मण्यांच्या काश्मिरी पर्सेस, लेदरच्या काश्मिरी बॅग्ज, फुलकारी ओढण्या, फ्लोअरलॅम्प
जळले गं मन माझे मन जळले
जळले गं मन माझे मन जळले गं....
मामी, तुझी खरेदी पाहुन उरले सुरले तुकडेही जळले.....
मला यावर्षी जाता आले नाही. पुढच्या वर्षी उट्टे काढले जाईल. संयमाचे बटन तोवर अतिवापराने तुटून गेलेले असेल.
अर्र साधना, तू पुण्याला जा.
अर्र साधना,
तू पुण्याला जा. तिथेही भरते म्हणे सरस.
मामी सुटलीय आज......
मामी सुटलीय आज......
कविता मस्त टूर घडवलीस
कविता मस्त टूर घडवलीस हं!
>>>>>>स्त्रीसुलभ खरेदीहावर्या मनाच्या कॅमेरात रसिकतेचा रोल घालून आणि संयमाचे बटण वापरून तू ही जी प्रचि काढली आहेस ती अतिशयच प्रशंसनीय आहेत.>>>>>>>>>>>>>>>
मामे मामे..............तांदूळ आणायला म्हणून जाऊन जर स्टोल, पर्सेस, ओढण्या इ.इ.इ.इ. गोष्टी आणल्या तर असाही "परिणाम" होतो !
महालक्ष्मी सरस के पी सरसचे
महालक्ष्मी सरस
के पी सरसचे फोटुपन लई सरस :}
आमी बी गेल्या सालाला गेल व्हत, पन फोटुबिटु काडायच ध्येनात बी नाय आल बग,
तु लई झकास काडले बग, आनि समद्यास्नि दाकिवले त्ये बी लई झकास, गुनाची हाय बग बाय,
बय, अश्येच फोटु काडत र्हा आनि आमा सम्द्याना दाकव
मस्त फोटो.
मस्त फोटो.
मामे , तुझा आदर्श ठेवला की
मामे , तुझा आदर्श ठेवला की डोळ्यासमोर , फोटो काढुन काढुन मन भरल्याने जास्त खरेदी अशी काही केलीच नाही बघ,
नीरु, धन्यवाद
२०१६ चे सरस कधी भरतेय काही
२०१६ चे सरस कधी भरतेय काही पत्ता लागला का?
मामी, कविता मस्त फोटो.
मामी, कविता मस्त फोटो.
जानेवारीत असेल
जानेवारीत असेल
जानेवारीत आहे. तारीख कळाली की
जानेवारीत आहे. तारीख कळाली की सांगेन इथे.
सुंदर, सर्वच फोटो. मामींचे
सुंदर, सर्वच फोटो. मामींचे पण.
११ ते २३ जानेवारी २०१७ या
११ ते २३ जानेवारी २०१७ या काळात सरस भरणार आहे.. खरेदीप्रेमींनी सज्ज व्हा..
यावर्षी लवकर आले. नाहीतर २६
यावर्षी लवकर आले. नाहीतर २६ जानेवारीच्या आसपास असते
http://www.umed.in/English/fr
http://www.umed.in/English/frmMahalaxmi-Saras.aspx?strMenuId=MTAzNTAwMDA...
१६ ते २८ आहे..
कबाली ते २०१६ बद्दल आहे.
कबाली ते २०१६ बद्दल आहे.