Submitted by वैवकु on 5 January, 2015 - 10:45
जुनी शाई नवी शाई लगेचच ओळखू येते
तुझी "इतिहास-भरपाई" लगेचच ओळखू येते
कुठे लपवायला जमते तुला प्रत्येक जखमेला
तुझ्या नटण्यातली घाई लगेचच ओळखू येते
इथे रात्री जरी लाख्खो फुलांचा गंध दरवळतो
मनाने वेंधळी जाई लगेचच ओळखू येते
जरी करतेस शब्दांची अशी आरास सोनेरी
तुझ्या डोळ्यातले बाई लगेचच ओळखू येते
उगाचच कान धरणे तू उगाचच मागणे माफी
कुणी केली दिरंगाई ..लगेचच ओळखू येते
मने पहिल्याच हप्त्याला पुन्हा भजतात स्वस्ताई
खिशांपुढली महागाई लगेचच ओळखू येते
उभी दुनिया जिथे गाते तिची गाणी उजेडाची
तुझी ती किर्र अंगाई लगेचच ओळखू येते
तिचा संसार दिसतो "एकटीचा" ..सर्व बाजुंनी
तुझ्या गर्दीत रखुमाई लगेचच ओळखू येते
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इथे रात्री जरी लाख्खो फुलांचा
इथे रात्री जरी लाख्खो फुलांचा गंध दरवळतो
मनाने वेंधळी जाई लगेचच ओळखू येते
जरी करतेस शब्दांची अशी आरास सोनेरी
तुझ्या डोळ्यातले बाई लगेचच ओळखू येते<<< वा वा
तिचा संसार दिसतो "एकटीचा" ..सर्व बाजुंनी
तुझ्या गर्दीत रखुमाई लगेचच ओळखू येते<<< मस्त
शेर आणि गझल आवडली.
फेसबूकवर दिलेल्या प्रतिसादाव्यतिरिक्त आत्ता नव्याने आवडलेला एक शेर खाली कोट करत आहे.
>>>कुठे लपवायला जमते तुला प्रत्येक जखमेला
तुझ्या नटण्यातली घाई लगेचच ओळखू येते<<<
सुंदर!
मनाने वेंधळी जाई लगेचच ओळखू
मनाने वेंधळी जाई लगेचच ओळखू येते<<<
तुमच्या काही ओळी कायमस्वरुपी स्मरणात राहणार्या आहेत तशीच ही एक ओळ!
ह्या आधीची आठवणारी एक (वरवर स्वस्त वाटेल अशी, पण निखालस निरागस आणि नैसर्गीक) ओळ म्हणजे:
'भिजण्यास घाबरतात त्या पोरी कश्या पटवायच्या'
धन्यवाद बेफीजी गुरुकृपा आहे
धन्यवाद बेफीजी
गुरुकृपा आहे ..दुसरे काय !
पुनश्च धन्यवाद
आपले आशीर्वाद असेच माझ्या गझलेच्या पाठीशी राहूद्यात सर
बख्शदो भैय्या! मलाबिला गुरू
बख्शदो भैय्या!
मलाबिला गुरू नका म्हणू कृपया!
धन्यवादच!
(No subject)
बढिया. अनेक शेर आवडले. जमीनही
बढिया. अनेक शेर आवडले. जमीनही मस्त.
शुभेच्छा आणि अभिनंदन.
खूप खूप आभारी आहे मी आपला
खूप खूप आभारी आहे मी आपला समीरजी !
जमीन चांगलीच आहे बरका मला एक
जमीन चांगलीच आहे बरका
मला एक शेर पाडता आला ह्या जमीनीत
सुखांची प्रेतयात्रा वा असो बारात दु:खांची
मला हल्ली तुझी आई..लगेचच ओळखू येते !!
शेर जरा हसवा आहे बरका..
असो
येतो ..बाय !
घाई,जाई,बाई,रखुमाई.....मस्त
घाई,जाई,बाई,रखुमाई.....मस्त
नटण्यातली घाई, डोळ्यातले
नटण्यातली घाई, डोळ्यातले बाई, खिशांपुढली महागाई >>> वा! छान!
सुंदर
सुंदर
तिचा संसार दिसतो "एकटीचा"
तिचा संसार दिसतो "एकटीचा" ..सर्व बाजुंनी
तुझ्या गर्दीत रखुमाई लगेचच ओळखू येते >>> लै झ्याक बगा!
खूप सुंदर झाली आहे
खूप सुंदर झाली आहे गझल
धन्यवाद
जमीन जबरदस्तच ! सगळेच शेर
जमीन जबरदस्तच !
सगळेच शेर थोड्याफार फरकाने आवडले .
किर्र अंगाई ...सगळ्यांत जीवघेणा.
अर्रर्र, लिहायला लागले का
अर्रर्र, लिहायला लागले का तुम्ही.
''मने पहिल्याच हप्त्याला पुन्हा भजतात स्वस्ताई'' ही ओळ
आस्वादाला घेतो, सध्या जरा बीझी आहे, तोपर्यंत केवळ पोच.
जुनी दारु, नवी दारु दुकानात लगेच ओळखून येते.
बिनवासाची किती मारा, पिलो हे तिला ओळखून येते.
अहाहा. कसला खतरा शेर सुचलाय. क्या बात है, मस्त.
-दिलीप बिरुटे
वैवकुंच्या सुंदर गझलांवर
वैवकुंच्या सुंदर गझलांवर बिरुटेंचे केविलवाणे, क्षीण व आचके देणारे विनोद मोफत मिळतील अशी एक पाटी लावा आता.
तरी म्हटलं बाळ बेफिकीर अजुन
तरी म्हटलं बाळ बेफिकीर अजुन कसा वकीलपत्र घेऊन आला नाही. पाटी लावायचीच तर
''शिष्यासाठी फुकटात वकिली व जिलेबी'' तयार करून मिळेल, अशी पाटी लावू हं आपण.
बाकी आमच्या ओळी म्हणजे विनोद आणि तुमच्या ओळी म्हणजे महाकवी कालिदासाला सुचल्या नाहीत अशी जगप्रसिद्ध रचना, हे काही बरोबर नै हं !
-दिलीप बिरुटे
वैभवजी , एकूण छानंच गझल !
वैभवजी , एकूण छानंच गझल !
"जरी करतेस शब्दांची अशी आरास
"जरी करतेस शब्दांची अशी आरास सोनेरी
तुझ्या डोळ्यातले बाई लगेचच ओळखू येते" वाह !
छान गझल! अवांतर - सगळे गझल
छान गझल!
अवांतर - सगळे गझल करणारे प्राध्यापक एक सारखेच असतात की काय?
अवांतर - सगळे गझल करणारे
अवांतर - सगळे गझल करणारे प्राध्यापक एक सारखेच असतात की काय?
नाही. मला म्हटलंत का ?
सुंदर ! शुभेच्छा .अशीच वाटचाल
सुंदर ! शुभेच्छा .अशीच वाटचाल होऊ द्या .