मागील लेखात आपण वाचले की बायोमेडीकल्/डॅन्/मॅप्स डॉक्टरच्या सांगण्यानुसार बर्याच ब्लड टेस्ट्स करून मग अपॉईंटमेंट दिली ती रिझल्ट्स डिस्कस करण्याची. त्याबद्दल लिहीतेच आहे, परंतू थोडी बॅकग्राउंड बायोमेडीकलबद्दल द्यावी असे वाटते.
बायोमेडीकल हा काय प्रकार? तर मुख्यतः ऑटीझम हा फार वादग्रस्त मुद्दा आहे. मेडीकल फिल्डमध्ये ऑटीझम हा जेनेटीक म्युटेशनने होतो, तसेच काही वातावरणातील फॅक्टर्सदेखील काराणीभूत असतात असे मानले जाते. थोडक्यात ऑटीझम बरा होत नाही. परंतू डॉक्टर्समध्येच एक फळी आहे (डॅन्/मॅप्स) जे मानतात की ऑटीझम हा पर्यावरणातील फॅक्टर्सने होऊ शकतो तसेच व्हॅक्सीनेशननेही बर्याच मुलांमध्ये बदल होतात - जे ऑटीझमसारखी लक्षणं दाखवतात. सायन्स बघायला गेले - तर जगात कितीतरी मुलांना व्हॅक्सिनेशन केले जाते, सर्व मुलांना का ऑटीझम होत नाही? याचा अर्थ व्हॅक्सिनेशनने ऑटीझम होत नाही. तर दुसरी फळी म्हणते - काहीच मुलांची इम्युन सिस्टीम आधीच कमकुवत असते, त्यांच्यात चांगले बॅक्टेरिआज कमी असतात- ते वरवर पाहता हेल्दी असतात! परंतू जेव्हा व्हॅक्सिनेशनसाठी लाईव्ह व्हायरस आणि मुख्यतः जोडीने दिलेल्या व्हॅक्सिनेशनमध्ये एकापेक्षा अनेक व्हायरस शरीरात सोडले जातात तेव्हा ज्या काही बालकांची इम्युन सिस्टीम हेल्दी नसते त्यांच्यासाठी हे व्हॅक्सिनेशन म्हणजे ऑटीझमची लक्षणं दिसण्यासाठीचा एक ट्रिगर असतो. त्यामुळेच सर्व मुलांना नाही, परंतू काही मुलांना व्हॅक्सिनेशन दिल्या दिल्या अतिशय सिव्हिअर रिअॅक्शन होऊन त्यानंतर त्यांची पर्सनालिटी बदललीच हे ठामपणे सांगणारे बरेच पालक इंटरनेटवर्/पुस्तकांतून सापडतात. यात मुख्य कल्प्रिट बर्याचदा असतो तो एक ते दिड वर्षाच्या आसपास दिली जाणारी लस Measles, mumps, rubella (MMR). सीडीसी (सेंटर फॉर डिसिज कंट्रोल & प्रिव्हेंशन) यांचे ऑफिशिअल वेळापत्रक तुम्हाला इथे मिळेल. -> http://www.cdc.gov/vaccines/schedules/hcp/imz/child-adolescent.html
ओके, मुळात व्हॅक्सिन्स व ऑटीझम हा अतिशय वादाचा मुद्दा आहे. मला त्यात पडायचे नाही. पण माझे मत विचाराल तर मी एकच सांगीन. माझा मुलगा सव्वा वर्षापर्यंत पिडीयाट्रिशिअनच्या मते ब्युटीफुली ग्रो होत होता. साधं सर्दी पडसं देखील त्याला झाले नाही इतकी त्याची फिजिकल हेल्थ चांगली होती. छान हसरा, अफेक्शनेट, सर्व रिस्पॉन्सेस बरोबर देणारा व सर्वात महत्वाचे, जे देऊ ते व्यवस्थित तोंड उघडून खाणारा होता. त्याला सर्वात पहिलं आजारपण आले ते म्हणजे सव्वा-दिड वर्षाचा असतानाच्या सुमारास दिलेल्या व्हॅक्सिनच्या आठवड्यात. सिव्हिअर रिअॅक्शन. कमी न होणारा ताप, उलट्या.. इतकं की कधीही डॉक्टरांची पायरी आजारपणासाठी न चढलेलो आम्ही डिरेक्टली इमर्जन्सीमध्ये गेलो. त्यानंतर मुलाची पर्सनालिटी बदलली ती बदललीच. त्याआधी जरासा अस्पष्ट शब्द उच्चारणारा , बॅबलिंग करणारा या मुलाची बोलती बंद झाली. चांगला इंटरॅक्ट करणारा, डोळ्यात बघून रिस्पॉन्स देणारा कुठेतरी खिडकीतून बाहेर टक लाऊन बघत बसे. खेळणी ओळीने लावत बसे. कार्स उलट्या ताकून चाकांशी खेळत बसे. सर्व काही खाणारा (अगदी पोहे,उपमा,पालकाची भाजी, कोबीची भाजी,बेगल्स, पॅनकेक्स, चिकन व फिश देखील खायचा ) हा मुलगा खाण्यासाठी तोंडच उघडेना. अतिशय प्रमाणार ओरल अॅव्हर्जन्स - ज्याबरोबर आम्ही अजुनही लढतो. परिणामी अथक २ वर्षांच्या प्रयत्नाने मुलगा दोन वेळेस खातो. काय? तर पराठा/थालिपीठ किंवा भात. हे आमचे सर्वात सक्सेसफुल दिवसातले खाणे. नाहीतर आहेच पिडियाशुअर.
तर हे सांगायचा मुद्दा असा की सायन्स काय सांगते ते सांगेल. पण आमच्या डोळ्यासमोर झालेला हा बदल आम्हाला या सगळ्या प्रकरणाच्या दुसर्या बाजून बघायला भाग पाडतो. नेहेमीचे डॉक्टर थेरपीज सुचवतात परंतू खात्री देत नाहीत रिकव्हरीची. मग जरा का जीएफ्/सीएफ डाएट्स अथवा कुठल्या सप्लिमेंट्सने लगेचच चांगला फरक दिसत असेल तर तुम्ही विश्वास का ठेऊ नये? शेवटी आम्ही पालक आहोत. आमच्यासाठी आमच्या मुलाचे भले हे एकच ध्येय आहे. कशानेही तो बदल झाला तर हवाच आहे आम्हाला! इंटरनेटवर अशा पालकांना ब्लेम करणारेही लोकं आहेत! की "तुम्ही तुमच्या मुलांना ती आहेत तसं प्रेम करत नाहीत, अॅक्सेप्ट करत नाहीत." हे चूकीचे आहे. आम्ही अॅक्सेप्ट केले नाही तर रोजचा दिवस कसा पार पडणार? Of course, I love my child the way he is. But I also hate the way he struggles with very basic skills every step of the way .. And if Biomedical or any sensible methodology is going to be helpful in some way, I am going to try it out.
एनीवे, तर मी आता मूळ मुद्द्याकडे वळते. टेस्ट्सचे रिझल्ट्स.
सर्वच्या सर्व पॅरामीटर्स इकडे देणे अशक्य आहे. त्यामुळे जनरल आयडीया देते. (मला यातील ८०% नावं व गोष्टी माहीत नाहीत. दर वेळेस पुस्तक घेऊन रिपोर्ट वाचावा लागतो. हे काय आहे, याचे काय मिनिंग इत्यादी. मी येथे फक्त नावं देते. अर्थ मलाही माहीत नाही बरेच. येथील डॉक्टर लोकांना काही याबबत माहीती शेअर करायची असेल तर वेलकम!)
पहिला रिपोर्ट माझ्या हातात आहे, त्यात आहे
कोलेस्टरॉल(एल्डीएल्,एचडीएल इत्यादी), Lipoprotein Particles and Apolipoproteins, Inflammation/Oxidation, Myocardial structure/Stress/function, Platelets, Lipoprotein Genetics, Platelet Genetics, Coagulation Genetics, Metabolic (TSH, homocystein, vit B, vit D, RBC Folate) , Renal (Creatinine) Sterol Absorption Markers, Sterol Synthesis Markers, Glycemic control, insulin resistance, Beta Cell function, electrolytes(Na+,K+,Cl-,Co2, Calcium), Liver(AST, ALT,bilirubin), Others(Albumin, total protein, iron, ferritin) Thyroid(TSH, T4,T3, T4 free, reverse T3) , CBC with differential, Omega 3 Fatty Acids, Omega 6 Fatty Acids, Other fatty acids.
-> या रिपोर्टवरच्या कमेंट्समध्ये डॉक्टर असं म्हणतो की:
थोडक्यात, ओमेगा ३ सप्लिमेंट्स व मिथायलेशनची गरज आहे. म्हणजे Methylcobalamin (बी१२ चा एक प्रकर्र) याची गरज आहे.
दुसर्या रिपोर्टमध्ये आहेत खालील गोष्टी :
व्हिटॅमिन सी, व्हीटॅमिन डी याचबरोबर डॉक्टरांनी एझाईम्स, काही इतर सप्लिमेंट्स सांगितले आहेत. तसेच मुलाला Mitochondria नावाचाही प्रकार असल्याचे सांगितले त्यामुळे त्यावरही एक औषध सांगितले आहे.
तिसर्या रिपोर्टमध्ये आहे IgG Food Antibody Assessment & IgG Spice Profile, IgE Inhalants profile, IgE Mold profile, Celiac & Gluten Sensitivity..
-> तुम्हाला फुड अॅलर्जीज माहीतीच असतील.उदा: सतत पाहण्यात, ऐकण्यात आलेली पीनट्स वा इतर नट अॅलर्जी. मग त्यात श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो तर कधी स्वेलिंग, कधी हाईव्ह्ज(रॅशेस) होते. हा जो प्रकार आहे तो IgE (or immunoglobulin E) यामध्ये मोडतो. हा जो दुसरा IgG (Immunoglobulin G)हा जरा सटल प्रकार आहे, त्यामध्ये तुम्ही अमुक एक पदार्थ घेतल्यावर तुम्हाला अॅलर्जिक रिअॅक्शन अॅज सच रॅशेस वगैरे होणार नाही, परंतू काही ना काहीतरी बिहेविअर चेंजेस, हायपर अॅक्टीव्हिटी, ब्लोटींग, डोकेदुखी असे सिम्प्टम्स दिसू शकतात. थोडक्यात फुड सेन्सिटीव्हिटी. अॅलर्जीमध्ये फुड बरोबरच मोल्ड्स, पोलन याची अॅलर्जी तुम्ही ऐकली असेल. तो झाला IgE Inhalants profile, IgE Mold profile. पदार्थांमध्येच मसाले देखील आले. तेई टेस्ट करण्यात आले - IgG Spice Profile मध्ये. याचबरोबर सेलिआक डिसिजची / ग्लुटेन सेन्सिटीव्हीटीचीही टेस्ट घेण्यात आली. (येथे अधिक माहीती वाचा) माझ्या मुलाला मोल्ड , पोलन अशी किंवा रॅश्/स्वेलिंग होणार्या अॅलर्जीज नाहीत. परंतू चिक्कार फुड सेन्सेटीव्हिटीज सापडल्या. त्याचा तक्ता देते.
येथे लाल रंग अथवा ३+ जिथे लिहीले आहे ते सगळं माझ्या मुलासाठी अपायकारक आहे. ते पदार्थ निदान ६ महिने तरी अॅब्सोल्युटली टाळायचे आहेत. त्यानंतर अगदी थोड्या प्रमाणात रि-इंट्रोड्युस करून त्याची रिअॅक्शन कशी येते ते पाहून पुढील कोर्स ऑफ अॅक्शन ठरवावी लागेल. पण तुम्ही पाहीलंत तर दिसेल, आपल्या भारतीय स्वयपाकातले कितीतरी पदार्थ त्याला चालणार नाहीत. उदा: म्हशीचे दूध, दही, बीट्स, कोबी, काकडी, लसूण, ढोबळी मिरची, लेट्युस, कांदा, रताळे, पालक, टोमॅटो, ग्लुटेन (पोळी, ब्रेड), गहू, स्ट्रॉबेरी, द्राक्ष, प्लम... परंतू फिशचे बरेचसे प्रकार व पोल्ट्री त्याला चालणार आहे जी तो मुळीच खात नाही. बाकीचे नॉन्व्हेज प्रकार आम्हीदेखील खात नसल्याने घरी बनले अथवा आणले जात नाहीत.
ग्लुटेन सेन्सिटीव्हिटीच्या रिपोर्टमध्ये देखील ग्लुटेन/व्हीटला ३+ असल्याने तेही टाळण्याची गरज आहे. मी गेले ३-४ महिने त्याची पोळी कम्प्लिट बंद केली आहे. आणि माझ्या मुलाला पोळी खूपच आवडते. थोडासा समजूतीत फरक वाटतो पण अजुन आम्ही पूर्णपणे १००% जीएफ्/सीएफ डाएट करत नसल्याने याबद्दल मी नंतरच लिहीलेले बरे.
अशा रीतीने वरील रिपोर्टसवरून एक कळते, की आमच्या मुलाला जीएफ्/सीएफ डायेट व काही सप्लिमेंट्स (ओमेगा ३, एम्बी१२, झिंक) याचा फायदा होऊ शकतो. आता दुसरा अडथळा येतो. आमचा मुलगा मुळीच औषध घेत नाही. त्याला दोन माणसांनी पकडले तर तिसरा कसातरी औषध तोंडात ढकलू शकेल - तेही तो थुंकून टाकतो. आम्हाला सप्लिमेंट्स रोजच्या रोज देणे सध्यातरी स्वप्नवतच आहे. परंतू मी जेव्हा शक्य आहे व मुलाच्या मूडनुसार झिंक वगळता सप्लिमेंट्स देऊन पाहीली आहेत. ओमेगा ३ व एम्बी१२ याचा फायदा बोलण्यात वगैरे झाला नसला तरी आय काँटॅक्ट सुधारण्यात मात्र झाला. अचानक आपण जे बोलत आहोत ते मुलापर्यंत पोचत आहे असा दिलासा कुठून तरी आम्हाला मिळाला, मेबी त्याच्या एक्स्प्रेशन्सवरुन? हे सगळं जरी असलं तरी औषधं जर त्याच्या पोटात गेलीच नाहीत तर काय फायदा व तोटा. इथे आम्ही अजुनही स्ट्रगल करतो. त्याला अजुन इतकी समज नाही, की आम्ही सांगितले हे तुझ्यासाठी चांगले आहे - घे, तर तो गपचुप घेईल. त्यासाठी बहुधा थोडी वाट पाहावी लागेल. परंतू वरील रिपोर्ट्सवरून व मुलाच्या रिस्पॉन्सवरून आम्हीदेखील म्हणू शकतो की याचा फायदा होऊ शकतो!
अजुन एक मार्ग आहे जे तुम्ही करत आहात त्याचा किती फायदा होतो हे बघण्याचा. http://www.surveygizmo.com/s3/1329619/Autism-Treatment-Evaluation-Checkl... येथे एक चेकलिस्ट्/प्रश्नपत्रिका आहे. वरची कुठलीही मेडीकल ट्रीटमेंट चालू करण्याआधी व नंतर तुम्ही प्रश्नमालिका सोडवून स्कोअर काढला तर ऑटीझमची लक्षणे कमी जास्त होत आहेत किंवा कसे हे कळून येते.
मुलाच्या रिपोर्टवरून तसेच माझ्या काही लक्षणांवरून मलाही जाणवले की मला देखील फुड सेन्सिटीव्हिटीज असणार आहेत काही. मी काहीदिवस जीएफ्/सीएफ डाएट ट्राय केले असता मला अतिशय चांगले रिझल्ट मिळाले. पोटभर जेऊनही हलके वाटणे - सुस्ती न येणे, पचनसंस्था सुधारल्याचे समजणे इत्यादी फरक जाणवले. शिवाय मुलाच्या थेरपीस्ट्स, स्पीच थेरपीस्ट यांच्याशी बोलताही असंच समजले की ग्लुटेन सेन्सिटीव्हिटी इज अ बिग डील. तुम्ही ते ट्राय केले तर फरक जाणवेल नक्की. त्यामुळे ती एक आशा आहेच. अतिशय कष्टाचा रोड आहे हा, पण मी त्या वाटेला नक्कीच जाणार!!
हे थोडेसे डिस्क्लेमर :
I have missed many many points while writing that article. I am not a writer and also I write and publish it right away because of time constraints. Even when writing I had a feeling, this article needs lot of editing.
First, the cause of Autism. personally, I don't care what the cause is. Because damage is already done. It could be MMR vaccine at the 1.5 or HepB at the birth, or maybe where we were living was agricultural area. so I'm sure the air filled with the pesticides might have some role. It could also be Mercury amalgam in my teeth, or it could be toxins from tap water. Also genetic mutation. I have mentioned all these 'so called causes' in my previous articles or comments on them. But yes I'm guilty of not mentioning them in the Biomedical article. I kind of got carried away and lost the thought process.
Also, my whole point was, whatever may be the cause of autism and toxins in your body, if these simple methods, lifestyle changes and support of supplements are making positive changes somehow, I am going to try them. It will at the least give the satisfaction of 'I tried whatever I can'. I cannot get past and deny all the recoveries read from all the books I have on this topic.
But yes, I also know, that this being spectrum disorder - one particular thing worked for A would not necessarily work for B. But Mother warrior has to fight first to see if she is winning or losing.
http://marathi.journeywithautism.com/
मवॉ, रिपोर्टच्या इमेजेस आणखी
मवॉ, रिपोर्टच्या इमेजेस आणखी जरा मोठ्या टाकाल का?
एनलार्ज केल्यावर माझ्याकडे फेड होतायत.
सुरेखच लिहिलंय. खूप नविन
सुरेखच लिहिलंय. खूप नविन माहिती मिळाली.
तुम्हाला दिसलेल्या आशेच्या किरणामुळे खूप खूप बरं वाटलं. ही प्रगती अशीच होत राहू दे ही प्रार्थना त्या विश्वनियंत्यापाशी.
ऐकूणातच ऑटिझमवर काहीतरी उपचार मिळू देत किंबहुना मु़ळातूनच हा आणि यासारखे इतर डिसीजेस नाहीसे होऊ देत असं वाटतं.
साती, इमेजेसवर क्लिक
साती, इमेजेसवर क्लिक केल्यासही नीट दिसत नाहीत का? माझ्याकडे ठिक दिसत आहेत इमेजेस वर क्लिक केल्यास. मी बघते काय करता येते ते.
मामी, ऑटिझमवर काहीतरी उपचार मिळू देत किंबहुना मु़ळातूनच हा आणि यासारखे इतर डिसीजेस नाहीसे होऊ देत असं वाटतं.>>
अगदी खरे आहे. ती जी अनिश्चितता आहे ती तरी जाऊदे. म्हणजे डायबेटीसवर कशा गोळ्या असतात तितपत तरी काही झाले तर बरे. नाहीसेच झाले हे प्रकार तर काय अजुनच बरे.
ती जी अनिश्चितता आहे ती तरी
ती जी अनिश्चितता आहे ती तरी जाऊदे. >> अगदी अगदी.
मवॉ, हो, क्लिक केल्यावर
मवॉ, हो, क्लिक केल्यावर स्पष्टं दिसतायत इमेजेस.
मी उगाच आयफोनवर एनलार्ज व्ह्यू बघत बसले होते.
बुधवारपर्यंत तुम्हाला सविस्तर मेल करते.
ऐकूणातच ऑटिझमवर काहीतरी उपचार
ऐकूणातच ऑटिझमवर काहीतरी उपचार मिळू देत किंबहुना मु़ळातूनच हा आणि यासारखे इतर डिसीजेस नाहीसे होऊ देत असं वाटतं.>>> +१
थँक्स अश्विनी के. साती,
थँक्स अश्विनी के.
साती, इमेजेस दिसल्या ना.. गुड. तुमच्या ईंमेलची वाट बघते. थँक्स!
ममा वॉरियर, तुमचा हा आणि या
ममा वॉरियर, तुमचा हा आणि या आधीचा लेख वाचून खूप नवी माहिती मिळाली.
विषेशतः हा लेख खूप मेहेनत घेऊन लिहिला आहे हे जाणवलं. केलेल्या टेस्ट्सचा आणि त्यानुसार ठरवलेल्या नव्या उपचारपध्दतीचा बेबी वॉरियरला खूप छान उपयोग होवो ही मनापासून सदीच्छा!
धन्यवाद मृण्मयी! वर लेखात ही
धन्यवाद मृण्मयी!
वर लेखात ही लिंक द्यायची होती, राहून गेली.
http://www.autism.com/pdf/providers/adams_biomed_summary.pdf
ह्या सगळ्या टेस्ट्स आम्ही करून आता वर्ष होईल. आमचं मुळात तो खाण्याबाबतीत खूप स्ट्रगल असल्याने जीएफ्/सीएफ डायेट ट्राय करण्याचा प्रश्नच नव्हता. तो काहीच खात नाही तर निदान त्याला आधी २ वेळेस खाण्याची सवय लागूदे या विचाराने गेल्या वर्ष-२वर्षाचा बराच वेळ गेला. नेहेमीच्या डॉक्टरांनी जीएफ्/सीएफ हाणून पाडल्याने आम्ही परत कन्फ्युजनमध्ये गेलो. अशा रीतीने हो नाही हो नाही करत परत एकदा जीएफ्/सीएफची सुरवात गेल्या ३-४ महिन्यांपासून केली आहे. नशीब जीएफ्/सीएफ मध्ये भात येतो.
सप्लिमेंट्स जेव्हढी जायला पाहीजेत तेव्हढी गेली नाहीत, परंतू त्याचा नव्याने प्रयत्न चालू केला आहे. हा खूप मोठा प्रवास आहे. परंतू याचबरोबर आम्ही बाकीच्या थेरपीज( स्पीच, एबीए, ओटी) अर्थातच चालू ठेवली आहे. भारतातून आईबाबा, नातेवाईक यांच्याकडून होमिओपथी, फ्लॉवर रेमेडी याही गोष्टी कळतात. काही औषधं घरात आहेतही, परंतू रात्र थोडी सोंगं फार सारखे, आमचा मुलगा छोटा अन त्याचे मेडीसीन्/सप्लिमेंट कॅबिनेटच मोठे असा प्रकार होतो. त्याखेरीज त्याचे रूटीन अतिशय व्यस्त असल्याने हे सगळं जमवणे अवघड जाते. परंतू हॉलिस्टीक अॅप्रोचचाच फायदा होईल असं आम्हाला वाटते.
भरभर वाचला. खूप नवीन कळलं घरी
भरभर वाचला. खूप नवीन कळलं घरी गेल्यावर शांतपणे वाचीन लिंक नाही वाचल्यात अजून.
vaccine नंतरचा बदल तुम्ही पचवलात/ पचवताय आणि मार्ग काढताय ग्रेट. माझ्या मुलाला लशी दिल्या तेव्हा अनभिज्ञ होतो, खरं खोटं विज्ञान जाणेल लवकरच... पण काळजाचा ठोका चुकलाच. आणखी शोधून वाचतो. धन्यवाद.
तुम्हाला शुभेच्छा!
तुम्हाला शुभेच्छा!
खूप चांगली माहिती देत आहात.
खूप चांगली माहिती देत आहात. ह्या सर्व उपचारांना यश लाभू दे!
एक सुचवतेय, essential oil
एक सुचवतेय,
essential oil therapy हा प्रकार एकलात का?
एक जवळच्या उदाहरणात तो(बाळ) चांगला रीस्पोन्स देतोय.
चांगली माहिती देताय. सगळंच
चांगली माहिती देताय. सगळंच नीट कळलं असं अजिबातच नाही.
मुलाला होल व्हीट चालणार नसेल आणि पोळी आवडते म्हणताय तर मल्टी ग्रेन आटा चालू शकतो का? ( जर वापरत नसाल ऑलरेडी तर)
सुरूवातीचा काही काळ सगळं व्यवस्थित चालू असताना अचानक आजारपण येऊन मुलात एवढा बदल व्हावा हे वाचूनच कसंसंच झालं. तुम्हांला काय वाटलं असेल ह्याची कल्पना करवत नाही.
नॉन्व्हेज प्रकार सुरु करायला
नॉन्व्हेज प्रकार सुरु करायला काय हरकत आहे मग? इतक करतेस त्या कोकरूसाठी त्यात अजून एक भर. (तू खायला पाहिजे अस थोडीच आहे.) खूप खूप शुभेच्छा!
दालचिनी, ओट्स आणि सफरचंद
दालचिनी, ओट्स आणि सफरचंद चालतंय त्याला. मस्त अॅपल क्रंबल करता येईल माबो वर रेसिपी नक्की टाक.
ममा वॉरियर, व्हॅक्सिननंतर
ममा वॉरियर, व्हॅक्सिननंतर तुमच्या मुलावर झालेला परिणाम वाचताना डोळ्यात पाणी आलं माझ्या. अगदि रुटीन म्हणवल्या जाणार्या व्हॅक्सिनचा किती गंभीर परिणाम! हे accept करताना किती त्रास झाला असेल याची कल्पनाही करू शकत नाही.
त्यावरुन एक प्रश्न आला डोक्यात. व्हॅक्सिनच अव्हॉइड करण्यापलिकडे काही करता येईल का? MMR seperately देता येतं का? बाळाचं काही टेस्टिंग करता येईल का व्हॅक्सिनेशनच्या आधी? याबद्दल काही महिती आहे का तुम्हाला? लिंक दिली तरी चालेल....
तुमच्या सर्व प्रयत्नांना यश मिळू दे!
धन्यवाद सर्वांना. झंपी, हो.
धन्यवाद सर्वांना.
झंपी, हो. इसेन्शियल ऑईल्स नाही आणली परंतू बाथ & बॉडी वर्क्सची अरोमाथेरपी लाईन आमच्या मुलाला आवडते. रादर अंघोळीला युकॅलिप्टस स्पिअरमिंटच लागते त्याला. मला माहीत आहे - हे एक्झॅक्ट अरोमाथेरपी नसेल कदाचित. परंतू तो छान वासाचा साबण, सिनेमन आणि क्लोव्ह इसेन्शिअल ऑईल्स असलेले स्लीप लोशनने मसाज हे सगळं मुलाला आवडते. व बहुतेक वेळेस रोज या गोष्टी बेडटाईम रूटीनमध्ये असतातच. अनुभव असा आहे - यानंतर मुलगा शांत झोपतो. आता अॅक्चुअल ऑईल्स आणून मसाज करून पाहायचा आहे. (तुमच्या विपू साठी देखील धन्यवाद. तुम्हाला विचारपूशीत उत्तर देता आले नसल्याने येथे लिहीते.)
सायो, मुलाला व्हीटच नव्हे तर ग्लुटेन चालणार नाही. त्यामुळे मल्टी ग्रेन आटाही बाद आहे. मात्र त्याला ज्वारी बाजरी चालत असल्याने मी त्याला ज्वारीच्या पीठाची थालिपिठं देते करून.
सीमंतिनी, माझीही आई हेच म्हणाली. त्याला जे चालते आहे ते घरी बनव मग. तू खाऊ नकोस. मी रेड मीटच्या बाबतीत फार सोवळी आहे. सवय करून त्याच्या जेवणाची सोय केली पाहीजे खरं. आधी चिकन व फिश तरी ट्राय करते. अॅपल क्रंबलची रेसीपी शोधते. ओटस चालतात परंतू ते देखील जीएफ/सीएफ आणावे लागतात, कारण जनरली ओटमील वगैरे तयार होते तिथे इतर ग्लुटेन असणारे फॅक्टर्स असतात. असंच काहीतरी डॅन डॉक्टर म्हणाला. जीएफ्/सीएफ ओटमील / वॉफल्स, पॅनकेक हे प्रकार फार बोर व सपक लागतात चवीला. पण तेही देत असतो मूडनुसार.
खालील गोष्टी डॉक्टरने(डॅन) दिलेल्या पत्रकात आहेतः
ग्लुटेन मध्ये हे ग्रेन्स येतात : व्हीट, राय, बार्ली, ओट्स, स्पेल्ट, कामुट
केसीन मध्ये : गायीचे दूध, गोट् मिल्क, बटर, दही, चीज, आईसक्रीम. त्याऐवजी - राईसमिल्क, पोटॅटो मिल्क, नट मिल्क चालेल.
झिंक व बी व्हिटॅमिन्स दिल्यास वेगवेगळे फुड ट्राय करणे वाढते.
साखर शक्य तिथे टाळणे. त्याऐवजी स्टिव्हिया व एक विशिष्ट जोसेफ'स मेपल सिरप म्हणून आहे ते थोड्या प्रमाणात चालेल.
शक्य तेव्हढे ऑर्गॅनिक भाज्या व फळफळावळ आणणे. पेस्टीसाईड्स, प्रिझर्व्हेटीव्ह्स व केमिकल्स टाळणे.
सानुली, मला नक्की माहीत नाही. परंतू वेगवेगळ्या वेळेस व्हॅक्सिन द्या असं कधीतरी वाचल्याचे आठवते आहे मला. शोध घेताना ही लिंक सापडली. सगळी वाचली नाही. परंतू हा डॉक्टर्/लेखक अतिशय उपयुक्त माहीती देतो. रॉबर्ट सिअर्स यांचे 'द ऑटीझम बुक' आमच्या घरातील बायबल/गीता/कुराण काय म्हणाल ते आहे.
व्हॅक्सिन देण्याअगोदर बाळाचे टेस्टींग - अशी काहीही सोय नाही.
धन्यवाद! त्याला चालणार्या
धन्यवाद! त्याला चालणार्या फुडमधून, banana-apple-almond milk smoothie देता येईल, त्याला आवडलं तरच अर्थात! पण पोट छान भरेल त्याने....
हो सानुली. डोक्यात आहे तो
हो सानुली. डोक्यात आहे तो ऑप्शन. याआधी प्रयत्न केला आहे २-३दा. पण अजुन एकदाही मुलाने तोंड लावलेले नाही. तो अजुनही खूप लिमिटेड फुड ऑप्शन्स ट्राय करतो. होपफुली हळूहळू तो प्रॉब्लेम कमी होईल.
मला काय प्रतिसाद द्यावा तेच
मला काय प्रतिसाद द्यावा तेच कळत नाहीये
फक्त मी लेख वाचतेय आणि मनापासून तुमच्यासाठी देवा जवळ प्रार्थना करतेय. माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेतच हे सांगण्यासाठी हा प्रतिसाद
थँक्स रीया. तुम्हा सर्वांच्या
थँक्स रीया. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांचा मला तरी खूप फायदा होतो. त्यामुळे कळत-नकळत मुलालाही पॉझिटीव्ह फरक पडतो. थँक्स!
वॅक्सीनचे वाचून अगदीच
वॅक्सीनचे वाचून अगदीच गडबडायला झाले. आमच्या बाळाचे दोनदा एमेमेआर झाले (इकडची मॅड सिस्टम.) आम्ही असू दे म्हणून करून घेतले दोनदा. आई गं. मी अजून विचारच करते आहे. बाळ पस्तिशीत झाल्याने आम्ही कायमचे धास्तावलेले होतो पहिली दोन वर्षे. तरी हे वॅक्सीनचे वाचनात आलेच नव्हते.
असो. जीएफ डायेटला शुभेच्छा.
मृदुला, कोणालाही घाबरवण्याचा
मृदुला, कोणालाही घाबरवण्याचा माझा उद्देश नाही. तसे झाले असल्यास दिलगीर आहे. एका इमेलमध्ये मी खालील मजकूर लिहीला होता, तो मी बहुधा येथे चिकटवावा. हे या लेखाचे डिस्क्लेमर म्हणता येईल. मी बर्याच गोष्टी यात नमूद करायला विसरले. लेखांची लांबी व मनातील विचार वाढतच गेले, व मी सर्व मूद्देसूद नाही लिहू शकले. (मी हाच मजकूर वर लेखातही पेस्ट करते. )
I have missed many many points while writing that article. I am not a writer and also I write and publish it right away because of time constraints. Even when writing I had a feeling, this article needs lot of editing.
First, the cause of Autism. personally, I don't care what the cause is. Because damage is already done. It could be MMR vaccine at the 1.5 or HepB at the birth, or maybe where we were living was agricultural area. so I'm sure the air filled with the pesticides might have some role. It could also be Mercury amalgam in my teeth, or it could be toxins from tap water. Also genetic mutation. I have mentioned all these 'so called causes' in my previous articles or comments on them. But yes I'm guilty of not mentioning them in the Biomedical article. I kind of got carried away and lost the thought process.
Also, my whole point was, whatever may be the cause of autism and toxins in your body, if these simple methods, lifestyle changes and support of supplements are making positive changes somehow, I am going to try them. It will at the least give the satisfaction of 'I tried whatever I can'. I cannot get past and deny all the recoveries read from all the books I have on this topic.
But yes, I also know, that this being spectrum disorder - one particular thing worked for A would not necessarily work for B. But Mother warrior has to fight first to see if she is winning or losing.
आलेल्या परिस्थितीला तुम्ही
आलेल्या परिस्थितीला तुम्ही ज्या संयमानी आणि विचारानी सामोरं जात आहात ते बघून फार कौतुक वाटतं.
कोठल्याही आजाराला कायमचं cure करण्यासाठी फक्त होलिस्टिक अप्रोचच उपयोगी पडतो. तुमच्या जीएफ्/सीएफ डायटची दिशा अगदी योग्य वाटत आहे.
रामरक्शा, साइबाबाची आरती
रामरक्शा, साइबाबाची आरती रात्रि झोपताना ऐकावते. त्याने खुप फरक पड्तो. तुम्हला पाहिजे असेल तर मी पाटविन.
Some Autism Symptoms May Be
Some Autism Symptoms May Be Reversed By Gene Editing, Scientists Suggest..
Neuroscientists at MIT have found a way to "turn on" a gene that's critical for brain development.
Some Autism Symptoms May Be Reversed By Gene Editing, Scientists Suggest
Tai Bal kase ahe aata? Kiti
Tai Bal kase ahe aata? Kiti improvement zali ? Amchya shubhecha ahet tumchya .sobat
थोडी माहीती हवी होती. आपल्या
थोडी माहीती हवी होती. आपल्या मुलाला स्वमग्नता आहे याचे निदान कसे केले? स्वमग्नतेच्या निदाना विषयी थोडी माहीती मिळाली तर बरे होइल.
अननस , https://www.maayboli
अननस , https://www.maayboli.com/node/47665 या मालिकेतील तिसरा आणि चौथा भाग वाचा.
Pages