Submitted by समीर चव्हाण on 25 December, 2014 - 00:43
संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझे जीवन त्याच्यापाशी येउन
माझे जीवन त्याच्यापाशी येउन थांबे
त्याचे अजून कोणापाशी कधी ना कधी
आज ना उद्या मार्ग वेगळे व्हायचेच की
उद्या कदाचित परवावर जाईल फारतर
निघतो जेथुन तिथवर असतो तिथल्यांचा मी
गाडी सुटली की कोणाचा कोण न उरतो
मी आता निश्चिंतीच्या वाटेवर आहे
मी आता चिंतांची झोळी फेकू म्हणतो
तुझ्या खुशीने का इतका बावरून जातो
किती मने घेऊन बरे मी निघून जातो
छोट्याश्या गोष्टीचा होतो प्रपंच मोठा
एक झाकले की पडते उघड्यावर दुसरे
सगळी झाली तय्यारी जाण्याची आता
एक खूण पटली की लागूया वाटेला
निघण्याआधी लागत नाही झोप जराही
निघता-निघता झोप अनावर होत राहते
वर्षेही उडतात पाखरे होउन बहुधा
परत न येण्यासाठी, कोणा-कोणासाठी<<<
फार आवडले हे शेर!
शेवटचा अतिशय सुंदर!
माझे जीवन त्याच्यापाशी येउन
माझे जीवन त्याच्यापाशी येउन थांबे
त्याचे अजून कोणापाशी कधी ना कधी
आज ना उद्या मार्ग वेगळे व्हायचेच की
उद्या कदाचित परवावर जाईल फारतर
फार दिवस मुक्काम लांबवू नये खरेतर
किंमत कोणाची न उरावी किमतीपुरती
येता-जाता बघत राहतो कुठवर आले
वारवार पाहून वाढते पीक भ्रमाचे
तुझ्या खुशीने का इतका बावरून जातो
किती मने घेऊन बरे मी निघून जातो
बोल हवे तितके आता तू ह्याच घडीला
भेट पुढे-मागे अपुली होवो ना होवो
वाह.. विशेष आवडले.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भूषण आणि सुशांत,
भूषण आणि सुशांत, धन्यवाद.
गुलमोहर थंड दिसतेय, काय झाले ?
समीर चव्हाण
सर्व शेर एका दमात न वाचता
सर्व शेर एका दमात न वाचता थोडे थोडे वाचायचे ठरवले आहे त्यामुळे आज पहिले ५ शेरच वाचले
कोलाहल सर्वात आधिक आवडला
भेटीच्या शेरावरून माझा एक मतला आठवला....
पुढे मागे कुठे असशील काही माहिती नाही
पुन्हा होईल नाही भेट ह्याचीही हमी नाही
धन्यवाद
अनेक शेर आवडले सर धन्यवाद,
अनेक शेर आवडले सर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद, नूतन वर्षाभिनंदन!!
निवांत वाचावे म्हणतो!!
निवांत वाचावे म्हणतो!!
फारतर पासुनचे एकूण एक शेर
फारतर पासुनचे एकूण एक शेर आवडले .
दोन भागात विभागणी केली गेली असती तर अजुन मजा घेता आली असती असे वाटले ( वै म )
धन्यवाद !!
सुप्रिया.
सगळ्यांचे आभार. दोन भागात
सगळ्यांचे आभार.
दोन भागात विभागणी केली गेली असती तर अजुन मजा घेता आली असती असे वाटले
विनोदाची गोष्ट म्हणजे मी मुळातच जे काही लिहिले त्याच्या १२ भागातील हा एक भाग आहे.
असो, वाचकांची पंचाईत मी समजू शकतो.
वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.