१ लहान दोडके शिरा काढून, १ मध्यम बटाटा, २ लहान हिरव्या मिरच्या, १ च्मचा आलं-लसूण पेस्ट, १ जुडी कोथिंबीर, २ छोटे चमचे रवा, मीठ, शॅलोफ्राय करायला तेल, आवडत असल्यास एक छोटा कांदा बारीक चिरून, ताजे मटारदाणे, बाईंडींगसाठी बेसन आणि तांदळाचे पीठ समप्रमाणात पण लागेल तसे.
कबाबची प्लेट सजवायला कोथिंबीर, गाजराची फुले, काकडीचे आणि कांद्याचे काप.
दोडक्याच्या शिरा काढून तुकडे करा. बटाट्याची साल काढून तुकडे करा. हे तुकडे, थोडी मटार, अर्धी जुडी कोथिंबीर (काड्यावाला भाग), हिरव्या मिरच्या, आल-लसूण पेस्ट, थोडे मीठ घालून मिक्सरमधून वाटा.
*आशूडीने सुचवल्यानुसार-- मिक्सरमधून काढलेले मिश्रण थाळीत एका बाजूला ठेवले तर दोडक्याचे पाणी निघून येईल ते वेगळे करावे म्हणजे बाईंडिंगला पीठ कमी लागेल.
रवा घाला. ५ मिनिटे ठेवा तसेच. नंतर लागेल तसे बेसन, तांदळाचे पीठं, मीठ, जीरे, मटारदाणे, कोथिंबीर, कांदा मिक्स करा. कबाब थोड्या तेलात शॅलोफ्राय करा. एका प्लेटमध्ये सॅलड आणि केचपबरोबर किंवा कांदा काकडीने सजवून खायला द्या.
१. मिश्रणात पाणी मुळीच लागत नाही. दोडक्याचे पाणी पुरते.
२. एकदा मिक्स केल्यावर कबाब लगेच लावावेत, नाहीतर दोडक्याचे पाणी सुटत जाते, मग भजी तळावी लागतील
३. थोडा गाजराचा कीस मिक्स करू शकतो, पण एक गोडीळ चव येते. तशी न येता मीठ आणि तिखट जास्त टाकावे लागेल.
४. आधी प्लेट सजवण्याचे सामान सज्ज ठेवावे. आयत्यावेळी कबाब ठेवून गरम सर्व्ह करावे. नाहीतर तळता तळताच कबाब खाऊन फस्त होतात
५. पुलाव, हे कबाब, कोशिंबीर, गाजर हलवा किंवा गुलाबजामून म्हणजे मस्त आणि लाईट बेत.
६. प्रतिसादातून सुचवलेले - बाजरीचे पीठ खमंगपणासाठी वापरता येइल. थँक्स टू आशूडी.
फोटो नाहीयेत. नॉर्मल
फोटो नाहीयेत. नॉर्मल आलूटिक्कीप्रमाणे दिसतात पण कुरकुरीत होतात.
छान वेगळा प्रकार. दोडका
छान वेगळा प्रकार. दोडका पोखरूनही करता येतील हे. तूकडे करून पोखरायचे आणि आतल्या पोकळीत सारण भरायचे.
पाककृती छानच असेल, पण
पाककृती छानच असेल, पण फोटोशिवाय मजा नाही. पुढच्या वेळेला कराल तेव्हा फोटो तेवढे काढून घ्या फस्त करायच्या आधी.
थँक्स दिनेशदा. सारण भरून
थँक्स दिनेशदा. सारण भरून वाफवून शॅलो फ्राय करता येतील. हेल्दी प्रकार!
नरेशजी, दोडक्याला खपवण्यासाठी म्हणून ऐनवेळी केलेला प्रकार. सॉरी हं, फोटो नै घेतले.
छान प्रकार . मटार वाफवून नको
छान प्रकार .
मटार वाफवून नको घ्यायला ?
नाही भाऊ. फ्रेश मटार किंवा
नाही भाऊ. फ्रेश मटार किंवा फ्रोझन हिरवे मटार तसेच धुवून वापरायचे.
वाफवायची गरज नाही. शिजतात पटकन.
मस्त पाककृती. आज करून पाहिली.
मस्त पाककृती. आज करून पाहिली. फोटो काढायचे लक्षात आले नाही. दोडका अजिबात न खाणार्यांसाठी मस्त प्रकार आहे. कळलेही नाही यात काय काय.जिन्नस आहेत. मी यात थोडासा ओवा आणि तांदळाच्या पिठीऐवजी घरात असलेले बाजरीचेच पीठ वापरले त्यामुळे भाजणीसारखा खमंगपणा आला होता. (कालची पोळी आणि भातही ढकलून दिला त्यात! )
झटपट होणारा मस्त स्टार्टर. घरच्या पार्टीत पण करता येईल.थँक्स चिन्नु!
मिक्सरमधून काढलेले मिश्रण थाळीत एका बाजूला ठेवले तर दोडक्याचे पाणी निघून येईल ते वेगळे करावे म्हणजे बाईंडिंगला पीठ कमी लागेल.
अश्या पदधतीने मी दोडका नक्की
अश्या पदधतीने मी दोडका नक्की खाऊ शकेन. एकदा करुन पाहन्यात येईन.
थँक्स आशु. हो आज्जिबात कळत
थँक्स आशु. हो आज्जिबात कळत नाही दोडका आहे यात
टिप वर अॅड करते. मीही बाजरीपीठ ट्राय करेन नक्की. मोठ्ठा थँक यू
अंकु, करके देको