१. या विषयाची आवड असेल तरच आपला प्रतिसाद द्यावा.
२. क्रुपया दुखावणारे प्रतिसाद टाळा.
३. अवांतर प्रतिसाद नकोत.
४. उथळ प्रश्नांना प्रतिसाद मिळणार नाही.
सोशल मीडीयावर स्वत:ला आधुनिक म्हणवणारा एक (किंवा अनेक) गट खूप आक्रस्ताळे पद्धतीने आपले म्हणणे मांडत असतो. त्यांची दहशत एव्हढी आहे की पारंपारीक गोष्टींमधल सायन्स समजून न घेता मोडीत निघत असताना हताशपणे पाहत रहावं लागतं. (याचा अर्थ जुनं तेच सोनं असा नाही).
आंम्ही मैत्रिणींनी नंतर अशा लोकांच्या नादाला लागणे सोडून दिले. जुनं ते सर्वच खोटं असंच आधुनिक शास्त्र म्हणतं की काय असा प्रचार चालू आहे त्याला आळा बसला पाहिजे असंही वाटत. चांगला योग जुळून आल्याने देशात सर्वत्र या पारंपारीक ज्ञानाचा सन्मान करणारे सरकार सिंहासनावर आरुढ झाले आहे. या सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे जर या सरकारला एखादा निर्णय पटला की ते कुणाचीही पत्रास ठेवत नाही. त्यामुळेच परमपूज्य शंकराचार्यजींना आपली मतं व्यक्त करता येऊ लागली आहेत. या देशात बहुसंख्य लोक ज्या धर्माला मानतात त्या धर्माच्या सर्वोच्च धर्मगुरूला आपली मतं मांडता येऊ नयेत ही लोकशाही आहे का ? खरं तर कुणाला देव मानायचं कुणाला नाही हा अधिकार त्यांच्य़ाशिवाय कुणाकडे असणार तरी देखील सहिष्णू वृत्तीने त्यांच्या या अधिकाराकडे कानाडोळा केल्यास त्यांचं विधान बेसिकली चूक होतं का याबद्दल कुणीच बोलत नाही. फक्त तुटून पडने हेच दिसून आलं. सोशल मीडीयाचा हा एक मोठा अवगुण आहे.
जर आपलं पारंपारीक ज्ञान-विज्ञान मोडीत निघावं असं असतं तर मग आस्था चॅनेल का पाहतात लोक ? गेली कित्येक वर्ष लोक पूज्य रामदेवजी महाराजांबरोबर श्वास घेत आहेत. ते कशासाठी ? त्यांच्या पतंजली योगपीठाच्या औषधांवरचा लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे, ते कशासाठी ? बाबांनी कॅन्सरचे पेशंट बरे केल्याचं ते पेशंट्स स्वत:च टीव्हीवरून सांगताना देशाने, जगाने ऐकलं. फक्त या कामासाठी त्यांना नोबेल मिळू शकतं ( पण ते मिळणार नाही). पण दुर्दैवाने आधीच्या सरकारने त्यांना साधं भारतरत्न सुद्धा दिलेलं नाही ( त्या सरकारने पुरस्कार सोडाच, रामदेव महाराजांवर पोलीस सोडून अर्ध्या रात्री जे काही केलं ते सुद्धा देशानं पाहीलं आहे). अशा परिस्थितीत परंपराघत ज्ञानाला प्रतिष्ठा कशी मिळणार ? राजकीय द्धामधुमीत जे नमोभक्त सोशल मीडीयावर होत त्यांच्यामुळे अनेक गैरसमजांना हातभार लागला हे मला मान्य आहे. खरं म्हणजे यांच्यामुळे सरकारच्या इमेजचं नुकसानच झालेलं आहे. पण याचा अर्थ या सरकारचे समर्थन करणारे सर्वच असे आहेत असा समज करून घेऊ नये. ते असो.
आज सर्वत्र व्यभिचार वाढला आहे. सोशल मीडीयावर म्हणे तो वैयक्तिक प्रश्न आहे, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. अरे, पण हे सर्व कुठे चाललं आहे ? त्यातूअ गुन्हेगारी वाढती आहे. महिलांवर हल्ले होतात. नवरा बायकोच्या जिवावर उठतो आहे, कारण काय तर दुसरी कुणी भवानी आवडलेली असते. या जोडीला अभिनेत्री नको त्या धंद्यात पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत. हे काय समाज जिवंत असल्याचे लक्षण आहे की काय ?
हेच ओळखून पूर्वीच्या साधू संतांनी मनुश्याला अध:पतनापासून वाचवण्य़ासाठी सोप्या सोप्या वचनांची निर्मिती केलेली आहे. साध्या सरळ मराठीत सांगायचं तर परस्त्री मातेसमान हा सुविचार मनावर बिंबवला गेल्याने पूर्वीच्या काळी स्त्री ला आदर मिळत असे. तसच स्त्रियांसाठी वटसावित्रीचे व्रत तर आहेच आहे, शिवाय परपुरूष पित्यासमान हे वचन सुद्धा प्रचलित होते. यामुळे स्त्रीपुरूषांमधे एकमेकांविषयी वेडेवाकडे विचार येत नसत,. आजच मानसशास्त्र हे पूर्वीच्या लोकांनी कुठल्याही विद्यापीठात न जाता कोळून पिलेलं होतं हे यातून कळतं. .या सर्व जीवनविद्या साधू संतांनी सांभाळून ठेवल्या, समाजहितासाठी त्या पुढच्या पिढीला शिकवल्या.
थोरांचा आदर करण्य़ाची आपली परंपरा ही चेष्टेचा विषय नाही. या मागे काय विचार आहे हे आपण जेव्हां ज्येष्ठ होऊ तेव्हां कळतं. ज्येष्ठांकडे अनुभव असतो पण दुस-यावर अवलंबून असल्यानं पुढच्या पिढीने त्यांना आधार दिला तर त्यांचं म्हातारपण सुखाचं जाऊ शकतं आणि तरूण पिढीला अनुभवाचा फायदा होत असतो. अशाच पद्धतीने कित्तीतरी चांगल्या गोष्टी समाजात चालत आलेल्या आहेत. पण चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त निगेटीव्ह गोष्टींकडे लक्ष वेधून सगळंच मोडीत काढण्याला आधुनिकता समजल जातं. समाज अनुकरणप्रिय असल्याने हे लोण खाली खाली झिरपत जातं. अशा पद्धतीनं आपण एका अपरिचित संस्कृतीला कवटाळून बसत आहोत. या संस्कृतीला इतिहास नसताना विज्ञानाच्या नावाखाली नव्या अंधश्रद्धा जोपासत आहोत. जुन्याला कुठलाही विचार न करता विरोध हा या अंधश्रद्धेचाच भाग आहे. या लोकांना सांगा की वीज असते तर तत्काळ विश्वास ठेवतील. हे बटन दाबल्यावर वीज वाहते म्हटलं की विश्वास ठेवतील. पण वीज दाखवा असं आवाहन केलं की यांची बोबडी वळते .
या ठिकाणी आपण अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या अशा अंधश्रद्धांमुळे काळाच्या उदरात गडप होण्य़ाची शक्यता आहे त्यांची चर्चा करूयात.
रीया कोण ? मला तर बाई ती
रीया कोण ? मला तर बाई ती खोडसाळ वाटतेय. भीतीच वाटतेय तिची.
आणि अशा रितीने ड्युआय रंगात
आणि अशा रितीने ड्युआय रंगात आलेले आहेत. वीणातै तुम्ही गायबच राहील्या असता तर अजून गूढ वाढत गेले असते. जितका बचाव करायला जाल तितकीच लोकांची खात्री होत जाईल.
तुमचा कॉल
तू एकमेव व्यक्ती आहेस माझ्या माहीतीत इथे, जो समंजस आहे.
जोशी तुमचे काय खरे नाही. धक्क्यावर धक्के...भूकंपप्रवणक्षेत्रात राहत असल्यासारखे वाटत असेल ना....
सीता और गीता मधील अभिनेत्री
सीता और गीता मधील अभिनेत्री एकच होती, हे विसरू नका. तुम्ही रोना आहात का? पेपर मधील बातमी कुणी फोटोशॉप करत नाही.
हे बघा, वाचा.
धक्क्यावर
धक्क्यावर धक्के...भूकंपप्रवणक्षेत्रात राहत असल्यासारखे वाटत असेल ना..>>
नाही तर काय. आणखी एक धक्का आणि मला हार्ट अॅटॅक येणार हे नक्की. राम बोलो भाई राम बोलो.
राम बोलुनच तर बदनाम केलेत
राम बोलुनच तर बदनाम केलेत
विणातै देव माझे कल्याणच करतो खोटे वाटत असेल तर तुम्ही त्यांना जाउन विचारु शकतात. (असे ही तिथेच जव़ळपास आहात )
कोण जवळ राहतात?
कोण जवळ राहतात?
अशा रीतीने माबोवर रंगत चाललीय
अशा रीतीने माबोवर रंगत चाललीय वर्षाखेर
अनुपमखेर ची लहान मुलगी ?
अनुपमखेर ची लहान मुलगी ?
That reminds me. नवा
That reminds me. नवा कालनिर्णय भिंतीवरी टांगायची वेळ झाली.
असू शकेल
असू शकेल
काय आणि का उत्तर द्यायचं
काय आणि का उत्तर द्यायचं त्यांना ? तू एकमेव व्यक्ती आहेस माझ्या माहीतीत इथे, जो समंजस आहे.>>>
कोन ही व्यक्ती ??
आणि वेगाने ६०० प्रतिसादांकडे
आणि वेगाने ६०० प्रतिसादांकडे घोडदौड...
काय आणि का उत्तर द्यायचं
काय आणि का उत्तर द्यायचं त्यांना ? तू एकमेव व्यक्ती आहेस माझ्या माहीतीत इथे, जो समंजस आहे.>
शेवटचे ३ मॅजिकल शब्द नाही लिहिले असते तर सुवर्णाक्षरांनी नोंद झाली असती.
भूता>>>> भूत म्हणजे ( आय डी)
भूता>>>> भूत म्हणजे ( आय डी) प्रसाद गोडबोले. पण ते नसतील.
देव>>>> म्हणजे पूर्वीचे देवदत्त कवि, पण हे ही नाहीत.
कल्याण>>>. हा आय डी आहे का कुणाचा? असेल की.
मग राहीले हे आय डी.:-अगं बाई, , तुम्ही, संशय घेताय ?, तुमचं, करो. मग ह्ये आय डी कुणाचे ? ओ काउ,/ जामोप्या हा वीणा आय डी तुमचा तर नाही ना?:फिदी::दिवा:
(No subject)
काय मिळणारे हे असं संशयकल्लोळ
काय मिळणारे हे असं संशयकल्लोळ खेळून देवीच जाणे
अगं मग तू संशय खतम करुन टाक
अगं मग तू संशय खतम करुन टाक या सार्यांचा. एकाच फटक्यात. बघ कसे गप्प बसतील......................
का देव का नाही जाणे ? तुम्ही
का देव का नाही जाणे ? तुम्ही सरळ सरळ पार्शालिटी करत आहेत मी तुमचा जाहीर निषेध करतो
रीया कोण ? मला तर बाई ती
रीया कोण ? मला तर बाई ती खोडसाळ वाटतेय. भीतीच वाटतेय तिची.
>>>
मलाही तुझी जामच भिती वाटते.
माझं फक्त नॉर्मल लोकांशी जमतं. विकृतांशी नाही.
कोकणस्थ ( मी कोक्या म्हटलं तर
कोकणस्थ ( मी कोक्या म्हटलं तर चालेल ना ?)
हे लोक ऐकणार आहेत का ?
मी धाग्याच्या सुरुवातीला किती कळवळून विनवलं होतं की नाहि ? त्यांनी माझं एक नाही ऐकलं. आता यांचा संशय फेडण्यात काही अर्थ आहे का ? माझ्या सारख्या दिसणा-या स्त्री चा फोटो शोधून काढलाय यांनी. म्हणून देवीलाच साकडं घालतेय आता..
चालू द्या ग बै तुमचं.
संशय फेडणं आवश्यक आहे इतकंच
संशय फेडणं आवश्यक आहे इतकंच म्हणेन.
पार्शालिटी कस्ली?
पार्शालिटी कस्ली?
अरे काय चाललय काय ? कळेल का
अरे काय चाललय काय ? कळेल का आम्हा इतर जणाना
चालू द्या ग बै तुमचं.>>>> ग
चालू द्या ग बै तुमचं.>>>> ग बाई? इथे रिया, विनीता, सुरेख आणी मी सोडले तर बाकी स्त्रीच आय डी हायती का? मुद्दाम अन्नुलेख करत्यात बगा.
सुरेख?? Are you sure?
सुरेख?? Are you sure?
५९६
५९६
५९७
५९७
५९८
५९८
५९९
५९९
६०० हुर्रेर्रे
६००
हुर्रेर्रे
Pages