Submitted by बेफ़िकीर on 9 December, 2014 - 11:00
मूळ लेख मी काढून टाकलेला आहे. प्रशासकांना लेखाखालील प्रतिसादांच्या सोयीला कुलूप लावण्याची विनंती केली होती, पण ती विनंती अजून विचारात घेतली गेलेली नाही.
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्वतःच्या जातीचा अतिफुकाचा
स्वतःच्या जातीचा अतिफुकाचा अभिमान असणार्यांनाच विचारा जाती कुठुन आली
http://www.maayboli.com/user/
http://www.maayboli.com/user/3/guestbook
>>>बेफ़िकीर
10 December, 2014 - 14:07
प्रशासक महोदय,
http://www.maayboli.com/node/51844
ह्या धाग्यावर सर्वांनी मनापासून प्रयत्न करूनही काही कारणाने व्यवस्थित चर्चा घडवून आणता आली नाही.
कृपया ह्या धाग्याला कुलूप लावावेत. तसदीबद्दल मनापासून क्षमस्व!
-'बेफिकीर'!<<<
सर्व प्रतिसाददात्यांचे
सर्व प्रतिसाददात्यांचे चर्चेतील सहभागासाठी मनापासून आभार.
-'बेफिकीर'!
मला एक शंका आहे.... सध्या
मला एक शंका आहे....
सध्या हिंदु पद्धतीत जात बदलता येत नाही. पण आरक्षणाच्या फायद्यांसाठी एखाद्याने मुस्लिम धर्म स्विकारला आणि नंतर पुन्हा हिंदु होतो म्हणाला आणि त्यासाठी आरक्षित जात मागितली तर नियम काय सांगतो.
कारण आडवळणाने का होईना फायदा होत असेल तर लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात याचा अनुभव आहे.
=================================================================
रच्याकने, हातोडावाले जोशी स्वतला ब्राह्मण म्हणवून घेत नाहीत हे वाचून मी कोमातच गेलोय.
जात किन्वा धर्म बदलला की खरच
जात किन्वा धर्म बदलला की खरच काही वेळेस गोची होते. आम्ही बदलीनिमीत्त ( बाबान्च्या) वेगवेगळ्या गावी राहीलो. मी पाचवीत होते तेव्हा माझ्या बाबान्च्या काही मित्रानी काही कारणाकरता बौद्ध धर्म स्वीकारला. यातले काही हिन्दु तर दोघे ख्रिश्चन होते. त्याना कदाचीत बौद्ध धर्म जीवन पद्धती पण पसन्त पडली असेल.
पण झाले असे की काही दिवसानी दिवाळी आली. हे जे मुळचे हिन्दु होते, त्याना रहावेना. त्यानी घराबाहेर आकाश कन्दिल लावले. नेमके शेजारच्या २ बौद्ध व्यक्तीनी याला हरकत घेतली. भान्डणे होतात की असे वाटायला लागे पर्यन्त बौद्ध समाजातील काही ज्येष्ठ व्यक्तीनी मध्यस्थी करुन वाद मिटवला. गम्मत म्हणजे जे स्वतःला कट्टर बौद्ध समजत होते ( माझ्या २ मैत्रिणी ) ते घरात गणपती वगैरेची पूजा करत होते. पण फरक हाच होता की निदान जाती-धर्मावरुन कधीच कुठले वाद झाले नाहीत हे समाधान. मी माझ्या मैत्रिणीना आणी त्यान्च्या घरच्याना पण कधी याबद्दल विचारले नाही कारण ते त्यान्चे व्यक्तीस्वातन्त्र्य होते. मला कधी त्यान्ची जात काढाविशी वाटली नाही, न त्याना कधी माझ्या असण्यावर आक्षेप होता. उलट खूप आनन्दी वातावरणात आम्ही राहीलो.
कोण कुठला धर्म स्वीकारते यापेक्षाही महत्वाचे आहे की त्या व्यक्तीमधली माणुसकी कितपत जागी रहाते. धर्म कोणता का असेना दुसर्याला त्याची आवडनिवड जपु द्यावी, आपण आपली जपावी. आणी एकमेका सहाय्य करु अवघे धरु सुपन्थ असे चालावे. पण सध्या हे होणे अशक्य दिसतेय. प्रान्त वाद, सीमा वाद, प्रादेशीक अस्मिता, महागाई यातुन बाहेर पडता तेव्हा येईल.
आता इथे माझे लिखाण ( प्रो भाजपा असल्याने) बर्याच जणाना भडक वाटते, कट्टर जातियवादी वाटते. वाटत असेल, नो डाउट. पण जेव्हा दुसर्याला/ दुसरीला माझी गरज भासते तेव्हा मी माझयकडुन प्रयत्न करते चान्गले देण्याचा. कारण आई-वडिलान्चे सन्स्कार. कदाचीत आम्ही हाय प्रोफाईल जगतात राहीलो असतो तरी माझे विश्व नसते बदलले कारण घरातले मोकळे आश्वासक वातावरण.
पण आरक्षणाच्या फायद्यांसाठी
पण आरक्षणाच्या फायद्यांसाठी एखाद्याने मुस्लिम धर्म स्विकारला आणि नंतर पुन्हा हिंदु होतो म्हणाला आणि त्यासाठी आरक्षित जात मागितली तर नियम काय सांगतो. >> माझ्या माहितीप्रमाणे अशी जात बदलून लगेच आरक्षणाचा फायदा मिळत नाही. त्यासाठी १-२ पिढ्या आधीपासूनच त्या जातीत असावे लागते.
आशुचॅम्प +१०० मागासवर्गियाने
आशुचॅम्प +१००
मागासवर्गियाने जर धर्मांतर केले आणि काही काळाने जर परत आपल्या धर्मात आला तेव्हा जर त्याने इतर उच्चजातीची निवड केली तर ती त्याला मिळते का ?
समजा मिळाली तर त्या समाजातले इतर सामाजिक व्यवहार जसे इतरांबरोबर होताततसेच त्याच्याबरोबर देखील होतात का?
दिवाकरजी: कोणती जात उच्च आणि
दिवाकरजी: कोणती जात उच्च आणि कोणती जात नीच?
सर्वच जाती सारख्या..
अहो जातीवरून कोणालाही कमीजास्त लेखण्याचा जमाना कधीच गेलाय.
राहता राहीला प्रश्न आरक्षणाचा, तो राजकारण्यांनी फेकलेला चेंडू आहे. जेणेकरुन जनता जातीवरून वाद घालत बसेल आणि तेे आपली पोळी भाजून घेतील.
चला आपण म्हणतात तर सारख्याच
चला आपण म्हणतात तर सारख्याच आहेत.
अहो जातीवरून कोणालाही कमीजास्त लेखण्याचा जमाना कधीच गेलाय. >>> कोणत्या जगात आहेत ?
जरा पेपरातले विवाहविषयक पान वाचुन बघा. ऑनर किलिंग च्या बातम्या वाचुन बघा.
जमाना आहे तिथल्या तिथेच उलट वाढत चालले आहे असे म्हणावे लागेल.
हिंदुत्ववाद्याना इतर लोकाना
हिंदुत्ववाद्याना इतर लोकाना आपल्या धर्मात घेण्याची इतकी का हौस आलि आहे ?
हिंदु धर्मात दुसर्या धर्मातील मनुष्यास घेण्याची सोय नाही.
तशी सोय असती तर मस्तानीपासुन झालेल्या समशेरबहाद्दरला हिंदु ब्राह्मण करुन घेण्याचे ब्राह्मण पेशव्याचे स्वप्न ( पेशवा असुनही ) असफल का झाले ?
दुसर्या धर्मातल्याला हिंदु करता येते असे म्हणुन इथले लोक जे ऊर बडवत बसले आहेत त्यान्ना ते मंत्र ठाउक आहेत आणि पेशव्याच्या दरबारच्या प्रकांड पंडिताना ते मंत्र ठाऊक नव्हते की काय ?
काय गंमत आहे बघा.. पेशव्याचे नाव , धर्म , जात , संस्कार , संपत्ती यातले बिचार्या समशेर बहाद्दरला काही मिळाले नाही.
पण पानिपतावर मात्र त्याच पेशव्यांसाठी तो शहीद झाला !
हिंदुत्ववादी संघटना बोलत आहेत ... नवीन धर्मांतरीत लोकाना जॉब देऊ ...
कसला जॉब ? दंगल झाली तर त्यात शहीद होणार्या सैनिकाचा जॉब का ?
काउ... नावाप्रमाणेच टोचा
काउ... नावाप्रमाणेच टोचा मारतांय अगदी
काऊ..जाणकारांकडुन तुमच्या
काऊ..जाणकारांकडुन तुमच्या प्रश्नांची ऊत्तरे मिळतिल वाट पहा...
हतोडावाले, साधरण समज आहे की
हतोडावाले,
साधरण समज आहे की ब्राह्मणानी जाती आणल्या. पण तसे असते तर वेद, पुराण, मनू व उपनिशदांतून मराठा, कुण बी, कोळी, मांग वगैरे नाव दिसली असती. ती तशी दिसत नाही म्हणजे हे ब्राह्म् णांचे काम नक्कीच नाही.
<<
रामायण लिहिणारे वाल्याचा वाल्मिकी झालेले ते कायसेसे कोण होते हो? कुठे आलाय तो उल्लेख म्हणे? आय मीन त्यांच्या "वर्णा'चा?
रायगडावरील महाराजांचा
रायगडावरील महाराजांचा नगारखान्याचा भाग, त्यांचे सिंहासनाची जागा, तसेच जगदिश्वराचे मंदिर निट निरखुन पाहिल्यास लक्षात येते. कदाचित तुम्ही वाचलेला उल्लेख याच भागाचा असेल.>>>>>> स_सा, श्री शैल्य येथील मंदिर पाडून त्याची मशीद बनविली होती.ती मशीद महाराजांनी पाडून परत मंदिर उभारले.
साती,
लग्नानंतर स्त्रीची जात बदलत नाही.मुलांची जात ,वडलांच्या जातीप्रमाणे येते.
वाचकहो, या विषयाच्या
वाचकहो,
या विषयाच्या निमित्ताने स्वामी विवेकानंदांचे धर्मांतराविषयी विचार सांगावेसे वाटतात. ते म्हणतात : ‘हिंदूत्वातून बाहेर पडणारा मनुष्य हिंदूंची संख्या केवळ एकाने कमी करतो, एवढेच नव्हे तर शत्रूची एकाने वाढवितो.
कोणी जर स्वखुषीने हिंदू होत असेल तर त्याचे स्वागत आहे.
आ.न.,
-गा.पै.
जाणकार प्रश्नांची उत्तरे
जाणकार प्रश्नांची उत्तरे शिताफीने टाळत आहेत...
‘हिंदूत्वातून बाहेर पडणारा
‘हिंदूत्वातून बाहेर पडणारा मनुष्य हिंदूंची संख्या केवळ एकाने कमी करतो, एवढेच नव्हे तर शत्रूची एकाने वाढवितो.
>>>> हे काही झेपले नाही! आपल्या धर्मातले नसतील ते डायरेक्ट शत्रू ?
(No subject)
हे काही झेपले नाही! आपल्या
हे काही झेपले नाही! आपल्या धर्मातले नसतील ते डायरेक्ट शत्रू ? >> +१ ते पण विवेकानंदांच्या तोंडी ज्यांनी शिकागोमधे माझ्या बंधू-भगिनींनो म्हणून सभा जिंकली..
ते उद्गार सावरकरांचे आहेत ना
ते उद्गार सावरकरांचे आहेत ना ?
हो @ जामोप्या. पण ते उधृत
हो @ जामोप्या. पण ते उधृत करणारे आपले "न." गापै आहेत. तेव्हा चालायचंच.
ते उद्गार विवेकानंदांचेच
ते उद्गार विवेकानंदांचेच आहेत.. कदाचित सावरकरांचेही असु शकतील.
http://www.psiddharam.com/2014/09/blog-post_38.html?m=1
ख्रिस्चनानी कालिमातेचे रुपांतर मेरीमध्ये केले ! ... स्वामीजी नरेंद्रजी विवेकानंदजी
maitreyee, >> आपल्या धर्मातले
maitreyee,
>> आपल्या धर्मातले नसतील ते डायरेक्ट शत्रू ?
हे उद्गार विवेकानंदांनी इ.स. १९०४ पूर्वी काढलेले आहेत. एका विशिष्ट लोकसंख्येच्या आधारे नंतर इ.स. १९४७ साली पाकिस्तान वेगळा काढला गेला. विवेकानंदांचे उद्गार खोटे ठरायला हवे होते. पण दुर्दैवाने ते खरे ठरले.
आ.न.,
-गा.पै.
भारतापासुन ब्रह्मदेश , नेपाळ
भारतापासुन ब्रह्मदेश , नेपाळ , लंका हेही देश वेगले झाले ना ? त्यांचा धर्म कोन्ता ?
नेपाळ आणि श्रीलंका कधीही
नेपाळ आणि श्रीलंका कधीही भारताचा भाग नव्हते. ही पूर्वीपासून स्वतंत्र राष्ट्रे आहेत.
ब्रम्हदेश भारतापासून वेगळा काढण्यात आला हे बरोबर आहे.
नेपाळ जगातील एकमेव हिंदुराष्ट्र म्हणून अलिकडेपर्यंत विख्यात होते. ब्रम्हदेश आणि लंका बौद्ध धर्मिय आहेत.
नेपाळ आणि लंका हे हिंदु
नेपाळ आणि लंका हे हिंदु राष्ट्राचा भाग कधीच नव्हते !
ऐकुन धक्काच बसला !
नेपाळ भारताचा भाग नव्हता. मग नेपाळचा पशुपती आपला देव कसा काय बुवा ? सावरकरांच्या व्याख्येप्रमाणे त्या पुण्यभु पितृभुचं काय झालं ?
लंका आणि हिंदु देव यांचंही मग तसंच होईल ... लंका ही हिंदु देवांची रिजर्व ब्यांक होती. तिथे त्यांची संपत्ती होती. तिथे ते रहातही होते ( म्हणे )
आणि विवेकानंद जर म्हणतात काली हीच मेरी .. तर मग मेरी आणि येशु यांची भारत हीच मूळ भूमी ठरते आणि भारत ही ख्रिस्चनांची पुण्यभू पित्रुभू ठरते.
यॅशु हा इस्लामचाही प्रेषित असल्याने मुसलमानांचीदेखील भारत ही पुण्यभु पित्रूभु ठरु शकतेच.
वा ! वा ! आता मी अतिशय आनंदाने व अभिमानाने इस्लाम किंवा ख्रिश्चन यापैकी कोणताही धर्म स्वीकारु शकेन.. सर्व धर्मांची पुण्यभु व पित्रुभु भारतच आहे !
वुइ या गोळवलगुरुजींच्या पुस्तकावर अफगाणिस्तान ते लंका हा भाग अखंड हिंदु राष्ट्रात दाखवला आहे.
या सगळ्या कन्फ्यूजनचे एकच
या सगळ्या कन्फ्यूजनचे एकच कारण आहे की 'हिंदु' नावाचा एक धर्म हा टिपीकल पाश्चात्य 'धर्म' पद्धतीत बसणारा धर्म नाही. त्यामुळे एखाद्याला धर्म द्या, धर्म स्विकारा, धर्म बदला याविषयी काही प्रोसिजर निश्चित करायची जरूर हिंदु धर्माला नव्हती.
एका ठराविक भूभागावर रहाणार्या एका ग्रूपची जीवनपद्धती म्हणजे हिंदुधर्मं.
१०० टक्के सहमत. अगदी महाभारत काळात देखील निरनिराळ्या भूभागात रहाणार्या लोकांच्या जीवनपद्धति काही बाबतीत वेगळ्या वेगळ्या असत. त्यांना त्यांचा धर्म समजला जात असे. कारण धर्म या शब्दाला इतर काही अर्थ नव्हते.
त्याचा सध्याचा अर्थ पाश्चात्यांनी आणला. वास्तविक इतर धर्मात देखील अनेक निरनिराळ्या विचारांचे लोक आहेत - कॅथॉलिक, अँग्लिकन, मॉर्मन, कॉप्टिक इ.
तर अश्या निरनिराळ्या जीवनपद्धति असणार्या लोकांना अमुक धर्माचे कशावरून म्हणायचे - तर ते त्या धर्मामागे असलेले तत्वज्ञान. आपण हिंदू पुनर्जन्म, परमात्मा, कर्मफळ इ. मानतो ख्रिश्चन लोक जीझस ख्राईस्ट हा परमेश्वराचा मुलगा आहे, आणि त्याने सांगितल्याप्रमाणे वागायचे. पुनर्जन्म मानत नाहीत. ज्यू लोक जीझस ख्राईस्ट ला मानत नाहीत, मुसलमान आणखीनच काही वेगळेच तत्वज्ञान सांगतात.
आजच्या युगात जीवनपद्धति व धर्म हे एकच राहिलेले नाहीत.
फार तर अमेरिकेतील जीवनपद्धति, भारतातील, आणि चीन मधली किंवा मध्यपूर्वेतली इ. जीवनपद्धति अश्या वेगळ्या वेगळ्या जीवनपद्धति आहेत असे म्हणावे.
धर्म नावाचे काहीतरी उगाचच लोकांच्या मागे लावले नि त्यावरून भांडणे! कधी अक्कल येणार समाजाला नि धर्म प्रकार काढून टाकणार?
साधरण समज आहे की ब्राह्मणानी
साधरण समज आहे की ब्राह्मणानी जाती आणल्या. पण तसे असते तर वेद, पुराण, मनू व उपनिशदांतून मराठा, कुण बी, कोळी, मांग वगैरे नाव दिसली असती. ती तशी दिसत नाही म्हणजे हे ब्राह्म् णांचे काम नक्कीच नाही.
म्हणून जाती ह्या गाव पातळीवर प्राबल्य असणारे, देशमुख, पाटील, मराठा वगैरे लोकानी त्यांच्या सोयीसाठी तयार केले हे सिद्ध होते.
माझ्या मते, ब्राह्मण लई हुष्षार्. त्यांनी स्वार्थासाठी ब्राह्मण श्रेष्ठ व इतर लोक नाहीत असा समज पसरवला, अकलेच्या जोरावर तो चालवला ते पाहून मग देशमुख, पाटील, मराठा वगैरे लोकानी सुद्धा आपआपसात कुणि श्रेष्ठ, कुणि कनिष्ठ असे काहीतरी आणले,
कुणाचा ना कुणाचा त्यात फायदा असतोच. त्याला तत्वज्ञान, तर्कशास्त्र वगैरे काही लागत नाही. जसे नियम काहीहि असले तरी लाच दिल्याशिवाय सरकारदरबारी तुमचे काम मनासारखे होत नाही तसे. (सगळ्याच देशात!) निव्वळ दादागिरी. चालतं,फायदा होतो म्हणून करायचे.
खुद्द महाभारतकाळात सुद्धा कर्णाला सूतपुत्र ठरवून त्याचे योग्य स्थान, मान त्याला दिले नाही! अगदी तेंव्हा पण कृष्ण होता, का नाही म्हणाला नाही जाती या गुणकर्म विभागशः आहेत म्हणून? तेव्हढ्या वेळेपुरता तो देवाचा अवतार माणूस बनून माणसासारखा लबाडी करतो, आपल्याला मान देतात ना, मग घ्या फायदा!
काउ, इतिहासाचा जरा अभ्यास
काउ,
इतिहासाचा जरा अभ्यास करा, भले होईल!
भारत हे सेक्युलर - सोशलिस्ट
भारत हे सेक्युलर - सोशलिस्ट राष्ट्र असल्याची नोंद घटनेत ४२ व्या दुरुस्तीने झाली.
१९७७ मध्ये जनता पक्ष सत्तेवर आल्यावर त्यांनी ४२ व्या घटनादुरुस्तीतील अनेक कलमे ४३व्या व ४४व्या घटनादुरुस्त्यांनी रद्दबातल ठरवली. त्यांना सोशलिस्ट-सेक्युलर हे शब्द हटवावेसे वाटले नाहीत की तसे करणे शक्य नव्हते?
Pages