Submitted by बेफ़िकीर on 9 December, 2014 - 11:00
मूळ लेख मी काढून टाकलेला आहे. प्रशासकांना लेखाखालील प्रतिसादांच्या सोयीला कुलूप लावण्याची विनंती केली होती, पण ती विनंती अजून विचारात घेतली गेलेली नाही.
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ह्म्म्म विषय चांगला(च)
ह्म्म्म विषय चांगला(च) आहे,
पण अन्य धर्मात जन्माला आलेल्या व्यक्तीला हिंदू धर्मात येण्याची खरेच अशी काही सोय आहे का ?
हिंदु धर्मात येणं कदाचीत सोपं
हिंदु धर्मात येणं कदाचीत सोपं असेल , पण त्यांना हिंदु धर्मातल्या सोकॉल्ड जातीव्यवस्थेत कसं सामावलं जाईल की ती अजुन एक वेगळीच जात निर्माण होईल ?
हिंदु धर्म स्विकारण्याचं असं काय आकर्षण असणार आहे ?
हिंदु धर्मात येणं कदाचीत सोपं
हिंदु धर्मात येणं कदाचीत सोपं असेल , पण त्यांना हिंदु धर्मातल्या जातीव्यवस्थेत कसं सामावलं जाईल की ती अजुन एक वेगळीच जात निर्माण होईल ?
>>>>> हाच प्रश्न मलाही पडला आहे. हिंदू धर्मात प्रवेश केल्याचा आनंद तर आहेच पण दुर्दैवाने भारतात फक्त धर्म हिंदू म्हणून चालत नाही, जात ही पाठोपाठ येतेच
यावरच अजून एक
यावरच अजून एक उपप्रश्नः
माझ्या माहितीनुसार ख्रिस्ती अथवा मुस्लीम धर्मात प्रवेश केला तर आपल्याला हवा तो पंथ आपण निवडू शकतो (प्रोटेस्टंट, शिया, सुन्नी इ.). हिंदू धर्मात असे पंथ नसल्याने (असल्यास कल्पना नाही) प्रवेशकर्ता त्याला हवी ती जात निवडू शकतो का? किंवा हवे ते नाव/आडनाव निवडू शकतो का? तसे केल्यास त्याला त्या जातीनुसार सोयी सवलती मिळू शकतात का?
म्हणजे समजा एका मुस्लीम वा ख्रिस्ती माणसाने धर्म बदलून ब्राह्मणी आडनाव घेतले तर आपण त्याला ब्राह्मण समजणार का?
महेश, >> पण अन्य धर्मात
महेश,
>> पण अन्य धर्मात जन्माला आलेल्या व्यक्तीला हिंदू धर्मात येण्याची खरेच अशी काही सोय आहे का ?
ज्युलिया रॉबर्ट्स यांनी काही वर्षांपूर्वी रीतसर हिंदू धर्म स्वीकारला आहे. त्या अगोदर ख्रिस्ती होत्या का ते माहीत नाही.
आ.न.,
-गा.पै.
चीकू, >> माझ्या माहितीनुसार
चीकू,
>> माझ्या माहितीनुसार ख्रिस्ती अथवा मुस्लीम धर्मात प्रवेश केला तर आपल्याला हवा तो पंथ आपण निवडू शकतो
>> (प्रोटेस्टंट, शिया, सुन्नी इ.).
माझ्या अंदाजाप्रमाणे जो धर्मांतर विधी करणारा धर्मगुरू असेल त्याचा धर्म धर्मांतरितांना प्राप्त होतो. याबाबत चूकभूल देणेघेणे.
आ.न.,
-गा.पै.
>>>म्हणजे समजा एका मुस्लीम वा
>>>म्हणजे समजा एका मुस्लीम वा ख्रिस्ती माणसाने धर्म बदलून ब्राह्मणी आडनाव घेतले तर आपण त्याला ब्राह्मण समजणार का?<<<
का समजू नये? माझे मत असे की अवश्य समजावे व जात निवडण्याचा हक्कही धर्मांतरिताला मिळावा.
>>>पण अन्य धर्मात जन्माला आलेल्या व्यक्तीला हिंदू धर्मात येण्याची खरेच अशी काही सोय आहे का ?<<<
महेश, हाच प्रश्न एकाने विहिंपच्या नेत्याला आज एका वाहिनीवर विचारला की असे धर्मांतर करून घेणारे तुम्ही (म्हणजे तुम्ही हिंदू) कोण? (विचारणाराही हिंदूच होता पण त्याला ही घटना मान्य नव्हती)
झालं ते चांगल आहे किंवा वाईट
झालं ते चांगल आहे किंवा वाईट आहे; मला तर हे सुद्धा ठरवता येत नाहिये ..
जातींच ठिके पण मग पोटजातींच काय ?
याबाबत काही नियम वगैरे असतिल तर जाणकारांनी त्यावर पन प्रकाश टाकावा ..
हिंदू धर्मात प्रवेश केला की
हिंदू धर्मात प्रवेश केला की 'आता त्यांची जात कोणती असणार' हा प्रश्न पडावा हे दुर्दैवी आहे. पण जर अख्खा धर्म बदलता येत असेल तर जातीच्या प्रश्नावरही तोडगा निघू शकेल.
झाले ते चांगले झाले की वाईट ह्याबाबत माझी मते:
१. जबरदस्तीने / आमीष दाखवून झालेले नसेल, स्वखुषीने झालेले असेल तर चांगले म्हणावे.
२. कोणालातरी आपल्या धर्मात यावेसे वाटले ह्याला आपण विजय वगैरे मानू नये. माणसाला ते स्वातंत्र्य असावे.
३. कोणाला तसे यायचे असेल तर आपल्याकडे त्या तरतुदी, विधी, तोडगे मात्र असावेत.
आपल्या धर्मातून कोणी स्वेच्छेने बाहेर जात असेल तर त्यालाही जाऊ द्यावे, फक्त कारणे समजून घेत चलावे.
एक बाळबोध वाटावा असा
एक बाळबोध वाटावा असा प्रश्न....
या हिंदुत्व स्विकारलेल्या मुस्लिम पुरूषाने हिंदू मुलीशी रितसर विवाहबध्द होवून कालांतराने मुला-बाळांसकट पुन्हा धर्मांतरण करायचे ठरवले तर कायदा काय सांगेल ?
- सुप्रिया.
हा प्रश्न मला तरी बाळबोध वाटत
हा प्रश्न मला तरी बाळबोध वाटत नाही आहे.
उत्तर माहीत नाही.
माझ्या मते हे हिंदु धर्माला
माझ्या मते हे हिंदु धर्माला नवीन नाही आहे. फक्त सामुहीक धर्मांतर झाल्यामुळे आणि भाजप सरकार असल्यामुळे ही एक फार मोठी गोष्ट मीडीया ने केलि. स्वखुशीने बर्याच जनांनी हींदु धर्म स्वीकरला आहे
ही लींक बघा
http://en.wikipedia.org/wiki/List_of_converts_to_Hinduism
>>>Sufia Begum,76, who is the
>>>Sufia Begum,76, who is the oldest woman among the converts, told TOI: "I read Quran and offered namaz five times a day. Now at this age, I will read Ganesh aarti. I don't find any major difference in the teachings of the two religions."
"The RSS people assured us that they will provide us better place to live, better food and schooling for my grandsons. I don't mind change of religion, as religion doesn't give us food to eat."
<<<
वरचा पॅरा कुठे आहे ? तो
वरचा पॅरा कुठे आहे ? तो वाचून मिशनरी स्टाइल धर्मप्रचार वाटत आहे ! नॉट एक्झॅक्टली स्वखुषी.
जात निवडण्याचा हक्कही
जात निवडण्याचा हक्कही धर्मांतरिताला मिळावा.
>>>>>
एखाद्या हिंदूला आपली जात बदलता येते का?
माझ्यामते नाही.
आणि हे असे असेल तर इतर धर्मियांना का हि फॅसिलिटी द्यावी??
http://m.ibnkhabar.com/news/1
http://m.ibnkhabar.com/news/132296/1/
तो वाचून मिशनरी स्टाइल
तो वाचून मिशनरी स्टाइल धर्मप्रचार वाटत आहे ! नॉट एक्झॅक्टली स्वखुषी. >>> +१
एग्झाक्टली. वरचा प्यारा वाचून
एग्झाक्टली. वरचा प्यारा वाचून जर स्वखुशी असं म्हणायचं असेल तर मिशनरी गावात त्या परिस्थितीत राहून मग तेथील लोक धर्म बदलतात यावर विहिंपचे लोक इतकी वर्षे बोंब का मारत होते? धर्माचं गाजर दाखवून सुविधा.
संस्कृत, मग हराम, मग गीता आणि आता धर्मबदल.. कसल्या वाटेवर चाललोय?
काय करायचं ते स्वखुशीने आणि
काय करायचं ते स्वखुशीने आणि गाजावाजा न करता व्हावं. हे काही झाडू अभियान नाही मीडियामध्ये झळकवणारं, याचं भान असू द्यावं.
अल्ला याना माफ कर. ते काय
अल्ला याना माफ कर. ते काय करताहेत हे त्यानाच समजत नाही आहे.
जात कोणती असणार' हा प्रश्न
जात कोणती असणार' हा प्रश्न पडावा हे दुर्दैवी आहे. पण जर अख्खा धर्म बदलता येत असेल तर जातीच्या प्रश्नावरही तोडगा निघू शकेल.
>>>
आता नविन मिळालेल्या माहितीनुसार 'जात' हाच या सगळ्या उपद्व्यापात मुख्य मुद्दा होता हे समोर आले आहे.
हे सगळे लोक 'वाल्मिकी' जातीचे होते जी अनुसूचित जमातीची आहे म्हणे.
त्यामुळे या लोकांना मूळ हिंदु धर्मात आल्यावर परत त्यांची मूळ जात आणि त्या अनुशंगाने मिळणारे फायदे मिळवून द्यायचे अमिष देऊन हे धर्मांतर करण्यात आले आहे.
जातीचा प्रश्नं करणे कितीही दुर्दैवी वाटले तरी आपल्या देशातले लोक कुठलाही प्रश्नं शेवटी 'जातीचा' करण्यात पटाईत आहेत.
मैदेवी, तुमच्या मताशी सहमत
मैदेवी,
तुमच्या मताशी सहमत आहेच. ह्या बाबतीत कोणतीही बाजू घेण्याचा माझा अजिबात हेतू नसून जे काय बातम्यांंमधून समोर येत आहे ते जसेच्या तसे चर्चेस घेण्याचा शुद्ध हेतू ठेवलेला आहे. तेव्हा, वरील पॅरा ज्या टाईम्स ऑफ इन्डियाच्या बातमीतील आहे (काल लिंक पाहात होतो, पुन्हा सापडली की देतोच) ती बातमी वाचून ह्या धर्मांतरणासाठी आमीष दाखवण्यात आले असे मानायला वाव आहे असे म्हणता येईलच.
आता पुढचा (माझा) मुद्दा:
समजा आमीष दाखवलेले असेल व त्याला भुलून काहीजण हिंदू धर्मात परत यायला तयार झाले तर ते काही हिंदू धर्माबाबत त्या लोकांच्या मनात श्रद्धा किंवा सद्भावना निर्माण झाली म्हणून हे झाले असे नक्कीच म्हणता येणार नाही. पण मग ते इतर धर्मात होते म्हणून त्यांना काही सुविधांपासून वंचित राहावे लागत होते का? तसे असल्यास का? तो धर्म जर धर्मासंदर्भात कडवी भूमिका घेणार्यांचा असेल तर त्या धर्मियांचा पुरेसा विकास का झाला नसेल? तसेच, समजा ते परत येण्याची जाहिरात करण्यात आली तर नेमके काय बिघडले?
हे मी विचारत आहे म्हणजे 'बिघडले नाही' असे म्हणणे ठसवायचा प्रयत्न नसून भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न आहे.
इतर सर्वजण ज्यांनी मैदेवींशी सहमती दाखवली त्यांना - हाच प्रतिसाद लागू होत असल्यामुळे रीपीट करत नाही.
धन्यवाद!
>>>त्यामुळे या लोकांना मूळ
>>>त्यामुळे या लोकांना मूळ हिंदु धर्मात आल्यावर परत त्यांची मूळ जात आणि त्या अनुशंगाने मिळणारे फायदे मिळवून द्यायचे अमिष देऊन हे धर्मांतर करण्यात आले आहे.<<<
माहितीसाठी आभार!
त्या लोकांना (त्यांच्या पूर्वजांना) मुस्लिम धर्मात गेल्याबद्दल काय मिळाले होते / असावे हे जाणण्यास उत्सुक आहे.
>>>जातीचा प्रश्नं करणे कितीही दुर्दैवी वाटले तरी आपल्या देशातले लोक कुठलाही प्रश्नं शेवटी 'जातीचा' करण्यात पटाईत आहेत.<<<
हे विधान 'जनरल' स्वरुपाचे आहे. धर्मांतर होणे / करण्यास प्रवृत्त करणे / करणे ह्या विषयाच्या अनुषंगाने जात ह्या विषयावर लिहिताना स्पेसिफिक मत अधिक योग्य ठरावे.
जातीचा प्रश्न पडणे दुर्दैवी
जातीचा प्रश्न पडणे दुर्दैवी असले तरी जातीबरोबर आरक्षण हे आलेच. आधीच आरक्षणाचे सतरा वाद असल्याने या नवीन् लोकाना त्यात का सामावून् घ्या.. आणि जर त्यांना खरेच आअक्षणाची गरज होती तर ते आधीच का नव्हते? त्यासाठी हिंदू बनायची का गरज भासली? का तसे आरक्षण आधीही होतेच..
बेफी, मला एक प्रश्न पडला आहे,
बेफी,
मला एक प्रश्न पडला आहे, चुकीचा वाटला तर इग्नोरास्त्र वापरा, पण योग्य वाटला तर तुम्ही किंवा येथील इतर जाणकारांनी प्रकाश टाकावा...मुळात आपल्या हिंदु धर्मामध्ये अशी convert व्हायची सोय आहे काय ?
किंवा अशी काही procedure आहे का?
मागे एके ठिकाणी मी चर्चेत
मागे एके ठिकाणी मी चर्चेत वाचले होते की प्रत्येक मनुष्य हा जन्माने हिंदू असतो जो पर्यंत त्याच्यावर कोणा धर्माचे संस्कार होत नाहीत.
तसेच हिंदू हा एक धर्म नसून एक जीवनपद्धती आहे. (याचा अर्थ मात्र समजला नव्हता)
If someone is giving me 100
If someone is giving me 100 Cr. I am ready to convert to any religion in the world. (But who will give? :-))
Dharm hi afuchi goli ahe. kuthalyahi dharmachi khalli tar kai farak padato
मसुराश्रमात गेल्या शतकाच्या
मसुराश्रमात गेल्या शतकाच्या सुरवातीपासून एक चळवळ म्हणून हिंदु धर्मात परत घेण्याचे अर्थात शुद्धिकरण चळवळ चालू होती/आहे.
वरील प्रकार नवा नाही, मात्र संख्येने कमी असूनही, केवळ मिडीयाने टीआरपीच्या धन्द्याकरता वाढवलेली बातमी आहे. या पेक्षा कितीतरि जास्तपटीने हिंदु धर्मातून लोक बाहेर पडलेत/पडावे लागलय/पडताहेत.
हिंदू धर्मात आल्यावर जात कोणती या विचाराबरोबरच किंवा त्यापेक्षाही, हिंदू धर्मातून बहुसंख्येने अन्य धर्मात गेलेल्यांची पूर्वाश्रमीची जात तशीच रहाते का, त्यांचे काय अनुभव यावरही थोडाफार (खरेतर "बराचसा") विचार व्हावा असे वाटते.
<<मला एक प्रश्न पडला आहे,
<<मला एक प्रश्न पडला आहे, चुकीचा वाटला तर इग्नोरास्त्र वापरा, पण योग्य वाटला तर तुम्ही किंवा येथील इतर जाणकारांनी प्रकाश टाकावा...मुळात आपल्या हिंदु धर्मामध्ये अशी convert व्हायची सोय आहे काय ?
किंवा अशी काही procedure आहे का?>>
मला ही या प्रश्नाचे उत्तर जाणकारांकडुन जाणुन घ्यायला आवडेल.
लिंबुकाका... >>हिंदू धर्मात
लिंबुकाका...
>>हिंदू धर्मात आल्यावर जात कोणती.<<
च्यायला हे एक अजुन त्रांगडेच आहे की....इतर धर्मात जाती, पोटजाती असतात का ? मागे एकदा मल वाटते की सत्यमेव जयते असेल...नक्की नाही, पण त्या मध्ये एक converted ख्रिश्चन माणुस बोलत होता....त्याने असे सांगितले की तो ख्रिश्चनांमधील निम्नजाती चा होता...आणि अश्या लोकांसाठी कब्रस्थान वेगळे असते, आणि त्या वरिल Cross ही वेगळ्या रंगाचा असतो. मला ते ऐकुन फारच नवल वाटले होते
Pages