आलो पुन्हा तुझ्या दारी
मागणं घेऊन..
तुलाही वाटत असेल ना रे, कसा हा असा?
नेहमीच काहीतरी मागणारा?
पण देणारा तूच एक आहेस ना रे..
मग जाऊ तरी कोणाकडे?
अर्ज़ियाँ सारी मैं चेहरे पे लिख के लाया हूँ
तुम से क्या माँगू मैं
तुम ख़ुद ही समझ लो
मौला मेरे मौला
दरारें-दरारें हैं माथे पे मौला
मरम्मत मुक़द्दर की कर दो मौला मेरे मौला
तेरे दर पे झुका हूँ, मिटा हूँ, बना हूँ
मरम्मत मुक़द्दर की कर दो मौला
तू समजून घेतोस म्हणून मला असं वेड पांघरायला आवडतं...
तुला अन मला दोघांनाही माहितीये मी का आलोय पण माहित नाही असं दाखवतोस...
जोखलेलं असतंस आधीच पण मी कधी येतोय याची वाट पहातोस...
असं म्हणतात सटवाईने नशीब लिहिलेलं असतं जन्माच्या कितव्या तरी दिवशी!
माझं नशीबही असंच भेगाळलेलं.
ज्याला सावरण्याची ताकद फक्त तुझ्यातच आहे असं वाटतं नेहमी...
जो भी तेरे दर आया, झुकने जो सर आया
मस्तियाँ पिए सबको, झूमता नज़र आया
प्यास लेके आया था दरिया वो भर लाया
नूर की बारिश में भीगता सा तर आया
माझीच ओळख शोधत फिरणारा मी...
किती शोधावं, काही हाती लागलं तर काही निसटतं... सगळं नाहीच सापडंत
तुझ्याजवळ आलेली माणसं पाहतो, वाटतं त्यांना उमजलय काहीतरी...
मला ते काहीतरी कधी उमजणार?
की मला नाहीच समजून घ्यायचं ते?
खरयाला घाबरतोय का रे मी?
एक खुशबू आती थी, मैं भटकता जाता था
रेशमी सी माया थी, और मैं तकता जाता था
जब तेरी गली आया, सच तभी नज़र आया
मुझमें ही वो खुशबू थी, जिससे तूने मिलवाया
कधीतरी अचानक गवसतं काहीतरी
येतं मनाची सगळी पुटं फोडून उफाळून वर
जाणवतं... की हो!...
हे आहे जे मी शोधतोय
आणि समोर पाहतो तर तू उभा असतोस... हसतोस माझ्याकडे बघून...
टूट के बिखरना मुझको ज़रूर आता है
वरना इबादत वाला शहूर आता है
सजदे में रहने दो, अब कहीं ना जाऊँगा
अब जो तुमने ठुकराया तो सँवर ना पाऊँगा
मी बेभान होतो...
माझ्यातल्या नवीन गवसलेल्या मला घेऊन तरंगत राहतो असाच.
जाणवतं की हे तुझ्यामुळे आहे.. तू दिलेलं आहे..
मग मन मानत नाही. तुला सोडून जायला..
पुन्हा तीच भिती
परत हरवलो तर?
सर उठा के मैंने तो कितनी ख्वाहिशें की थी
कितने ख्वाब देखे थे, कितनी कोशिशें की थी
जब तू रूबरू आया, नज़रें ना मिला पाया
सर झुका के एक पल में मैंने क्या नहीं पाया
मोरा पिया घर आया, मोरा पिया घर आया
माझ्या छोट्या छोट्या इच्छा...
त्यांच्यासाठीच्या मोठ्या लढाया
तुझ्या दानासाठी पसरलेले हात
हे सगळं त्या नवीन मला यःकश्चित वाटायला लागलंय रे..
तुझं माझ्यासाठी असणं...
माझ्याजवळ असणं....
म्हणजे काय चीज आहे हे उमगल्यावर...
ही लेखमाला फारच मस्त आहे.
ही लेखमाला फारच मस्त आहे. गाण्यांचा भावनुवाद करण्याची कल्पना पण आवडली. फार छान लिहिता तुम्ही.
>>>ही लेखमाला फारच मस्त आहे.
>>>ही लेखमाला फारच मस्त आहे. गाण्यांचा भावनुवाद करण्याची कल्पना पण आवडली. फार छान लिहिता तुम्ही.>>>>खूप धन्यवाद सुमुक्ता
जमले आहे ... असे पाहिजे ...
जमले आहे ... असे पाहिजे ... शब्दश अनुवाद नको ... भावनानुवाद हवा ... तुम्ही लिहित राहा ... पु ले शु...
>>>>>जमले आहे ... असे पाहिजे
>>>>>जमले आहे ... असे पाहिजे ... शब्दश अनुवाद नको ... भावनानुवाद हवा ... तुम्ही लिहित राहा ... पु ले शु...>>>>> धन्यवाद च्रप्स