पारुष्यमनृतं चैव पैशुन्यं चापि सर्वशः ।
असम्बध्धप्रलापश्च वाङ्ग्मयं स्याच्चतुर्विधम् ॥
अर्थातः कठोर वचन उच्चारणे, खोटे बोलणे, चहाडी करणे, आणि बिनकामाच्या गप्पा मारणे - ही चार प्रकारची संभाषणे पाप आहेत.
हे आपलं उगाचंच.
मायबोलीवर राजकीय आणि धार्मिक विभागात गदारोळ आणि भांडणांसाठी अनेक धागे आहेत. क्वचित प्रसंगी पाककृतींचे धागेही यातून सुटलेले नाहीत.
मग म्हटलं असा धागा काढूया ज्यात चांगलं सोडून इतर काही लिहीताच येऊ नये.
मंडळी, इथे दोन गोष्टी लिहीणे अपेक्षित आहे.
एक म्हणजे आपण आपल्या मायबोलीवरील सदस्यकालात (सगळी सदस्यनामे मिळून देखील चालेल) आपल्याला कुठल्या मायबोलीकराविषयी काय चांगले अनुभव आले याचे आपण जमेल तितके विस्तृत वर्णन करावयाचे आहे.
मग तुम्हाला केली गेलेली मदत, दिलेला आधार, जमलेली मैत्री, मिळालेला वैद्यकीय सल्ला, सुचवलेले स्थळ असे काहीही अनुभव असू शकतात. आणि हे अनुभव आंतरजालावर आणि प्रत्यक्षात भेटून असे दोन्ही प्रकारचे असू शकतात.
दुसरं म्हणजे आपल्याला एखाद्या व्यक्तीत आढळणारे काही चांगले गुणही आपण इथे लिहावेत.
टीपः
(१) अवलोकनात अनेक जणांनी अनेक कारणास्तव आपले नाव लिहीलेले नसते. तेव्हा हे अनुभव लिहीताना सभ्यतेचे संकेत पाळत त्या सदस्यनामा मागील खरे नाव लिहायचे झाल्यास त्या सदस्याची परवानगी मात्र घ्यावी.
(२) शक्यतो अवांतर टिप्पण्या टाळाव्यात.
तर मंडळी, एकमेकांविषयी आलेले चांगले अनुभव आणि तुम्हाला आढळणारे चांगले गुण लिहा बरे! फक्त आणि फक्त चांगलंच लिहायचं आहे!!
माझा उल्लेख वाचून कसं भरून
माझा उल्लेख वाचून कसं भरून आलं..... माझ्यासाठी माझे इथले मित्रमैत्रिणी म्हणजे मर्मबंधातली ठेव आहेत..
उल्लेख कुणाकुणाचा आणि कशाकशाचा करू ?
पियू अक्षरशा: मला पण लिहि
पियू अक्षरशा: मला पण लिहि ताना अस्संच फिस्स्कन हसू आलं होतं.
काही पोस्टी वाचून ते लोक वस्सवस्स करून अंगावर जातायत असंच वाटतं
दिनेश तेव्हढी गुगलवाली लाईन
दिनेश तेव्हढी गुगलवाली लाईन इग्नोर मारा बर का
खुपशा व्यक्ती आहेत. उलट एखादी
खुपशा व्यक्ती आहेत. उलट एखादी राहीली तर गैरसमज होईल असे वाटते. पण सावकाशीने लिहेन.
मी उद्यापर्यंत बहुतेक खाली
मी उद्यापर्यंत बहुतेक खाली दिलेला धागा काढणार आहे.
हे आपल्याला का आवडत नाहीत?
दक्षिणा, मनापासून आभार मानतो
दक्षिणा,
मनापासून आभार मानतो तुमचे.
वस्स वस्स >>>> दक्षे कोण ते
वस्स वस्स >>>>
दक्षे कोण ते पण लिहायचस की.
दक्षिणा धन्स सो मच
दक्षिणा धन्स सो मच
अन् मग १५ दिवसानी... आता तरी
अन् मग १५ दिवसानी...
आता तरी हे आपल्याला आवडू लागले आहेत का?
हे आपल्याला का आवडत नाहीत?>>
हे आपल्याला का आवडत नाहीत?>> शक्यतो नका काढु ! कारण मला तुमच्या जवळपास सगळ्या धाग्यांवर लिहायचे असते.हा धागा काढ्ला तर मला लिहिण्याजोगं काहीच नसेल .
वरच्या बर्याच पोस्टींना
वरच्या बर्याच पोस्टींना +१११
प्लस मला जागु च्या माश्यांच्या पा. कृ. आवडतात
मी सुरुवातीला जेव्हा
मी सुरुवातीला जेव्हा मायबोलीवर जॉईन झाले तेव्हा कुठल्या गप्पाच्या पानांवर नसायचे.. तेव्हा मायबोलीवर कथा कादंबर्या बर्यापैकी येत होत्या त्यामुळे त्या वाचुन केवळ मनोरंजन करुन घेणे हाच उद्देश असायचा.. फार्फार तर एखादी कमेंट इतकच... गेल्या वर्ष-दीड वर्षात गप्पांच्या पानांवर नियमीत हजेरी लागु लागली.. त्यात पहील म्हणजे "गप्पागोष्टी" अहो-जाहो करत करत हळु हळु एकेरी आणि आता टोपणनाव, बहाल केली गेलेली विशेषनामं इथपर्यंत मजल मारली आहे... झाल पयल नमन.. आता मुख्य विषय.. मला हे का आवडतात.. हे म्हणजे मायबोलीवरील काही आवडते आय डि..
१. नंदीनी:- मायबोलीवर लॉग इन होण्याच निमित्त म्हणजे नंदीनीचा "मी केलेला वेंधळेपणा" हा धागा.. नंतर तिच प्रत्येक लिखाण वाचल. अनेक चर्चात्मक धाग्यांवरील तिची मत वाचत गेले.. मला तिच्या कथा, कादंबर्यांपेक्षा जास्त काय आवडल असेल तर तिचा रोखठोक आणि सडेतोड स्वभाव..
२. दिनेशदा:- मला वाटत प्रत्येक माबोकराचे आवडते असतील हे.. काय एकेक पाकृ असतात ग्रेटच.. सोबत खुसखुशीत वर्णनही असत आणि जमेल तिथे अतिशय उपयुक्त माहीती देखील.. कुठेतरी वाचलय किंवा ऐकलय की तुम्ही केलेल अन्न हे सर्वप्रथम नजरेने खाल्ल गेल पाहीजे.. याच उत्तम उदाहरण म्हणजे दिनेशदांच्या पाककृतींचे धागे.. पदार्थ नुसता करुन ठेवत नाहित तर त्याची सजावट सुद्धा सुंदर असते..
३. बेफीकिर:- फॅन आहे मी यांच्या कथा कादंबर्यांची..
४. विशाल कुलकर्णी, कौतुक शिरोडकर, कवठीचाफा:- मानल या तिघांनाही.. ग्रेट्टच..
५. गप्पागोष्टी धाग्यावरचे सगळेच छान आहेत त्यामुळे सगळेच आवडते आहेत..
आणि सगळ्यात महत्त्वाच म्हणजे "आम्ही कोल्हापुरी" धाग्यावरची एकापेक्षा एक माणस.. माझ्या आयुष्यातला आनंदाचा ठेवा आहेत हे सगळेजण म्हणजे.. प्रत्येकाबद्दल वेगळ लिहील तर एक नवा धागा तयार होईल आणि तिथल्या तीन 'अ'कारांबद्दल लिहीण म्हणजे माझ्यासारख्या येरागबाळ्याचे काम नोहे... तेव्हा ते सगळे आवडतात इतकच..
या सगळ्यात एक नाव विसरले ती म्हणजे स्वप्ना_राज... संथ चालति या मालिका धाग्याची स्टार आहे ती.. मालिकेतल्या एखाद्या दृश्याचा पंचनामा करावा तर तिनेच.. तिच्या पोस्टिला प्रतिसाद देताना मायबोलीने उपलब्ध करुन दिलेल्या स्मायलीज कमी पडतात, पण प्रत्यक्षात हसण काही थांबत नाही..
विशाल कुलकर्णी, कौतुक
विशाल कुलकर्णी, कौतुक शिरोडकर, कवठीचाफा:- मानल या तिघांनाही.. ग्रेट्टच..>>+१
कशी विसरले मी.
.
.
...
...
मराठी आंतरजालांवर मी मायबोली
मराठी आंतरजालांवर मी मायबोली या संस्थळामुळे आलो, त्यामुळे मायबोलीचे आभार. मायबोलीवर श्री गजानन कागलकर उर्फ जामोप्या यांचे बिनतोड प्रतिवाद, त्यांचे मार्मिक टोले वाचुन आपणही अशी टोलेबाजी करावी अशी इच्छा तयार झाली व मी इथे लिहायला सुरवात केली(तसे जमत नाही हि बाब अलाहिदा). त्याच सुमारास इब्लिस मंदार जोशी मास्तुरे गामा दासु उदयन विकु ईत्यादींचे प्रतिसाद व सामने बघुन इथे थांबावेसे वाटले.
माझ्या निवृत्तीच्या काळांतच
माझ्या निवृत्तीच्या काळांतच मी मायबोलीवर रुजूं झालों. हा काळ अर्थपूर्ण व आनंददायी करणारे मायबोलीचे संस्थापक, संकेतस्थळाचे व्यवस्थापक व समस्त मायबोलीकर यांचं माझ्यावरचं ॠण हीच खरं तर आतां माझ्या जगण्यासाठीची शिदोरीही आहे !
वर आदराने उल्लेखिलेल्या बहुतेक मायबोलीकरांचं लेखन मीं वाचलं आहे, त्यातलीं वैशिष्ठ्यहीं टिपलीं आहेत व त्या त्या लेखनावरच्या प्रतिसादात कौतुकानं तसं म्हटलंही आहे. पण प्रत्यक्ष असा मात्र मीं दोनच मायबोलीकराना भेटलो आहे - श्री पाटील [ त्यांच्या चित्रांच्या प्रदर्शनात] व श्री गिरीश कुलकर्णी [ त्यांच्या कवितांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात]. ह्या दोन्ही भेटी ते दोघंही खूप गडबडीत असताना झाल्या होत्या तरीही त्यानी जी खास आपुलकी दाखवली त्यातून त्यांचं उमदेपण जाणवलंच ! अर्थात या दोघांचाही मीं पक्का 'फॅन' आहेच !
'गजाली' हा कोकणी गप्पांचा धागा म्हणजे घरच्या खेळपट्टीवर खेळल्यासारखं !'गजाली'कराना काम-धंद्यामुळे इथं मनसोक्त गप्पा मारतां येत नाहीत, ही त्यांची सलही जाणवत रहातेच.
वर इतरानी उल्लेखिल्या माझ्याही आवडीच्या माबोकरांमधे मला यांचाही उल्लेख करावासा वाटतो - १] पल्ली - कविता. शब्द, कल्पना व प्रतिमा यांचा तरल संगम २] इथले गिर्यारोहक व भटके - मला त्यांचं नुसतं कौतुकच नाही तर हेवाही वाटतो व ३] क्रिकेटच्या धाग्यांवर सहभाग घेणारे, खेळाची आत्यंतिक आवड व खरीखुरी जाण असणारे माबोकर; माझी क्रिकेटची समज -व त्या खेळाचं रसग्रहण- त्यांच्यामुळे कितीतरी पटीनी वाढली आहे !
मुग्धटली मनःपूर्वक आभारी
मुग्धटली
मनःपूर्वक आभारी आहे.
इथे लाईकची सुविधा असायला हवी
इथे लाईकची सुविधा असायला हवी होती
इथे लाईकची सुविधा असायला हवी
इथे लाईकची सुविधा असायला हवी होती>>>>>..काय बाई चावटपणा करायला लागलीत मन्डळी.:फिदी::दिवा:
श्री. अशोक पाटील (अजुनही काही
धन्यवाद चेतन, एवढ्या मोठ्या
धन्यवाद चेतन,
एवढ्या मोठ्या यादीत मला सामावून घेतल्याबद्दल
कुणावरही वस्सवस्स करून अंगावर
कुणावरही वस्सवस्स करून अंगावर जात नाहीत >>> इथे सगळ्यांनाच जमत नाही हे.
(No subject)
धन्यवाद चेतन.
धन्यवाद चेतन.:स्मित:
श्री बोलने वाली थी, पण
श्री बोलने वाली थी, पण जाऊदे आवरतं घेते.
चेतन धन्यवाद.
कुणावरही वस्सवस्स करून अंगावर
कुणावरही वस्सवस्स करून अंगावर जात नाहीत >>> वस्सवस्स>> काय पोटेन्शियल आहे शब्दात!! भक्कन असं डोळ्यासमोरच येतं ना राव
इथे प्रत्येकजण आपापल्या जागी योग्य असल्यामुळे (ड्यु आय सकट ) सर्वच जण पटतात आवडतात...
प्रत्यक्ष कोणाची जास्त भेट झाली नाही... सगळेच्या सगळे गटग आणि ववि मिसल्याने
पण ऑनलाईन वावरात जास्त आवडलेल्यांपैकी
अरूंधती कुलकर्णी : मदत करायला हिला फार ओळख पाळख लागत नाही.... अतिशय उत्साही, आपल्या उमेदीच्या प्रभावी शब्दांनी मेलेल्यालाही संजीवनी देऊन जागवणारी, जगवणारी, तगवणारी
स्वाती २ : संयत शब्दांत योग्य माहीती, धाग्याशी निगडीतच पोस्ट्स
चिनुक्स : भांडकुदळ पोस्टस वर ही आणि संवेदनाशील विषयांवर अतिशय संयत शब्दात योग्य माहीती
अशोक मामा : तेच आपुलकीने जिव्हाळ्याने बोलणं, संयत शब्दांत योग्य माहीती
सुरेश शिंदे : सोप्या, ओघवत्या, उत्कंठावर्धक आणि इंटरेस्टिंग पद्धतीने मेडिकल अनुभव सांगतात
जागू : नॉनव्हेज विशेषत: मासे स्पेशल रेसीपीज आणि निसर्गाची माहीती
दिनेशदा : मृदू स्वभाव, देशोदेशीची माहीती, असंख्य खुसखुशीत, रसरशीत, कुरकुरीत, रसभरीत पदार्थ सोप्प्या पद्धतीने स्पेशल टिप्ससह आणि तोंपासू, देखण्या प्रचिंसह देणारे उत्तम शेफ
बेफिकीर : व्यक्ती आणि प्रसंग वर्णन खासीयत, काही पॅराग्राफ उच्च
नंदिनी : मसालेदार कथा पण सगळ्याची तर्कसंगत सुसंगती (भलेही मध्ये कितीही दिवसांचा क्रमशः रेंगाळलेला असो )
दाद, मधुरिमा (सुपरमॉम जुन्या मायबोलीवरील) यांच्या नात्यांची सुखद जीवघेणी लाघवी गुंतवणूक असलेल्या सकारात्मक कथा.
रिया, साती, सिमंतीनी, दक्षिणा, नीधप (कथा आणि कॉश्च्युम डिझायनिंग प्रोफेशनची खूप छान माहीती) : सडेतोड! चुकतंय असं कोणीतरी नीडरपणे सांगावं असं वाटत असताना सुखद रित्या स्पष्टपणे, नीडरपणे आपलं म्हणणं मांडू शकणार्या! (आस्मादिक मुखदुर्बळ असल्याने हा सडेतोडपणा आवडतो)
विशाल कुलकर्णी, कौतुक शिरोडकर, कवठीचाफा >> भयकथा, गूढकथा, रहस्यकथा अशा आवडत्या विषयांचे विशेषज्ञ
स्वप्ना राज : अप्रतिम आधे अधुरे पन्नेसाठी आणि सिरीयल्स वरील बेफाट टिक्काटिप्पणीच्या षटकारांसाठी!
धुंद रवी : स्ट्रेस बस्टर कॉमेडी लिखाणासाठी! लुंगी खरेदी कधीही वाचावी...
बी : असंख्य अगणित निरागस प्रश्नांनी समोरच्याच्या चेहर्यावर मिनीटभर का हो ईना हसू आणण्यासाठी आणि येस्स "अजरामर आईने अकबरी" साठी!!
भूंगा, सूकि, बासुरी (जुना आयडी सध्या दिसत नाही), ऋयाम आणि असेच अनेक जिव्हाळ्याने विपू करणारे...
जिप्सी : फोटोग्राफी बाप!!!
बागेश्री (खूप गोड मुलगी आहे ही! डार्लींग!!), मुग्धमानसी : अप्रतिम ओघवतं लडिवाळ शब्दरचना, गुंगी आणणारं, मुग्ध करणारं, मनात घुमत राहणारं लेखन
साधना : बर्याच प्रतिक्रिया पटतात (अर्रे आपल्याला हेच्च म्हणायचं होतं इतक्या ), उत्साही, सगळ्या विषयांमध्ये धाग्यांवर मनापासून रमणारी, केक्स स्पेशालिस्ट शेफ
लाजो : पंचतारांकीत शेफ ला लाजवेल अशी सजावट करणारी, उत्साही, हरहुन्नरी गोड पदार्थ स्पेशालिस्ट
वर्षूनील : माबो फॅशन दिवा (दिवे घ्या मधला नाही )
आणि असेच असंख्य......... कोणी चुकून राहीले असतील तर जसे आठवतील तसे अपडेटीन
मायबोलीने, मायबोलीकरांनी विचार समृद्ध केले, सांभाळून घेतले, असंख्य विषयांवर माहीती दिली, जिव्हाळ्याने विचारपूस केली, मनमुराद हसवले, चुकत माकत शिकत (यथातथा) सुगरण बनायला मदत केली, जगभराचे अपडेट्स दिले, हसत हसत रेशमी चिमटे, कोपरखळ्या, टक्केटोणपे, क्वचित शाब्दीक हाणामारी ओचकारे बोचकारे फटकारे झेलायची ताकद आणि द्यायची हिंमत शिकवली.... अजून काय लिहू... बस्स अशीच नाळ जुळलेली राहो मायबोलीशी आणि तमाम माबोकरांशी!!
(नुकतंच बेफिकीर यांच्या मायबोली गजबजचं (आठवत नाही नक्की कितवं ते) पारायण करत असताना अचानक वाचनात आलेल्या या वाक्यासारखं वाटतंय मायबोलीवरील सुसंवादांमुळे हृदयविकाराचा झटका आल्यानंतर मिळालेल्या वैद्यकीय सेवेवरचा तपशीलवार लेख पुन्हा मायबोलीवरच लिहून माबोप्रेम सिद्ध करण्यापर्यंत काही आय डीं ची मजल गेली.
ड्रिमे :* :* :*
ड्रिमे :* :* :*
बेफी- ह्यांच्या कांदबर्या,
बेफी- ह्यांच्या कांदबर्या, मी मायबोलीवर सभासद होण्याला कारणीभुत आहेत. लेखन फार आवडत. प्रत्यक्श भेट नाही. ओळख नाही. पण इथल्या वावरावरुन, लेखनातुन माणुस म्हणुन जेन्युइन वाटले नेहमीच.<<++1 मी मायबोलीवर सभासद होण्याला (ओल्ड मंक लार्ज .... ऑन द रॉक्स) कादंबरी कारणीभुत आहेत
डॉ. सुरेश शिन्दे : क्लिष्ट वैद्यकीय केसेससुद्धा अतिशय सोप्या आणि मृदु पद्धतीने सांगण्याची हातोटी
स्वप्नसुंदरी व
स्वप्नसुंदरी व नक्सकुमार,
अनेक आभार आपल्य दोघांचे!
>>> मायबोली गजबजचं (आठवत नाही नक्की कितवं ते) पारायण करत असताना <<<
>>>मी मायबोलीवर सभासद होण्याला (ओल्ड मंक लार्ज .... ऑन द रॉक्स) कादंबरी कारणीभुत आहेत<<<
ह्यासाठी विशेष आभार!
Pages