पारुष्यमनृतं चैव पैशुन्यं चापि सर्वशः ।
असम्बध्धप्रलापश्च वाङ्ग्मयं स्याच्चतुर्विधम् ॥
अर्थातः कठोर वचन उच्चारणे, खोटे बोलणे, चहाडी करणे, आणि बिनकामाच्या गप्पा मारणे - ही चार प्रकारची संभाषणे पाप आहेत.
हे आपलं उगाचंच.
मायबोलीवर राजकीय आणि धार्मिक विभागात गदारोळ आणि भांडणांसाठी अनेक धागे आहेत. क्वचित प्रसंगी पाककृतींचे धागेही यातून सुटलेले नाहीत.
मग म्हटलं असा धागा काढूया ज्यात चांगलं सोडून इतर काही लिहीताच येऊ नये.
मंडळी, इथे दोन गोष्टी लिहीणे अपेक्षित आहे.
एक म्हणजे आपण आपल्या मायबोलीवरील सदस्यकालात (सगळी सदस्यनामे मिळून देखील चालेल) आपल्याला कुठल्या मायबोलीकराविषयी काय चांगले अनुभव आले याचे आपण जमेल तितके विस्तृत वर्णन करावयाचे आहे.
मग तुम्हाला केली गेलेली मदत, दिलेला आधार, जमलेली मैत्री, मिळालेला वैद्यकीय सल्ला, सुचवलेले स्थळ असे काहीही अनुभव असू शकतात. आणि हे अनुभव आंतरजालावर आणि प्रत्यक्षात भेटून असे दोन्ही प्रकारचे असू शकतात.
दुसरं म्हणजे आपल्याला एखाद्या व्यक्तीत आढळणारे काही चांगले गुणही आपण इथे लिहावेत.
टीपः
(१) अवलोकनात अनेक जणांनी अनेक कारणास्तव आपले नाव लिहीलेले नसते. तेव्हा हे अनुभव लिहीताना सभ्यतेचे संकेत पाळत त्या सदस्यनामा मागील खरे नाव लिहायचे झाल्यास त्या सदस्याची परवानगी मात्र घ्यावी.
(२) शक्यतो अवांतर टिप्पण्या टाळाव्यात.
तर मंडळी, एकमेकांविषयी आलेले चांगले अनुभव आणि तुम्हाला आढळणारे चांगले गुण लिहा बरे! फक्त आणि फक्त चांगलंच लिहायचं आहे!!
(No subject)
एस.आर.डी. ===> त्यांच्या
एस.आर.डी. ===> त्यांच्या भटकंतीच्या ज्ञानामुळे.
अन्जू ====> स्वतःची दू:खे विसरत आणि नशीबाला दोष न देता, आहे त्या परीस्थितीला हसतमुख चेहर्याने सामोरे जाणारे व्यक्तिमत्व.
आम्हाला मुखवट्यांपेक्षा, त्याच्या आत दडलेले चेहरे शोधण्यातच जास्त रस.त्यामुळे प्रत्यक्ष व्यक्ती भेटल्याशिवाय, त्या व्यक्तीचे व्यक्तीमत्व, आम्हाला तरी ओळखता येत नाही. (काय करणार? आम्हाला शंकाच फार येतात.)
लिहीतांना काय हो, मनुष्य वारेमाप काही पण लिहील.चार-चौघांत थोड्या काळाकरता हास्यलेप पण लावून येईल किंवा उदार व्यक्तीमत्वाची शाल पण पांघरून येईल.
एस.आर.डी. आणि अन्जू , ह्यांना गेली २ वर्षे ओळखत असल्याने आणि एकदम घरगुती संबंध असल्याने ह्यांच्या विषयी खात्री देवू शकतो , की ह्यांचे मुखवटे आणि चेहरे सारखेच आहेत.
बेफी तुम्हा माबोवर स्टार
बेफी तुम्हा माबोवर स्टार झालात की.
अरे वा! मस्त धागा आहे. मला
अरे वा! मस्त धागा आहे.
मला आवडणारे खूप माबोवरचे आय्.डी. आहेत.
दिनेशदा-- दिनेशदांचे खुमासदार लेख, पाककृती आणि सजावट, प्रवासवर्णने, निसर्गाच्या गप्पांवरिल थक्क करणारी माहिती, अफाट स्मरणशक्ती आणि हे सर्व असूनही निगर्वी स्वभाव. त्यांच्याशी बोलताना आपणाला कोणतेही दडपण येत नाही, हेच त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य. !
बेफिकीर : बेफिकीर ह्यांचे लेख, कादंबर्या वाचायला आवडतात. एकदा ते श्रेयसमधे दिनेशदांना भेटण्यासाठी घाई-गडबडीत असूनही आले होते तेव्हा पाहिले.
भाऊ नमसकर : मालवणी भाषेतील ह्यांच्या गजाली, प्रसंगानुरुप लगेच व्यंगचित्र , म्हणजे आम्हाला तर मेजवानीच वाटते.
दाद, धुंद रवी, तनया, मानुषी, जागू, किंकर,अशोक मामा, विशाल कुलकर्णी,
मंदार जोशी, चिनुक्स, जिप्सी, मार्को पोलो, यो रॉक्स, आशुचँप, दक्षिणा,
गजाली ग्रुप : ह्या ग्रूपमुळे मला मालवणी भाषेत गप्पा मारता आल्या, नि.ग. ग्रुप मला खूप जवळचे वाटतात.
अजून बरेच आहेत पण आता परत कधीतरी लिहिन.
जयंतजी धन्यवाद पण तुम्ही जरा
जयंतजी धन्यवाद पण तुम्ही जरा जास्त कौतुक केलंत माझं.
@ अन्जू....तसे नाही. मला उगाच
@ अन्जू....तसे नाही. मला उगाच कुणाशी मखलाशी करायला जमत नाही.
Stutya upakran. Chan
Stutya upakran. Chan vatavaran aahe ithe, tyatach itake sundar upakram chalvat ahat. Kautukaspad aahe. Pratyakasha kunala olakhat nahee..so sad
Namobhaktana pan kunitari asa chan vagayala shikava. Fb var kay ghanerade msg forward kartat. Sick ppl..
प्रज्ञा कुलकर्णी, दिनेशदा व
प्रज्ञा कुलकर्णी,
दिनेशदा व बेफिकीरजी खूपच मोठ्या मनाची माणसं आहेत म्हणून... नाहीं तर मला त्यांच्या पक्तीत बसवलंत हें महाग पडलं असतं तुम्हाला !
तरी पण धन्यवाद कारण मला मात्र सततच्या टोंमण्यांच्या भडीमारातून वाचवलंय तुम्ही -
(No subject)
भाउ तुमचे नाव पंक्तीत यायलाच
भाउ तुमचे नाव पंक्तीत यायलाच हवं . माझी सगळी यादी अजुन पुर्ण नाहीये तरी तुम्ही खात्री बाळगा त्यायादीत सुरवातीच्या नावांमधे असण्याची कारण तुमची चित्र पाहुन जितका आनंद मला इथे होतो तीतका आनंद हजार शब्दांच्या प्रतीसादातही नसतो . या धाग्यावरचं चित्र मस्त धमाल आहे.
भाऊ
भाऊ
भाऊकाका प्रज्ञाने लिहिलंय की
भाऊकाका प्रज्ञाने लिहिलंय की तुमचं नाव.
बाकी व्यंगचित्र सॉलिड नेहेमीप्रमाणे.
इथे लिहिणार्यांनी आवडत्या
इथे लिहिणार्यांनी आवडत्या माबोकरांची नावे बोल्ड अक्षरात लिहावीत. म्हणजे आमच्यासारख्या वाचकांना आपले नाव आहे की नाही हे पोस्टवरून एक नजर टाकली तरी लक्षात येईल. तेवढ्यासाठी सगळे वाचत बसावे लागणार नाही.
गजानन
गजानन
<< भाऊकाका प्रज्ञाने लिहिलंय
<< भाऊकाका प्रज्ञाने लिहिलंय की तुमचं नाव.>> अहो, व्यंचि व व्यंचिवरची पोस्ट त्याला उद्देशूनच आहे !
(No subject)
ओ सॉरी भाऊकाका, मी पोस्ट वरची
ओ सॉरी भाऊकाका, मी पोस्ट वरची वाचलीच नाही. फक्त व्यं चि आणि खालची पोस्ट बघितली.
माझी माबो ची ओळख तशी जुनी
माझी माबो ची ओळख तशी जुनी आहे पण सध्या मराठी कथा-कादंबरी वाचण्याच्या ओढीने नियमित येते. त्यामुळे माझं निरीक्षण हे गेल्या ३-४ महिन्यातील आहे. त्यात मला आवड्लेले काही आयडी:
बेफीकीर : ह्यांच्या कथा मी आवर्जून वाचते. खूप विचारपूर्वक मांडणी आणी गूंतवून ठेवणाय्रा असतात.
mi_anu - ह्यांच विनोदी लिखाण मनापासून आवडतं... खूप वर्षाने मी वाचताना एवढी हसले....
डों. अशोक, जिज्ञासा, मयुरी चवाथे-शिंदे ह्यांचे किस्से, लिखाण मनाला स्पर्श करतात...
चिनूक्स : ह्यांच्या अभ्यास पूर्ण लेखांनी तर मी भारावून गेले आहे..
मला अजूनही मराठी टाईप करायला वेळ लागतो.. पण मी शिकेनच हळू हळू मग आणखी लिहेन....
सिनिजी तुम्ही विचारणा
सिनिजी
तुम्ही विचारणा केलेल्या पोस्टमधे काय चुकीचं आहे हे कळवलेलं नाही अद्याप. माझे फक्त दोनच प्रतिसाद आहेत. एक या धाग्यावर आणि दुसआ आबा धर्मांतरण या धाग्यावर. धन्यवाद.
प्रज्ञा, >>>बेफिकीर :
प्रज्ञा,
>>>बेफिकीर : बेफिकीर ह्यांचे लेख, कादंबर्या वाचायला आवडतात. एकदा ते श्रेयसमधे दिनेशदांना भेटण्यासाठी घाई-गडबडीत असूनही आले होते तेव्हा पाहिले.<<<
हो, बरोबर! आपण भेटलेलो आहोत. अनेक आभार आपले.
सुजाता बापट - आपलेही आभार मानतो
भाऊसाहेब -
* कौतुक शिरोडकर : सगळ्याच्या
* कौतुक शिरोडकर : सगळ्याच्या सगळ्या कथा अप्रतिम
* डॉ. सुरेश शिन्दे : क्लिष्ट वैद्यकीय केसेससुद्धा अतिशय सोप्या आणि मृदु पद्धतीने सांगण्याची हातोटी
* बेफ़िकीर: मी गज़ला फ़ारशा वाचत नाही पण तुमच्या कथा आणि कादंबर्या आवडतात. इतर धाग्यांवरचे प्रतिसादही प्रगल्भ असल्याने आवड्तात.
दिनेशदा: उत्कृष्ट पाककृती, सजावट, विविध विषयांची मौलिक माहिती अभिनिवेशाशिवाय द्यायचा स्वभाव
अजूनही आहेत ....
बेफिकिर ... गजल व कथा दिनेश
बेफिकिर ... गजल व कथा
दिनेश .. सर्व धागे
अशोक पाटिल ... प्रतिक्रिया
.माझे फेवरीट - १. कौतुक
.माझे फेवरीट -
१. कौतुक शिरोडकर - यांचे - "याला म्हणतात नशीब " अक्षरशः एखाद्या movie सारखा डोळ्यासमोर आला वाचताना...
२. विशाल कुलकर्णी - अप्रतिम कथा ...
३. कवठीचाफा / चाफा - एक प्लान ..... खुनाचा
४. बेफिकीर - अप्रतिम कथा आणि कादंबर्या ... माझी विनंती आहे कि बोका त्यांनी परत आणावा .. मला त्या कथा प्रचंड आवडल्या ..
५. नंदिनी - खूप talented .
६.भाऊ नमसकर - नमस्कार तुम्हाला ... अरे किती हसवतात... मानला तुम्हाला...
सर्वच आवडतात. फक्त धिरज
सर्वच आवडतात. फक्त धिरज काटकरांच्या यादितले सोडून आणि हो बाबुराव सुद्धा
ओहो, चेतन आमचे नाव आपल्या
ओहो, चेतन आमचे नाव आपल्या यादीत आलेले पाहून आम्हास भरते आले (आनंदाचे)
तपशिलवार आणि संयम ठेवून चर्चा करणारा दुर्मिळ मनुष्य आहे चेतन _/\_
झक्कींचे नाव कसे आले नाही अजुन ?
त्यांचे लिखाण अनेकदा भिष्माचार्यांप्रमाणे वाटते.
तसे पुराने खिलाडी फार कमी दिसतात आता माबोवर.
दिनेशदा, जागू यांच्या पाककृती अनेकदा वाचत असतो.
बेफिंच्या गझला बर्याच वाचल्या, कादंबरी एकच सोलापूरवाली.
अशोकजी यांचे अभ्यासपुर्ण लेखन,
दाद यांचे रसग्रहणात्मक लेखन
वरदा यांचे पुरातत्वशास्त्रावरील लिखाण.
पुर्वी सावट नावाचा एक आयडी होता अध्यात्मावर यांनी जी काही चर्चा केलेली आहे त्याला तोड नाही.
ते सारे लिखाण शोधून काढून संग्रही ठेवावे असे आहे.
इब्लिस नामक आयडी बाबत मला बरेच कुतुहल आहे.
त्यांच्या लिखाणावरून ते एक फार अनुभवी, बहुआयामी आणि प्रगल्भ व्यक्तिमत्व वाटते.
गापै, मास्तुरे हे दोन आयडी पण मुद्देसूद चर्चेमधे फारच भारी आहेत/होते.
सुधीर काळे (जाकार्ता) यांचे विदेशनितीबद्दल जे काही लेख येत होते ते पण फारच माहितीपुर्ण असत.
कॅमेराप्रेमी लोक सावली आणि कांदापोहे यांचे लिखाण / छायाचित्रे आवडतात.
रैनाचे अभ्यासपुर्ण लिखाण पण भारी.
शशांक पुरंदरेंचे बालसाहित्य धमालच, अगदी आम्ही घरी मुलांना आवर्जुन वाचायला देतो.
अजुन अनेक आहेत, पण आत्ता जेवढे प्रामुख्याने जे आठवले ते लिहिले. अजुन आठवेल तसे यादी संपादित करावी असा मानस आहे.
ओह , ड्रीमगर्ल तू और दीवा
ओह , ड्रीमगर्ल तू और दीवा मै?? थांकु ड्रीमगर्ल!!!
माझी लिस्ट किती लांबलचक आहे, प्रत्येकाचं नांव कसं लिहू...
म्हणून थोडक्यात
१) समस्त निगप्रेमी - येथील निसर्ग प्रेमींमुळे निसर्गा बद्दल उत्सुकता, जवळीक वाटू लागलीये. माझ्या झाडा,फुला,पक्षी,प्राणींबद्दल सा.ज्ञा.त सातत्याने , न कंटाळता प्रत्येक निसर्ग प्रेमी भर टाकत असतो.
२) साहीत्यिक आणी युनिक आर्टिस्ट्स- बेफिकीर, सुरेखा, स्वप्ना-राज, कंसराज, भाऊ नमस्कार, वर्षा, अजय पाटील, जिप्सी, कौतुक
३) पाककृती स्पेशालिस्ट्स- दिनेश, जागू , सुलेखा ,तृप्ती ,सायो ,मृण्मयी , अजून कितीतरी.. या सर्वांकडून नित्य नवे काहीतरी रोज शिकायला मिळते.. अगदी मनापासून , सुंदर रीतीने रेसिपीज पेश करतात हे सर्व..
४) मामी.. वेरी इंटेलिजंट आणी युनिक सेंस ऑफ ह्यूमर
५) बागेश्री , दक्षिणा सारख्या गोड पोरी
निखळ मैत्री झालेले अजून कितीतरी आहेत, अपडेट करेन सावकाश!!!
<< झक्कींचे नाव कसे आले नाही
<< झक्कींचे नाव कसे आले नाही अजुन ?>> माझ्या 'आवडत्यां'च्या यादीत नक्कीच. विशेषतः, 'क्रिकेट'वरच्या धाग्यांवर अशी तुफान फटकेबाजी करणारा विरळाच !!
वावे, काउ, च्रप्स, महेश आणि
वावे, काउ, च्रप्स, महेश आणि वर्षू नील,
खूप खूप आभार!
>>>
बेफी तुम्हा माबोवर स्टार झालात की. स्मित
<<<
दक्षिणा, आधी नव्हतो काय?
माझेही नाव आवडत्यांच्या यादीत
माझेही नाव आवडत्यांच्या यादीत आहे हे वाचून आनंद झाला. धन्यवाद.
निसर्गाच्या गप्पांवरील वेगवेगळी माहीती देणारे सर्व निगकर्स.
माबो वर पहिलीच जवळची ओळख झाली ती अश्विनी के. सोबत. धार्मिक गोष्टींनी कसे समाधान लाभते ह्यावर तिने वारंवार मार्गदर्शन दिले व देते. त्या पाठोपाठ साधना मैत्रीण झाली. बिनधास्त कसे रहायचे ते हिच्याकडून शिकावे. दोघींसोबत नेहमी संपर्कात नसले तरी खुप जवळच्या मैत्रीणी म्हणूनच त्यांचे स्थान आहे.
दिनेशदांची निसर्गावरील माहीती, त्यांचे पाककृतीं मधील विविधता देशोदेशीची माहिती ह्याला तोड नाही. शिवाय एखादी गोष्ट आपल्याकडे आहे हे कळल्यावर त्याचा अजून कसा छान उपयोग कर ता येईल ह्यावर नेहमी सल्ले देतात.
जिप्सी चे फोटो म्हणजे मला तर मायबोलीची शान वाटते. भटकंतीचे लेखही सुंदर असतात.
कांदेपोहे, हिमस्कूल, वर्षा, इंद्रधनुष्य, यो-रॉक्स, पाटील, भाऊ नकस्कार यांचे फोटो, लेख आणि चित्र, अप्रतिम असतात.
वर्षूनिल ला अजून भेटले नाही. मागील बरीच वर्षे फक्त फोनवर आणि वॉट्स अॅपवर कॉन्टॅक्ट आहे पण तिच्या गोड स्वभावाने ती पण अगदी जवळची झाली आहे.
मामी, दक्षिणा, नीधप, रिया, जाई, मंजूडी, मनीमोहोर, शांकली, शोभा, कविन, अनिष्का, उजू, अंजली चितळे, विनार्च, वेल, अखि, मनिषा लिमये, कविता १९७८, पलक, सायली पाटूरकर, साती, सामी, कांचन, थंड, मोनाली, कामिनी यांचे प्रत्येकाचे वेगवेगळे स्वभाव विशेष आवडतात.
डॉ. कैलास गायकवाड यांच्या गझल व त्यांचे सामाजीक कार्य.
सर्व संयुक्तांचे सामाजीक कार्य संयुक्तात मांडण्यात येणारे वेगवेगळे विषय.
चिनुक्स, दाद, विशाल कुलकर्णी, कौतुक शिरोडकर, नंदिनी यांचे लेखन.
बी, बेफिकीर, ऋन्मेष यांचा लेखनाचा दांडगा उत्साह.
बागेश्री, पल्ली यांच्या कविता
शशांक पुरंदरे यांचे बालसाहित्य व ज्ञानेश्वरी वरील लेखन व निसर्गावरील माहीती.
अवल ने इथे बर्याच जणांना ऑनलाईन क्रोशे शिकवले हे कौतुकास्पद आहे. मलाही तिच्या मार्गदर्शना मुळे बर्यापैकी क्रोशे जमू लागले आहे.
नलिनी, जयवी अंबासकर यांच्या कलाकृती सुलेखा यांच्या पाककृती.
अजुन काही नावे राहिलीही असतील. लक्षात आल्यावर सांगतेच.
>>>लेखनाचा दांडगा उत्साह. <<<
>>>लेखनाचा दांडगा उत्साह. <<<
धन्यवाद जागू!
मला तुमच्या मत्स्यरेसिपीज अतिशय आवडतात.
Pages