हे आपल्याला का आवडतात?

Submitted by कोकणस्थ on 8 December, 2014 - 07:08

पारुष्यमनृतं चैव पैशुन्यं चापि सर्वशः ।
असम्बध्धप्रलापश्च वाङ्ग्मयं स्याच्चतुर्विधम् ॥

अर्थातः कठोर वचन उच्चारणे, खोटे बोलणे, चहाडी करणे, आणि बिनकामाच्या गप्पा मारणे - ही चार प्रकारची संभाषणे पाप आहेत.

हे आपलं उगाचंच.

मायबोलीवर राजकीय आणि धार्मिक विभागात गदारोळ आणि भांडणांसाठी अनेक धागे आहेत. क्वचित प्रसंगी पाककृतींचे धागेही यातून सुटलेले नाहीत.

मग म्हटलं असा धागा काढूया ज्यात चांगलं सोडून इतर काही लिहीताच येऊ नये.

मंडळी, इथे दोन गोष्टी लिहीणे अपेक्षित आहे.

एक म्हणजे आपण आपल्या मायबोलीवरील सदस्यकालात (सगळी सदस्यनामे मिळून देखील चालेल) आपल्याला कुठल्या मायबोलीकराविषयी काय चांगले अनुभव आले याचे आपण जमेल तितके विस्तृत वर्णन करावयाचे आहे.
मग तुम्हाला केली गेलेली मदत, दिलेला आधार, जमलेली मैत्री, मिळालेला वैद्यकीय सल्ला, सुचवलेले स्थळ असे काहीही अनुभव असू शकतात. आणि हे अनुभव आंतरजालावर आणि प्रत्यक्षात भेटून असे दोन्ही प्रकारचे असू शकतात.

दुसरं म्हणजे आपल्याला एखाद्या व्यक्तीत आढळणारे काही चांगले गुणही आपण इथे लिहावेत.

टीपः
(१) अवलोकनात अनेक जणांनी अनेक कारणास्तव आपले नाव लिहीलेले नसते. तेव्हा हे अनुभव लिहीताना सभ्यतेचे संकेत पाळत त्या सदस्यनामा मागील खरे नाव लिहायचे झाल्यास त्या सदस्याची परवानगी मात्र घ्यावी.
(२) शक्यतो अवांतर टिप्पण्या टाळाव्यात.

तर मंडळी, एकमेकांविषयी आलेले चांगले अनुभव आणि तुम्हाला आढळणारे चांगले गुण लिहा बरे! फक्त आणि फक्त चांगलंच लिहायचं आहे!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भुंगा बदललाय नि सुपरमॉम झालीय

(कालपासून पोस्ट टाकायची भितीच वाढतेय, लोक माझ्या व्याकरण चुकाच काढतायत : सॉरी फॉर अवांतर)

सर्व मायबोली कायमच आपली कित्येक वर्षे सरली तरीही, पण इथ चिकटलो तो आयडी = दक्षिणा अन लिखाण होत अजुनही क्रमशः राहिलेलं खिद्रापुर ... पहिला ट्रेक विसरता येणार नाही अस काहितरी हेही . धन्यवाद ! Happy

धाग्याची कल्पना अभिनव!
मी मायबोलीवर आजकाल फारसा नियमित नसतो पण सुरुवातीच्या काळात खुप जणांनी लिहण्यासाठी प्रोत्साहन दिले ते सगळे माझ्या आवडत्यांच्या लिस्टमध्ये आहेतच आहेत पण नंतरही अनेक जणांचे लिखाण वेगवेगळ्या कारणांसाठी आवडत गेले.... त्या सगळ्यांबद्दल निवांत लिहिनच!

पण मला या मायबोलीची साधारणत: दहा वर्षापुर्वी ओळख करुन देणार्‍या जुन्या मायबोलीवरच्या "AJ_Onnet" चे विशेष आभार Happy

Pages