पारुष्यमनृतं चैव पैशुन्यं चापि सर्वशः ।
असम्बध्धप्रलापश्च वाङ्ग्मयं स्याच्चतुर्विधम् ॥
अर्थातः कठोर वचन उच्चारणे, खोटे बोलणे, चहाडी करणे, आणि बिनकामाच्या गप्पा मारणे - ही चार प्रकारची संभाषणे पाप आहेत.
हे आपलं उगाचंच.
मायबोलीवर राजकीय आणि धार्मिक विभागात गदारोळ आणि भांडणांसाठी अनेक धागे आहेत. क्वचित प्रसंगी पाककृतींचे धागेही यातून सुटलेले नाहीत.
मग म्हटलं असा धागा काढूया ज्यात चांगलं सोडून इतर काही लिहीताच येऊ नये.
मंडळी, इथे दोन गोष्टी लिहीणे अपेक्षित आहे.
एक म्हणजे आपण आपल्या मायबोलीवरील सदस्यकालात (सगळी सदस्यनामे मिळून देखील चालेल) आपल्याला कुठल्या मायबोलीकराविषयी काय चांगले अनुभव आले याचे आपण जमेल तितके विस्तृत वर्णन करावयाचे आहे.
मग तुम्हाला केली गेलेली मदत, दिलेला आधार, जमलेली मैत्री, मिळालेला वैद्यकीय सल्ला, सुचवलेले स्थळ असे काहीही अनुभव असू शकतात. आणि हे अनुभव आंतरजालावर आणि प्रत्यक्षात भेटून असे दोन्ही प्रकारचे असू शकतात.
दुसरं म्हणजे आपल्याला एखाद्या व्यक्तीत आढळणारे काही चांगले गुणही आपण इथे लिहावेत.
टीपः
(१) अवलोकनात अनेक जणांनी अनेक कारणास्तव आपले नाव लिहीलेले नसते. तेव्हा हे अनुभव लिहीताना सभ्यतेचे संकेत पाळत त्या सदस्यनामा मागील खरे नाव लिहायचे झाल्यास त्या सदस्याची परवानगी मात्र घ्यावी.
(२) शक्यतो अवांतर टिप्पण्या टाळाव्यात.
तर मंडळी, एकमेकांविषयी आलेले चांगले अनुभव आणि तुम्हाला आढळणारे चांगले गुण लिहा बरे! फक्त आणि फक्त चांगलंच लिहायचं आहे!!
तू चांगला आहेस
तू चांगला आहेस
जुने प्रतिसाद येउदे की इथे.
जुने प्रतिसाद येउदे की इथे.
सस्मित, तिथला एकमेव प्रतिसाद
सस्मित, तिथला एकमेव प्रतिसाद जो संयुक्तिक ठरू शकेल व अनुभव सांगणारा आहे तो इथे डकवला आहे.
मंडळी, कृपया विपू पहा, अमुक धागा पहा, अशा पोष्टी न येता आपले अनुभव इथेच लिहावे.
--------------------------------------------------------------------------------------------------
बेफ़िकीर | 8 December, 2014 - 17:06
बापरे, हा धागा लिहितं करणार हे खरं! कितीजणांची नावं लिहायची? फिदीफिदी
चांगला धागा!
आठवतील तसे एकेक प्रसंग, स्मृती अॅड करत राहीनच. पण तूर्त हे खालील (फक्त इतकेच फिदीफिदी) आठवतात.
====================
डॉ. कैलास गायकवाड - मला पल्मनरी एम्बॉलिझम झाल्यानंतरच्या कालावधीत मी अनेकदा मनाच्या समाधानासाठी त्यांना फोन करून सतराशे साठ शंकाकुशंका विचारायचो आणि दरवेळी ते मला मानसिक आधार देत आले आणि शंकानिरसनही करत आले.
सुप्रिया जाधव, विजय पाटील, सानी, दक्षिणा, दाद, निशिकांत देशपांडे, परेश लिमये, कौतुक, श्रुती, वर्षू नील, सस्मित, उल्हासराव, शेवगा, वत्सला, नाना फडणवीस, प्रज्ञा, शशांक अभिषेक, आबासाहेब, सेनापती दुर्योधन, आर्च, असामी, सागर आणि आणखीन अनेक सदस्य (फिदीफिदी) - माझ्या आजाराच्या दरम्यान सुप्रिया जाधव मला येऊन भेटल्या होत्या. इतर अनेकांनी आपुलकीने चौकशी केली व मानसिक आधार दिला. अनेकांची नांवे तर राहूनच गेली असतील येथे देण्यात!
साती, इब्लिस, जामोप्या - मायबोलीवर ऑनलाईन ह्या तिघांना मी अनेक वैद्यकीय शंका विचारल्या व प्रत्येकवेळी अश्या शंकेचे पूर्ण निरसन केले गेले.
स्वाती आंबोळे, समीर चव्हाण, साजिरा, चिनूक्स, गामा, इब्लिस, अस्चिग, मयेकर - ज्ञानात भर पाडणे, आपलेच विचार पुन्हा तपासून घेण्यासाठी बेंचमार्क प्रोव्हाईड करणे वगैरे!
मंदार जोशी, भुंगा, बाई, साती व इतर काही - वाहत्या पानांवर सामावून घेणे हाहा
इतर अनेक मायबोलीकर - माझ्या आईच्या निधनाच्यावेळी मला आधार देणे
माझे प्रतिसाददाते व वाचक!
सरतेशेवटी वेमा आणि अॅडमीन - ज्यांनी मला येथे राहू दिले. पण खरे तर मी असे म्हणेन की त्यांनी येथे सर्वांनाच प्रचंड अभिव्यक्ती स्वातंत्र्य ठेवलेले दिसते, बिकॉज ऑफ विच धिस इज अ युनिक साईट!
कोणाचे नांव राहिले असल्यास क्षमस्व! फिदीफिदी
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
कोकम कोण आहेत? नाही म्हणजे
कोकम कोण आहेत? नाही म्हणजे धाग्याची रीक्षा कॉहा वर दिसली म्हणुन विचारलं.
कोकम चित्पावन कोकणस्थ आहेत
कोकम चित्पावन कोकणस्थ आहेत
(No subject)
(No subject)
मला हा धागा आवडला, भले
मला हा धागा आवडला,
भले माझ्याबद्दल चांगले लिहावेसे वाटेल अशी माबोवर एकही व्यक्ती नसेल,
पण मला इथे बरेच जणांबद्दल लिहायला आवडेल.
- जुन्या मायबोलीवरून
"""मुसावादा वेरमणी सिक्खापदं
"""मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामी"""
अर्थातः कठोर वचन उच्चारणे, खोटे बोलणे, चहाडी करणे, आणि बिनकामाच्या गप्पा मारणे - ही चार प्रकारची संभाषणे पाप आहेत.
प्रत्येकाने स्वता:हा चे प्रतिसाद तपासुन पहावेत. आपल्याहातुन ही पापे झाली आहेत का?
मला हा धागा आवडला, +
मला हा धागा आवडला, + १
बाकीच्यांबद्दल नंतर कधीतरी ,पण आज मला ज्यांनी हा धागा काढला आहे त्यांच्याविषयी चांगले अनुभव लिहायचे आहेत. तुम्ही मला इतके पोत्साहन दिले व माझे कौतुक केले त्याबद्दल मी कायम तुमची ॠणी राहीन.
माझे कौतुक केलेले तुमच्या शब्दात-->>माबोवर जर का मी काही चुकीचे लिहिले तर माफ करा. मी कैच्याकै लिहिते कधी कधी त्यामुळे गैरसमज होतो.धन्यवाद>> अगं शेवटी - पिंडे पिंडे मतिर्भिन: उगाच म्हणत नाहीत. मतमतांतरे असायचीच, किंबहुना त्यानेच मजा येते. फक्त काही आयडींमुळे जेव्हा चर्चा वैय्यक्तिक टिप्पण्यांकडे जाते तेव्हा सगळा कचरा होतो. मला खात्री आहे तू या पातळीवर काही उतरणार नाहीस. तेव्हा त्याबाबतीतही बिंधास राहणे. कैच्याकै सुद्धा एक मत असतेच की .
संस्कृत भाषेत शास्त्रशुध्द अभ्यास असलेल्या व्यक्ती फार कमी असतात आजकाल ,पण तुमचे संस्कृत भाषा व श्लोकां बद्दल असलेले ज्ञान मला फार प्रभावित करते. तुमचे इंग्रजी चेही ज्ञान अतिशय योग्य व शास्त्रीय आहे. तसही पारंपारीकता आणि आधुनिकतेचा मेळ सर्वांत सुंदर असतो.तुमच्या व्यक्तीमत्वातली ही चांगली गोष्ट मला केवळ मी वाचलेल्या तुमच्या लेखनातुन नकळत लक्षात आली. संस्कृत वाचायला कधीही आवडते आणि त्याचा अर्थ नेहमीच आनंद देतो.पण इंग्लिश भाषा व तीचे महत्व जे मला होते, ते तुमच्यामुळे मला जास्त गरजेचे वाटु लागले. व त्यासाठी मी प्रयत्न देखील करत आहे मला याभाषेची खुप मदत होईल पुढील आयुष्यात . मार्गदर्शनासाठी कायम आभारी आहे.
वेळेअभावी अर्धे राहीलेले पोस्ट केले आहे .
आवडला धागा. मस्त
आवडला धागा. मस्त कल्पना.
माझेही छान छान अनुभव आहेतच. सुरुवात अर्थातच अशा मायबोलीकरांनी ज्यांनी गेल्या दहा वर्षाच्या माझ्या सदस्यत्वाच्या काळात माझी साहित्यिक गोडी वाढवली आणि अनुभव विश्व सम्रुद्ध केले. (हा दहा वर्षाचा उल्लेख उगाच मुक्तपिठीय बढाई मारण्यासाठी..बरं का!)
दिनेशदा - पाककृतींतून आणि त्यानंतर व्यक्तिगत ओळख होण्याआधी मी दिनेशदांचे विविध देशांमधले अनुभव वाचून थक्क झालो होतो. त्यांना भेटून तर एखाद्या सेलेब्रीटीला भेटण्याईतका आनंद झाला होता.
दाद - लेखन साधे आणि तरीही प्रभावी कसे करावे हे यांच्याकडून शिकून घ्यावे. यांचे लेखन वाचून किमान दिवसभरतरी मी अंतर्मुख होतोच.
बेफि - यांच्या लेखनावर फारशा प्रतिक्रिया दिल्या नसल्या तरी अक्षरशः झपाटून जाऊन यांच्या कादंबर्या वाचल्या आहेत. हाफ राईस ही सर्वात आवडती. सहसा आपल्या मनात चालणारे हेलकावे जे आपण चोर कप्प्यातच ठेवतो आणि मान्य करायची डेअरींगसुद्धा करु शकत नाही ते अगदी अलगद आपल्या समोर मांडण्यात यांचा हातखंडा. यांचे लिखाण वाचताना 'अगदी अगदी' व्हायला होतं.
आणखीही काही मान्यवर आहेत. नक्कीच लवकरच लिहीन.
सर्वप्रथमः वेमा आणि अॅडमीन -
सर्वप्रथमः वेमा आणि अॅडमीन - ज्यांनी मला येथे राहू दिले. पण खरे तर मी असे म्हणेन की त्यांनी येथे सर्वांनाच प्रचंड अभिव्यक्ती स्वातंत्र्य ठेवलेले दिसते, +१००.
त्यामुळेच ह्या उपक्रमाचे मला कौतुक वाटते, अद्वितीय! दुसरीकडे कुठ्ठे जाण्याची गरज नाही.
(माफ करा, मला श्री. बेफिकीर यांच्यासारखे मॉडर्न मराठी लिहीता येत नाही. बेफिकीर,
नावे लिहीली असती, पण कुणा कुणा ची लिहीणार? काही नावे राहून गेली तर कंपूशाहीचा दोष येईल. शिवाय काही नावे आ़जकाल दिसत नाहीत.
एकंदरीतच इथे अनेक हुषार, अभ्यासू, विद्वान नि शिवाय संतुलित विचारांचे अनेक लोक आहेत. त्यांच्याकडून मी वेळोवेळी बरेच काही काही शिकलो, बरे वाटले.
मी मात्र मोठी चूक केली. मला
मी मात्र मोठी चूक केली. मला झक्कींकडून एक गोष्ट शिकता आली. मला माहीत नाही पण अनेक ठिकाणी वाचलेल्या माहितीनुसार झक्की येथील सर्वात ज्येष्ठ सदस्य असावेत. ह्या वयात ते स्वतःतील चैतन्य जपून ठेवत आहेत, मस्करी करतही आहेत, करून घ्यायलाही मागे पुढे पाहात नाही आहेत. मला हे शिकता आले की मला असे वागणे शिकता येणार नाही. आपण काय काय करू शकत नाही ते दाखवून देणार्यांमधील एक प्रमुख सदस्य असल्याबद्दल झक्कींचे आभार मानतो. हा प्रतिसाद (सुद्धा) मनापासून!
धन्यवाद, बेफी - द फीलिंग इज
धन्यवाद, बेफी - द फीलिंग इज म्यूच्युअल - माहितीत भर आणि विचार पुन्हा तपासले जाणं हे चांगल्या चर्चेचं उभयपक्षी फलित असतं - तेव्हा तोच आणि तितकाच लाभ माझाही होतोच.
इन अॅडिशन तुम्ही (स्वतःचे आणि इतरांचेही) वाचनीय शेर ऐकवता हाही लाभच.
(बाकी माझे आवडते आयडीज माझे कंपूबांधव/भगिनी आहेत. त्यांच्याबद्दल चांगलं बोलायचं पाप माझ्याच्याने होणार नाही. :P)
अरे बाप रे! बाई, काय हे श्रेय
अरे बाप रे! बाई, काय हे श्रेय नाकारणे!
झक्की काकांची पोस्ट फार
झक्की काकांची पोस्ट फार दिवसांनी आली माबोवर.
काका, नमस्कार करतो.
माबोवर येऊ लागलो तेव्हा कमी का होईना, झक्कींच्या पोस्टी येत असत. उत्कृष्ट टायमिंग अन तीक्ष्ण विनोदबुद्धी. मी झक्कींच्या फॅनक्लबात.
अविकुमार, कस्चं कस्चं!
अविकुमार,
कस्चं कस्चं! मनःपूर्वक धन्यवाद
बेफी तुम्ही तुमच्या
बेफी तुम्ही तुमच्या पोस्टमध्ये सेनापती आणि दुर्योधन मध्ये स्वल्पविराम द्यायचे विसरला आहात
विसरलो कुठे? कौरवांचा सेनापती
विसरलो कुठे? कौरवांचा सेनापती दुर्योधनच होता की?
उगाच आपलं बिचार्याला
उगाच आपलं बिचार्याला छेडायचं! हे काही चांगलं आणि ठीक नाही राव!
स्वाती२ व अरुंधती कुलकर्णी हे
स्वाती२ व अरुंधती कुलकर्णी हे दोन आयडी. अवघड माहिती सोप्या आणि स्पष्ट शब्दात देतात. अटेन्शन टू डिटेल व सर्व्हिस ओरीयेंटेड. इन्फोर्मेशन इज पॉवर अँड दि वे दे एमपॉवर पीपल इज अमेझिंग.
(दोघी कुंभमेळ्यात बिछडलेल्या बहिणी असाव्यात अशी माझी उगीच एक बॉलीवूडीय शंका आहे. दोघींनी आपापल्या जवळची लॉकेट तपासायला हवी.)
दि वे दे एमपॉवर पीपल इज
दि वे दे एमपॉवर पीपल इज अमेझिंग<<< +१
सीमंतिनी, +१ स्वाती२ आणि अकु
सीमंतिनी, +१ स्वाती२ आणि अकु साठी! आणि अकु ज्याप्रकारे तुम्हाला चांगल्या कामांना जोडून घेते त्या कौशल्यासाठी सलाम! आणि हो इतके छान मेन्यू कसे सुचतात नेहमी??
सीमंतिनी >> मस्त सेन्स ऑफ ह्युमर रादर wit साठी!
बेफिकीर आणि नंदिनी, तुमच्या कथा वाचून मायबोलीची सदस्य झाले (केवळ प्रतिसाद देता यावा म्हणून)!!
भारती ताई >> अभिजात, छंदबद्ध कवितांसाठी!
अशोक मामा >> नेहमीच वाचनीय अभिप्राय आणि सगळ्यांसाठी असलेलं कौतुक!
अमा आणि शबाना >> सगळ्या पोस्ट्स इतक्या वाचनीय असतात! You don't write anything very different, you just write it differently!
चिनूक्स >> नेहमीच काहीतरी हटके आणि नवीन सादर करण्यासाठी! साहित्यिक मेजवान्यांसाठी!
जिप्सी>> अप्रतिम फोटो! चित्रपटांचा प्रीमियर असो किंवा किल्ले, गणेश विसर्जन! सगळ्याचे सुरेख फोटो!
दिनेशदा >> The Maayboli chef! तुमच्या कृतीने पदार्थ केला तर चुकू म्हटलो तरी चुकणार नाही! आणि तुमचं निसर्गाचं ज्ञान थक्क करणारं आहे!
छान धागा आहे हा! मी आठवेल तशी भर घालणार आहे!
>>अर्थातः कठोर वचन उच्चारणे,
>>अर्थातः कठोर वचन उच्चारणे, खोटे बोलणे, चहाडी करणे, आणि बिनकामाच्या गप्पा मारणे - ही चार प्रकारची संभाषणे पाप आहेत.
हे वाचल्यावर तर मला मायबोलीची "पापीच" घ्यावीशी वाटली.
ठराविकच आयडींबद्दल लिहायचे असे नाही करता येणार. प्रत्येकच आयडीचे काही ना काही योगदान आहे.
त्यातल्या त्यात सर्वात जास्त अॅडमिन (पुर्वी ते क्रमांकासहित अवतरत असत समज देण्यासाठी)
मला मायबोलीवरील सर्वच सदस्य
मला मायबोलीवरील सर्वच सदस्य प्रत्येकातील विशेष गुणनैपुण्यामुळे आवडतात.
(अन हो, अगदी माझ्या शत्रुपक्षातील - कंपुतील आयडीही आवडतात... ते नसले, वा दिसले नाहीत तर चुकल्यासारखे होते).
इथे एकेका विषयातील अभ्यासू, तज्ञ लोक समान पातळीवर भेटतात त्याचे अप्रुप आहे.
माझी स्मृती तकलादू आहे, त्यामुळे एकेक आयडी नावानिशी सांगणे महाअवघड. तरीही आशयरूपात सांगू पहातो...
श्वास चित्रपटाच्या निर्मितीत सहभागी, व अनेकविध चित्रपटविषयक कार्यामधे सहभागी नीरजा,
देशविदेश फिरुन, जीवनात अनेक प्रतिकुल अनुभव झेलुनही, माणसामाणसातील संवाद शोधू पहाणारे दिनेशभौ,
फोटोग्राफीमधील जिप्सीसहित अजुन दोन तीन आयडी...,
चित्रकलेतील एक्स्पर्ट असलेला माझा याहूवरील जुना मित्र पी_एच्_पी,
तसेच याहूवरूनच इकडेही भेटलेला जपानी कान्द्या,
सदाबहार झक्की,
नृत्यामधील एक्स्पर्ट एक आयडी (नाव विसरलो),
जीटीजीकरता गल्फ कन्ट्रिजमधुन बकलावा आणणारी श्यामली,
हाफचड्डीत डाव्या हाताच्या मनगटाने नाक पुसत..... अहो ते वर्णन त्यांच्या बालपणीच्या गोष्टीचे... ते करणारे लाल टीशर्टातील राहूल फाटक,
किंचाळत का होईना, पण म्हशींवर बसून बघणारी नंदिनी अन तिची मैत्रीण (तिचे नाव विसरलो)
अजुनहि जमीनीवरच पाय असणारा सरकारी अधिकारी हूडा...
एकेकाळची अत्तरांची डिस्ट्रिब्युटर, अन मला उदबत्ती बनविण्याचे पुस्तक क्युरिअरने पाठवणारी (अमा)मामी
आवडणारे मुंबईकर/ठाणेकर तर कितीक आहेत.... खासकरुन दंड अन शेंडी वाले घारूअण्णा, किरण फोन्ट वाला किरण, माझ्या हट्टाखातर मला "वस्तु" देणारे मालक (" आयडी?? नाव???") अन ती पुण्यास वस्तु पोहोच करणारे देसाई,
माझ्या अत्यंत प्रतिकुल काळात जेव्हा माझ्याबरोबर बोलायचे धाडस एकही आयडी करीत नव्हती, तेव्हा ठामपणे रोजच्या रोज मला "नमस्कार/राम राम" करणारा किस्ना, जोडीला तेव्हाच माझी प्रत्यक्ष भेट घेणारा झकोबा....
असंख्य नावे आहेत हो,....
.....
ए वेळ अपुरा पडतोय लिहायला, असंख्य नावे आहेत, लिहायचि राहीली आहेत, त्यांनी क्रुपया रागावू नये.
बेफी- ह्यांच्या कांदबर्या,
बेफी- ह्यांच्या कांदबर्या, मी मायबोलीवर सभासद होण्याला कारणीभुत आहेत. लेखन फार आवडत. प्रत्यक्श भेट नाही. ओळख नाही. पण इथल्या वावरावरुन, लेखनातुन माणुस म्हणुन जेन्युइन वाटले नेहमीच.
रीया, सेनापती, बागेश्री, दक्शिणा, भुंगा, शुभांगी कुलकर्णी अशी कॉहाची मेम्बरं. (हाय रे मेरा कॉहा :-)) खुप गप्पा मारल्या. चर्चा केल्या. मजा मस्करी केली. (पुन्हा हाय रे मेरा कॉहा :-))
दाद- लेखन अतिशय आवडतं.
नंदीनी- लेखन आवडीने वाचते. जरी फिल्मी वाटलं तरी.
दिनेशदा - उत्तम पाकक्रुती असतात. ज्या मला जमतील का कधी असे स्वप्न बघते मी.
नीधप, चिनुक्स,अरुंधती कुलाकर्णी, आणि इतरही बरेच्से जण आपल्या कामाशी संबंधित गोष्टींबद्दल अतिशय उत्तम माहीती देतात.
आणि खुप आहेत. आठवेल तसं लिहिन.
सस्मित, आभारी आहे दिलखुलास
सस्मित, आभारी आहे दिलखुलास दाद दिल्याबद्दल
दिनेश - आवडीने करत असलेल्या
दिनेश - आवडीने करत असलेल्या पाकृ आणि त्यांचे प्रेझेंटेशन. चव माहित नाही कशी असते. त्यांचा मृदू आणि संयमित स्वभाव. (कुणावरही वस्सवस्स करून अंगावर जात नाहीत . प्रत्येक गोष्टीत त्यांचं ज्ञान पाहून मला वाटे की हे गुगल उघडून बघून लिहितात वाट तं
बेफि - यांचं लिखाण उगिचच मोठे मोठे शब्द न वापरता असतं. बर्याचदा त्यांच्या लिखाणातले काही पॅरेग्राफ्स मनाला खूप भिडतात. वाचताना 'अगदी अगदी' असं वाटतं. आपण मनात जे विचार करतो ते नेहमीच आपल्याला शब्दबद्ध करता येत नाही बेफिंना छान जमतं.
स्वाती २ - अगेन नो वस्स वस्स. फक्त संयमित पोस्ट. अगदी वस्स्करून अंगावर जावे असं पोटेन्शियल असलेली पोस्ट सुद्धा संयमित पद्धतिने हातळण्याचे कौशल्य.
जिप्सी/मार्को पोलो/विशाल कुलकर्णी/ अतुलनीय/ शैलजा - फोटोग्राफी सुरेख करतात.
बाकी सर्व मित्र मैत्रिणी - मामा, सई, मुगु, वर्षा, वर्षुनिल, शुकू, मी आर्या..... कोकम, उदयन रिया सस्मित, सेनापती , भ्रमर, भावना, निलू, विवेक देसाई, भुंगा आणि अनेक.
अजून आठवेल तसं लिहि न
स्मितु, दक्षुतै :* किती तरी
स्मितु, दक्षुतै :*
किती तरी थँक्स! मी लिहीन जरा वेळाने
कुणावरही वस्सवस्स करून अंगावर
कुणावरही वस्सवस्स करून अंगावर जात नाहीत
Pages