Submitted by शिवम् on 25 November, 2014 - 14:52
ताटामधील भाकर झाली चकोर आहे..
पोटातल्या भुकेची व्याख्या कठोर आहे...
नाहीच पाहिला मी दगडात देव माझा
तो मायबाप रूपी माझ्या समोर आहे...
चल बांधुयात घरटे गावातल्या ठिकाणी...
शहरी झुळूक झाली कृत्रीम थोर आहे..
देता तुम्ही कशाला लाखोंत मंदिरांना??
तोही उभा विटेवर का लाचखोर आहे??
मी पाळले जरी हो कानून-कायदे ते
अन्याय, ठोकरांचा अंधार घोर आहे...
केली तरी मशागत भरपूर वावराची
पाऊस तो कधीचा बनला मुजोर आहे...
-- शिवम्
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शुभेच्छा. नाहीच पाहिला मी
शुभेच्छा.
नाहीच पाहिला मी दगडात देव माझा
तो मायबाप रूपी माझ्या समोर आहे...
चांगल्या भावना.
छान. केली तरी मशागत भरपूर
छान.
केली तरी मशागत भरपूर वावराची
पाऊस तो कधीचा बनला मुजोर आहे...
मस्तच.
-दिलीप बिरुटे
धन्यवाद समीरजी, बिरुटेसर..!!
धन्यवाद समीरजी, बिरुटेसर..!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ताटामधील भाकर झाली चकोर
ताटामधील भाकर झाली चकोर आहे..
पोटातल्या भुकेची व्याख्या कठोर आहे...
नाहीच पाहिला मी दगडात देव माझा
तो मायबाप रूपी माझ्या समोर आहे...
केली तरी मशागत भरपूर वावराची
पाऊस तो कधीचा बनला मुजोर आहे... >>>> छान, मस्त!
चांगला प्रयत्न सराव कराच
चांगला प्रयत्न सराव कराच खुरसालेंची मदत घेत जा लागेल तेंव्हा
शुभेच्छा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद इस्रोजी, वैवकुजी...!!
धन्यवाद इस्रोजी, वैवकुजी...!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
@वैवकुजी : हो नक्कीच.. खुरसालेंची मदत होतेच आहे..
सुर्रेखच ...
सुर्रेखच ...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद शशांकजी...
धन्यवाद शशांकजी...
ताटामधील भाकर झाली चकोर
ताटामधील भाकर झाली चकोर आहे..
पोटातल्या भुकेची व्याख्या कठोर आहे...
नाहीच पाहिला मी दगडात देव माझा
तो मायबाप रूपी माझ्या समोर आहे...
छानच.
विठूही मस्त .
खुरसालेंची मदत घेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जा लागेल तेंव्हा << नक्कीच हो.
He is doing well.
चल बांधुयात घरटे गावातल्या
चल बांधुयात घरटे गावातल्या ठिकाणी...
शहरी झुळूक झाली कृत्रीम थोर आहे..<<< छान
धन्यवाद बेफिजी , धन्यवाद
धन्यवाद बेफिजी , धन्यवाद सुशांत..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)