झाडात पोखरणारा तांबट

Submitted by जो_एस on 4 December, 2014 - 06:53

सध्या तांबट रोज दर्शन देत आहे. माझ्या घरातून लांबवर दिसणाऱ्या एका वाळालेल्या झाडात कोरून घर तयार करत आहे. गेले ४,५ दिवस त्याचा हा उद्योग चालू आहे. त्याचा फोटो काढणं जरा कठिणच गेलं कारण तो खुपच लांब होता, तो कॅमेरात बसवणं, हात स्थीर ठेवणं अवघड गेलं.
cb1.jpgcb2.jpgcb3.jpgcb4.jpgcb5.jpgcb6.jpgcb7.jpgcb8.jpgcb9.jpgcb10.jpgcb11.jpgcb12.jpgcb13.jpg
आणि हा फुललेला कांचन, त्या कांचनाच्या उजवीकडे मागे ते Y आकाराचं वाळलेलं झाड दिसतय त्यातच तांबट घर करतोय.
kanchan1.jpgkanchan.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आलेत फोटो.. अगदी मन लावून कोरत असतो हा. आमच्याकडे पेरुच्या झाडावर केले होते त्याचे प्रयोग. पण बहुतेक ते लाकूड फार कठीण वाटले त्याला. अर्धवट सोडले त्याने.

मस्त माझ्याकडे White Cheeked Barbet चा फोटो आहे कोरलेल्या घरात जाताना. तुम्ही पाषाण जवळ रहाता ना? एखाद्या विकांताला यायला पाहीजे पक्षीनिरीक्षणाला. Happy

व्वॉ.....किती सुंदर चित्राने दिवसाची सुरुवात झाली. अतिशय कामसू आणि कुटुंबवत्सल असा हा प्रेमळ पक्षी आहे. तांबट आपल्या तांबटिणीवर फार माया करतो. अन्य पक्षी करत नसतील तसले हा एक काम करतो म्हणजे मादीने अंडी दिल्यावर ती उबविण्याचे काम हे तांबटराव करतात.

श्री.मारुती चितमपल्ली यांच्या "पक्षीकोश" पुस्तकात तांबटाचा उल्लेख वाचल्याचे स्मरते.

मस्त फोटो!! २०१४ च्या कालनिर्णयच्या एका पानामागे - 'तांबटाचे दिवस'- हा डॉ. श्रीश क्षीरसागर यांचा मस्त लेख आहे. त्याचीच आठवण झाली.
दा, पेरूचं खोड खूप चिवट असल्यामुळे कदाचित त्याने प्रयत्न सोडून दिला असेल.
अतिशय कामसू आणि कुटुंबवत्सल असा हा प्रेमळ पक्षी आहे>>>> +१००
तांबटिणीवर >>>> Lol हा शब्द खूप आवडला!!

धन्यवाद शांकली....

"तांबटिणी..." हे नाम आम्हीच शोधून काढले होते मागे एकदा.

व्ही.शांताराम यांचा "शांतकिरण स्टुडिओ" होता कोल्हापूरातील रंकाळा तलावामागील परिसरात (आता ती आठवण नाहीशी झाली असून सारे अपार्टमेन्टरुपी जंगलाने माखून गेली आहे ती जागा...) असलेल्या एका प्रचंड वडाच्या साम्राज्यात तांबटाच्या जोड्या रुबाबात राहत असत. त्यावेळी एका तांबटाला आम्ही घरट्यात अंड्यावर बसलेले पाहिले होते....तर शेजारी पेशवीणबाईच्या तोर्‍यात तांबटीण इकडे तिकडे भिरभिर्‍या नजरेने पाहात होती. आगळेच आणि मजेशीर चित्र होते ते.

खूप छान फोटो आलेत ताम्बटबुवान्चे. डोक्यावर आणी गळ्यावर काय मस्त रन्ग आहे.

माझा अत्यंत आवडता पक्षी. मस्त रंगसंगती आणि तो कुक कुक कुक असा काहीतरी ठोकत असल्यासारखा आवाज ऐकला की छान वाटते. झाडीत लपलेला असतो तो शोधणे अवघड असते, आकार आणि रंग दोन्हीमुळे.
पण पोपट, मैना, कोकिळ हयांना लोकसंगीत, बालगीते ह्यात जितके महत्त्व आहे त्या मानाने हा पक्षी अगदी दुर्लक्षित आहे. इंग्रजीत ह्याला कॉपरस्मिथ बार्बेट म्हणतात असे दिसते.
मस्त फोटो आले आहेत.

ह्या तांबटाचं एक गमतीशीर लक्षण म्हणजे, याला चक्क छोट्या मिशा असतात. (हो अगदी तांबटीणीलासुद्धा!!) (अगदी मांजरांमधे मिशांबाबत जसा भेदाभेद नसतो ना तस्साच! :डोमा:)

तांबटिणीवर >>>> हाहा हा शब्द खूप आवडला!!>>>>>>>>
जो एस खूप सुंदर प्रचि.
आणि मिश्यांबाबत शांकलीचे निरिक्षण..............:खोखो:

कालनिर्णयच्या डिसेंबर महिन्याच्या पानाच्या मागे, डॉ. क्षीरसागर यांचा तांबटावर सुंदर लेख आहे.

Back to top