अखेर महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळाले...

Submitted by ऋन्मेऽऽष on 5 December, 2014 - 06:27

"कुठे नेऊन ठेवणार महाराष्ट्र माझा.." या विचाराने जीव टांगणीला लागलेल्या महाराष्ट्रातील सर्वच नागरिकांना अखेर दिलासा मिळाला. सर्व रुसवेफुगवे संपून अखेर युतीतील मित्रपक्षांच्या वादावर पडदा पडत महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळाले.

महाराष्ट्रातील सर्व जनतेचे अभिनंदन आणि सेना-भाजपा युती सरकारला शुभेच्छा!

सत्तेसाठी झालेल्या नेत्यांच्या या मनोमीलनानंतर मधल्या काळात एकमेकांवर टिकास्त्र सोडणारे सैनिक आणि भाजपा समर्थक आता याला कसे स्विकारतात हे बघणे रोचक. याचे सोशल साईटवर काय पडसाद उमटतात याबाबत मी स्वत: उत्सुक.

माझ्या स्वत:पुरते सांगायचे झाल्यास भाजपापाठोपाठ आता शिवसेनाही माझ्या मनातून थोडीफार का होईना उतरली.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिवसेनेला पक्ष म्हणून याचा काहीही लाभ होणार नाही कारण थेट जनतेशी संपर्क असणारी खाती मिळणार नाहीत.
कॅबिनेट मंत्री म्हणून जी पाच डोकी निवडणार आहेत त्यांचा शिवसैनिकांशीसुद्धा थेट संपर्क नाही आणि म्हणूनच आदरही नाही.

उद्धव ठाकरेंनी आपण किती बालिश राजकारण करतो याचा नमुना दाखवला आहे. पोकळी निर्माण तर झाली आहे, भविष्यात मनसे याचा कितपत फायदा उठवू शकते हे पाहणे मनोरंजक ठरेल.

असं स्थिर सरकार, पवारांना बघवणार आहे का ?
आता दोन्ही पक्ष ( परत ) एकत्र आलेच आहेत तर कॉमन अजेंडात असणार्‍या किती भ्र्ष्टाचारांच्या प्रकरणांचा तपास होतोय बघू या !

या विषयावर एक धागा (सत्ताकारण-सचिन पगारे) आधीच काढण्यात आला आहे तेंव्हा या धाग्यावर कोणती वेगळी चर्चा होणे अपेक्षित आहे ते धागा लेखकाने कृपया सांगावे.

या विषयावर एक धागा (सत्ताकारण-सचिन पगारे) आधीच काढण्यात आला आहे तेंव्हा या धाग्यावर कोणती वेगळी चर्चा होणे अपेक्षित आहे ते धागा लेखकाने कृपया सांगावे.>>>>>>

पगार्‍यांचा धागा काँग्रेसी आहे, हा धागा शिवसैनीक कम मनसैनिक सहानभुतीदारांसाठी आहे.

आपल्या आवडी प्रमाणे निवडा

हातच्या कांकंणाला आरसा कश्याला ?

काँग्रेसी ते कोठेही लपले जात नाहीतच !!

:G:

:G:

:G:

>>>उद्धव ठाकरेंनी आपण किती बालिश राजकारण करतो याचा नमुना दाखवला आहे<<<

दुर्दैवी व सत्य विधान

दुर्दैवी काय? ६३ आमदारांच्या प्रमाणात योग्य खाती मिळालीत ,नाहीतरी सेना पॅरलल गव्हर्नमेंटवर विश्वास ठेवणारा पक्ष आहे.
यानिर्णयाने सेना एकाच वेळेस सत्तेत व विरोधात बसु शकते. राज्यातल्या प्रश्नांचा चेंडू भाजपकडे ढकलायचा व स्वतः स्वच्छ राहयचे. राकाँने काँग्रेसबरोबर सत्तेत राहुनही विरोधी पक्षाचे काम केले होते.व सर्वाधिक भ्रष्टाचार करुणही संख्याबळात काँग्रेसला मागे टाकले.

काय उद्योग नसल्यासारखं ज्या त्या गोष्टीवर बीबी उघडून चर्चा करायची? Uhoh
बरं आणि अशा चर्चेचं फलित काय? उगिच लोकांचा वेळ वाया.
तुम्ही ढिग चर्चा कराल इथं, शेवटी सरकार तेच करणार जे त्यांना करायचं आहे आणि देशाचं तेच होणार जे देशाच्या पत्रिकेत लिहिलं आहे ते.

ता. क. - वेळ वाया जातोय तर मी यावर पोस्ट का टाकली असा प्रश्न विचारू नये. धाग्याचे शिर्षक आणि धागाकर्त्याचे नाव पाहून ही पोस्ट टाकली आहे.

ऋन्मेष, एक विनंती...
प्लिज हे असले धागे सार्वजनिक नका करू
ज्यांना या धाग्यांमधे इंटरेस्ट आहे असे लोकं चालू घडामोडीचे सभासद आहेत.

एनसीपीबरोबरची मिलीभगत उघड झाल्याने लोकांत भाजपची जोरदर छीथु झाल्याने त्यांचे चाणक्य जागे झाले आणि सेनेला सत्तेत घ्यायला राजी झाले. शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवून खिजवण्याच्या नादात भाजपची हि फटफजिती झाली. अल्पमतातल सरकार (एनसीपीच्या टेकूवर) चालवत राहायचं, सभागृह आणि बाहेरही सेनेचा कडवा विरोध फेस करायचा हे किती अवघड असणार हे भाजपला समजून आले. सेना फुटेल अश्या आवया उठवून पण हाती काही लागले नाही म्हणून भाजपला शेवटी उपरती खाली.खरे तर विरोधात बसणे हाच खरा सेनेचा हुकमाचा पत्ता होता. भाजप- एनसीपी मिलीभगत लोकांसमोर अजून येत राहिली असती. मात्र कदाचित मुंबई महापालिकेतील समीकरणे, १५ वर्षे सत्तेबाहेर राहिल्याने काहीजणांचा सत्तेत जायचा ओढ यामुळे सेना पण सरकार मध्ये सहभागी झाली असावी मात्र भाजप सत्ता मिळवण्यासाठी उद्या एनसीपीला पण बरोबर घेवू शकतो हे जनतेला समजले हेच एक या सगळ्या अध्यायाचे फलित मानावे लागेल. १२२ + ६३ = १८५ आमदार विधानसभेत असल्याने एक मजबूत सरकार बनले आहे.असो आता निर्णय पटापट होतील , लोकांची कामे मार्गी लागतील हीच अपेक्षा.

१२२ + ६३ = १८५ आमदार विधानसभेत असल्याने एक मजबूत सरकार बनले आहे.

>>>>>>>>>>

माझी एक्स ग’फ्रेंड मला सोडताना मला म्हणाली, आपण यापुढे मित्र म्हणून तरी नक्कीच राहू. मी मोठ्या आनंदाने हो म्हणत तो प्रस्ताव स्विकारला. पण नाही जमले. लवकरच त्यातील फोलपणा समजला. अर्थात राजकारणात बिनसल्यानंतरही जुळवाजुळवीचे राजकारण चालतेच. पण शिवसेनाचा तो पिंड नाहीये. कुरबुर्‍या चालू राहणारच. त्या कदाचित आधीपासूनच असतील पण आता या प्रकरणाने चव्हाट्यावर आल्या आहेत. येत्या काळात यातील जो पक्ष बलशाली बनणार तो दुसर्‍याला डच्चू देण्याचा विचार नेहमीच मनात ठेऊन असणार. आणि हे दोघांनाही ठाऊक आहे. त्यामुळे आता एकत्र असूनही त्यांचे एकमेकांवर कुरघोडी करायचे राजकारण चालणारच.
भाजपाने आपल्या मित्रपक्षाशी युती केली नसून एका विरोधी पक्षाशी युती केली आहे हेच आता अंतिम सत्य आहे.

असो, वरील पगारेंच्या धाग्याबद्दल मला माहीत नव्हते, किंबहुना मी स्वत:च गेले काही दिवस राजकारणाच्या धाग्यांपासून, चर्चेपासून, त्या विषयापासून दूर राहत होतो. या नेत्यांच्या कोलांट्याउड्यांना वैतागलोच होतो. आज मात्र बांध फुटला आणि घडाघडा व्यक्त झालो. पण भावनेच्या भरात काही उलटसुलट लिहायला नको, वा लिहिलेले पोस्टायला नको, म्हणून मग धागा पोस्ट करायच्या आधी ऐनवेळी ते डिलीटले. अन्यथा आता जे पहिल्या पोस्टमध्ये दिसतेय तेवढेच नव्हते तर आणखीही काही होते. असो.
एकंदरीत क्षमस्व, मला कोणाच्या भावना दुखवायच्या नव्हत्या.
सर्वांचेच अभिनंदन, सर्वांनाच शुभेच्छा.
जय हिंद ! जय महाराष्ट्र .! जय गुजरात ..!

न आवडणार्‍या , डोक्यात जाणार्‍या मालिका पाहायचे कम्पल्शन असते तसेच न आवडणार्‍या आयडीजचे डोक्यात जाणार्‍या विषयांवरचे लेख वाचायचे आणि त्यावर प्रतिसाद द्यायचे कम्पल्शन असते हे कळले. संबंधिताना Light 1

ऋन्मेऽऽष, लब्बाड, एक्स-गर्लफ्रेंडचा उल्लेख करून ठराविक आयडीजना ठराविक प्रतिसाद द्यायची सोय करून ठेवली ना? Wink

आता स्थिर सरकार मिळाले आहे, तर इथे नव्या सरकारच्या निर्णयांवर, कामकाजावर `चर्चा' करता येईल. ( निवडणुकांचा उद्देश फक्त, आपल्याला न आवडणारे सरकार घालवून त्याजागी आवडते सरकार येणे हा आहे; तसेच आपल्यापेक्षा वेगळ्या विचाराच्या लोकांना अंगठा दाखवण्यात आयुष्याचे सार्थक आहे असे मानणार्‍या महानुभावांसाठी हे कंसाआधीचे वाक्य नाही.)

Proud

Proud

>>> आता राजकारण हा माणसाच्या जिवणाचा अविभाज्य भाग बनविला गेला आहे... तेव्हा कितीही धागे गोवले तरी तो नित्य नविन आहे.

अखेर मायबोलीला स्थिर धागाकर्ता सापडला, जो स्थिर राहुन नित्यनेमाने रोज किन्वा दिवसा आड एक नवीन धागा विणतो. काही दिवसानी मायबोलीवर स्वेटर विणुन मिळतील अशी जाहिरात चालू घडामोडी या सदरात पहायला मिळेल.:दिवा:

घ्या! स्वतः एकही धागा उघडायचा नाही आणि दुसर्‍याने घागा काढला तर त्याला नावे ठेवायची. इथे कोणी बिचारा नित्यनेमाने धागे काढतोय, हिट्ट करून दाखवतोय, सगळ्यांना त्यात काही ना काही लिहिता वाचता येतंय, तर लोकांना त्याचं जऽऽरा म्हणून कौतुक नाही. Light 1 | Light 1

रूमाल ते राजकारण कोणताही विषय वर्ज्य नाही यांना.

याच धर्तीवर.....
गर्लफ्रेंड ते गजकरण कोणताही विषय वर्ज्य नाही यांना.....अस म्हटलं तर चालेल काय ?

Pages