Submitted by ऋन्मेऽऽष on 5 December, 2014 - 06:27
"कुठे नेऊन ठेवणार महाराष्ट्र माझा.." या विचाराने जीव टांगणीला लागलेल्या महाराष्ट्रातील सर्वच नागरिकांना अखेर दिलासा मिळाला. सर्व रुसवेफुगवे संपून अखेर युतीतील मित्रपक्षांच्या वादावर पडदा पडत महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळाले.
महाराष्ट्रातील सर्व जनतेचे अभिनंदन आणि सेना-भाजपा युती सरकारला शुभेच्छा!
सत्तेसाठी झालेल्या नेत्यांच्या या मनोमीलनानंतर मधल्या काळात एकमेकांवर टिकास्त्र सोडणारे सैनिक आणि भाजपा समर्थक आता याला कसे स्विकारतात हे बघणे रोचक. याचे सोशल साईटवर काय पडसाद उमटतात याबाबत मी स्वत: उत्सुक.
माझ्या स्वत:पुरते सांगायचे झाल्यास भाजपापाठोपाठ आता शिवसेनाही माझ्या मनातून थोडीफार का होईना उतरली.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लाखो करोडो रुपये खाल्लेल्या
लाखो करोडो रुपये खाल्लेल्या सरकारापेक्षा हे बर आहे ना !!
देशाला प्रामाणीक सरकारची गरज आहे लुटारुंची नाही !
एकदा जनतेने मनात आणल आणी वाजवली अशी की आता किमान दहा वीस वर्षे घरी बसतीलच !!
कोण घरी बसलेय ? ज्याना
कोण घरी बसलेय ? ज्याना लुटारु म्हणताय त्यातलेच १०० लोक उधार घेऊन निवडुन. आअलाय ना मोदी ?
आणि म्हणे काँग्रेसमुक्त देश केला !
ज्याना लुटारु म्हणताय
ज्याना लुटारु म्हणताय त्यातलेच १०० लोक उधार घेऊन निवडुन. आअलाय ना मोदी ? >> महाराष्ट्र कार्यकारीणीत त्यांना मानाचे स्थान देण्यात आले आहे.
काउ, >> सकाळी सकाळी ह्यो
काउ,
>> सकाळी सकाळी ह्यो पैलवान उगाचच पार्श्वसंगीत वाजवत फिरत असतो.
इतके निराश होऊ नका. पुढील समयी तुम्हांस खास सुवासिक पार्श्वसंगीतिकेची भेट देईन. दिल खुश?
आ.न.,
-गा.पै.
टीव्हीराव धन्यवाद ! इथले
टीव्हीराव धन्यवाद ! इथले आंधळे मोदीभक्त आयारामांची गुगलवरुन यादी काढा म्हटले तर पळ काढतात...
महाराष्ट्रात अँटी-स्पिटिंग
महाराष्ट्रात अँटी-स्पिटिंग लॉ. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंड आणि सरकारी कार्यालयांमध्ये सफाई करावी लागणार.
मुंबईत हे किती सफल होईल ह्याची शंकाच आहे. ५०% जरी झालं तरी खूप फरक पडेल.
http://m.firstpost.com/india/sweep-and-clean-govt-offices-pay-upto-rs-50...
मुंबई विद्यापीठातील
मुंबई विद्यापीठातील गुणवाढीबाबतचा भ्रष्टाचार - महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एका पानवाल्याला अटक केली आहे आणि विद्यापीठातील कोण कोण ह्यात गुंतले आहे ह्याची तपासणी होणार आहे.
परिक्षेच्या आधीच मुलं व त्यांचे पालक पुढील अॅडमिशनसाठी आवश्यक असलेले मार्क्स मिळावेत म्हणून सेटिंग लावतात. ह्यात वैद्यकिय कारण देवून सोयिस्कर परिक्षा केंद्र निवडणे, परिक्षेच्या बाजूला पुस्तक बाजूला ठेवून पेपर लिहिणे वगैरे सेटिंग विकले जाते.
मुंबई विद्यापीठ एक नामवंत विद्यापीठ म्हणून अजूनपर्यंत तरी ओळखले जाते. सगळी अब्रूच घालवतायत. हरकत नाही, अशीच पाळंमुळं शोधून उखडून टाकायला हवीत. तात्पुरती अब्रु नुकसानी होईल पण किडीला आळा बसू दे.
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/money-for-mark...
महाराष्ट्रात अँटी-स्पिटिंग
महाराष्ट्रात अँटी-स्पिटिंग लॉ. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंड आणि सरकारी कार्यालयांमध्ये सफाई करावी लागणार. >> हा कायदा कडकपणे राबविण्याची गरज आहे. हा कायदा केल्याबद्दल सरकारचे अभिनंदन
सांगली जिल्ह्य़ामधील बत्तीस
सांगली जिल्ह्य़ामधील बत्तीस शिराळा येथे जिवंत नागाची पूजा करण्यास उच्च न्यायालयाने बंदी घातली असल्याने तेथील अनेक वर्षांची परंपरा खंडित झाली झाली आहे. ही पूजा पुन्हा सुरू होऊन नागपंचमी साजरी करता येण्यासाठी कायद्यामध्ये बदल करण्यात येणार आहे : केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर.
नागपंचमीच्या दिवशी बत्तीस शिराळा येथे जिवंत नागांना पकडून त्यांची पूजा केली जात होती. त्याचप्रमाणे त्यांच्या स्पर्धाही घेण्यात येत होत्या. या प्रकाराच्या विरोधात निसर्गप्रेमींनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना उच्च न्यायालयाने वन्यजीव कायद्याच्या अधीन राहूनच नागपंचमी साजरी करण्याचे आदेश मागील वर्षी दिले होते. त्यामुळे जिवंत नागाची पूजा करण्यास बंदी आली होती. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी बत्तीस शिराळ्यातील गावकऱ्यांच्या शिष्टमंडळासह रविवारी पुण्यात जावडेकर यांची भेट घेतली. बत्तीश शिराळयातील नागपंचमीचा उत्सव संकटात आला असल्याने त्यावर मार्ग काढण्याची विनंती गावकऱ्यांनी जावडेकर यांच्याकडे केली.
शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर त्याबाबतची माहिती जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, प्राण्यांवर क्रूरता होऊ नये, याच्याशी आम्ही सहमत आहोत. मात्र बत्तीस शिराळ्यातील नागपंचमीची अनेक वर्षांची परंपरा आहे. ही परंपरा कायम राहून लोकांना नागांची पूजा करता आली पाहिजे. कायद्यातील तरतुदींनुसार न्यायालयाने या पूजेबाबत र्निबध घातले आहेत. त्यामुळे आम्ही कायद्यात बदल करणार आहोत
छान छान. आता आणखी अशा कायद्याने वा न्यायालयाने बंदी आलेल्या कोणकोणत्या प्रथा/परंपरांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी कायद्यात बदल करणार?
बंदी एवढ्यात घातली होती का?
बंदी एवढ्यात घातली होती का? तेथे अशी परंपरा आहे हे अनेक वर्षे ऐकले आहे. एखाद्या सर्पमित्र संस्थेला बरोबर घेऊन नागांना इजा न होता ही परंपरा सुरू ठेवता येत असेल तर काय हरकत आहे? वरकरणी हे सनातनी काम वाटले तरी मला खात्री आहे की तेथील ग्रामस्थांचीही हीच मागणी असेल.
दहीहंडी, गणेशोत्सव,
दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव यासारखे हिमदूंचे सण दरवर्षीप्रमाणेच रस्त्यांवरच किंवा नेहमीच्याच ठिकाणी साजरे करता यावे आणि न्यायालयीन आदेशामुळे त्यात अडथळे येऊ नयेत, यासाठी उच्च न्यायालयात अर्ज सादर करण्याचा निर्णय मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी घेतला आहे. फूटपाथ वापरण्याचा नागरिकांचा हक्कअसला तरी कायदेशीर मार्गाने उत्सव साजरे करण्याचा मंडळांनाही मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे कायदेशीर अडचणी न येता उत्सव कशा पद्धतीने साजरा करता येईल, यासाठी पक्षात विचारमंथन सुरू आहे. या संदर्भात न्यायालयात बाजू मांडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर संबंधितांची बैठकही लवकरच आयोजित केली जाणार असल्याचे शेलार यांनी सांगितले.
तामिळनाडूतील जल्लीकट्टू ,
तामिळनाडूतील जल्लीकट्टू , अन्य काही राज्यांतील बैलांच्या शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी कायद्यात योग्य ते बदल करायचा जावडेकरांचा विचार आहे. निसर्गाची, पशूंची पूजा हा आपल्या राष्ट्रीय संस्कृतीचा भाग असून त्याचे जतन केले पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे.
सार्वजनिक किंवा रस्त्यावर मंडप घालून गणेशोत्सव, नवरात्र, उत्तुंग दहीहंड्या आणि या सार्याला सुमधुर संगीताची जोड देणारी यंत्रे यांची परंपरा किती जुनी आहे बरे?
या बाकीच्या बाबतीत काही
या बाकीच्या बाबतीत काही म्हणणे नाही (म्हणजे कंट्रोल करायला हवा असेच मत आहे). फक्त नागपंचमी च्या तेथील परंपरेबद्दल खूप वर्षे ऐकले आहे. त्यावर बंदी घातली म्हणजे नागांच्या हाताळणी मुळे काही संस्थांनी ती मागणी केली असावी. त्यात सुधार करून ती चालू ठेउ द्यायला हवी, जर तेथील लोकांना हवे असेल तर.
फारएण्ड, >> त्यात सुधार करून
फारएण्ड,
>> त्यात सुधार करून ती चालू ठेउ द्यायला हवी, जर तेथील लोकांना हवे असेल तर.
तुमच्याशी सहमत.
आ.न.,
-गा.पै.
उज्ज्वल परंपरागत हिंदू सणवार
उज्ज्वल परंपरागत हिंदू सणवार वगैरे सगळं ठीकठाक आनंदात असू देत.
त्या मनेकाबाईंनी कुत्री मारायला घातलेली बंदी उठवता येतेय का ते बघेल का हो कुणी?
भरत मयेकर, >> सार्वजनिक किंवा
भरत मयेकर,
>> सार्वजनिक किंवा रस्त्यावर मंडप घालून गणेशोत्सव, नवरात्र, उत्तुंग दहीहंड्या आणि या सार्याला सुमधुर संगीताची
>> जोड देणारी यंत्रे यांची परंपरा किती जुनी आहे बरे?
उत्सवाच्या नावाखाली करण्यात येणारे बेताल वर्तन परंपरेचा भाग नव्हे.
आ.न.,
-गा.पै.
तिथे नागांची पूजा होते.
तिथे नागांची पूजा होते. म्हणजे त्याना हळद-कुंकु वाहिले जाते. त्यामुळे न्युमोनिया होऊन साप मरतात असे वाचले. तसेच त्यांचे अन्न नसलेले दूध त्यांन जबरदस्ती पाजले जाते. यामुळेही साप मृत्युमुखी पडतात. बरं, पूजेसाठी हे नाग पकडले जातात. यात त्यांची बिळे नष्ट होतात.. आता या 'उत्सवामध्ये' सुधार कसा करायचा??
बैल घोड्याप्रमाणे धावु शकत नाहीत. मग त्यांची शर्यत कशासाठी ??
आपले मायबोलिकर गजानन देसाई बत्तीस शिराळ्याचे आहेत. त्यांनी या विषयावर काही लिहिले तर बरे होईल.
बंदी एवढ्यात घातली होती का?
बंदी एवढ्यात घातली होती का? तेथे अशी परंपरा आहे हे अनेक वर्षे ऐकले आहे. >> बंदी घालून बरीच वर्षं झालीत. त्याच्या आधी नाग मंडळांचं प्रबोधन करायचा बराच प्रयत्न केला गेला होता. पण त्यानंतरही फारशी काही सुधारणा झाली नाही. या उत्सवामुळं बरेचसे साप (फक्त नागच नाहि) नंतर मेलेले आढळायचे. माझ्या चांगल्या ओळखीचे एकजण या बंदीच्या मागं होते. त्यानंतर त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. फक्त परंपरेचाच भाग नाहिये तर त्यात आर्थिक हित सुध्दा आहे म्हणून हे सर्वे चालू आहे.
हो असे प्रबोधन सहसा होत नाही.
हो असे प्रबोधन सहसा होत नाही. आधी बंदी घालून मग "त्यापेक्षा..." म्हणून उलटे निगोशिएट करणे त्यातल्या त्यात सोपे :). आर्थिक हित असणार हे बरोबर आहे. पण अनेकवेळा श्रद्धेचा भाग म्हणून कसलाही आर्थिक फायदा नसताना लोक एखादी गोष्ट करणे सोडायला तयार होत नाहीत.
लोकांना नागाची पूजा करण्याची गावातील परंपरा सुरू ठेवण्याचे समाधान, त्यात ज्यांचे (वैध) आर्थिक हितसंबंध आहेत ते जपणे, पण त्याचबरोबर नागांना त्यातून इजा होणार नाही असा मार्ग सर्पमित्र वगैरेंशी बोलून काढणे अगदी अशक्य नसावे.
नागांना हळद कुंकू वाहू नका.
नागांना हळद कुंकू वाहू नका. डोळ्यात वगैरे पण जात असेल बिचार्यांच्या. दूधही त्यांचे खरे अन्नं नाही.
हवं तर दुरून नमस्कार करा. नागाच्या अंगावर न घालता प्रतिक म्हणून एका ताटलीतच हळद कुंकू, फुलं किंवा अजून काही वाहा. दुधाचा नैवेद्यही त्या ताटलीजवळच ठेवा.
खरंच नागोबाला त्याच्या खाण्यायोग्य काही द्यायचे असेल तर उंदीर असतील अश्या ठिकाणी त्याला आपला आपला जावून खावू द्या. भरवायला जायची गरज नाही
------
दहीहंडी बेताच्या उंचीवर बांधून एखाद दुसरा थर लावूनच फोडावी. गोविंदाच्या जिवाला धोका होवू नये म्हणून काळजी घेण्यात यावी. टोकन म्हणून छोटेसे बक्षिस लावावे. कानठळ्या संगीत ऐकून कृष्ण केव्हाच पळून जात असेल. भिंतीएवढे डॉल्बी लावण्याला बंदीच असावी. मिरवणुकीतल्यांनीच वाजवलेली माफक वाद्य असावीत. एकंदरच कुठल्याही उत्सवामध्ये ठणाणा गाणी लावायची गरज नाही.
छान छान. आता आणखी अशा
छान छान. आता आणखी अशा कायद्याने वा न्यायालयाने बंदी आलेल्या कोणकोणत्या प्रथा/परंपरांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी कायद्यात बदल करणार?
>>
विशिष्ट समाजातील मतांसाठी घटस्फोटा संदर्भातील कायदाबदलापेक्षा बरेच आहे की. प्राण्यांप्रती पुज्य भाव जपण्याच्या परंपरेचेच जतन करतायत ना? सतरा बायका करण्याचे आणि बेकायदेशीर घटस्फोट कायदेशीर करण्याची परंपरा तर जतन नाही ना करत?
"पुजा करण्याच्या पद्धतीत सुधार करुन" कायदाबदलाला काय प्रॉब्लेम आहे?
सतीची ,केशवपनाची परंपराही
सतीची ,केशवपनाची परंपराही पुन्हा सुरू करायला हरकत नसावी. नाग ,साप हे काही डोमेस्टिक अॉनिमल्स नाहीत. पूजेच्या एका दिवसापुरतं त्यांना धरायचं म्हटलं तरी त्यातच त्यांना इजा न होणं अशक्य वाटतं. इतर देवताप्रमाणे नागाचीही मूर्तिपूजा अशक्य आहे का? एका बाजूला परंपरा हवी म्हणणार ,दुसरीकडे गणपतीच्या पीओपीच्या उंचच मूर्ती कुठल्या परपरेत बसवणार? तिथे नव्या परंपरा निर्माण करायच्या का? नुसता लोकानुनय चाललाय.इग्रजांचं राज्य नसतं तर सतिबंदीझाली नसती.बालविवाह तर अजूनही सर्रास होतात.
प्रबोधन कोणी करायच? अंनिसने
प्रबोधन कोणी करायच? अंनिसने केलेले चालणार नाही.परिवारातल्या सघटना करणार का?
सतीची ,केशवपनाची परंपराही
सतीची ,केशवपनाची परंपराही पुन्हा सुरू करायला हरकत नसावी. >> असे कोणी म्हणाले आहे का? जादुच्या चश्म्यातुन जास्तीचे दिसते का तुम्हाला?
तुम्ही आणि तुमच्या सदृश सगळे "केवळ आर.एस.एस. / बी.जे.पी. / मोदी ने केल म्हणुन त्याला विरोध" हे धोरण सोडा.
काही दिवसाम्पुर्वी तो ओवैसी ए.बी.पी माझावर युनिक सिव्हिल कोड ला विरोध आहे कारण दोन लग्ने करणे, तलाक म्हणुन घटस्फोट देने ही "आमची" परंपरा आहे असे म्हनाला.
तेव्हा तुमचा थयथयाट कुठे दिसला नाही तो? तेव्ह तुम्ही आणि तुमच्यासदृश ईतर कोणत्या बिळत लपुन बसले होत?
निव्वळ त्या गाव्यातल्या लोकानी एखादी नुसती मागणी केली अजुन कायदा बदलला नाही तर तुमचा एवढा जिव जळतो.
जिथे तो विशिष्ट समाजातल्या लोकांसाठी प्रत्यक्ष बलला गेला तिथे तुमचा थयथयाट दिसत नाही?
अत्यंत अपेक्षित प्रतिसाद.आधी
अत्यंत अपेक्षित प्रतिसाद.आधी शेजारचे घर स्वच्छ करा,मग आमचे. यापुढे टेप कधीच जात नाही.
अत्यंत अपेक्षित प्रतिसाद.आधी
अत्यंत अपेक्षित प्रतिसाद.आधी शेजारचे घर स्वच्छ करा,मग आमचे. यापुढे टेप कधीच जात नाही.
>>
प्रोब्लम असा आहे की शेजारचा त्याचे घर स्वच्छ तर करतच नाही आणि वरतुन ती घाण आमच्या अंगणात टाकतो?
आणि तुम्ही आम्हाल सांगता प्रबोधणाचे?
प्रबोधन कोणी करायच? >> प्रबोधनाच राहु द्या हो. आधी तो अवेळी वाजणारा प्रार्थनेचा भोंगा बंद करुन दाखवा. स्रियांनी बाहेर पडताना काळेच कपडे घालण्याच बंधन ऊठवुन दाखवा. रमझान मुबारक एवजी रमादान करीम च्या सक्तीचा विरोध करुन दाखवा. विशिष्ट कपडे आणि दाढीच्या सक्तीचा विरोध करुन दाखवा. या सगळ्याच प्रबोधन करुन दाखवा आधी. ते कोण करनार? आय.एस.आय? एम.आय.एम? ओवैसी?
विशिष्ट समाजातील मतांसाठी
विशिष्ट समाजातील मतांसाठी घटस्फोटा संदर्भातील कायदाबदलापेक्षा बरेच आहे की. >> त्या समाजात वाइट प्रथा आहेत म्हणून माझ्या समाजात सुध्दा त्या किंवा दुसर्या वाईट प्रथा आल्या पाहिजेत असा हट्ट आहे का? की मी चांगल्या प्रथा पाडून दुसर्या समाजासमोर उदाहरण ठेवीन असा हट्ट केला पाहिजे?
प्राण्यांप्रती पुज्य भाव जपण्याच्या परंपरेचेच जतन करतायत ना? >> तुम्ही कधी बघितला आहे का नाग पंचमीचा उत्सव आणि त्याचे सापांवरचे आफ्टर इफेक्ट्स?
वाईट प्रथा आल्या पाहिजेत असा
वाईट प्रथा आल्या पाहिजेत असा हट्ट आहे का
>> सगळ्यांना चांगल्या प्रथा पाळण्याची "समान" सक्ती / जबाबदारी हवी. हा हट्ट आहे.
तुम्ही कधी बघितला आहे का नाग पंचमीचा उत्सव आणि त्याचे सापांवरचे आफ्टर इफेक्ट्स? >> त्यांनी केवळे हे बिजेपी करतय म्हणुन विरोध केलाच ना? म्हणुन तसा प्रतिसाद दिला. या साणाच्या पुर्णतः विरोधात आहे.
ही "समान" सक्ती / जबाबदारी
ही "समान" सक्ती / जबाबदारी पाळताना धर्म / रेस / संस्क्रूती अडसर ठरु नये हा हटट्ट आहे.
"पुजा करण्याच्या पद्धतीत
"पुजा करण्याच्या पद्धतीत सुधार करुन" कायदाबदलाला काय प्रॉब्लेम आहे?
<<
पूजा करण्याच्या पद्धतीत नक्की काय सुधारणा करणार, अन कोण?
*
बाय द वे, थयथयाट कोण व कसा करतंय ते जरा सांगणार का?
>>
""तेव्हा तुमचा थयथयाट कुठे दिसला नाही तो? तेव्ह तुम्ही आणि तुमच्यासदृश ईतर कोणत्या बिळत लपुन बसले होत? निव्वळ त्या गाव्यातल्या लोकानी एखादी नुसती मागणी केली अजुन कायदा बदलला नाही तर तुमचा एवढा जिव जळतो.
जिथे तो विशिष्ट समाजातल्या लोकांसाठी प्रत्यक्ष बलला गेला तिथे तुमचा थयथयाट दिसत नाही?""
<<
हे तुम्ही लिहीले ते नक्की काय आहे? संयत समंजस सुसंस्कृत शांत प्रतिवाद तो हाच काय?
हे "अमुक तमुक सदृश" हा नवा प्रकार मायबोलीने अंगीकारलेला आहे काय?
Pages