जर हा मृतांचा आकडा मनुष्यवधाचा नसून पशूवधाचा आहे हे बघून आपल्याला दिलासा वाटला असेल तर हा धागा आपल्यासाठी नाही.
..............
नेपाळमधील पारंपरिक 'पशुबळी उत्सवात' तब्बल ५००० म्हशींची नृशंस कत्तल करण्यात आली.
http://www.loksatta.com/desh-videsh-news/gadhimai-hindu-festival-over-50...
५००० हा आकडा केवळ म्हशींचा आहे, पण कोंबड्या-बकर्या हिशोबाते घेता हा आकडा पाच लाखांवर आहे.
नेपाळमध्ये देवीच्या यात्रेत ५ लाख जिवांची कुर्बानी
http://www.lokmat.com/storypage.php?catid=3&newsid=3760801
...............
स्वत:च्या मांसाहाराचे समर्थन करताना मी कित्येकदा अनिष्ठ प्रथांच्या नावाखाली मारल्या जाणार्या पशूंचे उदाहरण देतो.
पण हा आकडा मलाही हादरवून गेला. याचा एखादा एवढा मोठा उत्सव कसा काय होऊ शकतो.
बरे ही एखादी गावकुसात होणारी छोटीमोठी जत्रा नाही जिच्यामागे काही स्थानिक अनिष्ट परंपरा आणि अंधश्रद्धा असते जी प्रामुख्याने अशिक्षितेतून आली असते. तर हा आकडाच पुरेसा बोलका आहे.
माझ्या, "या धाग्यावर" मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कोणाला देता आली नाही. पण ईथे तरी नक्की द्या.
नक्कीच एवढ्या मोठ्या प्रमाणावर कापले जाणारे पशू खाद्य म्हणून वापरले जात नसतील. वा थोडेफार कोणी खातही असले तरी कोणताही मांसाहारी मनुष्य या प्रकारे आणि या कारणासाठी ते जीव घेण्याचा आग्रह धरणार नाही.
मग या हत्याकांडाला जबाबदार नक्की कोण?
बेकायदेशीर कृत्याला जर परंपरा व प्रथांची आणि धर्मिक भावनांची जोड दिली तर त्या कृत्यावर कारवाई अशक्यच नाही का! थोडक्यात नैतिकतेच्या निकषावर पुन्हा एकदा कायदा गंडला.
अहो तुलना करणारे लोक तर
अहो तुलना करणारे लोक तर आश्यारामाची तुलना देखील देवाबरोबर करतात.
मी माझ्या नेपाळी मित्राला
मी माझ्या नेपाळी मित्राला विचारले.
त्याच्या माहितीप्रमाणे, गेली कित्येक वर्षे हे चालू आहे.
आणि
नेपाळी लोकांनाच काही वाटत नसेल तर आपण कशाला त्रास करून घ्यायचा?
आता मुख्य गोष्टीकडे वळतो....
१. नेपाळ हे एकमेव हिंदू राष्ट्र आहे.
२. चीनने नेपाळला घातलेल्या विळख्यातून नेपाळ सही सलामत सुटला ते भारतामुळे.(आता हा नक्की विळखा कुठला? हे ओळखण्यासाठी स्वतः नेपाळला तरी जा, किंवा जाणकार नेपाळी माणसाला विचारा.)
३. भारतीय प्रसार माध्यमांना आत्ताच हा विषय कसा काय सुचला?
४. सईद हाफीझ पाकिस्तानात काय बोलणार आहे? काय बोलला? हे प्रसार माध्यमे का छापत नाहीत?
५. बकरी इदच्या निमीत्ताने इथे किती तरी पशू हत्या होते आणि तशीच गटारीच्या निमित्ताने त्याच्या बातम्या नेपाळी व्रुत्तपत्रांत येत नाहीत.
६. नेपाळने नक्कीच कुणालातरी दुखावले असणार.
७. महत्वाचा मुद्दा....नेपाळ मध्ये गोहत्येला बंदी आहे.(स्त्रोत: नेपाळमधली अनेक मित्र मंडळी आणि मी स्वतः नेपाळ मध्ये जावून ह्या गोष्टी बाबत तिथल्या लोकांना विचारून घेतलेली खातरजमा.)
८. हा कुणाचा तरी, आपले ठेवायचे झाकून आणि दुसर्याचे बघायचे वाकून, असला प्रकार असावा.
माबो वरील बरीच जणे ह्या वरील वाक्यांचा अर्थ, स्वतःच शोधण्या इतपत प्रगल्भ आहेत.त्यामुळे मी आधीच रजा घेतो. जे प्रगल्भ नसतील, त्यांनी गूगलून बघावे.आता नक्की काय शोधायचे हे जर माहित नसेल तर, आमचा त्यांना दंडवत.
@ jayant.phatak << १. नेपाळ
@ jayant.phatak
<< १. नेपाळ हे एकमेव हिंदू राष्ट्र आहे.>>
माझ्या माहिती प्रमाणे ही भूतकाळातील वस्तुस्थिती आहे. वर्तमानकाळात ते देखील एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र झाले आहे.
http://www.asianews.it/news-en/From-Hindu-kingdom-to-secular-state-6172....
बाकी मुद्यांविषयी तटस्थ.
१. नेपाळ हे एकमेव हिंदू
१. नेपाळ हे एकमेव हिंदू राष्ट्र आहे
>>
स्पष्टीकरणः
लोकशाही आल्यापासून ते सिक्युलर............आपलं............सेक्युलर राष्ट्र आहे. आता ते हिंदू राष्ट्र नाही.
हां, भारताप्रमाणे इतर धर्मीय फार नसतील, but it is a secular country now. Like it or not.
नेपाळ हे हिंदूराष्ट्र आहे की
नेपाळ हे हिंदूराष्ट्र आहे की नाही याचा ईथे काय संबंध?
परत चीन, पाकिस्तान, सईद हाफिज, बकरी ईद..
मिडीया हल्ली विकाऊ झालीय याबद्दल मला जराही शंका नाही पण जी बातमी आहे ती आहेच.
हा प्रकार चुकीचा आहे की नाही यावर भाष्य करायचे सोडून विषयाला फाटे कसले फोडताहेत. आणि मुळात का? नक्की कोणाला वाचवायचा प्रयत्न करत आहात? नेपाळला? आणि का? ते हिंदूराष्ट्र आहे म्हणून? कि इथेही मोदी नेपाळला भेट देऊन आले हा अँगल घुसवण्याचा प्रयत्न केला जातोय. सारेच अनाकलनीय आणि निराशाजनक आहे.
>>>आता नक्की काय शोधायचे हे
>>>आता नक्की काय शोधायचे हे जर माहित नसेल तर, आमचा त्यांना दंडवत<<<
>>>बाकी मुद्यांविषयी तटस्थ.<<<
>>>नेपाळ हे हिंदूराष्ट्र आहे की नाही याचा ईथे काय संबंध?<<<
खरेच नाही संबंध समजला.. नेपाळ
खरेच नाही संबंध समजला..
नेपाळ हे हिंदूराष्ट्र होते तेव्हाही हि प्रथा होती आणि आता सेक्युलर राष्ट्र आहे तेव्हाही आहे मग याचा काय संबंध?
हा पण एक विचार करण्यासारखा
हा पण एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे की याचा काय संबंध
परत चीन, पाकिस्तान, सईद
परत चीन, पाकिस्तान, सईद हाफिज, बकरी ईद.....
चीन तर येणारच हो.नेपाळ आणि भूतान म्हटले की चीन येणारच.पुर्वी तसेच तिबेट पण यायचे.
आता चीन म्हटले की पाकिस्तान पण येणारच.जसे आवळा-भोपळा, साप-मुंगूस,कीडा-मुंगी, तसेच आहे हे.
आता ओवेसी आणि हाफीझ का आले? ते तुम्हीच थोडे शोधून काढा.नाहीच जमले तर आम्ही आहोतच मदतीला.
हा प्रकार चुकीचा आहे की नाही यावर भाष्य करायचे सोडून विषयाला फाटे कसले फोडताहेत?
मुळांत तुम्हीच चूकीचे उदाहरण दिलेत.तुम्हाला जर प्राण्यांच्या हत्येविषयी इतकीच काळजी होती, तर थँक्स गिव्हिंग डे"ला किती पक्षी मारल्या जातात? हे पण विचारले असते.निदान इदच्या आणि रमझानच्या कालावधीमध्ये किती पशू मारल्या जातात? हे तर नक्कीच विचारले असते. .
आणि मुळात का? नक्की कोणाला वाचवायचा प्रयत्न करत आहात? नेपाळला? आणि का? ते हिंदूराष्ट्र आहे म्हणून?
माझ्या प्रतिसादाने नेपाळ वाचेल, असे मला वाटत नाही.अँग्लो-नेपाळ युद्धापासून ब्रिटिशांनी योग्य तो धडा घेतला आहे.आता जिथे ब्रिटिश हरले.(मी तरी असेच म्हणीन.कारण ब्रिटीशांचा एकछत्री अंमल नेपाळ वर कधीच न्हवता.) त्या माणसांना आम्ही काय वाचवणार?
कि इथेही मोदी नेपाळला भेट देऊन आले हा अँगल घुसवण्याचा प्रयत्न केला जातोय?
नेपाळच्या आणि भूतानच्या भेटीनंतर, मोदी नक्की कुठे-कुठे गेले आणि काय बोलले?ह्यात माझ्यापेक्षा तुम्हालाच जास्त रस दिसत आहे.आता मी मोदींचे नांव पण न घेता, तुम्हाला मोदीच दिसतात, ह्यांतच सगळे आले."चोराच्या मनांत चांदणे", ही म्हण अशा तर्हेने, खरी करायला धडपडायचे नसते.
सारेच अनाकलनीय आणि निराशाजनक आहे.
तुमचा लेख वाचून, मला तरी अजिबात तसे काही वाटले नाही.उलट तुमचा लेख वाचून मला नेपाळ आणि नेपाळी लोकांविषयी, माझी किती आत्मियता आहे, हे तरी कळले.आकलन पुढे-मागे नक्की होइल आणि नेपाळच भारताचा खरा मित्र होता,आहे आणि राहीलच अशी आशापण आहे.बघाना बांगलादेशांत आणि पाकिस्तानातल्या इदच्या दिवशीच्या कुर्बानीच्या बातम्या, येत नाहीत, पण नेपाळच्या येतात.
आणि हो,
आमचे प्रतिसाद आणि लेखही, पहिल्या क्रमांकाच्या मुलांसाठी अनाकलनीय आणि निराशाजनकच असतात.काय करणार?आम्ही मुळातच बॅक बेंचर्स.आम्हाला कार्यापेक्षा कारणीभावच जास्त महत्वाचा वाटतो.बातम्या वाचतांना पण मनांत, ही बातमी आत्ताच का आली? कुणी आणली?ह्या आधी गेल्या ८-१० दिवसांत किंवा महिन्याभरांत अशा कुठल्या घडामोडी झाल्या?अशाच शंका येतात.काय करणार्?आमचा स्वभावच फार शंकेखोर. आणि काम करतांना पण ह्याच स्वभावाचा फायदा होत असल्याने, हा स्वभाव टाकून पण देता येत नाही. त्यामुळे तुम्ही जास्त मनावर घेव नका
नेपाळ हे हिंदुराष्ट्र होते.
नेपाळ हे हिंदुराष्ट्र होते.
सध्या ते सेक्युलर आहे.
बातमी आत्ताच का आली याचं कारण
बातमी आत्ताच का आली याचं कारण तो उत्सव दर पाच वर्षांनी एकदा साजरा होतो. आता तो होतोय तर बातमी गेल्या वर्षी कशी आली असती? याउपर शंका काढायच्या असतील तर काढालच.
<मुळांत तुम्हीच चूकीचे उदाहरण दिलेत.तुम्हाला जर प्राण्यांच्या हत्येविषयी इतकीच काळजी होती, तर थँक्स गिव्हिंग डे"ला किती पक्षी मारल्या जातात? हे पण विचारले असते.निदान इदच्या आणि रमझानच्या कालावधीमध्ये किती पशू मारल्या जातात? हे तर नक्कीच विचारले असते>
पहिल्या पानावर आलेला मुद्दा आता परत. त्याच्या व्यवस्थित उत्तरे इथे लिहिली गेलीत. (लिहिल्या गेलीत नव्हे) पण नेपाळमधले उदाहरण चुकीचे कसे ते कळले नाही. (की कळल्या नाही?)
(अवांतर : मी एक दिवसभर प्रत्येक ठिकाणी फक्त ही ल्या रूपे वापरून लिहिणार आहे. माबोवर एक दिवस 'ल्या' दिन साजरा करायची कल्पना कशी आहे?)
'ल्या' दिन<<<
'ल्या' दिन<<<
@भरत मयेकर, बातमी आत्ताच का
@भरत मयेकर,
बातमी आत्ताच का आली याचं कारण तो उत्सव दर पाच वर्षांनी एकदा साजरा होतो. आता तो होतोय तर बातमी गेल्या वर्षी कशी आली असती? याउपर शंका काढायच्या असतील तर काढालच.
शंका काढणे चूकीचे आहे का? पण मग गेल्या २५-३० वर्षांत पण ह्या बातम्या दर ५ वर्षांनी एकदा ह्या हिशोबाने,निदान५/६ वेळा तरी बातम्या यायला हव्या होत्या.
मग अचानक ह्याच वर्षी का?
जयंत फाटक
जयंत फाटक +१००००००००००००००००००००००००००००००
जबरदस्त फटके देताय. आवडलंच.
शंका काढणे चूकीचे आहे का? पण
शंका काढणे चूकीचे आहे का? पण मग गेल्या २५-३० वर्षांत पण ह्या बातम्या दर ५ वर्षांनी एकदा ह्या हिशोबाने,निदान५/६ वेळा तरी बातम्या यायला हव्या होत्या...
.....
वा ! काय शंका तरी !
गेल्या २५ वर्षातील सगळे पेपर वाचुन बघा ..
@ काउ गेल्या २५-३० वर्षात ही
@ काउ
गेल्या २५-३० वर्षात ही बातमी मी तरी वाचलेली नाही.तुम्ही वाचली असल्यास लिंक द्यावी..
गेल्या २० वर्षात बातमी आली
गेल्या २० वर्षात बातमी आली होती का / तुम्ही मी वाचली होती का याचा नेमका काय स्म्बंध आहे हे समजले नाही.. त्यानी जेंव्हा बातमी वाचली ,तेंव्हा त्याबद्दल त्यानी लिहिले.
मागच्या लिंका द्यायला तेंव्हा ई पेपर आस्तित्वात होते का ?
कै च्या काय मागण्या !
२००९ च्या उत्सवाचीही बातमी
२००९ च्या उत्सवाचीही बातमी झाली होती शोधलीत तर सापडेल. त्यवर्षी प्राणिमित्रांनी प्रथम आवाज उठवला होता. या प्राणिमित्रांत मनेका गांधींचाही समावेश होता.
यंदा हे प्रकरण भारतातल्या न्यायालयांत पोचले. भारत सरकारच्या गृहमंत्रालयाला त्यासंबंधाने सूचना प्रसृत कराव्या लागल्या. त्यामुळे भारतीय प्रसारमाध्यमांत चर्चा झाली. (हे सांगायची खरे तर गरज नाही. पण झापडे बांधलेल्या डोळ्यांत अंजन घालायचे ...............)
मुख्य मुद्दा : अन्यत्र होणार्या पशुहत्येमुळे किंवा यापूर्वी बातमी चर्चेत नसल्याने उत्सवात झालेल्या निर्घृण, अकारण व क्रूर पशुहत्येचे समर्थन होऊ शकते का?
त्यांचे म्हणने असे आहे की मला
त्यांचे म्हणने असे आहे की मला जे माहीत नाही ते मी मान्यच करत नाही
उद्या झेकोस्लोविया मधिल ब्युरिच गावाबद्दल मी काही वाचले नाही त्यामुळे ते गाव तिथे आहे हे मी मान्य करणार नाही आणि मीच प्रश्न विचारणार त्या गावाबद्दल आताच का लिहिले
हा त्यांच्या प्रदिर्घ पत्रावळीचा सार
मयेकर, तुम्ही अश्या फॅक्ट
मयेकर,
तुम्ही अश्या फॅक्ट असलेल्या पोस्टस टाकत जाऊ नका.
मग फाटे फोडत फोडत हवा तसा विषय वळवत चर्चेचं दळण दळायला आम्हाला मर्यादा येतात.
साती जबरदस्त +१०००० बाँम्बंच
साती जबरदस्त +१०००० बाँम्बंच फोडला की
विकीवरच्या पानावर संदर्भ
विकीवरच्या पानावर संदर्भ दिल्या गेले आहेत त्यात २००९ सालच्या अनेक बातम्याही दिसल्या गेल्या आहेत.
बीबीसीच्या एका बातमीनुसार २००९ साली नेपाळमध्ये बकर्यांचा तुटवडा निर्माण झाल्याचे नोंदल्या गेले आहे.
उद्या कुणीतरी कुठली तरी मुलगी
उद्या कुणीतरी कुठली तरी मुलगी पळवली याची बातमी दिली की हे त्याला भीष्माने अंबा अंबालिकेला पळवलेल्या बातमीची लिंक मागतील.
नाहीतर मग आत्ताच ही बातमी का दिलित असेही विचारतील
बरं मग आता काय करायचं म्हणता?
बरं मग आता काय करायचं म्हणता?
अनेको महिने/आठवड्यांनी माबोवर
अनेको महिने/आठवड्यांनी माबोवर आलं आणि पहिल्या पानावरचे तेच ते धागे बघितले कि माबो सोडल्याची हळहळ कमी होते. आज नेपाळ (विशेष सॉफ्ट कॉर्नर) नाव वाचलं म्हणुन पुर्ण धागा, सगळ्या प्रतिक्रिया आणि लिंक्स वाचल्या.
काऊची आदिवासी संस्कृतीवरची पोस्ट + १००
ऋन्मेषची तीनही उदाहरणं - एकदम appropriate. भारीच !
आशु मी असताना गायब झाला होता, तो परत आला आहे की काय? आशुच्या सगळ्या पोस्टस + १०००. एकदम पटल्या.
मयेकर पण सहीच !
गंभीर मारामार्या न होता बर्याच धाग्यांवर अशा छान चर्चा चालु झाल्या आहेत का? मग आजचा दिवस वाचावाची साठी रा॑खीव.
@ मयेकर, "२००९ च्या
@ मयेकर,
"२००९ च्या उत्सवाचीही बातमी झाली होती शोधलीत तर सापडेल. त्यवर्षी प्राणिमित्रांनी प्रथम आवाज उठवला होता. या प्राणिमित्रांत मनेका गांधींचाही समावेश होता.
यंदा हे प्रकरण भारतातल्या न्यायालयांत पोचले. भारत सरकारच्या गृहमंत्रालयाला त्यासंबंधाने सूचना प्रसृत कराव्या लागल्या. त्यामुळे भारतीय प्रसारमाध्यमांत चर्चा झाली. (हे सांगायची खरे तर गरज नाही. पण झापडे बांधलेल्या डोळ्यांत अंजन घालायचे ...............)"
ह्या माहितीबद्दल धन्यवाद.मला खरोखरच माहीत न्हवते.आता मी जर शंका विचारली नसती तर मला माहीत झाले असते का?माझे अज्ञान दूर केल्याबद्दल धन्यवाद.
कुलु मनाली येथिल हिडींबा
कुलु मनाली येथिल हिडींबा मंदीर मधे ही हजारोंच्या सख्येंनी बकर्यांचा बळी दिला जातो.
आणि आसाम गोहाटि मधे कामाख्या मंदिर आहे.तिथे कबुतराचा व बकरिचा बळि दिला जातो.
.
Pages