नेपाळ हत्याकांड - ५००० ठार

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 November, 2014 - 05:22

जर हा मृतांचा आकडा मनुष्यवधाचा नसून पशूवधाचा आहे हे बघून आपल्याला दिलासा वाटला असेल तर हा धागा आपल्यासाठी नाही.

..............

नेपाळमधील पारंपरिक 'पशुबळी उत्सवात' तब्बल ५००० म्हशींची नृशंस कत्तल करण्यात आली.
http://www.loksatta.com/desh-videsh-news/gadhimai-hindu-festival-over-50...

५००० हा आकडा केवळ म्हशींचा आहे, पण कोंबड्या-बकर्‍या हिशोबाते घेता हा आकडा पाच लाखांवर आहे.

नेपाळमध्ये देवीच्या यात्रेत ५ लाख जिवांची कुर्बानी
http://www.lokmat.com/storypage.php?catid=3&newsid=3760801

...............

स्वत:च्या मांसाहाराचे समर्थन करताना मी कित्येकदा अनिष्ठ प्रथांच्या नावाखाली मारल्या जाणार्‍या पशूंचे उदाहरण देतो.
पण हा आकडा मलाही हादरवून गेला. याचा एखादा एवढा मोठा उत्सव कसा काय होऊ शकतो.
बरे ही एखादी गावकुसात होणारी छोटीमोठी जत्रा नाही जिच्यामागे काही स्थानिक अनिष्ट परंपरा आणि अंधश्रद्धा असते जी प्रामुख्याने अशिक्षितेतून आली असते. तर हा आकडाच पुरेसा बोलका आहे.

माझ्या, "या धाग्यावर" मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कोणाला देता आली नाही. पण ईथे तरी नक्की द्या.

नक्कीच एवढ्या मोठ्या प्रमाणावर कापले जाणारे पशू खाद्य म्हणून वापरले जात नसतील. वा थोडेफार कोणी खातही असले तरी कोणताही मांसाहारी मनुष्य या प्रकारे आणि या कारणासाठी ते जीव घेण्याचा आग्रह धरणार नाही.

मग या हत्याकांडाला जबाबदार नक्की कोण?

बेकायदेशीर कृत्याला जर परंपरा व प्रथांची आणि धर्मिक भावनांची जोड दिली तर त्या कृत्यावर कारवाई अशक्यच नाही का! थोडक्यात नैतिकतेच्या निकषावर पुन्हा एकदा कायदा गंडला.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही हो, घुमजाव आणि पहारे पण मोदीकाकांचे पीआरओ वाचत असतील या गृहितकावर आधारित आहेत. Happy
तुमच्या त्या सिरीयली काही मी पाहिल्या नाहीत , पण त्यांचीपण टिआरपी नावाची मॉनिटरिंग सिस्टिम असतेच. जर टिआरपी कमी झाला तर त्याना मिळणार्या अ‍ॅडस कमी होतात मग कथानकात ट्विस्ट आणावा लागतो.
पब्लिक साईटवर सिरीयलला नावे ठेवूनही जर ठराविक वेळी घरच्या टिव्हीवर सिरीयलचा चॅनेल लागत असेल तर टिआरपीत लोकांना सिरीयल आवडत्येय असाच निष्कर्ष निघतो. मग सिरीयल लेखकाला, निर्मात्याला वाटेल त्या मोडवरच चालू रहाते.

म्हणजे तेच ना...तुम्ही काहीही म्हणालात तरी त्यांना करायचेच ते करतात...
उद्या जरी या धाग्याचे नेपाळी भाषेत रुपांतर करून त्यांना पाठवला तरी काय फरक पडणार आहे का...खुद्द नेपाळी सरकारच या प्रथेच्या विरुद्ध आहे पण जनमानसाच्या रेट्याखाली त्यांनी त्याला मंजूरी दिलीये...
तिथे आपल्या विरोधाला विचारते कोण..
पण जसे मी वर म्हणले की त्या अर्थाने मोदीकाकांनी असे केले पाहिजे तसे केले पाहिजे हे देशभरातले सगळे पत्रकार लेखण्या सरसावून लिहीत असतात. तरी पण त्यांना काय करायचे ते करतातच ना...मग आपल्या मध्यमवर्गिय मराठी संकेतस्थळावर पार हमरीतुमरीवर येऊन चर्चा करण्याचा नक्की उपयोग काय....

पेटा च्या फेसबुक पेज ला लाइक करा. पेटिशन साइन करा. दबाव टाका. नेट्च्या वापराने एकाजरी अश्राप जनावराचा प्राण वाचला तरी तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. इथे नुसते बोटे मोडून काहीही होणार नाही.

धागा काढल्याबद्दल धन्यवाद. रुनमेश. मला काही तुमचे नाव लिहीता येत नाही.

माबोचा व्याप इतका मोठा झालाय की मध्यमवर्गीय मराठी मनाचा आढावा इथे आल्यास सहज घेता येतो>>/em>

मध्यमवर्गीय मराठी मनाचा आढावा Rofl

आशुचँप,
मोदी, राहुल इ. लोक इथले धागे नसतील वाचत पण त्यांचे पीआरओज नक्कीच वाचत असतील.>>>>> साती हे बरोबर आहे, कारण मध्यन्तरी लोकप्रभा मध्ये सुद्धा कुणीतरी स्त्री वाचकानी माबोवर जी चर्चा केली होती, त्याचा उल्लेख केला होता. ( त्याना कल्पना पण नव्हती की माबो वर चाललेली चर्चा लोकप्रभा मध्ये येईल.)

Ashwinimami, please don't read this comment...........

Comparing killing of thousands of animals to tomatina reminds me of a comment comparing something to some other thing coming under a car's wheel and getting killed.

दैवदुर्विलास म्हणा किंवा विरोधाभास. गोहत्याबंदी करावी असे म्हटले की सापडेल त्या सोशल नेटवर्किंग साइटवर असे म्हणार्‍यांना हिंदुत्ववादाचे लेबल लाऊन अक्कल काढणारी लोकं इथे येउन मात्र या प्रकाराचा विरोध करत निरनिराळ्या लिंका डकवत आहेत. Wink

परत एकदा: सिलेक्टिव्ह निषेध चुकीचाच.

पेटा च्या फेसबुक पेज ला लाइक करा. पेटिशन साइन करा. दबाव टाका.
>>
हो एवढे तर करू शकतोच.
हा पर्याय सुचवल्याबद्दल धन्यवाद.

अवांतर - ऋ बद्दल रिया म्हणाल्या तसेच, याउपर रु देखील मला चालून जाते.

सौ चुहे खा के बिल्ली चली "हज" !!

स्वता: आहेत मांसाहारी आणि ह्याना बळी दिलेल्या जनावरांच्या संख्येमुळे (५०००) हादरा बसला ?

म्हणजे ही संख्या जर ५०० असती तर हादरा बसला नसता ?

शांताराम कागाळे यांच्याशी सहमत.

स्वतः मांसाहार करणार्‍यांनी अशा प्रकारे निषेध व्यक्त करणे कितपत संयुक्तिक आहे?

अहो जोशी आणि गुगळे - वर त्यांनी सांगितले आहे ना हा आकडा हादरवून गेला म्हणून..प्रश्न इथे जनावरांना मारण्याचा नाहीच आहे. यापेक्षा जास्त जनावरे भारतातच कत्तलखान्यात मारली जात असतील. पण ज्या नृशंस पद्धतीने त्यांना मारण्यात येत आहे आणि तेही धर्माच्या नावावर...
जनावराला तडफडून मारणे तेही केवळ बळी देण्याच्या हव्यासापोटी हे निषेधार्ह आहे....

जगात मनुष्यहत्या काय कमी झाल्या नाहीत. भारतात स्वातंत्र्यसैनिकांवर अत्याचार करणारे ब्रिटीश किंवा क्रुरकर्मा स्टॅलीन यांचा निषेध झालाच पण त्याहून जास्त झाला तो नाझींचा...
६० लाख ज्यू तेही अतिशय क्रुरपणे मारले गेले हा आकडा कुणालाही हादरवून टाकणारा होता.
त्यामुळे इथे कोण मांस खाणारे आहेत किंवा नाहीत यापेक्षा इतका क्रुरपणा का हा प्रश्न आहे...त्यामुळे उगाच कुठल्याही शेंड्या कुठेतरी लाऊ नका....

आणि गुगळे तुम्हाला आगाऊ सूचना तुम्ही याला उत्तर म्हणून मुळ लेखापेक्षा जास्त लिहीणार असाल तर आधीच सांगतोय मी वाचणार नाही....:;)

@ आशुचँप,

<< त्यामुळे इथे कोण मांस खाणारे आहेत किंवा नाहीत यापेक्षा इतका क्रुरपणा का हा प्रश्न आहे...त्यामुळे उगाच कुठल्याही शेंड्या कुठेतरी लाऊ नका....>>

मी कुठल्याही शेंड्या उगाच कुठेही लावलेल्या नाहीत. तुम्हाला तसे वाटत असेल तर तो तुमच्या समजशक्तीच्या अल्पक्षमतेचा प्रश्न आहे. तुमची ही व्यक्तिगत समस्या मी इथे सोडवणार नाही. उलट तुम्ही स्वतःच ब्रिटीश, स्टॅलीन, नाझी यांचा अनावश्यक उल्लेख करीत शेंड्या लावायचा उद्योग केला आहे.

मूळ धाग्यात / लेखात

  1. एकाच वेळी,
  2. मोठ्या संख्येने,
  3. जास्त क्रूरपणे

ही प्राणी हत्या झाल्याने निषेध केला गेला आहे हे मला समजले. तरीदेखील माझा मूळ प्रश्न तसाच आहे. असा निषेध करण्याचा हक्क मांसाहारी व्यक्तिंना असावा का? तोही फक्त एवढ्याच निकषावर की त्यांना -

  1. एका वेळी पाच सहाशे ग्रॅम पेक्षा जास्त मांस खायला लागत नाही.
  2. ते रोजच्या रोज मांसाहार करीत नाहीत.
  3. त्यांच्या मांसाहाराकरिता होणारी प्राणीहत्या इतक्या क्रूरपणे होत नाही.

माझ्यामते असा निषेधाचा हक्क नसावा, कारण क्रौर्याचे मापन करुन कमी क्रौर्यास कारणीभूत होणार्‍याने जास्त क्रौर्य करणार्‍यास अथवा त्यास प्रत्यक्ष / अप्रत्यक्षरीत्या कारणीभूत होणार्‍यास बोल लावावे हे तार्किकदृष्ट्या पटत नाही.

पाप्याला धोंडा मारायचाच असेल तर जरूर मारावा पण कुणी?

यार हमारी बात ऐसा एक इन्सान चुनो; जिसने पाप ना किया हो जो पापी ना हो

खरेच जर धागालेखक व इतर संबंधित निषेधकर्ते प्रतिसादक या प्राणिहत्येने व्यथित झाले असतील तर त्यांनी आधी स्वत: मांसाहार सोडावा मग खुशाल या प्राणीहत्येचा निषेध करावा. इथे प्राणीहत्येचा निषेध करणारे तिथे ५१७०४ क्रमांकावर भलतेच मत हिरीरीने मांडत आहेत. हा माझ्यामते दुटप्पीपणा आहे. मी या दुटप्पीपणाचा निषेध करतो.

नेपाळमधील घटनेला माझे मूळीच समर्थन नाही. मी त्या घटनेचाही निषेध करतो. अर्थात, असा निषेध मी न डगमगता करतो कारण मी स्वतः मांसाहार करीत नाही.

कसा काय दुटप्पीपणा होतो मला कळत नाही....
उद्या तुमच्या वस्तीत एखादा कारखाना उभा राहीला आणि त्याने काळेकुट्ट धुराचे लोट सोडायला सुरुवात केली. आणि त्याची तक्रार करायला गेल्यानंतर मालकाने सांगितले की तुम्ही पण रोज गाडी वापरता..त्याचा धूर होतोच मग एखाद्या धूर करणाऱ्या व्यक्तीनेच हा धूर बंद करा सांगणे हा दुटप्पीपणा आहे.
प्रदुषणाचे मापन करुन कमी प्रदुषणास कारणीभूत होणार्‍याने जास्त प्रदुषण करणार्‍यास अथवा त्यास प्रत्यक्ष / अप्रत्यक्षरीत्या कारणीभूत होणार्‍यास बोल लावावे हे तार्किकदृष्ट्या पटत नाही.

असे म्हणाला तर

नेपाळमधील घटनेला माझे मूळीच समर्थन नाही. मी त्या घटनेचाही निषेध करतो. अर्थात, असा निषेध मी न डगमगता करतो कारण मी स्वतः मांसाहार करीत नाही.

मी मांसाहार करतो तरीही मी देखील न डगमगता हा निषेध करू शकतो...

रच्याकने वरती जोशींनी जे आक्षेपार्ह फोटो टाकले आहेत त्याचाही निषेध करणार का तुम्ही....
कारण तो न डगमगता करायचा असेल तर तुम्हाला टोमॅटो, गहू वगैरे खाणे सोडावे लागेल. Happy

चेतनजी आणि शांतारामजी,

तुम्हाला तो सिंह माहीत असेलच..
तो नाही हा.. राणीबागेतला.. त्याला तर लहानसहान पोरेटोरे सुद्धा दगडे मारतात..
तर तो जंगलातला.. जो रोज स्वताचे पोट भरायला प्राण्यांची शिकार करतो..
पण उद्या जंगलाला आग लागली आणि त्या वणव्यात कित्येक प्राणी मृत्युमुखी पडले तर हळहळायचा हक्क त्याला सुद्धा आहेच..

चला दुसरे उदाहरण देतो,
तुम्हाला ते जवान माहीत असतीलच..
ते नाही हा, जे प्रत्येक जण तरुण झाल्यावर स्वताला समजायला लागतो..
तर ते, जे सीमेवर आपापल्या देशाचे रक्षण करताना समोरच्या ओळखीच्या ना पाळखीच्या पण शत्रू देशाच्या सैनिकांचा जीव घेतात..
पण जगभरात कुठल्या युद्धातील बॉम्बवर्षावात जेव्हा नागरीक मारले जातात तेव्हा त्यांनाही दुख होतेच, निषेध करायचा हक्क त्यांनाही असतोच..

चला तिसरे उदाहरण देतो,
तुम्हाला त्या वेश्या माहीत आहे का..
हो.. त्याच वेश्या.. ज्या स्वत: देहविक्रय करून पैसे कमावतात.. वा गेला बाजार पॉर्नस्टारच घ्या..
पण कुठल्या स्त्रीची कुठे विटंबना होत असेल तर त्याविरुद्ध एक स्त्री म्हणून आवाज उठवायचा हक्क त्या देखील राखून आहेतच..

चला चौथे उदाहरण देतो.,
नको चला राहू द्या..
सांगायचा मुद्दा हा की मी स्वत:ही धाग्यात वा प्रतिसादात कबूल केले आहेच की मी मांसाहारी आहे आणि मला कसलाही आव आणायचा नाहीये.. पण जेव्हा हि बातमी वाचली तेव्हा माझी पहिली उत्स्फुर्त प्रतिक्रिया हिच होती.. अरे देवा.. काय हा क्रूरपणा, काय हा वेडेपणा.... आणि बस्स त्याच भावनेने हा धागा काढला.

गोहत्याबंदीची मागणी करणार्‍यांना म्हशी आणि बकर्‍यांच्या अकारण हत्येबद्दल सोयरसुतक नसावे याचे नवल वाटत नाही.

आधी दिलेली लिंक पुन्हा देतो. मंडळींनी वाचायचे कष्ट घेतलेले नसल्याने काही मजकूर डकवायचीही गरज आहे.
http://edition.cnn.com/2014/11/29/world/asia/nepal-gadhimai-ritual-slaug...

हे बळी नवस फेडण्याकरिता दिले जातात असे दिसते.

"We object to the cruelty with which animals are treated," says Pramada Shah of Animal Welfare Network Nepal. "There is random hacking of animals in open space. Not all animals have their heads chopped off. Some take up to 40 minutes to die."

The animals not only suffer while they are being killed: they are also transported over long distances on foot. "By the time they get to the festival venue they are half dead," says Shah. "They are kept two or three days without food after they are brought here."

" Hindu religion does not support the ritual sacrifice of animals, says Shah. "We consulted religious priests on the matter," she says. (नेपाळमधला हिंदू धर्म वेगळाबिगळा आहे की काय?)

He estimates 6,000 to 8,000 water buffaloes will be randomly hacked, not necessarily by having their heads chopped off.

"Any part of the body can be cut," he says. "Last time round we saw buffalo walking with their head hanging."

अरे वा थोडीफार आतषबाजी होऊन गेलेली दिसते Happy

जामोप्या - ऋषी मुनी असे म्हणले की उपहासाने लिहायची काही गरज आहे का ? केलेच आहेत ऋषी मुनींनी प्रयत्न आदिवासी, जंगली लोकांना सुसंस्कृत करण्यासाठी. बळीच्या बदल्यात नारळाचा वापर हे एक मोठे प्रतिक आहे.

जैन आणि बौद्ध धर्माबद्दल मला आदर आहेच आहे, पण बौद्ध धर्मात शाकाहाराच्या प्रचाराबद्दल काही असल्याचे ऐकिवात नाही. असल्यास सांगावे.

म्हशींची आणि टोमॅटोची / धान्याची तुलना करणे अगदीच योग्यच नाहीच.

धागाकर्ते आणि त्यांचे समर्थक यांना मांसाहार किंवा अन्य कारणांसाठी पशुवध होणे मान्य आहे, पण तो असा एवढ्या मोठ्या प्रमाणावर, धर्माच्या नावाखाली आणि बर्‍याच प्रमाणात नासाडीच्या स्वरूपात होत असेल तर ते चुकीचे आहे असे वाटत आहे. आणि हे मत अगदी बरोबर आहे. यात दुमत होऊच शकत नाही.

काळाच्या ओघात प्रथांमधे बदल घडवून धर्माचे स्वरूप प्रवाही ठेवणे हे खरे तर हिंदू धर्माचे व्यवच्छेदक लक्षण, आणि त्यासाठी अयोग्य गोष्टींना विरोध हा झालाच पाहिजे.

केलेच आहेत ऋषी मुनींनी प्रयत्न आदिवासी, जंगली लोकांना सुसंस्कृत करण्यासाठी.

......

अग्गोबै ! आदिवासी संस्कृती पुसुन तिथे आपली संस्कृती घालणे म्हणजे सुसंस्कृतपणा की काय !

केवळ मांसाहार करतो म्हणुन कुणी क्रूर ठरत नाही. उत्तर ध्रुवावर , कोकणात , जंगलात केवळ उपलब्धतेनुसार मांसाहार केला तर तो क्षम्यच ठरतो....रादर , तो अपराधच नसतो.

हे मी नै म्हणत बरं का ! दुष्काळात कुत्राची तंगडी खाणार्‍या एका थोर हिंदु ऋषींचेच हे उद्गार आहेत.

पोटासाठी शिकार केली , मांसाहार केला / विकला तर तो गुन्हा नाही. तुमच्या धर्मात व्याध गीता म्हणुन एक गीता आहे. ही गीता एका आदिवासी व्याधाने एका ऋषीना सांगितलि आहे.
प्त्यामुळे शिकार कर्तात म्हनुन आदिवासी क्रुर असंस्कृत ठरत नाहीत.

>>अग्गोबै ! आदिवासी संस्कृती पुसुन तिथे आपली संस्कृती घालणे म्हणजे सुसंस्कृतपणा की काय !

==> विषय वेगळा असल्याने, येथे वाद घालणार नाही.

>>केवळ मांसाहार करतो म्हणुन कुणी क्रूर ठरत नाही. उत्तर ध्रुवावर , कोकणात , जंगलात केवळ उपलब्धतेनुसार मांसाहार केला तर तो क्षम्यच ठरतो....रादर , तो अपराधच नसतो.
हे मी नै म्हणत बरं का ! दुष्काळात कुत्राची तंगडी खाणार्‍या एका थोर हिंदु ऋषींचेच हे उद्गार आहेत.
पोटासाठी शिकार केली , मांसाहार केला / विकला तर तो गुन्हा नाही. तुमच्या धर्मात व्याध गीता म्हणुन एक गीता आहे. ही गीता एका आदिवासी व्याधाने एका ऋषीना सांगितलि आहे.
प्त्यामुळे शिकार कर्तात म्हनुन आदिवासी क्रुर असंस्कृत ठरत नाहीत.

==> सहमत, +१०१ या मुद्द्यावर आपले एकमत. (मी शाकाहारी आहे. नाहीतर खुष होऊन दावत का न्योता बिता द्याल) Wink

बळीच्या बदल्यात नारळाचा वापर हे एक मोठे प्रतिक आहे..

.........

म्हणजे बळीची प्रथा कुणाची ? आदिवासीम्ची !

नारळाची परंपरा कुणाची ? ( हंदु ) ऋशी मुनींची !

वा वा !

अहो पुर्वी फार म्हणजे फारच मोठ्या प्रमाणावर लोक मांसाहारी असणार, का की ते आजुबाजुच्या प्राण्यांचे पाहून तसेच अन्न खात असणार, आणि इतिहास हेच सांगतो ना की शिकारीचा शोध आधी आणि शेतीचा शोध नंतर लागला आहे.
तर सुरूवातीच्या काळात जेव्हा सिविलायजेशन फारसे नव्हते तेव्हा लोकांना मार्गदर्शन करण्याचे काम ज्या सुधारकांनी केले त्यांना ऋषी मुनी म्हणले जाते. बर हे सगळे घडून गेले आहे, तुमच्या नाही म्हणण्याने किंवा माझ्या हो म्हणण्याने त्यात बदल होण्याची शक्यताच नाही. Sad
आता तुम्ही जे करत आहात त्याला देखील अनेक वर्षांनंतर कदाचित म्हणले जाईल की,
ते जामोप्या ऋषी दूर तिकडे माबोच्या जंगलातल्या आदिवासींना सुधारण्याचे सत्कृत्य करत असत. Happy

ऋन्मेऽऽष ... तिन्ही उदाहरणे अतीशय समर्पक! असो.. पन ही म्हशींची आणि टोमॅटोची तुलना कशी होऊ शकते बुवा?.. जौदे !

Pages