नो शेल्टर फॉर अभक्ष्यभक्षी :अओ:

Submitted by जाग्याव पलटी on 28 November, 2014 - 02:21

आजच्या वर्तमानपत्रात एक अनोखी बातमी वाचायला मिळाली की मनसे, शिवसेना, काँग्रेस आणि इतर पक्षांच्या आमदारांनी भाजपाचा संपूर्ण विरोध असताना विधानसभेला एक ठराव मंजूर करायला लावला की,

मुंबईत काही बिल्डर्सकडून "मांसाहारी लोकांना घरे विकायची नाहीत" अशा प्रकारची तिरस्करनीय गोष्ट अंमलात आणली जात आहे अशा बिल्डर्सना त्या प्रकल्पांची आय ओ डी दिली जावू नये

चर्चेचा प्रस्ताव
१. मांसाहार करणार्‍यांना घरे विकायची नाहीत ही कशा प्रकारची मानसिकता आहे? हे अन्यायकारक आहे किंवा कसे?
२. सत्तेतल्या पक्षाने सर्वसमावेशक विचार करणे अपेक्षित असताना भाजपाचा त्याला विरोध का असावा?
३. कोण काय आहार करतो ह्यावरून त्याला निवारा मिळावा की नाही ठरवणे कितपत योग्य आहे?
४. अशा प्रकारच्या बिल्डर्सच्या निर्णयांमागचे छुपे अजेंडाज काय असू शकतील?

प्रश्न मुंबईतला असला तरी वादप्रविण लोकांनी इतर शहरातल्या वातावरणावर भाष्य केल्यास माझी काही हरकत नाही Wink

तर करा सुरूवात!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मयेकर +१
साती +१
ही कट्टर अहिंसक कम्युनिटी आपण अहिंसक असल्याचे भांडवल करुन छुपी (मानसिक, व्यावसायिक) हिंसा करण्यात एक नं आहेत. अत्यंत इन्टॉलरन्ट.
बरं जगाने यांच्याप्रमाणेच चालावं कारण हे म्हणजे सद्गुणाचे पुतळेच, असाही नुसता आग्रहच नाही तर पैशाच्या जोरावर माजही आहे. वर्षातनं एकदा "तुअम्चय भावना दुखावल्या असतील तर माफ करा" म्हटलं की पुन्हा वर्षभर लबाडधंदे करायला मोकळे!

साती चांगली पोस्ट. कन्सेप्ट लिव्हिंग हे ऑप्शन आहे आणि त्याचा कायदा मूळ चर्चेतील कायद्यापेक्षा वेगळा आहे हे माझ्या लक्षात आले.

मयेकर +१
नूड बीच analogy बरोबर नाही ना? ते बीच क्लोदिंग ऑपशनल असतात, कपडे घालून गेलात तरी प्रवेश असतो. Lol

हा धागा इतक्या पोस्टी पडल्यानंतर आज वाचला.
स्वाती२, मयेकर आणि साती ह्यांना पूर्ण अनुमोदन.
सिमंतीनी नक्की काय म्हणायचं आहे हे अजिबात समजलं नाही.. काहीच्या काही गोष्टी एका पारड्यात तोलल्याचं दिसत आहे.

मांसाहारींना घरं न विकणे हा प्रकार मुंबईत अनेक वर्ष सुरू आहे. अखेर पालिकेत ह्याविरुद्ध ठराव पास करून घेतला ते बरं झालं.

Lol ती उपमा बरोबर आहे. तसे बीच, वसाहती, त्यांच्या असोसीएशन इ इ असतात. वेगळे परवाने लागतात. आपल्याला अजब वाटली तरी ती एक जीवनशैली आहे आणि सरकारमान्य आहे. इतर देशात इतक्या टोकाच्या वर्तनाला सरकारकडून पाठींबा मिळतो पण भारतात शाकाहार वसाहतीला मिळत नाही असे का हा प्रश्न मला पडत होता. सातीचे स्पष्टीकरण मला हेल्पफुल झाले.

बाकी विनाशर्त अपार्टमेंटस मिळाली कि जुनी अंतरे कमी होतील हा फारच भाबडा आशावाद झाला. राजकारणात मसल पॉवर आणि मनी पॉवर अगदी हातात हात घालून चालतात त्यामुळे हा जो काही ठराव झाला तो किती दिवस टिकेल हे बघायची उत्सुकता आहे.

बाकी विनाशर्त अपार्टमेंटस मिळाली कि जुनी अंतरे कमी होतील हा फारच भाबडा आशावाद झाला.
>>>>
मुळात कुठलीही अंतरे इथे कमीजास्त करायचा सबंधच नाहीत.

आंतरजातीय विवाहांवर उद्या बंदी आणली आणि ती उठवायची मागणी झाली तर तेव्हाही असेच म्हणायचे का की आंतरजातीय विवाहांनी जातीभेद मिटतात हा भाबडा आशावाद झाला.. Happy

बाकी विनाशर्त अपार्टमेंटस मिळाली कि जुनी अंतरे कमी होतील >>>> कुठली अंतरं आणि काय कमी करायची ? खाण्यावरून होणारं डिस्क्रीमिनेशन थांबवा इतकच!

हे झाले घरांचे, मध्यंतरी एका क्लायंटकडे ऑडिटसाठी पोस्टेड होते तेव्हा असाच अनुभव आला. क्लायंट कंपनी ही गेल्या दहा वर्षात उदयास आलेले एक्स्चेंज.
डबा नेला नव्हता म्हणून बॉक्स ८ मधून चिकन रॅप मागवले. सिक्युरिटि गार्डने ते दरवाजावरच थांबवले. कारण कंपनीच्या गेटच्या आत नॉन व्हेज अलाऊड नाही म्हणून. गेटच्या बाहेर स्कूटर नेऊन, स्कूटरवर बसून मी माझा लंच खाल्ला. कंपनीच्या एम्प्लॉयीजने सांगितलं की ते लोकदेखील आठवड्यातून नॉन व्हेजचा डबा असेल तर गाडीत ठेवून गाडी बाहेर पार्क करतात. आणि गाडीत बसूनच खातात. स्वत:कडे गाडी नसेल तर कलीगच्या गाडीत ठेवून गाडी बाहेर पार्क करवतात. दोन वर्षापूर्वी एका माणसाची नोकरी ऑफिसमध्ये नॉन व्हेज नेले म्हणून गेली होती.

नशीब बाहेर जेवायला जाणार्‍यांचे जेवून आल्यावर पोट स्कॅन करून पाहात नाहीत तुम्ही व्हेज खाल्लेत की नॉन व्हेज. नॉन व्हेज खाल्ले असेल तर तुमच्या सिस्टीम मधून ते बाहेर पडे पर्यंत ऑफिस प्रीमायसेस मध्ये यायचे नाही...असा रूल असता तर.

मांसाहाराला इतका कट्टर विरोध करणारी ही अनेक मंडळी आजूबाजूच्या माणसांचे रक्त पिउन स्वतःचा बिझनेस करत असतात. त्या कंपनीच्या मॅनेजमेंटमधले अनेक जण पैशाच्या अफरातफरीमुळे तुरुंगात आहे. मग खरे मांसाहारी कोण असा प्रश्न पडतो.

कधी कधी विशिष्ट कम्युनिटीला सपोर्ट मिळत नाही हे मी माझ्या मैत्रिणीच्या उदाहरणावरून पाहिलं. ती कोब्रा पण नवरा मुसलमान. त्यांना ह्या कारणास्तव मुंबईत अनेक बिल्डिगमध्ये जागा मिळाली नव्हती.

ह्म्म्म सर्व चर्चा वाचली, या विषयावर माझे दोन आणे.

आम्ही ज्या सोसायटीत राहतो त्यातल्या २ इमारती या फक्त जैन (कारण ते शाकाहारी असतात असे सांगितले) स्पेशल आहेत असे सांगितले होते सुरूवातीला.
तसेच आमच्याच भागात अजुन एक सोसायटी आहे ती तर पुर्ण सोसायटी जैन आहे, कारण तेच शाकाहार.
मी आणि माझे घर पुर्ण शाकाहारी आहे, मी विचारले आम्ही शाकाहारी आहोत तर आम्हाला त्या इमारतीत किंवा सोसायटीत जागा मिळेल का ? उत्तर नाही होते. Uhoh
मी म्हणालो की मग शाकाहारी असे न म्हणता निव्वळ धर्मावर आधारित आरक्षण आहे असे म्हणा,
तर त्यावर ते लोक रागावले, म्हणाले छे छे असे नाहीये, पण जे जैन नाहीत त्या लोकांचे काय सांगता येत नाही, चोरीछुपे पण मांसाहार करत असतील घरात. Uhoh
एकंदरीत मुद्दा फारच अतार्किक होता. पण कायेना की सत्तेपुढे (आणि पैशापुढे) शहाणपण चालत नाही. Sad
वाचकांपैकी कोणी जैन असतील तर कृपया गैरसमज करून घेऊ नयेत. ज्याच्या त्याच्या भावना, मागणी, पुरवठा आणि ऐपतीचा प्रश्न असतो. मला ते असे धर्मावर आरक्षण जरा खटकले इतकेच.
गेली अनेक वर्षे, जैनबहुल भागात आम्ही सुखेनैव राहतो आहोत. Happy

बेंगलोरला आमच्या कंपनीच्या कॅफेटेरियात पुर्वी नॉनवेज सेक्शन होता, तो शाकाहारी लोकांच्या जोरदार आक्षेपामुळे बंद करावा लागला. मग नंतर अगदी ठराविक दिवशी ठराविक नॉनवेज पदार्थ वेगळ्या कॉर्नरला मिळतील असे चालू केले.
२ धावा काढून गेल्यावर शतक झाल्याचे कळाले Happy

मी म्हणालो की मग शाकाहारी असे न म्हणता निव्वळ धर्मावर आधारित आरक्षण आहे असे म्हणा,>>> एक्झॅक्टली.

या लोकांची ही धंद्याची स्ट्रॅटजी आहे "शाकाहार" हे नावापुरतेच, प्रत्यक्षात स्वधर्मीयांचे चोचले. आणि हे सध्यात्यांच्यापुर्रतेच नाही पण प्रत्येक धर्मजातीबद्दल चालू आहे. शाळा निवडताना, घर निवडताना शक्यतो "आपल्यामधलेच" पाहावेत ही विचारसरणी अत्यंत घातक आहे. दुसर्‍याला "सहन" करावे लागतंय असे वागणे जेव्हा आपले चालू होते, तेव्हा आपली इन्टोलरन्स लेव्हल घसरलेली असते. हा एरिया जैनांचा, तोब्राह्मणाचंचा, पलिकडचा मुसलमानांचा असं डीमर्केशन प्रत्येक कम्युनिटी स्व्तःपुरतं आखून घेत आहेच. वर कुणीतरी "गावकुसाबाहेरची वस्ती" असं वर्णन केलंय. गावामध्ये तरी दुसरं काय असायचं? सोनारआळी, कुंभार आळी, ब्राह्मण आळी अशा सेपरेट वस्त्याच तर असायचा, आताही अनेक गोंडस नावाखाली तेच चालू आहे. वास्तविक, शाकाहारींपेक्षा मांसाहारींची संख्या जास्त आहे, परिणामी वरील "केवळ शाकाहारींसाठी फ्लॅट" हा फंडा जास्त चालणारा नाहीच हे सांगाय्ला ज्योतिषी नको. पण त्यामधून जो घातक विचार येतोय त्यासाठी मात्र आतापासूनच आळा घालणे आवश्यक.

आम्ही स्वतः कट्टर वैष्णव ब्राह्मण. घरामध्ये कांदालसूणदेखील न चालणारे लोक. आम्ही बारावर्षे मुसलमान वस्तीमध्ये राहिलो. आजूबाजूला एकही घर हिंदूचे नाही. पण इतक्या दिवसांमध्ये आम्हाला कधीही कसलाही "नॉनव्हेजचा त्रास" जाणवला नाही. वास वगैरे येत होते, पण मग आम्ही मुळ्याची किंवा कोबीची भाजी केल्यावर त्यांना येतच असणार की.

दुसर्‍याच्या अन्नाला घाण म्हणण्यासारखा दुसरा असंस्कृतपणा नाही.

दुसर्‍यांची आर्थिक नाकाबंदी करणारा अत्यंत आगाउ समाज आहे. ह्यांच्या आर्थिक हिंसेने युध्दात मारली जाणार नाहीत येव्ह्दी मानसे मारली जातात.
most of the dealerships are rigged by this community. दुसर्‍या कुणाला आत शिरुच द्यायचे नाही अशी तजवीज असते.

माणूस पब्लिकली जे बोलतो आणि प्रत्यक्षात जे असतो त्यातील फरक तो स्वतः मान्य करत नाही.

अवांतर - काही वेळा काही विशिष्ट परिस्थितीत आपल्याला काही कारणाने असावे लागते, ह्याचा अर्थ ती परिस्थिती आपण जाणीवपूर्वक स्वतःसाठी निवडलेली असते असा होत नाही.

डिस्क्रिमिनेशन योग्य नाही हे खरे.
शाकाहारी व्यक्तीला आजूबाजूच्या घरांच्यातून दरवळणारा मांसाहाराच्या (विशेषतः फिश त्यातही सुकट) वासाचा त्रास होऊ शकत असेल ही शक्यता कुणीही विचारात घेतली नाहीये. असे म्हणणारे खोटारडे असतात असा एक दावा फक्त एका प्रतिसादात केलाय. हे एकांगी नाही का?

माझ्यामते त्या जैन धर्मिय, गुज्जू वैष्णव वगैरे लोकांनी मुळात ही बंधने घालायला सुरूवात केली ते याच कारणातून असावे. आणि ते कारण कोणाला खरे खोटे वाटो न वाटो मला पटते.

शेजारच्या किंवा स्वतःच्याच घरात तळले जाणार्‍या सुकटाचा वास नाकात घुसल्यावर आणि सतत घुसत राह्यल्यावर आख्खा दिवस उलट्यांनी त्रस्त होण्यात जातो, जेवण नको होते, सर्व कामांची वाट लागते याचा पुरेपूर अनुभव मी घेतलेला आहे. एका अक्षराचीही अतिशयोक्ती नाही. (यावर माझी अक्कल, बुद्धी वगैरे काढायला वैद्यकिय मंडळी हजर असतीलच कारण तसे केले तरच त्यांची इथली इमेज वधारेल!)

असो.. मुद्दा हा की वासाचा त्रास हे फिक्शन नाहीये त्यामुळे हे डिस्क्रिमिनेशन पूर्णपणे तुच्छतेच्या तत्वावर आधारित नसावे निदान मुळात तरी हे माझे मत.

अर्थात एखाद्याच्या खाण्याच्या सवयीवरून एखाद्याला कमी लेखू नये हे मान्यच आहे. पण हे शाकाहारी व मांसाहारी दोघांनी पाळण्याची गोष्ट आहे. शाकाहारींनी मांसाहारींना कमी लेखू नये आणि मांसाहारींनी शाकाहारींना भाजीपाला, बुळबुळीत भेंडीची भाजी, गवतखाऊ असे काहीही म्हणत राह्यले तर समर्थनीय असेही नाही.

परवाच्या इंडीयन एक्स्प्रेसमध्ये एका अमेरिकन विद्यापिठाने आणि एका भारतीय संस्थेने एकत्रित केलेल्या एका सर्वेक्षणाचा निकाल छापलेला वाचला. त्या निकालानुसार भारतातील २५% लोक आजही अस्पृश्यता पाळतात. लेखात आलेली अस्पृश्यता या २५ टक्क्यात आली नसणार.

जर माझ्या खिशाने मला परवानगी दिली तर मलाही अशा जागी घर घ्यायला आवडेल जिथे राहताना शेजा-याच्या घरातुन मला न आवडणारे वास येणार नाहीत. ब-याच वर्षांपुर्वी आमचा एक शेजार ख्रिश्चन होता आणि कधीकधी त्यांच्या घरातुन असले भयाण वास यायचे की राहवत नसे तेव्हा तिथे. पण एरवी मात्र आम्हाला किंवा त्यांना एकमेकांचा कसलाच त्रास नव्हता आणि ते भयाण वासवाले पदर्थ सोडल्यास इतर पदार्थांची देवाणघेवाणही व्हायची.

मला ना ते शाकाहारी-मान्साहरी पेक्षा ते हेडिन्गमधले अओ च खुपतेय. ओ आत्मा कुठे भटकताय, बदला की ते. टिम्ब टाका आधी त्या अओ च्या.:अओ:

जर माझ्या खिशाने मला परवानगी दिली तर मलाही अशा जागी घर घ्यायला आवडेल जिथे राहताना शेजा-याच्या घरातुन मला न आवडणारे वास येणार नाहीत. <<
भयाण वास यायचे म्हणतेस तेव्हा मांसाहारी घरातून येणारे वास शाकाहारी व्यक्तींना त्रासदायक ठरू शकतात ही शक्यता मान्य करतेस ना तू?

मग ज्या लोकांकडे तुंबळ पैसा आहे आणि त्यामुळे ते त्यांना न आवडणारे वास टाळण्याची लक्झरी विकत घेऊ इच्छितात आणि घेऊ ही शकतात त्याला आक्षेप का?

नीधप, तुम्ही शपथेवर लिहून दिलं की "मी मांसाहार करत नाही, या घरात कधीही करणार नाही" तरी तुम्हाला तिथे घर मिळणार नाही, हा आक्षेपाचा मुद्दा आहे.

नीधप, तुम्ही शपथेवर लिहून दिलं की "मी मांसाहार करत नाही, या घरात कधीही करणार नाही" तरी तुम्हाला तिथे घर मिळणार नाही, हा आक्षेपाचा मुद्दा आहे.>>>>>>>>

@नताशा - अगदी धर्म आणि जातीच्या नावावर शेजार्‍याची निवड केली तर काय हरकत आहे. संविधानाने पूर्ण अधिकार दिलेला आहे.
मला एका समाजाच्या लोकांबरोबर रहाणे कंफर्ट देत असेल तर मला तो चॉइस नको का?

आणि मी हा चॉईस फक्त माझ्यासाठी मागत नाहीये, सर्वांसाठीच असावा. कोणाला मी शेजारी नको असेन तर मी त्याच्यावर जबरदस्ती का करावी?

भारतात आधीच कोणा नेत्याबद्दल, ऐतिहासिक लोकांबद्दल "ब्र" काढायला अघोषित बंदी आलेली आहे. आता शेजारी निवडण्यावर पण.

मी आधीपण लिहीले होते पण त्याकडे सोयीस्कर पणे दुर्लक्ष केले गेले.

अल्पसंख्यांकांच्या हजारो शिक्षणसंस्था, गृहरचना सोसायट्या आहेत. त्याबद्दल कोणी एक वाक्य पण लिहायला तयार नाही. ज्यांची एक गठ्ठा मते नाहीत कुठल्याही मतदारसंघात त्या जैन लोकांना मात्र टारगेट करण्यात येते आहे.

ह्या अल्पसंख्यांक शिक्षणसंस्थेत आरक्षण पण लागू नाही, पण कोणी दलित किंवा ब्रिगेडी संघटना त्या विरुद्ध आवाज उठवत नाहीत.

मनसे नी तर ह्या विषयावर बोलूच नये. ज्यांच्या पक्षाची स्थापनाच भाषेवर आधारीत भेदभाव करण्यासाठी झाली ( आणि त्यावर स्वताची पोळी भाजण्यासाठी झाली ) त्यांनी तर अजिबात बोलू नये.

नीधप, तुम्ही शपथेवर लिहून दिलं की "मी मांसाहार करत नाही, या घरात कधीही करणार नाही" तरी तुम्हाला तिथे घर मिळणार नाही, हा आक्षेपाचा मुद्दा आहे. <<<
मान्य.
मला आक्षेप समजतो आहे, मान्य आहे आणि या घटनांमधले डिस्क्रिमिनेशनही समजतेय आणि ते चुकीचे आहे हे ही.
फक्त मुळात चाळण लावायचे कारण आणि गृहितक/ क्रायटेरिया काय असू शकतो हे दाखवायचा प्रयत्न होता.

मला आक्षेप समजतो आहे, मान्य आहे आणि या घटनांमधले डिस्क्रिमिनेशनही समजतेय आणि ते चुकीचे आहे हे ही.>>>>>>>>

@नीधप - आक्षेप ही चुकीचा आहे आणी डिस्क्रिमिनेशनही अजिबात नाहीये. ह्या सर्व प्रकारात.
जी काही गळचेपी होते आहे ते व्यक्ती स्वातंत्र्याची.

हा मुद्दा फार बेसिक आहे.

मला आणि माझ्यासारखी आवड्/मते असणार्‍यांना एकत्र रहायचे असेल तर त्यात काही चुक नाही. घटनेप्रमाणे पण काही चुक नाही. माझ्यासारखी आवड्/मते असणार्‍यांच्या ग्रुप मधे ज्याची आवड/मते वेगळी आहेत त्यांना घुसण्याचा कुठलाही नैसर्गीक किंवा घटनादत्त अधिकार नाही.

आपली मित्र मंडळी पण आपल्या आवडीनुसार असतात, तिथे कोणी जबरदस्ती करुन "मला पण घ्या तुमच्यात" असे म्हणाला तर चालेल का?

कोणी शास्त्रीय संगीताचा ग्रुप काढला तर त्यात मला शास्त्रीय संगीत अजिबात आवडत नाही तरी घ्यायलाच पाहीजे आणि मी वाजवीन ती रॉक गाणी सर्वांनी ऐकलीच पाहीजेत असे कोणी म्हणले तर चालेल का?

>>>ज्यांची एक गठ्ठा मते नाहीत कुठल्याही मतदारसंघात त्या जैन लोकांना मात्र टारगेट करण्यात येते आहे<<<

टोचा, ह्याच्याशी असहमत! पटो वा ना पटो, हा धागा ब्राह्मणविरोधासाठी आहे, जैनविरोध किंवा बिल्डरविरोधासाठी नाही.

तुमच्या ह्या मताशी मात्र सहमत व गेले दोन दिवस तेच लिहितोय, पण काहींना त्या फालतू कमेंट्स वाटत आहेत.

>>>हा मुद्दा फार बेसिक आहे.<<<

मुळात, वर कोणीतरी आधी म्हंटलेच आहे त्याप्रमाणे, स्वतःच त्या आहाराला 'अभक्ष्यभक्षण' म्हणणे हाच एक लपलेला विनोद आहे.

धर्म, जात, संप्रदाय, स्वामी/बुवा वगैरे, प्रांत, भाषा, व्यवसाय, सणवार, आहार, छंद, आर्थिक स्तर, व्यसनी / निर्व्यसनी असणे, मूळ गाव एकच असणे अश्या अनेक निकषांवर मनुष्य आपल्याला सोयीचे वाटतील असे सोबती निवडतो. रोटी बेटी व्यवहार समधर्मीयांत करताना आपल्याला प्रश्न पडत नाही. एखादा मुसलमान देवळात का जात नाही असे विचारावेसे आपल्याला वाटत नाही. एखाद्या मशिदीत हिंदूला का घेत नाहीत असे आपण म्हणत नाही. एखादा कारखानदार झोपडपट्टीत का राहात नाही असे आपण विचारत नाही. सगळे सोनार एकाच गल्लीत का दुकाने थाटतात असा प्रश्न आपल्याला पडत नाही.

मग इथे का प्रॉब्लेम येतो?

Pages