नो शेल्टर फॉर अभक्ष्यभक्षी :अओ:

Submitted by जाग्याव पलटी on 28 November, 2014 - 02:21

आजच्या वर्तमानपत्रात एक अनोखी बातमी वाचायला मिळाली की मनसे, शिवसेना, काँग्रेस आणि इतर पक्षांच्या आमदारांनी भाजपाचा संपूर्ण विरोध असताना विधानसभेला एक ठराव मंजूर करायला लावला की,

मुंबईत काही बिल्डर्सकडून "मांसाहारी लोकांना घरे विकायची नाहीत" अशा प्रकारची तिरस्करनीय गोष्ट अंमलात आणली जात आहे अशा बिल्डर्सना त्या प्रकल्पांची आय ओ डी दिली जावू नये

चर्चेचा प्रस्ताव
१. मांसाहार करणार्‍यांना घरे विकायची नाहीत ही कशा प्रकारची मानसिकता आहे? हे अन्यायकारक आहे किंवा कसे?
२. सत्तेतल्या पक्षाने सर्वसमावेशक विचार करणे अपेक्षित असताना भाजपाचा त्याला विरोध का असावा?
३. कोण काय आहार करतो ह्यावरून त्याला निवारा मिळावा की नाही ठरवणे कितपत योग्य आहे?
४. अशा प्रकारच्या बिल्डर्सच्या निर्णयांमागचे छुपे अजेंडाज काय असू शकतील?

प्रश्न मुंबईतला असला तरी वादप्रविण लोकांनी इतर शहरातल्या वातावरणावर भाष्य केल्यास माझी काही हरकत नाही Wink

तर करा सुरूवात!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नीरजा, तुला जे म्हणायचंय ते पटतंय पण मला वाटतं इतक्या टोकाचा त्रास फार कमी जणांना होतो, आणी तो दुसर्‍याच्या खाण्याला "किळसवाणा" अथवा "अभक्ष्य" मानणे यातून आलेला नाही. माझा एक मित्र सुकटाच्या वासाने बकाबका ओकतो - पक्क्या मासेमारी आणि खाऊ कम्युनिटीचा असूनदेखील.

अशा लोकांना त्रास होऊ नये म्हणून वेगळं घर घेण्यामधेय काहीच प्रॉब्लेम नाही. (वास्तविक ते त्यांना शक्य नाहीच आहे पण ते असो) ....

१. तुमच्या नॉनव्हेजचा वास आमच्या धार्मिक भावना दुखावतो.
२. तुमच्या नमाझाची बांग आमच्या कानांना त्रास देते
३. तुमच्या घरामधल्या गणपतीच्या आरतीचा आवाज आम्हाला ऐकू आलेला आमच्या धर्मात चालत नाही.

वगैरे गोष्टी घातक आहेत. अतिरेकी धार्मिक उन्माद जितक आणि जेवढा घातक आहे त्याहून अधिक दुसर्‍या धर्माअच्या व्यक्तींना कमी लेखणं त्यांना हीन मानणं हे जास्त घातक आहे. आणि त्याबद्दल मात्र कुणीच बोलत नाहीये.

>>>अतिरेकी धार्मिक उन्माद जितक आणि जेवढा घातक आहे त्याहून अधिक दुसर्‍या धर्माअच्या व्यक्तींना कमी लेखणं त्यांना हीन मानणं हे जास्त घातक आहे. आणि त्याबद्दल मात्र कुणीच बोलत नाहीये.<<<

इथे त्याचा नेमका संबंध काय ते समजले नाही.

प्रिन्सिपली हा मुद्दा मान्य आहेच, पण मांसाहारींना सदनिका न देणे ह्या व्यावसायिक निर्णयात एकदम भावना का दुखावल्या जात आहेत, हा धर्म जात ह्याच्याशी संबंधीत विषय जर नसलाच तर?

जर मांसाहारी संख्येने जास्त आहेत तर उलट त्यांना प्रॉब्लेम यायलाच नको! अनेक जागा त्यांना उपलब्ध असतील.

एक प्रश्न - सरकारी गृहयोजना अंतर्गत जी बांधकामे होतात, म्हाडाच्या हाऊसिंग सोसायट्या बनतात, तिथे असे भेदभाव केले जातात का? उत्तर नाही असेल तर सरकार का नाही हि फॅसिलिटी पुरवत?

अतिरेकी धार्मिक उन्माद जितक आणि जेवढा घातक आहे त्याहून अधिक दुसर्‍या धर्माच्या व्यक्तींना कमी लेखणं त्यांना हीन मानणं हे जास्त घातक आहे. आणि त्याबद्दल मात्र कुणीच बोलत नाहीये.
<<
१००% सहमत. ही बेसिक सेंटीमेंट आहे माझीही.

बेफि,
वेड पांघरून पेडगावला गेल्यासारखे करू नका. विषय काय सुरू आहे ते जरा समजवून घ्या. वर म्हटलो, तसे 'परिप्रेक्ष्य वाढवा' ही विनंती.

बेफि, सर्व सोन्याची दुकाने एकाच भागात, सर्व कपड्यांची दुकाने एकाच रस्त्यावर याची मला फार गंमत वाटायची, असे वाटायचे की ही दुकाने शहराच्या वेगवेगळ्या भागात विखुरलेली का नाहीत.
पण याचे उत्तर महिलावर्गाकडून मिळाले, जर अनेक दुकाने फिरून कमी किंमतीत चांगला माल घ्यायचा असेल तर त्यासाठी ही सारी दुकाने एकाच भागात असणेच योग्य.
असो जरा विषयांतराबद्दल खोमा कोरबेन ! Happy

^^^
थोडक्यात या योजनेमुळे कोणी शाकाहारी व्यक्तींच्या शोधात निघाला तर सारेच शाकाहारी एकाच ठिकाणी सापडतील तर...

Pages