नो शेल्टर फॉर अभक्ष्यभक्षी :अओ:

Submitted by जाग्याव पलटी on 28 November, 2014 - 02:21

आजच्या वर्तमानपत्रात एक अनोखी बातमी वाचायला मिळाली की मनसे, शिवसेना, काँग्रेस आणि इतर पक्षांच्या आमदारांनी भाजपाचा संपूर्ण विरोध असताना विधानसभेला एक ठराव मंजूर करायला लावला की,

मुंबईत काही बिल्डर्सकडून "मांसाहारी लोकांना घरे विकायची नाहीत" अशा प्रकारची तिरस्करनीय गोष्ट अंमलात आणली जात आहे अशा बिल्डर्सना त्या प्रकल्पांची आय ओ डी दिली जावू नये

चर्चेचा प्रस्ताव
१. मांसाहार करणार्‍यांना घरे विकायची नाहीत ही कशा प्रकारची मानसिकता आहे? हे अन्यायकारक आहे किंवा कसे?
२. सत्तेतल्या पक्षाने सर्वसमावेशक विचार करणे अपेक्षित असताना भाजपाचा त्याला विरोध का असावा?
३. कोण काय आहार करतो ह्यावरून त्याला निवारा मिळावा की नाही ठरवणे कितपत योग्य आहे?
४. अशा प्रकारच्या बिल्डर्सच्या निर्णयांमागचे छुपे अजेंडाज काय असू शकतील?

प्रश्न मुंबईतला असला तरी वादप्रविण लोकांनी इतर शहरातल्या वातावरणावर भाष्य केल्यास माझी काही हरकत नाही Wink

तर करा सुरूवात!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२. सत्तेतल्या पक्षाने सर्वसमावेशक विचार करणे अपेक्षित असताना भाजपाचा त्याला विरोध का असावा? > भाजप फक्त आणि फक्त श्रीमंत व्यापारांचा पक्ष आहे आणि अश्या इमारतीमधे गुजराती जैन व्यापारी मोठ्या प्रमाणात राहत असल्याने त्यांचे हितसंबम्ध आधी भाजप्ये बघतात. खास करुन गुजराती हे भाजप्ये फक्त तोंडानीच बोलतात "मेरे १२५ करोड भारतीय" बाकी त्यांच्यामते ६ करोडच त्यांचे नातेवाईक असतात. त्यांच्यालेखी इतर जनता नंतर येत (किंबहुना येतच नाही)

असेच जर होत राहीले असते, तर आमच्यासारख्या कट्टर मांसाहारी लोकांना रस्त्यावर यावे लागले असते.. Proud Wink

ह्यातला राज्कारणी भाग सोडला तर .....मला पुण्यातिल अशी सोसायटी माहित आहे कि ति जेवा बाधलि जात होती तेव्हा फक्त ---को ब्रा नाच फ्लॅट मिळ्तिल असे सागितले होते ..आणी अत्ता पण त्या सो. मधे फक्त को ब्र च रहातात ....

काय म्हणावे ह्या मानसिकतेला माहित नाही .....

बहुतेक अगोदर सोसायटी बनवून नंतर त्यांच्या मेंबरांनाच फ्लॅट विकायचे असतील तर सोसायटी बनविण्यापूर्वी काही गेटस ठेवता येतात.
गेटेड कम्युनिटीज म्हटले जाते याला.
आता एखाद्या भागातल्या अमुक एका कम्युनिटीने ठरवले काही नियम तर आपण बहुतेक नंतर रेझिस्टन्स दाखवू शकत नाही.

मात्रं अगोदरच बांधून ठेवलेल्या इमारतीत विकताना असे निर्बंध घालता येत नाहीत. जे घालतात ते बेकायदेशीर आहेत आणि त्याला विरोध व्हायलाच हवा.

साती आपले म्हणणे पटले.

पण प्रश्न कम्युनिटीज चा नसून बिल्डर्सचा आहे आणि शाकाहारी, मांसाहारी ह्या कम्युनिटीही होऊ शकत नाहीत.

मांसाहार करणार्‍यांना घरे विकायची नाहीत ही कशा प्रकारची मानसिकता आहे? हे अन्यायकारक आहे किंवा कसे?>>>>>> ह्यात अन्यायकारक काही नाही.

१. प्रत्येकाला आपला शेजार निवडायचा हक्क आहे. जसा तो शाकाहारी लोकांना आहे तसा तो मांसाहारी लोकांना पण आहे. प्रत्येकाने तो हक्क बजावावा.
२. मांसाहारी लोकांनी शाकाहारी लोकांना घरे विकु नयेत.

ह्यातला राज्कारणी भाग सोडला तर .....मला पुण्यातिल अशी सोसायटी माहित आहे कि ति जेवा बाधलि जात होती तेव्हा फक्त ---को ब्रा नाच फ्लॅट मिळ्तिल असे सागितले होते ..आणी अत्ता पण त्या सो. मधे फक्त को ब्र च रहातात ....

काय म्हणावे ह्या मानसिकतेला माहित नाही .....>>>>>> ह्यात काय चुक आहे? प्रत्येकजण समाजातल्या एका वर्गाशी जास्त निगडीत असतो, त्या लोकांना एकत्र रहावे असे वाटले तर वाईट काय आहे? ह्यात काही जबरदस्ती नाहीये. तुमची जळ्जळ होतीय असे वाटतय.

मनसेने बरोबर दणका दिला आहे या भाजप्यांना
हेच लोक परदेशी गेल्यावर मात्र जे पुढ्यात येते ते खातात. दांभिक

हा मांसाहारीना फ्लॅट न विकण्याचा प्रकार गेली बरीच वर्षे सुरु आहे. हे एक प्रकारचे डिस्क्रिमिनेशनच.
टोच्या, शेजारी निवडायचा हक्क म्हणजे दुसर्‍याला घर नाकारायचा हक्क नव्हे. तुम्हाला एखाद्या कम्युनिटीत घर नको असेल तर ठीक पण दुसर्‍या व्यक्तीला घर न विकणे हे अत्यंत चुकीचे आणि अन्यायकारक. हे म्हणजे गावकुसाबाहेर दलीत वस्ती , त्यांना सवर्ण रहातात त्या गल्लीत घर नाही तसे झाले. ते जितके अन्यायकारक तसेच हे देखील. हीच लोकं इथे अमेरीकेत आली ही लगेच रेस कार्ड खेळायला तयार असतात .

>>>तुमची जळ्जळ होतीय असे वाटतय.<<<

तो क्रॉनिक प्रॉब्लेम आहे टोचा, इतरही ठिकाणी त्याची लक्षणे उघड होतच आहेत.

बिल्डर्सचा शेजार निवडण्याशी काय संबंध?

असा निर्णय मुंबईतले बिल्डर राबवताहेत हे आधी लक्षात घ्या. मुंबईतली जनता कुठलीही आहारी असली तरी मिळून मिसळूनच राहते. त्यांचे नको ते नखरे नसतात हाच पाहिजे तोच पाहिजे असे.

असा निर्णय मुंबईतले बिल्डर राबवताहेत हे आधी लक्षात घ्या>>>>>>
तो त्यांचा USP युनिक सेलींग पॉईंट आहे.
अश्या स्कीम मधे ते जास्त दराने फ्लॅट विकतात. ह्यात काय चुक आहे?
बिल्डर ला तिथे रहायचेच नाहीये, त्यामुळे त्याला काही फरक पडत नाही.

हा मांसाहारीना फ्लॅट न विकण्याचा प्रकार गेली बरीच वर्षे सुरु आहे. हे एक प्रकारचे डिस्क्रिमिनेशनच.>>> पण मासाहारींनी पण वेगळ्या सोसायट्या काढाव्यात असे मी लिहीले आहे. मांसाहारी जनता तर ९० टक्के असेल, तर खरेतर शाकाहार्‍यांनाच प्रॉब्लेम येइल.

ह्या सर्व प्रकारात मांसाहारींनी दीनवाणी भुमिका का घेतली आहे ते मला कळले नाही. मुबैत काय तेव्हड्याच सोसायट्या आहेत? "हाड" म्हणायचे त्या बिल्डर ला. तो शाकाहारी स्कीम करणारा बिल्डरच मटन वाली, मासे वाली अश्या वेगवेगळ्या स्कीम काढेल, जर त्याला त्यात मार्केट दिसले तर.

हे म्हणजे गावकुसाबाहेर दलीत वस्ती , त्यांना सवर्ण रहातात त्या गल्लीत घर नाही तसे झाले>>>>>

@स्वाती - हा बघण्याचा दृष्टीकोन च चुकीचा आहे. त्या शाकाहारी सोसायट्यांना गावकुसाबाहेरची दलित वस्ती म्हणा ना. तुम्ही आमच्या सारख्या मांसाहारींना दलित का म्हणताय?

शाकाहारी सोसायट्यांना विरोध करणार्‍यांना अल्पसंख्याकांच्या शाळा आणि कॉलेज दिसत नाहीत. तिथे फक्त "त्यांना" च प्रवेश आणि आरक्षण नाही , काही नाही.

टोच्या, मी देखील मांसाहारीच आहे.
असे बघा. अमुक एक बिल्डिंग प्रोजेक्ट सुरु झालाय. लोकेशन मला सर्व दृष्टीने अनुकुल आहे. बिल्डरने रेट लावलाय तो ही मला ठीक आहे. पण मला बिल्डर फ्लॅट विकायला तयार नाही कारण मी मांसाहारी आहे. मला जर का त्या प्राइम लोकेशनला फ्लॅट विकत घेण्याला केवळ मांसाहारी म्हणून अटकाव होत असेल तर माझ्या दृष्तीने ते गावकुसाबाहेर सारखेच.

@स्वाती - हा बघण्याचा दृष्टीकोन च चुकीचा आहे. त्या शाकाहारी सोसायट्यांना गावकुसाबाहेरची दलित वस्ती म्हणा ना. तुम्ही आमच्या सारख्या मांसाहारींना दलित का म्हणताय?>>> Uhoh

हे दोन्ही प्रकारे बोललं तरी ते योग्य नाहीच हो.
असं जातीवरुन का डिसक्रेमेनेशन Uhoh

इथे अमेरिकेत मी भारतीय वंशाची आहे म्हणून मला चांगल्या स्कुल डिस्ट्रिक्टमधे घर घ्यायला प्रतिबंध केला गेला तर ते डिस्क्रिमिनेशन आहे तसेच हे भारतातले प्रकार.

मला जर का त्या प्राइम लोकेशनला फ्लॅट विकत घेण्याला केवळ मांसाहारी म्हणून अटकाव होत असेल तर माझ्या दृष्तीने ते गावकुसाबाहेर सारखेच.>>>>>>>
एकतर एखाद्या लोकेशन ला एकच स्कीम चालू आहे हे पटण्यासारखे नाही.

आणि तुम्ही बिल्डरच्या बाजूनी विचार करा.
जर त्या एरीयात १०,००० रेट चालू आहे, पण शाकाहारी स्कीम च्या नावाखाली तो बिल्डर १२,००० रेट लावुन काही लोकांना विकत् आहे. त्यात त्याने तुम्हाला एक फ्लॅट विकला ( १२,००० च्या रेट नी ), तर त्याला जो बाकीच्यांकडुन शाकाहारी स्कीम असल्याचा प्रिमियम मिळणार होता ( २,००० ) तो गेला ना प्रत्येक फ्लॅट मागे.

आणि बिल्डरच्या लक्षात आले की फक्त मांसाहारी सोसायटी काढली तर १२००० रेट मिळणार आहे तर तो लगेच काढेल. मार्केट आहे हो हे, ज्याच्या कडे जास्त पैसे त्याचेच चालणार.

इथे अमेरिकेत मी भारतीय वंशाची आहे म्हणून मला चांगल्या स्कुल डिस्ट्रिक्टमधे घर घ्यायला प्रतिबंध केला गेला तर ते डिस्क्रिमिनेशन आहे तसेच हे भारतातले प्रकार.>>>>>>>> स्वाती ताई, तुम्ही शाकाहारी स्कीम म्हणजे बाकीच्यांपेक्षा वरची असे मनात धरुन सर्व युक्तीवाद करता आहात. हाच युक्तीवाद तुम्ही शाकाहारी सोसायटी म्हणजे काहीतरी "Down Market" (दलित पेक्षा वेगळा शब्द ) आहे असा मनात आणुन करा ना. असा विचार करा की तुम्ही हार्लेम मधे घर कशाला घ्याल.

हे दोन्ही प्रकारे बोललं तरी ते योग्य नाहीच हो.>>>>>>

झकासराव - दलित म्हणजे जातीवाचक नाही हो, दलित म्हणजे उतरंडीवरचा खालचा, जो दाबला गेला आहे समाजा कडुन.

पूर्ण सातारा, सांगली भागातल्या ग्रामिण भागातुन ब्राह्मणांना अघोषित बंदी घालुन गावाबाहेर काढण्यात आले ( त्यांच्या जमिनी लाटुन ). त्या भागात ब्राह्मण हा दलितच आहे.

>>एकतर एखाद्या लोकेशन ला एकच स्कीम चालू आहे हे पटण्यासारखे नाही.>>
अगदी १० स्किम्स सुरु असल्या तरी एकदा एका लोकेशनला हे चालवून घेतले जाते असे दिसले की इतर ठिकाणीही असेच चालते. मासांहारी म्हणून नको, मुस्लिम्/खिश्चन आहात म्हणून नको. हे डिस्क्रिमिनेशनच आहे. मार्केट वगैरे ठीकच पण गैर ते गैर! त्याचे समर्थन नको. काळ सोकावला आहेच अजून उत्तेजन नको.

माझा आक्षेप हा कुठल्याही प्रकारच्या डिस्क्रिमिनेशन ला आहे. शाकाहारी स्किम वगैरे एक प्रकारे मागल्या दाराने आणलेले डिस्क्रिमिनेशन.

स्वाती२ ला पूर्ण अनुमोदन.
आहाराच्या सवयीवरून जागा नाकारणे म्हणजे डीस्क्रीमिनेशनच. गावकुसाबाहेर analogy पण पटली.

स्वाती२, मला मूळ प्रश्न लक्षात येत नाही त्यामुळे तुझे मुद्दे ही समजले नाही (अस फार कमी वेळा होते म्हणून ह्या पोस्टीचा प्रपंच Happy ). एका कुटुंबात शाकाहारी आणि मांसाहारी लोक असू शकतात. किंवा घरी करत नाही पण बाहेर गेल्यावर खातो अशी स्थिती असते. काहीवेळा आयुष्यभर मांसाहारी असलेल्या व्यक्ती प्रकृतीसाठी शाकाहारी होतात. थोडक्यात आहार हा बदलणारा कन्सेप्ट आहे. तो जाती किंवा रेस सारखा/इतका स्थिर नाही. बिल्डर लोक नक्की काय निकषावर घर देत आहेत हे समजले नाही.

१. मांसाहार करणार्‍यांना घरे विकायची नाहीत ही कशा प्रकारची मानसिकता आहे? हे अन्यायकारक आहे किंवा कसे?<<<<

मांसाहार करणार्‍यांना घरे विकायची नाहीत ही मानसिकता कट्टर शाकाहारी व्यापार्‍यांची असू शकते. असे कट्टर शाकाहारी भारत देशात प्रामुख्याने जैन समाजात आहेत. कोणे एके काळी ब्राह्मण कट्टर शाकाहारी असत, ते चित्र आता पुष्कळच बदललेले आहे. आता मांसाहारी ब्राह्मण शुद्ध शाकाहारी ब्राह्मणांपेक्षा संख्येने खूपच अधिक असतील. मात्र जैन धर्मियांमध्ये 'कट्टर शाकाहारी' असलेले अजून पुष्कळ लोक आहेत. अनेक ढाब्यांवर / उपाहारगृहांमध्ये खास 'जैन पदार्थ' मिळतात. 'जैन पाव भाजीसुद्धा' मिळते. माझ्या व्यावसायिक परिचयातील कित्येक जैन लोक सुर्यास्तापूर्वी जेवून घेतात व नंतर काहीही घेत नाहीत. अनेक जैन कट्टर शाकाहारी (माझ्या परिचयातील) बाहेर जेवायला गेले तर बार्बेक्यूच्या सळया मांसाहारी पदार्थांसाठी वापरत असतील तर शाकाहारी कबाबही खात नाहीत. (अर्थातच, माझ्या परिचयात मद्यपान व मांसाहार करणारे जैनही आहेत, पण फारच तुरळक). तेव्हा कट्टर शाकाहारी व्यापारी लोकांनी आपल्याच समाजातील कट्टर शाकाहारी गिर्‍हाईकांना एकत्र राहता यावे व आजूबाजूला मांस शिजवले जाण्यामुळे व्यथित व्हावे लागू नये ह्या उद्देशाने ही मानसिकता बाळगलेली असावी.

प्रश्नाचा पुढचा भाग - हे अन्यायकारक आहे किंवा कसे! हे मला तरी अन्यायकारक वाटत नाही. अन्याय ह्या शब्दाचा अर्थ 'न्याय न होऊ देणे / न्यायाने न वागणे / कोणालातरी त्रास देणे'! व्यापार्‍यांच्या ह्या मानसिकतेमुळे काही मांसाहारी गिर्‍हाईकांची एक संधी हुकत आहे हा भाग सोडला तर कोणावर विशेष अन्याय झालेला दिसत नाही. अश्या गिर्‍हाईकांना इतर कित्येक संधी उपलब्ध आहेत.

२. सत्तेतल्या पक्षाने सर्वसमावेशक विचार करणे अपेक्षित असताना भाजपाचा त्याला विरोध का असावा?<<<

हा विषय इतक्या झटपट व इतक्या तीव्रतेने राजकीय का झाला हे लक्षात आलेले नाही. ह्या विषयाला राजकीय रंग लावणे हे किंचित गोंधळात टाकणारे आहे. अजून क्लॅरिटीची आवश्यकता वाटत आहे.

३. कोण काय आहार करतो ह्यावरून त्याला निवारा मिळावा की नाही ठरवणे कितपत योग्य आहे?<<<

व्यापारी 'मांसाहार्‍यांना घर मिळू नये' अशी भूमिका घेत नाही आहेत. व्यापारी म्हणत आहेत की 'आम्ही कायद्याने विकत घेतलेल्या जमीनींवर कायद्यानुसार केलेल्या बांधकामांमधील सदनिका आम्ही कोणाला विकाव्यात हा आमचा प्रश्न आहे'. मुंबईत मध्यंतरी मुस्लिम व हिंदू गिर्‍हाईकांनाही असेच अनुभव आलेले होते. मुस्लिम बिल्डरच्या योजनेत हिंदूंना जागा घेऊ नका असे बिल्डरच सुचवत होते व व्हाईस व्हर्सा!

४. अशा प्रकारच्या बिल्डर्सच्या निर्णयांमागचे छुपे अजेंडाज काय असू शकतील?<<<

त्या अजेंडांना छुपे म्हणण्यामागची भूमिका आधी समजली तर बरे होईल. ते बिल्डर्स तर बिनदिक्कतपणे हा प्रकार करत आहेत, त्यात काही छुपा अजेंडा आहे असे कोणाला वाटत आहे? का वाटत आहे? आणि कोणता छुपा अजेंडा? छुपे अजेंडाज असू शकत असतील हे गृहीतक पडताळून पाहणे आवश्यक! बिल्डर्स उघडपणे हे करत आहेत व त्याचे एकमेव कारण म्हणजे 'स्व-धर्मियांची सोय'!

आता ह्यावर जर भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे वगैरे युक्तिवाद होणार असतील तरः

१. आपण आपल्या मुलीचे लग्न मुद्दाम परकीय धर्मात कधी करतो का? प्रेमविवाह असला / मुलगा - मुलगी पळूनच गेलेले असले / आत्महत्येची किंवा कधीच लग्न न करण्याची धमकी देत असले तरच आपण तो विचार करतो. अन्यथा, शक्य आहे तोवर आपण आपल्याच समाजात 'बेटी-व्यवहार' करतो.

२. कन्स्ट्रक्शन हा एक व्यवसाय आहे व तो बराच काळ 'सेलर्स मार्केट' प्रकारचा राहिलेला आहे. म्हणजे ग्राहक कायमच गरजू, कर्जे काढून फ्लॅट घेऊ पाहणारे, याचक ह्या भूमिकेत राहिलेले आहेत. त्यामुळे, एक सामान्य ग्राहक म्हणून वरील बाबीकडे पाहताना आपण 'आम्हाला का म्हणून जागा मिळू नये' असा विचार करतो. पण बिल्डरसाठी तो व्यवसाय असतो. जागा त्याची, इमारत त्याची, सर्व परवानग्या त्याने घेतलेल्या, सर्व भांडवल त्याचे आणि रेट मार्केट रेटप्रमाणेच! त्यामुळे तो हे निर्णयस्वातंत्र्य स्वतःकडे घेतो.

३. माझ्या दुकानात असलेला माल मला दुकानात आलेल्या गिर्‍हाईकाला विकायचाच नसला तर? 'काढलंय कशाला दुकान' म्हणण्यापलीकडे गिर्‍हाईक काय म्हणू शकणार? हा सगळा डिमांड-सप्लायचा प्रश्न आहे. बिल्डरकडे आज कट्टर शाकाहारी गिर्‍हाईके ढिगाने आहेत. ग्राहकांसाठी त्याच लोकेशनमध्ये ढिगाने नव्या इमारती उभ्या राहात आहेत.

४. जसा गिर्‍हाईकाला चॉईस असतो तसा बिल्डरला का नाही? गिर्‍हाईक जर फ्लॅट घेताना 'मी माझ्या समाजातील बिल्डर असला तर बरा म्हणेन, आजूबाजूला माझ्या समाजातील माणसे असलेल्या ठिकाणी घर घेण्यास मी अधिक इच्छुक असेन, माझ्यासमोर पाच ऑप्शन्स असली तर किंमत, सुविधा, लोकेशन ह्याचप्रमाणे शेजारीपाजारी कोण हाही निकष लावून मी एक बिल्डर निवडेन व इतरांना माझ्या प्राधान्ययादीतून हुसकावून लावेन' असे सर्व विचार करत असेल तर बिल्डरने का करू नयेत?

ही मते पटत नसल्यास अवश्य प्रतिवाद व्हावा, अधिक चर्चा वाचण्यास नक्कीच उत्सुक!

-'बेफिकीर'!

सिमंतिनी, प्रकृतीसाठी मासांहार, जोडीदार मांसाहारी नाही म्हणून मांसाहार करणे थांबवले. एकाच घरातले भीन्न आहार पद्धती आचरणारे किंवा परंपरेने शाकाहारी आहोत त्यामुळे घरी शिजवत नाही पण बाहेर खातो हे सगळे व्यक्तिगत पातळीवर सामंजस्याने होणारे वर्तन झाले. हे असे वर्तन माझ्या नात्यागोत्यात जवळून बघितले आहे. पण जेव्हा बिल्डर तुम्ही मांसाहारी आहात म्हणून तुम्हाला फ्लॅट विकायलाच नकार देतो तेव्हा ते डिस्क्रिमिनेशन नाही का? ही बिल्डिंग स्किम शाकाहारी इथे मांसाहार करणार्‍यांना फ्लॅट विकले जाणार नाहित हे एक प्रकारचे डिस्क्रिमिनेशनच. भारतासारख्या देशात जिथे नुसत्या तुमच्या अडनावावरुन जात्,प्रांत, तुम्ही खाणारे की नाही वगैरे अंदाज बांधले जातात तिथे तुम्ही परंपरेने 'खाणारे' असाल तर तुम्हाला बिल्डर घर विकत नाही. हे असे तुम्ही मुस्लिम्/ख्रिश्चन आहात म्हणूनही केले जाते. स्वतःचा को ऑप सोसायटीचा फ्लॅट मुस्लिम कुटुंबाला विकायचा असेल तर ना ना प्रकारे हरकत घेतली जाते. सध्यातरी को ऑप सोसायटीतले फ्लॅट्स अमुकच एका प्रकारचे रिलीजन वगैरे असलेल्या लोकांनाच अशा प्रकारच्या वर्तनाविरुद्ध कुठलाही कायदा नाही. थोडक्यात हाउसिंग बाबत इक्वल ऑपॉर्ट्युनिटी नाही. .

Pages