चिकन - १/२ किलो
कांदा - १ मोठा
टोमॅटो - २
सुके खोबरे - १/२ वाटी किसलेले
लसुण - ३-४ पाकळ्या
आले - १ इंचाचा तुकडा
दालचिनी - १ छोटा तुकडा
काळि मिरी - ४-५
लवंग - २-३
धने - १ चमचा
हिरवी विलायची - २
हळद - १/२ चमचा
लाल तिखट - २ चमचे
गरम मसाला - १/२ चमचा
घरचा मसाला - १ चमचा
तेल - ३-४ चमचे
मिठ चवीनुसार
कोथिंबीर - सजावटीसाठी
१. चिकन स्वच्छ धुवुन याचे मध्यम आकारात तुकडे करुन घ्यावेत.
२. खालील फोटोत दाखवलेले सर्व पदार्थ मिक्सर मधे एकदम बारीक वाटुन घ्यावेत.
३. कढईत तेल गरम करुन घ्यावे.
४. त्यात वाटलेला मसाला टाकुन तेल सुटेपर्यंत परतुन घ्यावे.
५. मसाल्याला तेल सुटल्यावर त्यात हळद, लाल तिखट, घरचा मसाला, गरम मसाला व धणे पावडर टाकुन निट परतुन घ्यावे.
६. मसाला एकत्र करुन त्यात चिकनचे तुकडे व चवीनुसार मिठ टाकुन निट मिक्स करावे.
७. कढईवर ताटली ठेवुन त्यात थोडे पाणी टाकावे.
८. ५ मिनिटांनी बघितल्यावर चिकनला पाणी सुटले असेल. त्यात तुम्हाला पाहिजे तेवढे अजुन पाणी टाकुन मिक्स करावे व झाकण ठेवुन चिकन शिजु द्यावे.
९. चिकन शिजल्यावर गॅस बंद करावा.
१०. तांदुळाची भाकरी व जिरा राईस सोबत चिकन करी serve करावी.
आशा आहे ही झटपट होणारी चिकन करी तुम्हाला आवडेल.
शेवटचा फोटो फार सुंदर आला
शेवटचा फोटो फार सुंदर आला आहे! ती सर्व्ह करण्याची मिनि-कढाई मस्त आहे !!
व्वा सूंदर फोटो.
व्वा सूंदर फोटो.
याला म्हणतात प्रेझेंटेशनचे
याला म्हणतात प्रेझेंटेशनचे फुल्ल मार्क्स.
वा ! कसला तोंपासु फोटो आहे
वा ! कसला तोंपासु फोटो आहे !
नेहमीच्या पाकृला लाजवाब पद्धतीने सादर केलेय.. सहीच
काय अप्रतिम देखणे फोटो आहेत!
काय अप्रतिम देखणे फोटो आहेत! करीचा रंग लाजवाब!
शेवटच्या फोटोत वाढायचा चमचा नसता तर फोटो जास्तच आवडला असता.
अप्रतिम फोटो! >>शेवटच्या
अप्रतिम फोटो!
>>शेवटच्या फोटोत वाढायचा चमचा नसता तर फोटो जास्तच आवडला असता.>> +१
वाह. मस्तच. ते शेवटच्या फोटोत
वाह. मस्तच.
ते शेवटच्या फोटोत चौकोनी काय आहे? नान?
आहा ..
आहा ..
फोटो सुंदर. आणि शिवाय मस्त
फोटो सुंदर. आणि शिवाय मस्त रेसिपी. नक्की करून बघणार.
मस्तच! काय फोटो आहेत.
मस्तच!
काय फोटो आहेत.
याला म्हणतात प्रेझेंटेशनचे
याला म्हणतात प्रेझेंटेशनचे फुल्ल मार्क्स.>>अनुमोदन
मस्त तोंपासू
मस्त
तोंपासू
ते शेवटच्या फोटोत चौकोनी काय
ते शेवटच्या फोटोत चौकोनी काय आहे? नान? << रुमाली रोटी दिसते आहे
मस्त फोटो. चिकन पेक्शा मला रोटी जास्त आवडली :))
मस्तं !
मस्तं !
भारी. शेवटचा फोटो खतरा एकदम.
भारी. शेवटचा फोटो खतरा एकदम.
फोटो फारच मस्त. झकास
फोटो फारच मस्त. झकास प्रेझेंटेशन.
मस्त फोटो. शेवटचा खास आहे. ती
मस्त फोटो. शेवटचा खास आहे. ती चौकोनी भाकरी आहे का? (भाकरी असेल तर त्याला गावरान थाटच हवा, विदेशी नको)
रोटी दिसतेय ती. तुमचा ब्लॉग
रोटी दिसतेय ती.
तुमचा ब्लॉग अगदी पहिल्या पोस्टीपासून चाळला. कबाब वगळता सगळ्या पाककृती आणि फोटो प्रचंड आवडले.
शेवट्चा फोटो एकदम कातिल..
शेवट्चा फोटो एकदम कातिल..
तुमच्या ब्लॉगचं नाव काय? फोटो वर नाव आहे तोच का?
वॉव, एकद्म मस्त ! तुमच्या
वॉव, एकद्म मस्त ! तुमच्या ब्लॉगवरुन वाटते तुम्ही प्रोफेशनल शेफ आहात.
करीचा रंग खलास आहे एकदम !!
करीचा रंग खलास आहे एकदम !!
चिकन मॅरिनेट नाही करायचं का?
ती चौकोनी भाकरीच असावी..तांदुळाची, उकडीची. पण भाकरी गोलच हवी, ब्वा
शेवटच्या फोटोतल्या चमच्याबद्दल मृण्मयी +१
ते शेवटच्या फोटोत चौकोनी काय
ते शेवटच्या फोटोत चौकोनी काय आहे? नान?>>>>>>>>>>>>>>>>>>>>भाकरी आहे ती ,मिनि-कढाई मस्त आहे !!
शेवटचे दोन फोटो खत्तरनाक
शेवटचे दोन फोटो खत्तरनाक आहेत... अगदी तोंडात बोटं घालून शिट्ट्या माराव्याश्या वाटल्या.
तो सर्विंग बोल कसला भारी आहे... खूपच सुंदर!
हे असं काही पाहिलं की वाटतं नोकरी-बिकरी सोडून रोज वेगवेगळ्या ग्रूपला घरी जेवायला बोलवावं आणि सुंदर सुंदर पदार्थ रांधून अश्या सुंदर सुंदर भांड्यांतून त्यांना जेवायला वाढावेत.
सगळ्यांचे खुप खुप धन्यवाद.
सगळ्यांचे खुप खुप धन्यवाद.

हो ती पांढरी भाकरीच आहे. तांदुळाची भाकरी. मला जरा वेगळे presentation करायचे होते, म्हणुन तशाप्रकारे भाकरी serve केली आहे. serving plate हि rectangular होती, भाताची मुद ही गोलाकार आहे, म्हणुन मग असा विचार केला.
मला पण मान्य कि भाकरी गोलच हवी पण presentation साठी केले.
http://fooddreamers.blogspot.sk/
हि माझ्या ब्लॉगची लिंक आहे. मी काही प्रोफेशनल शेफ नाही. मला कुकिंग, बेकिंग खुप आवडते. त्यामुळे वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करत असते.
चिकन मॅरिनेट नाहि केले. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही ते नक्कीच करु शकता.
serving bowl आणि तो wooden spoon हे actually Hungary ची फेमस रेसिपी "गुलाश" (बटाटे, टोमॅटो, बीफ आणि हंगेरियन चिली वापरुन बनवलेले सुप) serve करण्यासाठी वापरले जाते. मी ते आपल्या चिकन करी साठी वापरले आहे.
मृणाल, तुमच्या रेसिपीचे फोटो
मृणाल, तुमच्या रेसिपीचे फोटो एकदम प्रो असतात. बाकी मी रेसिपीज केल्या नाहीत तर फोटोंसाठी तुमच्या रेसिपीज वाचते.
फोटो सुंदर.. मस्त रेसिपी
फोटो सुंदर.. मस्त रेसिपी
सुंदर फोटो. पण खडे मसाले न
सुंदर फोटो. पण खडे मसाले न भाजता वापरल्याने उग्र चव येत नाहि का?
आशु... अजिबात उग्र चव येत
आशु... अजिबात उग्र चव येत नाही. तसेही आपण ते वाटण नंतर तेलावर चांगले परतुन घेतो. त्यामुळे काहि वाटत नाहि.
वा खासच अगदी. मी चिकन खात
वा खासच अगदी. मी चिकन खात नाही पण रेसिपी फारच तोंपासु आणि सोप्पी आहे
फोटो खासम खास
मस्त!! फोटो तर फारच छान!!
मस्त!! फोटो तर फारच छान!!
Pages