चिकन करी

Submitted by मृणाल साळवी on 30 November, 2014 - 07:49
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चिकन - १/२ किलो
कांदा - १ मोठा
टोमॅटो - २
सुके खोबरे - १/२ वाटी किसलेले
लसुण - ३-४ पाकळ्या
आले - १ इंचाचा तुकडा
दालचिनी - १ छोटा तुकडा
काळि मिरी - ४-५
लवंग - २-३
धने - १ चमचा
हिरवी विलायची - २
हळद - १/२ चमचा
लाल तिखट - २ चमचे
गरम मसाला - १/२ चमचा
घरचा मसाला - १ चमचा
तेल - ३-४ चमचे
मिठ चवीनुसार
कोथिंबीर - सजावटीसाठी

क्रमवार पाककृती: 

१. चिकन स्वच्छ धुवुन याचे मध्यम आकारात तुकडे करुन घ्यावेत.
२. खालील फोटोत दाखवलेले सर्व पदार्थ मिक्सर मधे एकदम बारीक वाटुन घ्यावेत.

c1

३. कढईत तेल गरम करुन घ्यावे.
४. त्यात वाटलेला मसाला टाकुन तेल सुटेपर्यंत परतुन घ्यावे.
५. मसाल्याला तेल सुटल्यावर त्यात हळद, लाल तिखट, घरचा मसाला, गरम मसाला व धणे पावडर टाकुन निट परतुन घ्यावे.
६. मसाला एकत्र करुन त्यात चिकनचे तुकडे व चवीनुसार मिठ टाकुन निट मिक्स करावे.
७. कढईवर ताटली ठेवुन त्यात थोडे पाणी टाकावे.
८. ५ मिनिटांनी बघितल्यावर चिकनला पाणी सुटले असेल. त्यात तुम्हाला पाहिजे तेवढे अजुन पाणी टाकुन मिक्स करावे व झाकण ठेवुन चिकन शिजु द्यावे.
९. चिकन शिजल्यावर गॅस बंद करावा.
१०. तांदुळाची भाकरी व जिरा राईस सोबत चिकन करी serve करावी.

आशा आहे ही झटपट होणारी चिकन करी तुम्हाला आवडेल.

c2c3c4

वाढणी/प्रमाण: 
२-३ माणसांसाठी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय अप्रतिम देखणे फोटो आहेत! करीचा रंग लाजवाब!

शेवटच्या फोटोत वाढायचा चमचा नसता तर फोटो जास्तच आवडला असता.

ते शेवटच्या फोटोत चौकोनी काय आहे? नान? << रुमाली रोटी दिसते आहे

मस्त फोटो. चिकन पेक्शा मला रोटी जास्त आवडली :))

रोटी दिसतेय ती.

तुमचा ब्लॉग अगदी पहिल्या पोस्टीपासून चाळला. कबाब वगळता सगळ्या पाककृती आणि फोटो प्रचंड आवडले.

करीचा रंग खलास आहे एकदम !! Happy
चिकन मॅरिनेट नाही करायचं का?

ती चौकोनी भाकरीच असावी..तांदुळाची, उकडीची. पण भाकरी गोलच हवी, ब्वा Wink

शेवटच्या फोटोतल्या चमच्याबद्दल मृण्मयी +१

शेवटचे दोन फोटो खत्तरनाक आहेत... अगदी तोंडात बोटं घालून शिट्ट्या माराव्याश्या वाटल्या.

तो सर्विंग बोल कसला भारी आहे... खूपच सुंदर!
हे असं काही पाहिलं की वाटतं नोकरी-बिकरी सोडून रोज वेगवेगळ्या ग्रूपला घरी जेवायला बोलवावं आणि सुंदर सुंदर पदार्थ रांधून अश्या सुंदर सुंदर भांड्यांतून त्यांना जेवायला वाढावेत.

सगळ्यांचे खुप खुप धन्यवाद. Happy
हो ती पांढरी भाकरीच आहे. तांदुळाची भाकरी. मला जरा वेगळे presentation करायचे होते, म्हणुन तशाप्रकारे भाकरी serve केली आहे. serving plate हि rectangular होती, भाताची मुद ही गोलाकार आहे, म्हणुन मग असा विचार केला.
मला पण मान्य कि भाकरी गोलच हवी पण presentation साठी केले. Wink

http://fooddreamers.blogspot.sk/

हि माझ्या ब्लॉगची लिंक आहे. मी काही प्रोफेशनल शेफ नाही. मला कुकिंग, बेकिंग खुप आवडते. त्यामुळे वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करत असते. Happy

चिकन मॅरिनेट नाहि केले. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही ते नक्कीच करु शकता.

serving bowl आणि तो wooden spoon हे actually Hungary ची फेमस रेसिपी "गुलाश" (बटाटे, टोमॅटो, बीफ आणि हंगेरियन चिली वापरुन बनवलेले सुप) serve करण्यासाठी वापरले जाते. मी ते आपल्या चिकन करी साठी वापरले आहे. Proud

मृणाल, तुमच्या रेसिपीचे फोटो एकदम प्रो असतात. बाकी मी रेसिपीज केल्या नाहीत तर फोटोंसाठी तुमच्या रेसिपीज वाचते.

आशु... अजिबात उग्र चव येत नाही. तसेही आपण ते वाटण नंतर तेलावर चांगले परतुन घेतो. त्यामुळे काहि वाटत नाहि.

Pages