चिकन - १/२ किलो
कांदा - १ मोठा
टोमॅटो - २
सुके खोबरे - १/२ वाटी किसलेले
लसुण - ३-४ पाकळ्या
आले - १ इंचाचा तुकडा
दालचिनी - १ छोटा तुकडा
काळि मिरी - ४-५
लवंग - २-३
धने - १ चमचा
हिरवी विलायची - २
हळद - १/२ चमचा
लाल तिखट - २ चमचे
गरम मसाला - १/२ चमचा
घरचा मसाला - १ चमचा
तेल - ३-४ चमचे
मिठ चवीनुसार
कोथिंबीर - सजावटीसाठी
१. चिकन स्वच्छ धुवुन याचे मध्यम आकारात तुकडे करुन घ्यावेत.
२. खालील फोटोत दाखवलेले सर्व पदार्थ मिक्सर मधे एकदम बारीक वाटुन घ्यावेत.
३. कढईत तेल गरम करुन घ्यावे.
४. त्यात वाटलेला मसाला टाकुन तेल सुटेपर्यंत परतुन घ्यावे.
५. मसाल्याला तेल सुटल्यावर त्यात हळद, लाल तिखट, घरचा मसाला, गरम मसाला व धणे पावडर टाकुन निट परतुन घ्यावे.
६. मसाला एकत्र करुन त्यात चिकनचे तुकडे व चवीनुसार मिठ टाकुन निट मिक्स करावे.
७. कढईवर ताटली ठेवुन त्यात थोडे पाणी टाकावे.
८. ५ मिनिटांनी बघितल्यावर चिकनला पाणी सुटले असेल. त्यात तुम्हाला पाहिजे तेवढे अजुन पाणी टाकुन मिक्स करावे व झाकण ठेवुन चिकन शिजु द्यावे.
९. चिकन शिजल्यावर गॅस बंद करावा.
१०. तांदुळाची भाकरी व जिरा राईस सोबत चिकन करी serve करावी.
आशा आहे ही झटपट होणारी चिकन करी तुम्हाला आवडेल.
चौकोनी भाकरी?? ईंट्रेस्टींग
चौकोनी भाकरी?? ईंट्रेस्टींग
याला म्हणतात प्रेझेंटेशनचे
याला म्हणतात प्रेझेंटेशनचे फुल्ल मार्क्स.>>.>> चमचा वगळता एकदम खरंय!
आज सोमवार असुनही चिकन पाहून
आज सोमवार असुनही चिकन पाहून तोंडाला पाणी सुटले.
यम्मी
अमेझिंग फोटो आहेत. आणि रेसिपी
अमेझिंग फोटो आहेत. आणि रेसिपी पण कमी कटकटीची सोपी वाटतेय. मी करणार ह्याच आठवड्यात.
घरचा मसाला म्हणजे कोणता?
मस्त फोटो !
मस्त फोटो !
अप्रतिम फोटो. मी शाकाहारी
अप्रतिम फोटो. मी शाकाहारी असल्याने रेसिपी बद्दल नाही काही सांगु शकत.
भारी फोटो!
भारी फोटो!
अप्रतिम फोटो! एखादा रेसिपि
अप्रतिम फोटो! एखादा रेसिपि बुकात शोभुन दिसेल.
फारच भारी फोटो! चवीला ही छान
फारच भारी फोटो! चवीला ही छान असेलच.
याला म्हणतात प्रेझेंटेशनचे
याला म्हणतात प्रेझेंटेशनचे फुल्ल मार्क्स. >> +१ ब्लॉग वरच्या रेसिपीज्बद्दलपण हेच म्हणता येईल.
मस्त फोटो! याला म्हणतात
मस्त फोटो!
याला म्हणतात प्रेझेंटेशनचे फुल्ल मार्क्स. >> +१
चौकोनी भाकरी??
चौकोनी भाकरी?? ईंट्रेस्टींग>>>>>>> >> ती रुमाली रोटी आहे.
बुवा! भाकरीच आहे,
बुवा! भाकरीच आहे, रेसीपीकर्तिनेच सान्गितलय तस..
गै मेरी भेंस पानी मे. धन्यवाद
गै मेरी भेंस पानी मे. धन्यवाद प्राजक्ता. सॉरी अंजली१२.
मी केव्हाचा डोळ्यात बदाम आणून बघतोय त्या फोटो कडे. बाकी डिटेल्स नीट वाचले नाहीत.
वैद्यबुवा डोळ्यात बदाम आणून
वैद्यबुवा डोळ्यात बदाम आणून
(No subject)
मला ती चौकोनी रोटी पर्शिअन
मला ती चौकोनी रोटी पर्शिअन ब्रेड (रोटी) सारखी वाटली :).
चिकन ज्यात केले आहेत ते तर
चिकन ज्यात केले आहेत ते तर आमचे हंगेरीचे बोग्राच ज्यात गुयाश बनवतात. तो लाकडी चमचा पण सेंत एन्द्रेच्या दुकानातून आणलेला दिसतोय
फोटो भारी आहेत!! पाकृ पण सोपी
फोटो भारी आहेत!!
पाकृ पण सोपी वाटत्येय. .. करुन बघण्याच्या पदार्थांच्या यादीत अॅडते
ती भाकरी - लवाश ब्रेड सारखी वाटत्येय.
व्वा मृणाल.... भारी दिसते आहे
व्वा मृणाल....
भारी दिसते आहे हे प्रकरण...
पुढच्या वेळी भारतात याल तेव्हा तुमच्या सगळ्या रेसिप्या खायला सह-परिवार येणार
हो टण्या, मी वरती लिहले पण
हो टण्या, मी वरती लिहले पण आहे. बुडापेस्ट वरुनच आणले आहे ते बाऊल आणि तो चमचा. बुडापेस्टला तो मार्केट हॉल आहे ना.. तिथुन.
ती रुमाली रोटि नाहि किंवा ब्रेडही नाहि. ती भाकरीच आहे. Presentation साठी square shape मधे serve केली आहे.
प्रसन्न सर, नक्की.
तोंपासु, सर्व फोटो कातिल आणि
तोंपासु, सर्व फोटो कातिल आणि खुप सुंदर प्रेझेंटेशन.
पुर्वी श्रावणातच असायचं पण गेल्या काही वर्षापासुन मार्गशिष महिन्यात घरामध्ये मांसाहार मनाई आहे. मार्गाशिष महिन्याच्या सुरूवातीला ही पाककृती दिल्याबद्दल आणि त्याहीपेक्षा असे सुंदर फोटो डकवुन आत्म्याची तगमग वाढवल्याबद्दल णिषेढ!!!:दिवा:
खायच्या खाय खत्तर्रनाक...
खायच्या खाय खत्तर्रनाक... खल्लास!
हे असे समोर ठेवले तर खायचे सोडून अर्धातास बघतच बसेन
वॉव, काय सुंदर फोटो आहेत..
वॉव, काय सुंदर फोटो आहेत.. शाकाहारी असून चाखून बघावीशी वाटतेय डिश
जबरी फोटो आणी प्रेझेन्टेशन!
जबरी फोटो आणी प्रेझेन्टेशन! फोटो अप्रतीम आलेत एखाद्या प्रोफेशनल फोटोग्राफर ने काढल्यासारखे. कोणता कॅमेरा आहे ग मृणाल?
मी पण खात नाही, तरीही इतके सुबक आणी सुन्दर पद्धतीने सजवलेले पाहुन कौतुक वाटले.:स्मित:. भाकरी तर नजर लागण्यासारखी आहे.
खुप सुंदर फोटो आहे. तो चमचा
खुप सुंदर फोटो आहे.
तो चमचा मात्र एकदम ऑड वन आऊट झालाय. त्याऐवजी दुसरा एखादा चमचा हवा होता , किंवा नसता तरी चाललं असतं.
मंजूडी, कधी येऊ ते सांग
सावली नोकरी सोडून करण्याचे
सावली
नोकरी सोडून करण्याचे उद्योग असं लिहिलं आहे मी
सगळ्यांना थँक्स रश्मी.. अगं
सगळ्यांना थँक्स
रश्मी.. अगं मी कुकिंग करते आणि नवरा फोटो काढतो. त्याचा कॅमेरा, Nikon D7000 आणि ह्या फोटोंसाठी त्याने 2 lenses वापरल्या आहेत. - 18-105 mm आणि 1.8 D 50 mm
सावली, अगं हो.. तो चमचा खाली ठेवायला पाहिजे होता. पण हे नंतर फोतो काढल्यावर समजले. नेक्स्ट टाईम लक्षात ठेवेल.
आज ही करी पनीर वापरून केली.
आज ही करी पनीर वापरून केली. मस्त चव आली व रंगही फर्मास. एकदम सोपी रेसिपी आहे त्यामुळे जास्त आवडली.
पनीरला दही + गरम मसाला + मीठ + मिरपूड व किंचित हळद लावून वीस मिनिटे मॅरिनेट केले. नंतर बाकीची कृती. मसाला मुरावा म्हणून जेवणाअगोदर तास दीड तास करी बनवली. जेवायची पानं घेईपर्यंत छान मुरला होता मसाला. करीला आयत्या वेळी एक चटका दिला. वरून लिंबू पिळणे (माझ्यासाठी) मस्ट होते. तरी हायहुई करत खाताना मजा आली.
मृणाल, धणे पावडर वापरली नाही. कोरड्या मसाल्यात वापरलेले धणे पुरेसे वाटले. परंतु चवीत काही कमतरता जाणवली नाही.
अरे वा.. अरुंधती ताई...थँक्स
अरे वा.. अरुंधती ताई...थँक्स तुला रेचिपी आवडल्या बद्द्ल. मी पण कधी अजुन पनीर वापरुन ट्राय नाहि केली. आता एकदा ट्राय करते ते पण..
Pages