आधुनिक सीता - ३०

Submitted by वेल on 19 November, 2014 - 01:20

भाग २९ - http://www.maayboli.com/node/49170

***********************************

"व्हाय डू यु क्राय ऑल टाईम? डिड यु ईट? डिड यु हॅव युर ज्युस? काण्ट यु स्टे काम अँड क्वाएट? जस्ट बिकॉज ऑफ यु अ‍ॅम आन्सरिंग सो मेनी पीपल." फातिमाला एवढं चिडलेलं मी कधीच पाहिलं नव्ह्तं. आणि तिला इतकं व्यवस्थित इंग्लिश बोलताना मी कधीच ऐकलं नव्हतं. त्यानंतरही ती काही वेळ स्वतःशीच काही तरी बोलत होती.

**********************************

हे काय चाललं होतं माझ्यासोबत. आजवर तुटकं फुटकं इंग्लिश बोलणारी फातिमा आज एकदम अ‍ॅक्सेंटॅड आणि ङ्रॅमॅटिकली करेक्ट इंग्लिश बोलत होती म्हणजे, म्हणजे नक्कीच माझ्याशी काही तरी वेगळाच गेम खेळला जात होता. माझ्यापासून गोष्टी लपवल्या जाणं साहजिक होतं पण एवढं नाटक? का? बराच वेळ हुंदके देण्याचं आणि मग शंत होण्याचं नाटक केल्यानंतर शांत होण्याचं नाटक करावं लागलं कारण तोवर खरच माझ्या ह्या परिस्थितीमुळे आणि घरच्यांच्या आठवणीमुळे मला रडायला आलं होतं. जेनी माझ्यासोबत बोलत नव्हती कदाचित फातिमा समोर माझ्याशी ती काही बोलू शकत नव्हती पण माझा हात हातात घेऊन बसली होती.

थोड्या वेळाने फातिमाला मोबाईलवर कोणाचा तरी फोन आला. मी तिच्याकडे मोबाईलसुद्धा प्रथमच पाहात होते. ती कोणाशीतरी तिच्या भाषेत अखंड बडबड करत होती. मग थोड्या वेळाने तिने माझ्याकडे पाहिलं माझे डोळे रडून लाल झाले असावेत आणि चेहर्‍यावरही अश्रू सुकले होते. ती फोनवर बोलतच माझ्या जवळ आली आणि तिने लहान मुलाला जवळ घ्यावं तसं मला जवळ घेतलं आणि तिच्याही डोळ्यातून दोन अश्रू ओघळले. अर्थात तिच्या मेकपला खराब न करता, हे मला नंतर जेनीने सांगितलं. आणि तशीच फोनवर बोलत बोलत फातिमा रूमच्या बाहेर गेली.

जेनी मला कुजबुजत्या स्वरात म्हणाली "वी काण्ट टॉक मच विथ ईच अदर. समवन मे हियर अस. इट लुक्स समथिंग इज हॅपनिंग अ‍ॅज वी प्लाण्ड अँड वॉण्टेड. बट अगेन डोण्ट शो एनी हॅपीनेस ऑन युर फेस."
आणि आम्ही काही न बोलता अशाच बसून राहिलो.

थोड्या वेळाने रफिक स्वतः तिथे आला. जेनी समोर आहे नाही ह्याचा विचार न करताच तो बोलू लागला. "सुनिता, एक मोठा प्रॉब्लेम झालाय ग. आपल्या बेबीला काही प्रॉब्लेम नव्हताच आणि त्या बेबीमुळे तुलाही काही प्रॉब्लेम होणार नव्हता. कोणी तरी हॉस्पिटलच्या मशिनरी मध्ये आणि रेकॉर्डस मध्ये काही तरी प्रॉब्लेम केला आहे ज्यामुळे सोनोग्राफीमध्ये असं दिसलं की तुझ्या जीवाला धोका आहे बाळामध्ये काही जन्मतःच दोष असणार आहे म्हणून आपल्याला हे बेबी अ‍ॅबॉर्ट करावं लागलं आणि फक्त तुझंच नाही तर तुझ्या सोबतच्या तीन बायकांचा असाच प्रॉब्लेम झालाय. फक्त त्यांचं अ‍ॅबॉर्शन केलं नव्हतं तर ते प्लान केलं होतं पण त्यांनी दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये पुन्हा चेकप्स करून घेतले. त्यात रिपोर्ट्स नॉर्मल आले. मग कोणीतरी कंप्लेंट केली आणि आता हेल्थ मिनिस्ट्रीने रेड टाकली आहे. हॉस्पिटलचं नाव बदनाम होतय. आम्ही सगळे त्याच टेन्शन मध्ये आहोत. हॉस्पिटल बंद होऊ शकतं आणि आम्ही सगळे जेलमध्ये जाउ शकतो. मी, फातिमा, फातिमाचा भाऊ. माझे अब्बू. मला काही सुचत नाहीये काय करावं कोणी केलं असेल हे. कसं केलं असेल. सोनोग्राफी यंत्रात असे बदल करणं शक्य नसतं. आणि तरी हे असं... कॅमेरा फूटेज सुद्धा पाहिलं त्या सोनोग्राफि यंत्राशी कोणी छेडखानी केली दिसतच नाही आहे. पण कोणी तरी नक्की काही तरी केलं आहे. आणि खूप सेन्सिबली केलं आहे. आमच्या कॉम्पिटिटर हॉस्पिटलने केलेलें असू शकतं. तसंच असेल कारण हे सगळं करून वर हेल्थ मिनिस्ट्रीला कळवून त्यांनी हेही कळवलय की इंडियन ओरिजिनच्या बाईला मूल होऊ नये म्हणून आमच्या हॉस्पिटलने हे कारस्थान रचलय. इंडियन ओरिजिनच्या बाईला म्हणजे तुला." आणि तो डोकं धरून बसला.

"रफिक, रफिक माझं बाळ कोणीतरी कारस्थान करून... ओह नो... " मी संधीचा फायदा उचलला. जेनी माझ्या समोर रफिकच्या पाठी उभी होती तिने मला हलकेच डोळा मारला. मला आश्चर्य वाटले. म्हणजे हे करण्यात जेनी आणि माझ्या घरच्यांचा हात होता तर.

"रफिक, तुला काही होणार नाही ना? आणि फातिमाला, तिला का तुरुंगात जावं लागेल? आणि तुझ्या अब्बूला का ? आणि माझ्या इंडियन ओरिजिनचा काय संबंध?"

"नको ग इतके प्रश्न विचारू. मी इथे आधीच त्रासलोय आणि तुझे प्रश्न.."
"अरे असं काय करतोस, एकतर माझी काही चूक नसताना माझं बाळ गेलं आणि तुम्हा सर्वांची काळजी वाटून काही विचारलं तर मलाच ओरडतोस?" असं म्हणून मी मुसमुसु लागले. जेनी लगेच पुढे आली, "सर सर प्लीज डोंट लेट हर क्राय. इट विल अफेक्ट हर हेल्थ. इट मे अफेक्ट हर माईण्ड ऑल्सो. सर प्लीज."

रफिकने जेनीकडे रागाने पाहिलं आणि तो तिला म्हणाला, "गेट आऊट, टिल ई कॉल यु इन स्टे आऊट." जेनीला आता बाहेर जावच लागलं. रफिक पुन्हा डोकं धरून बसला. माझं मुसमुसणं चालूच होतं. देवाचे धन्यवाद की ह्या अशा सगळ्या परिस्थितीतसुद्धा त्याने माझी विचारशक्ती जागृत ठेवली होती. परिस्थितीचा फायदा करून घ्यायचा हे लक्षात आलं होतं. पण माझ्या रडण्याच्या आवाजाला कंटाळून का कोण जाणे, रफिकने माझ्या जवळ येऊन माझ्या खूप जोरात थोबाडीत मारली. ओठातून रक्त येईल इतकी जोरात. मी अवाक झाले. असं त्याला व्हायोलण्ट होताना कधीच नव्हतं पाहिलं. "साली ती सुनिता आयुष्यात आली आणि माझं इंजिनियरिंग अर्धवट राहिलं भारतातलं. तिच्यासारखी दिसणारी तू आयुष्यात आलीस आणि माझं हॉस्पिटल बंद पडायला आलं तुझा तो नवरा काय ब्लॅक मॅजिक करूप्न गेलाय देव जाणे माझा मेडिकल एक्विपमेण्टस चा धंदा तो स्लो झालाय. असं वाटतं तुझा गळा दाबून जीव घ्यावा. पण आत्ता असं केलं तर अजून इन्क्वायरी अजून प्रॉब्लेम्स. हे सगळं थंड होऊ दे मग बघतो तुझ्याकडे." रागाने त्याचे डोळेही लाल झाले होते. कोणत्याही क्षणी तो माझा गळा दाबेल असे वाटत होते. पण सुदैवाने तो बाहेर निघून गेला.

रफिक बाहेर गेल्याक्षणी जेनी आत आली. माझ्या ओठावरचे रक्त पाहून आणि गालावरचे वळ पाहून ती काय झाले असेल हे समजून गेली. तिने माझ्या डोक्यावर थोपटल्यासारखे केले, म्हणाली, " एवरीथिंग विल बी ऑल राईट. हॅव फेथ इन गॉड."

क्रमशः

पुढील भाग :- http://www.maayboli.com/node/52689

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे हा भाग. आवडला.

पण आता असे लहान भाग न टाकता लौकर संपवली तर बरे.

"आधुनिक" सीता म्हटल्यावर ती स्वतःची सुटका स्वतःच करेल असे वाटलेले पण अजुन तरी ती स्वतः हातपाय हलवताना दिसत नाहीय.

पुढचा भाग सुद्धा टाकेन लवकरच>>>> भाग नाय वो आता कथा करा लवकर अपडेट Happy
नक्की कुठे सुत्रे हलली ते वाचायला आवडेल.

हुश्श !!

गाडी हलली बाबा सिते ची !!
वल्लरी ताई आता येऊ दे जोमात...
ते रफिक बेणं असे व्हायोलण्ट होईल वाट्लेच होते...नावाला जागला हो आपल्या Wink

वेलताई,
इतकं आदळ आपट करत कथा पुढे रेटण्यापेक्षा, एकदाची संपली म्हणून जाहीर करुन टाका.

वाचक म्हणून कढ काढून काढून किती काढायची.

हद्द झाली यार.

-------

त्या नंदिनीताई पण असच त्रास देतात. एक कथा दोन-तीन वर्ष रेटतात.

कधी???

Pages