बिट्टे ( बिबटे नाही :D )

Submitted by टीना on 13 November, 2014 - 07:26
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी असल कि वाणावाणाच खायला असत .. खरा प्रॉब्लेम सुरु होतो पुण्यात रुमवर / फ्लॅटवर आल्यावर ..
रोज तीच ती भाजी पोळी बनवायची आणि पोटात ढकलायची .. वनवास नुसता ..
काल खुप म्हणजे खुप्पच जीवावर आल पोळी भाजी खायच .. सारखी माबोवरच्या पाक़कृती शोधतेय कि अरे कुछ तो मिल जाये पण डोक्यात आईच्या हातचे बिट्टे च होते ..
मग काय , हर हर महादेव म्हणत लागली कामाला ..

यासाठी काय लागत ते पाहुया :

बिट्टे तयार करायला :

कणिक - २ वाट्या
जीरेपूड - अर्धा चमचा
तेल - १ चमचा मोहन आणि तळण्यासाठी
मीठ - चवीप्रमाणे

फोडणीच्या वरणासाठी :

तुरडाळ - अर्धी वाटी
१ कांदा , ७ ते ८ लसुण पाकळ्या , अर्धा चमचा जीरं , ४ ते ५ हिरव्या मिरच्या या सर्वांची पेस्ट
१ टमाटर
गोडलिंबाची एक काडी ( कढीपत्ता )
सांभार ( कोथिंबीर )
किसलेल सुकं खोबरं
चिंचेचे बुटुक - २
धणेपूड - अर्धा चमचा
तिखट - १ चमचा
हळद - पाव चमचा
मीठ - चवीनुसार

क्रमवार पाककृती: 

बिट्ट्यांसाठी :

कणिक घट्ट मळुन घ्या ..
पोळपाटावर लाटुन घ्या आणि परत त्याला रोल करा ..
कुकर मधे खाली डाळ मांडा .. त्यावर झाकण ठेवुन लाटलेल्या पोळीचे रोल त्यावर ठेवा .

३ शिट्ट्या होऊ द्या आणि गॅस बंद करा .
ते वाफवलेले रोल असे दिसतील .

DSC03324.JPG

त्याचे खालीलप्रमाणे काप करा ..

DSC03326.JPG

कढईत तेल गरम करा अ त्यात हे काप खरपुस तळा ..

DSC03327.JPG

फोडणीच्या वरणासाठी :

भांड्यात तेल गरम करावे.
मोहरी जीरे तडतडल्यावर त्यात कांदा लसणाची पेस्ट टाकावी .
धणेपूड , हळद , तिखट त्यानंतर मीठ टाकावे .
बारीक चिरलेला टमाटर टाकावा .
टमाटर शिजला कि किसलेल खोबरं , चिंचेचे बुटूक टाकून मग वरण टाकाव ..
त्यात १ वाटी पाणी टाकून २ ते ३ मिनीटं शिजु द्याव .. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी .

DSC03328.JPG

वाढणी/प्रमाण: 
दोघांना पुरेल एवढे
अधिक टिपा: 

वरणासोबत कुस्करुन खावे .. टोस्ट सारखे चहात बुडवून खाऊ नये Lol
हे बिट्टे कुस्करुन त्यात गुळ आणि तुप टाकून सुद्धा खुप खुप मस्त लागतात ..

माहितीचा स्रोत: 
माझी आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम नविनच आहे ही संकल्पना. मस्त वाटताहेत. वरणफळांचा जरा सुधृढ भाऊ दिसतोय.

फोटो कातिल आलेत.

एक सुचना करू का? छापील कागदावर ( वर्तमानपत्रे, मासिके यांचे कागद) तळलेले पदार्थ काढणे टाळावे. शाईत घातक द्रव्ये असतात. त्यापेक्षा टिश्श्यू पेपरावर काढावे.

शीर्षकातच शीर्षकाचा खुलासा केला हे बरे झाले. Lol

छापील कागदावर ( वर्तमानपत्रे, मासिके यांचे कागद) तळलेले पदार्थ काढणे टाळावे. शाईत घातक द्रव्ये असतात. त्यापेक्षा टिश्श्यू पेपरावर काढावे.>>> अगदी बरोबर. शिवाय टिश्यू पेपर अतिरिक्त तेलही शोषुन घेतात.

मामी >> धन्यवाद सुचनेसाठी .. खरच माहिती नव्हत .. Happy रुमवर असल कि सगळी सारवासारव चालते ..

प्रिती विराज , रश्मी , आशिका >> आभार ..

टिना फोटो कातिल आहे सगळे म्हणाले त्या प्रमाणे.

शेवटच्या फोटो त त्या स्टिलच्या उथळ ताटलित काय आहे? ज्यात चमचा आहे Uhoh
ते जास्ती इन्व्हायटिंग आहे

यम्मी! आई शॅलोफ्राय करते बिट्टे. तुपात केल्यास लैच भारी Happy
गुळतूपवाले बिट्टे! क्या याद दिला दी.. आता काहीतरी गोड शोधावे लागेल घरात Happy

दक्षिणा >>
शेवटच्या फोटो त त्या स्टिलच्या उथळ ताटलित काय आहे? ज्यात चमचा आहे >> गुळतूपवाले बिट्टे!

सर्वांचे आभार .. Happy

मी बट्या खाल्ल्यात ४-५ वेळा, जळगाव कडचा पदार्थ. तळलेल्या बट्या मिक्सरमधुन बारीक करतात. कणिक जाड दळुन आणतात. तुमची सोपी आवृत्ती आवडली.

मस्तच आहे बिट्टे.पण खरच एक प्रश्न विचारु? हे वरणात कुस्करुन टाकायचे की कुस्करुन वरण वर ओतायचे. हा विनोद नाहीये.

बिबटे पण आहेत असच लिहायला पाहिजे होतं ते पण बघायला गर्दी होतेच की . Wink Happy

टिना उगिच विचारलं तुला त्यात काय आहे ते. आधी फोटो पाहून अर्धा जीव गेला होता. आता पूर्ण गेला.
अगं कुठं फेडशिल हे पाप असले फोटो टाकतेस. खाऊ घालत नाहीस. कधी घालतेस सांग.
मी पुण्यातच आहे. Proud

टीना, मस्त फोटो आहे. पाककृती छान आहे. चपाती आवडत नाही त्यामूळे हा प्रकार नक्की करून बघेन. Happy
आता तुझ्या पुण्याच्या घरी गटगला येण्यासाठी तिघीजणी तयार आहेत + ६ हात तूला मेंहदी काढायला मिळतील. कधी ठरवते आहेस गटग???? Proud

टीना धन्स. फोन व पीसी धड बोलेनात एकमेकांशी त्यामुळे ही रेसीपी टाकायची रहातेय. कनेक्ट झाले की मी पण स्टेप बाय स्टेप काढलेले फोटो टाकते.

प्रोसेस अगदी सेम फक्त कणकेत आम्ही थोडा रवा मिसळतो. मोहन घालत नाही. व जिर्‍याबरोबर ओवा पण घालतो. बट्ट्या (हो हाच शब्द आहे आमचा Happy ) तुपात तळतो. त्या वाफवलेल्या असतात. तशाच खाता येतात पण तळलेल्या म्हणजे तोंपासु. आणि त्या फार तुप शोषत नाहीत. त्यामुळे टेन्शन घेत खायचे नाही. Wink

ह्या साधे वरण + तुप + लिंबु रस घालुन खायचे सुख आह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हा. गोड आवडणारे बट्टी + गुळ + तुप खातात.

मुख्य म्हणजे ह्या उरतील अशाच करायच्या अन दुसर्‍या दिवशी नाश्ता बट्टी + चटणी (कोणतिही) + त्यावर तेलाची धार असे खायचे.

Pages