बिट्टे ( बिबटे नाही :D )

Submitted by टीना on 13 November, 2014 - 07:26
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी असल कि वाणावाणाच खायला असत .. खरा प्रॉब्लेम सुरु होतो पुण्यात रुमवर / फ्लॅटवर आल्यावर ..
रोज तीच ती भाजी पोळी बनवायची आणि पोटात ढकलायची .. वनवास नुसता ..
काल खुप म्हणजे खुप्पच जीवावर आल पोळी भाजी खायच .. सारखी माबोवरच्या पाक़कृती शोधतेय कि अरे कुछ तो मिल जाये पण डोक्यात आईच्या हातचे बिट्टे च होते ..
मग काय , हर हर महादेव म्हणत लागली कामाला ..

यासाठी काय लागत ते पाहुया :

बिट्टे तयार करायला :

कणिक - २ वाट्या
जीरेपूड - अर्धा चमचा
तेल - १ चमचा मोहन आणि तळण्यासाठी
मीठ - चवीप्रमाणे

फोडणीच्या वरणासाठी :

तुरडाळ - अर्धी वाटी
१ कांदा , ७ ते ८ लसुण पाकळ्या , अर्धा चमचा जीरं , ४ ते ५ हिरव्या मिरच्या या सर्वांची पेस्ट
१ टमाटर
गोडलिंबाची एक काडी ( कढीपत्ता )
सांभार ( कोथिंबीर )
किसलेल सुकं खोबरं
चिंचेचे बुटुक - २
धणेपूड - अर्धा चमचा
तिखट - १ चमचा
हळद - पाव चमचा
मीठ - चवीनुसार

क्रमवार पाककृती: 

बिट्ट्यांसाठी :

कणिक घट्ट मळुन घ्या ..
पोळपाटावर लाटुन घ्या आणि परत त्याला रोल करा ..
कुकर मधे खाली डाळ मांडा .. त्यावर झाकण ठेवुन लाटलेल्या पोळीचे रोल त्यावर ठेवा .

३ शिट्ट्या होऊ द्या आणि गॅस बंद करा .
ते वाफवलेले रोल असे दिसतील .

DSC03324.JPG

त्याचे खालीलप्रमाणे काप करा ..

DSC03326.JPG

कढईत तेल गरम करा अ त्यात हे काप खरपुस तळा ..

DSC03327.JPG

फोडणीच्या वरणासाठी :

भांड्यात तेल गरम करावे.
मोहरी जीरे तडतडल्यावर त्यात कांदा लसणाची पेस्ट टाकावी .
धणेपूड , हळद , तिखट त्यानंतर मीठ टाकावे .
बारीक चिरलेला टमाटर टाकावा .
टमाटर शिजला कि किसलेल खोबरं , चिंचेचे बुटूक टाकून मग वरण टाकाव ..
त्यात १ वाटी पाणी टाकून २ ते ३ मिनीटं शिजु द्याव .. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी .

DSC03328.JPG

वाढणी/प्रमाण: 
दोघांना पुरेल एवढे
अधिक टिपा: 

वरणासोबत कुस्करुन खावे .. टोस्ट सारखे चहात बुडवून खाऊ नये Lol
हे बिट्टे कुस्करुन त्यात गुळ आणि तुप टाकून सुद्धा खुप खुप मस्त लागतात ..

माहितीचा स्रोत: 
माझी आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दक्षिणा , रीया , आरती >> लगातार २ ४ एक्झाम आहेत त्या आटोपल्या कि मग Proud

धन्यवाद सर्वांचे Happy

मुक्तेश्वर कुळकर्णी >> बाफळे / बाफले वेगळे .. निदान माझ्या माहितीनुसार तरी .. मी शेगाव अभियांत्रीकी विद्यालयात होती तेव्हा मेस मधे बनायचे..

येथे रोल करुन घेतला आहे. >> हा रोल करताना पण एकदा आडवा मग तोच गोळा / रोल उभा मग तोच रोल परत आडवा अश्या घड्या घालायच्या. प्रत्येक वेळी पुसटस तेलाच बोट फिरवायचे.

आज मानुषीच्या पध्दतीने बाटी/बाफले केले होते व दाल तुझ्या पध्दतीने. यम्मी झाले पण दालचा रंग .... उप्स

मंजू >>> यावेळेला नव्हत बघायला हवं मी हे ताट .. कसयं नं , दिवेलागनीची वेळ ! लक्ष्मी म्हणते येतो येतो .. मी म्हणते खातो खातो अस झालं ना .. Sad

दालचा रंग .. Proud माझ्या ताटात तो तिखटामूळे असावा शायद .. Wink

चिनूक्स >> नेमक्या रेसीपी मधेच खुप मोठा फरक आहे अस नै का वाटत ?
मी फक्त कणिक वापरते . त्यात मका टाकत नै .. वेगळ अस जाडसर दळून सुद्धा आणत नै .. त्यात भिजवताना दही आणि सोडा पन टाकत नै .. ते ५ ते १० मिनीट मळून पन घेत नै .. लांबसर उंडे करुन तेल घातलेल्या उकळत्या पाण्यात सुद्धा सोडत नै ..आणि खर तर माझ्या दुसर्‍या दिवशी मऊ पन पडत नै ..

हलके घ्या प्लीज .. Happy

बिट्ट्या आमच्या विदर्भातून खानदेशात गेल्या असतील >>> बाकी इथे मात्र तुम्हाला सहमत ..

आणि हो तुमच्या पा़कृ प्रमाणे करुन पाहील एखाद्या दिवशी .. वांग्याच्या भाजीसोबत खाल्ल नै कधीच .. ट्राय करेल Happy धन्यवाद .

मी केले आज बिट्टे. थोडी चिनूक्सची आणि थोडी टीनाची पा.कृ वापरुन.

कणिक भिजवताना ओवा+जिरे घातले. आणि पोळीचा रोल करुन उकळत्या पाण्यात वाफवले. वरण मात्र टीनाचेच. आधी एकदा नुसतेच वरण करुन भाकरी बरोबर खाउन झाले होते. मस्त चव आहे. मजा आली. धन्यवाद टीना Happy
.

waran - bitte.jpg

टीना, मस्त रेसिपी आणि फोटो. दालबाटीचा धाकटा भाऊ असला तरी बाट्यांपेक्षा आकाराने लहान, घड्या घालून केल्यामुळे खुसखुशीत, त्यामुळे चव जास्त आवडेल असं वाटतंय.

मला आता बिट्टे करुन पाहण्याची भारीच सुरसुरी आलीय. आरती, तुझा फोटो खूप मस्त आलाय. मीही पाण्यात वाफवावे म्हणते. त्यानंतर तू डीप फ्राय केलेस की तुपावर परतलेस ?

आरती, त्या दिवशी साडे-अकरापर्यंत तुझ्या उत्तराची वाट पाहिली त्यानंतर दोन दिवस मायबोलीवर आलेच नाही त्यामुळे आत्ता पाहतेय तुझी पोस्ट Happy
इथे लिहिलं त्यानंतर लगेचच करायला घेतले होते. मग गार झाल्यावर ते तुपावर कुरकुरीत परतले नॉनस्टिक पॅनमध्ये. मस्त झाले होते ! डीप फ्राय केलेले अर्थातच जास्त चांगले लागतील त्यामुळे तसेही करुन बघेन. आमच्याकडे सारखा होणार हा पदार्थ आता. धन्यवाद टीना Happy

मी केलेल्या बिट्ट्यांच्या इतक्या छान घड्या मात्र दिसत नव्हत्या. एकदाच लाटून रोल केला म्हणून असावे का ? की आधी कापून मग उकळत्या पाण्यात सोडले म्हणून असावे ? वरुन कुरकुरीत आणि आतून मुटक्यांसारखे लागले.

मी केलेल्या बिट्ट्यांच्या इतक्या छान घड्या मात्र दिसत नव्हत्या. एकदाच लाटून रोल केला म्हणून असावे का ? की आधी कापून मग उकळत्या पाण्यात सोडले म्हणून असावे ? >>> मी पन एकदाच लाटल्या आहे .. मी वाफवून घेते , उकळत्या पाण्यात नै सोडत ... धन्यवाद

टीना, मी मागच्या रविवारी हे बिट्टे प्रकरण बनवलं होत. OMG, काय अप्रतिम झाले होते...आणि वरण तर अफाट ... फक्त थोडेसे बदल केले होते... बिट्ट्याच्या पीठात कणीक, मक्याचे पीठ आणि रवा घातला होता आणि त्यामुळे खूप खुसखुशीत झाले होते आणि वरणात चिंचेऐवजी आमसुल....फार वेळ शतपावली करावी लागली रविवारी Lol

धन्यवाद तुझे नवीन प्रकारची ओळख करून दिल्याबद्दल.

Pages