घरी असल कि वाणावाणाच खायला असत .. खरा प्रॉब्लेम सुरु होतो पुण्यात रुमवर / फ्लॅटवर आल्यावर ..
रोज तीच ती भाजी पोळी बनवायची आणि पोटात ढकलायची .. वनवास नुसता ..
काल खुप म्हणजे खुप्पच जीवावर आल पोळी भाजी खायच .. सारखी माबोवरच्या पाक़कृती शोधतेय कि अरे कुछ तो मिल जाये पण डोक्यात आईच्या हातचे बिट्टे च होते ..
मग काय , हर हर महादेव म्हणत लागली कामाला ..
यासाठी काय लागत ते पाहुया :
बिट्टे तयार करायला :
कणिक - २ वाट्या
जीरेपूड - अर्धा चमचा
तेल - १ चमचा मोहन आणि तळण्यासाठी
मीठ - चवीप्रमाणे
फोडणीच्या वरणासाठी :
तुरडाळ - अर्धी वाटी
१ कांदा , ७ ते ८ लसुण पाकळ्या , अर्धा चमचा जीरं , ४ ते ५ हिरव्या मिरच्या या सर्वांची पेस्ट
१ टमाटर
गोडलिंबाची एक काडी ( कढीपत्ता )
सांभार ( कोथिंबीर )
किसलेल सुकं खोबरं
चिंचेचे बुटुक - २
धणेपूड - अर्धा चमचा
तिखट - १ चमचा
हळद - पाव चमचा
मीठ - चवीनुसार
बिट्ट्यांसाठी :
कणिक घट्ट मळुन घ्या ..
पोळपाटावर लाटुन घ्या आणि परत त्याला रोल करा ..
कुकर मधे खाली डाळ मांडा .. त्यावर झाकण ठेवुन लाटलेल्या पोळीचे रोल त्यावर ठेवा .
३ शिट्ट्या होऊ द्या आणि गॅस बंद करा .
ते वाफवलेले रोल असे दिसतील .
त्याचे खालीलप्रमाणे काप करा ..
कढईत तेल गरम करा अ त्यात हे काप खरपुस तळा ..
फोडणीच्या वरणासाठी :
भांड्यात तेल गरम करावे.
मोहरी जीरे तडतडल्यावर त्यात कांदा लसणाची पेस्ट टाकावी .
धणेपूड , हळद , तिखट त्यानंतर मीठ टाकावे .
बारीक चिरलेला टमाटर टाकावा .
टमाटर शिजला कि किसलेल खोबरं , चिंचेचे बुटूक टाकून मग वरण टाकाव ..
त्यात १ वाटी पाणी टाकून २ ते ३ मिनीटं शिजु द्याव .. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी .
वरणासोबत कुस्करुन खावे .. टोस्ट सारखे चहात बुडवून खाऊ नये
हे बिट्टे कुस्करुन त्यात गुळ आणि तुप टाकून सुद्धा खुप खुप मस्त लागतात ..
मस्त करुन बघेन
मस्त करुन बघेन
मस्त दिसतायत. हिवाळा आला आणी
मस्त दिसतायत. हिवाळा आला आणी माबोवर दाल बट्ट्यान्ची बहार आली.
मस्तच दिसतायत बिट्टे. मी तर
मस्तच दिसतायत बिट्टे.
मी तर नावही ऐकले नव्हते.
करुन बघायला हवेत.
एकदम नविनच आहे ही संकल्पना.
एकदम नविनच आहे ही संकल्पना. मस्त वाटताहेत. वरणफळांचा जरा सुधृढ भाऊ दिसतोय.
फोटो कातिल आलेत.
एक सुचना करू का? छापील कागदावर ( वर्तमानपत्रे, मासिके यांचे कागद) तळलेले पदार्थ काढणे टाळावे. शाईत घातक द्रव्ये असतात. त्यापेक्षा टिश्श्यू पेपरावर काढावे.
शीर्षकातच शीर्षकाचा खुलासा केला हे बरे झाले.
छापील कागदावर ( वर्तमानपत्रे,
छापील कागदावर ( वर्तमानपत्रे, मासिके यांचे कागद) तळलेले पदार्थ काढणे टाळावे. शाईत घातक द्रव्ये असतात. त्यापेक्षा टिश्श्यू पेपरावर काढावे.>>> अगदी बरोबर. शिवाय टिश्यू पेपर अतिरिक्त तेलही शोषुन घेतात.
मामी >> धन्यवाद सुचनेसाठी ..
मामी >> धन्यवाद सुचनेसाठी .. खरच माहिती नव्हत .. रुमवर असल कि सगळी सारवासारव चालते ..
प्रिती विराज , रश्मी , आशिका >> आभार ..
छान आहे हा प्रकार.. आणि ते
छान आहे हा प्रकार.. आणि ते खास शब्द पण आवडले
छान प्रकार ... खास वर्हाडी
छान प्रकार ... खास वर्हाडी शब्दासह पाकृ आवडली.
भन्नाट पाककृती आहे. शेवटचा
भन्नाट पाककृती आहे. शेवटचा फोटो कातिल!
टिना फोटो कातिल आहे सगळे
टिना फोटो कातिल आहे सगळे म्हणाले त्या प्रमाणे.
शेवटच्या फोटो त त्या स्टिलच्या उथळ ताटलित काय आहे? ज्यात चमचा आहे
ते जास्ती इन्व्हायटिंग आहे
यम्मी! आई शॅलोफ्राय करते
यम्मी! आई शॅलोफ्राय करते बिट्टे. तुपात केल्यास लैच भारी
गुळतूपवाले बिट्टे! क्या याद दिला दी.. आता काहीतरी गोड शोधावे लागेल घरात
छान वाटतेय पा.कृ.
छान वाटतेय पा.कृ.
दक्षिणा >> शेवटच्या फोटो त
दक्षिणा >>
शेवटच्या फोटो त त्या स्टिलच्या उथळ ताटलित काय आहे? ज्यात चमचा आहे >> गुळतूपवाले बिट्टे!
सर्वांचे आभार ..
भारी. बाटी आणि बट्टीचे भाऊबंद
भारी. बाटी आणि बट्टीचे भाऊबंद वाटतात हे बिट्टे.
मस्त दिसतंय. ते वाफवलेलं
मस्त दिसतंय. ते वाफवलेलं प्रकरण सॉसेजेस सारखं दिसतंय.
मस्त! माझ्यासाठी नवीन.
मस्त! माझ्यासाठी नवीन.
मी बट्या खाल्ल्यात ४-५ वेळा,
मी बट्या खाल्ल्यात ४-५ वेळा, जळगाव कडचा पदार्थ. तळलेल्या बट्या मिक्सरमधुन बारीक करतात. कणिक जाड दळुन आणतात. तुमची सोपी आवृत्ती आवडली.
मस्त, वरणाचा रंगही खास
मस्त, वरणाचा रंगही खास दिसतोय.
मस्तच आहे बिट्टे.पण खरच एक
मस्तच आहे बिट्टे.पण खरच एक प्रश्न विचारु? हे वरणात कुस्करुन टाकायचे की कुस्करुन वरण वर ओतायचे. हा विनोद नाहीये.
बिबटे पण आहेत असच लिहायला पाहिजे होतं ते पण बघायला गर्दी होतेच की .
सिनि >> २हि चालते
सिनि >> २हि चालते
टिना उगिच विचारलं तुला त्यात
टिना उगिच विचारलं तुला त्यात काय आहे ते. आधी फोटो पाहून अर्धा जीव गेला होता. आता पूर्ण गेला.
अगं कुठं फेडशिल हे पाप असले फोटो टाकतेस. खाऊ घालत नाहीस. कधी घालतेस सांग.
मी पुण्यातच आहे.
मस्त आहेत.
मस्त आहेत.
वॉव..छानै आहे रेसिपी.. नांव
वॉव..छानै आहे रेसिपी.. नांव पण मस्त आहे..
मामे,' वरणफळांचा जरा सुधृढ भाऊ"...
मस्त
मस्त
मी पण पुण्यातच आहे
मी पण पुण्यातच आहे
छान प्रकार ... खास वर्हाडी
छान प्रकार ... खास वर्हाडी शब्दासह पाकृ आवडली.>>>> +१
वरणाचा रंग एकदम भन्नाट दिसतोय.
मस्त
मस्त
टीना, मस्त फोटो आहे. पाककृती
टीना, मस्त फोटो आहे. पाककृती छान आहे. चपाती आवडत नाही त्यामूळे हा प्रकार नक्की करून बघेन.
आता तुझ्या पुण्याच्या घरी गटगला येण्यासाठी तिघीजणी तयार आहेत + ६ हात तूला मेंहदी काढायला मिळतील. कधी ठरवते आहेस गटग????
टीना धन्स. फोन व पीसी धड
टीना धन्स. फोन व पीसी धड बोलेनात एकमेकांशी त्यामुळे ही रेसीपी टाकायची रहातेय. कनेक्ट झाले की मी पण स्टेप बाय स्टेप काढलेले फोटो टाकते.
प्रोसेस अगदी सेम फक्त कणकेत आम्ही थोडा रवा मिसळतो. मोहन घालत नाही. व जिर्याबरोबर ओवा पण घालतो. बट्ट्या (हो हाच शब्द आहे आमचा ) तुपात तळतो. त्या वाफवलेल्या असतात. तशाच खाता येतात पण तळलेल्या म्हणजे तोंपासु. आणि त्या फार तुप शोषत नाहीत. त्यामुळे टेन्शन घेत खायचे नाही.
ह्या साधे वरण + तुप + लिंबु रस घालुन खायचे सुख आह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हा. गोड आवडणारे बट्टी + गुळ + तुप खातात.
मुख्य म्हणजे ह्या उरतील अशाच करायच्या अन दुसर्या दिवशी नाश्ता बट्टी + चटणी (कोणतिही) + त्यावर तेलाची धार असे खायचे.
इकडे याला बाफळे म्हण्तात. !
इकडे याला बाफळे म्हण्तात. !
Pages